motivational लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
motivational लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २७ मार्च, २०२३

500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट !

 500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट !


आजपासून साठ वर्षांआधीची गोष्ट. १९६३ साली अमेरिकेतील हार्वे बॉल नावाच्या एका डिझायनर ला त्याच्या एका लोकल क्लाएंट चा फोन आला. या फोनमुळे हार्वे बॉल हे नाव इतिहासात कायमचं कोरलं जाणार होतं.



तो क्लाएंट एक इन्शुरन्स कंपनीचा कर्मचारी होता. त्या कंपनीने नुकताच एक स्पर्धक कंपनीसोबत मर्जर केलं होतं. दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे कर्मचारी एकत्र काम करणार होते. त्यामुळे ऑफिस मधील तणावाचे वातावरण हलके करण्यासाठी त्यांनी हार्वेला काही आनंदी व हलक्याफुलक्या डिझाइन्स बनवायला सांगितल्या. 


फोन ठेवल्यानंतर केवळ 10 मिनिटातच हार्वेने पुढे जाऊन जगप्रसिद्ध झालेले डिझाइन बनविले. एक पिवळ्या रंगाचा गोल आणि त्यावर काळ्या रंगात काढलेले उभट डोळे आणि मोठं स्माईल. तेच चित्र ज्याला आज आपण स्माइली ☺️ म्हणून ओळखतो. या कामाचे हार्वेला 45 डॉलर्स मिळाले. इतिहासातील हा पहिला स्माईली आयकॉन होता.


लवकरच अमेरिकन कल्चर मध्ये हे सोपे आणि तरीहि परिणामकारक स्माईली चिन्ह सर्वत्र दिसू लागले. स्माईली ची लोकप्रियता पाहून अनेकांनी या चिन्हाचा वापर सुरू केला. गिफ्टशॉप चालविणाऱ्या दोघा भावांनी स्माईली चिन्ह छापून त्याखाली Have a nice day असं लिहिलं. त्यांच्या या नव्या गिफ्ट च्या 50 लाख प्रती विकल्या गेल्या. 


हार्वेची ही डिझाईन लाखो डॉलर्स किमतीची होती हे एव्हाना कळले होते. पण हार्वे ने एक चूक केली, त्याने कधीच स्माईली ट्रेडमार्क रजिस्टर केले नाही.


Dear All,
Proudly launching our new brand in SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets
GITO - जिटो
G- guarding (protection)
I- innovative products
T- technology
O- organisation
committed to give you more advanced service & products
regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102

त्यानंतर 8 वर्षांनी 1971 मध्ये जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात फ्रान्स मध्ये एक तरुण पत्रकार आपल्या करिअरची सुरुवात करत होता. फ्रँकलीन लोफरानी असं त्याचं नाव. फ्रान्स-सोयर नावाच्या एका वर्तमानपत्रात सकारात्मक बातम्यांचं एक सदर करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. सकारात्मक बातमीला शोभेल असं स्माईली सारखच दिसणारं एक चिन्ह त्याने वापरलं. हे चिन्ह हार्वे बॉल च्या स्माईली सारखंच होतं. पत्रकार असला तरी फ्रँकलीन चं "उद्योजक" डोकं काम करत होतं. त्याला या चिन्हांची ताकद कळली होती. त्याने लगेचच फ्रेंच ट्रेडमार्क रजिस्टर केलं. त्याकाळी licensing हा प्रकार फारसा नव्हताच. त्यामुळे ट्रेडमार्क रजिस्टर केले तरी आर्थिक फायदा होत नव्हता. काही वर्तमान पत्रांनी स्माईली चिन्ह वापरण्याची तयारी दाखविली आणि त्यासाठी पैसे ही दिले. पण फ्रँकलीन ला मोठ्या प्रमाणावर हे चिन्ह वापरले जावे असं वाटत होते. त्यासाठी तो योग्य संधी शोधत होता. त्या काळात फ्रान्स मध्ये तरुणांमध्ये एक सांस्कृतिक बदलाची चळवळ (Counter - cultural movement) जोर धरत होती. जुने सांस्कृतिक बंधन झुगारून तरुण विद्यार्थी मुक्त प्रेमाची, वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा स्वीकार करत होते. फ्रँकलीन ने हीच संधी साधली आणि आपल्या स्माईलीचे दहा लाख स्टिकर्स छापून विनामूल्य विद्यार्थ्यांना वाटून टाकले. लवकरच हे स्टिकर्स भिंतींवर, कार्सवर सर्वत्र दिसू लागले. एका अर्थाने स्माईली या चळवळीचं प्रतीकच बनला.

