सोमवार, २ जून, २०२५

Elon Musk सुरु करतोय AIRBNB for CARS !

 Elon Musk सुरु करतोय AIRBNB for CARS !


Elon Musk ने नुकताच रोबोटॅक्सी ची घोषणा केली. रोबोटॅक्सी म्हणजे संपूर्णपणे स्वयंचलित टॅक्सी. अगदी ओला/उबर सारखी पण ड्रॉयव्हरशिवाय ! आपण फक्त अँप वापरून टॅक्सी बोलवायची. टॅक्सी येणार, आपण त्यात बसायचं आणि टॅक्सी स्वतःच आपल्याला अपेक्षित ठिकाणी पोहोचवणार !


टेस्ला लवकरच (१२  जूनला सुरु होईल अशा बातम्या आहेत !) एक self-driving कार्सची फ्लीट सुरू करणार आहे.सध्या या गाड्या केवळ टेस्लाच्या मालकीच्या असतील पण लवकरच त्यात ग्राहकांच्या समाविष्ट करून घेतले जाईल.

हो, ग्राहक आपली कार जेव्हा पार्क केलेली असते, तेव्हा ती दुसऱ्या लोकांना वापरायला देऊ शकतील ! जसं AirBNB ने लोकांच्या मोकळ्या real estate साठी बाजारपेठ तयार केली तसंच टेस्ला लोकांच्या पार्किंग उभ्या असलेल्या गाड्यांमधून त्यांना पैसे कमावून देण्याची तयारी करत आहे.



ना ड्रायव्हर, ना Uber सारखी तिसरी अ‍ॅप कंपनी, ना कमिशनचे टक्के. सगळं टेस्लाचंच — हार्डवेअर, सॉफ्टवेअर, पेमेंट्स, डेटा... सगळं!


पण हे फक्त कार्सपुरता मर्यादित नाही — तर ही आहे नवीन जगाची सुरुवात !

AI आता फक्त स्क्रीनवर दिसणारा chatbot राहिलेला नाही.

AI चं पुढचं पाऊल आहे — घरात राहणाऱ्या, रस्त्यांवर फिरणाऱ्या, वस्तू पोचवणाऱ्या, आणि काम करणाऱ्या "फिजिकल AI एजंट्स"चा हा उदय आहे ! AI ला "शरीर"मिळाल्यावर कोणकोणते बदल होऊ शकतात याची कल्पना करा !

ज्यांच्या हातात सर्व गोष्टींचा कंट्रोल आहे — हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क आणि डेटा — त्याच कंपन्या हे नवीन युग घडवणार.

याचीच तयारी म्हणून OPENAI एक device तयार करत आहे. जे वापरून कोणत्याही स्क्रिनशिवाय AI वापरता येईल. कल्पना करा chatgpt ला प्रश्न विचारायचा असेल तर लॅपटॉप किंवा मोबाईल बाहेर काढायची गरजच लागणार नाही !   


थोडक्यात काय तर बिझनेस मॉडेल्स बदलत आहेत. मध्यस्थ निघून जात आहेत. पुढे काय?

आपण आजही अनेक व्यवसाय माणसांवर चालवतो: ड्रायव्हर, एजंट, डिलिव्हरी बॉय…

पण जर ते सगळं AI ने केलं, तर?

मग खरी ‘असेट’ काय असेल?

घर? दुकान? कार?

की… डेटा आणि स्वयंचलित मशीन जे तुम्हाला २४x७ उत्पन्न देऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आणि खास सल्ल्यासाठी सत्फुल सोनवणे यांना 7057573102 या नंबरवर संपर्क करा!  आणि हो, कॉम्प्युटर प्लॅनेट आता व्हॉट्सॲपवर पण आहे! नवीन अपडेट्स, गॅजेट्स, कॅमेरा आणि इतर प्रोडक्ट्सच्या माहितीसाठी आमचा 'computer planet 1.1' व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. लिंक  आहे! "https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi


"एवढंच नाही, तर अजून आकर्षक प्रोडक्ट्स आणि त्यांच्या किंमती व स्पेसिफिकेशन्ससाठी आमचं टेलिग्राम चॅनेल 'spy_planet' https://t.me/spy_planet नक्की जॉईन करा!  खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा!"


 WhatsApp ग्रुप जॉईन करा: https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi

 Telegram चॅनेल: https://t.me/spy_planet

 आमचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी: https://linktr.ee/Satful

AI हे फक्त Silicon Valley किंवा कोडर्ससाठी नाही उरलं.

हे आता सर्वसामान्य माणसासाठी एक नवीन "income stream" बनू शकतं —

जर आपण समजून घेतलं, आणि थोडा पुढचा विचार केला तर !


Elon Musk काय करतोय याचा विचार करा.

पण त्याहून महत्त्वाचं — आपण त्यातून काय शिकतोय याचा विचार करा.

कुठे कुठे मध्यस्थी जाऊन AI च्या साहाय्याने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल का याचा विचार करा ! भविष्यातील संधी तेथेच दडलेल्या आहेत. 


आशा आहे की ही पोस्ट वाचून "टेस्ला कार" पेक्षा "तुमच्या आयुष्यातली गाडी" कुठे चाललीय, याचा विचार कराल.