Mr. SatfulSonawane (Proprietor)

Shop No. 1, ShaniwarPeth - 53, Opposite  AmruteshwarMandir, Amruteshwar Co -

Operative, Hosing Society, Near Shaniwar  Wada   Pune - 411 030, Maharashtra, India

Email:-   info@computerplanet.info ,  sales@computerPlanet.info

Mobile: +(91)-9822358631 , +(91)-9503852341

                                     www.securityplanet.co     

स्माईली लोकप्रिय झालं तसे ब्रँड्स आपोआपच फ्रँकलिन कडे यायला लागले. लवकरच चोकलेट, टी-शर्टस,जीन्स, वह्या, पेन्सिल्स अशा अनेक उत्पादनांवर स्माईली चिन्ह झळकू लागले. पुढे रॉक कल्चर येऊ लागले तेव्हा फ्रँकलिन ने अनेक DJ आणि म्युझिक स्टार्स बरोबर स्माईलीच्या वापरासाठी करार केले. 


20-25 वर्ष स्माईली चर्चेत होता आणि फ्रँकलीन ला कमावून देखील देत होता. पण 90 च्या दशकात स्माईलीची लोकप्रियता ओसरू लागली आणि licensing deals देखील कमी झाल्या. फ्रँकलिनने त्याच्या मुलाला निकोलस ला बिझनेस मध्ये आणले. निकोलस ने सूत्र सांभाळल्या नंतर त्याला जाणवलं की त्याच्या वडिलांनी केवळ लोगो वापरून 25 वर्षे व्यवसाय केला. पण ना त्याला नाव होते, ना कोणती कंपनी.


निकोलस ने पहिल्यांदा आपल्या लोगो नाव दिले "स्माईली" आणि एक कंपनी स्थापन केली "The Smiley Company" . त्यानंतर आपले ब्रँड नाव, चिन्ह त्याने 100 पेक्षा जास्त देशांमध्ये रजिस्टर केले. जिथे ते चिन्ह आधीच कुणी रजिस्टर केले त्यांच्याकडून विकत घेतले किंवा कायदेशीर लढाई करून जिंकून घेतले.


एवढं करून निकोलस थांबला नाही तर त्याने आपल्या लोगोसोबत अशी गोष्ट केली जी करण्याची हिंमत Branding च्या जगात कोणीही करणार नाही. संगणक आणि इंटरनेट क्रांती होऊ घातली आहे आणि त्यात स्माईली वापरता येत आहे  हे पाहून निकोलस ने स्माईलीची असंख्य रूपं डिझाईन करून घेतली. हसणारा 😊, रडणारा 😢, रागावलेला ☹️, आश्चर्य चकित झालेला 😮 अशी 300 पेक्षा जास्त चिन्ह निकोलस ने केली. यांनाच आपण EMOTICONS म्हणून ओळखतो. SmileyWorld नावाने "जगाची नवीन भाषा" असं ब्रीदवाक्य घेऊन निकोलस ने कंपनीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. सॅमसंग आणि नोकिया या मोबाईल कंपन्यांनी देखील त्यांच्याबरोबर licensing deal केली.


फ्रँकलीन आता 76 वर्षांचा आहे आणि पिवळा गोल हसरा चेहरा असलेले हे चिन्ह घेऊन The Smiley Company आजही दरवर्षी 500 मिलियन डॉलर्सचा बिझनेस करत आहे. मॅक डोनाल्डस, कोका-कोला, न्युटेला, निविआ असे 300 ब्रँड्स आजघडीला SMILEY वापरत आहेत. एवढेच नव्हे तर लंडन मध्ये The Smiley Company च्या ऑफिस मध्ये 40 लोकांची मार्केटिंग टीम कोणत्या नव्या ब्रँड्स सोबत डील करता येईल याचा शोध घेत असते.


हा स्माईली ज्याने सर्वप्रथम बनवला त्या हार्वे बॉलला यापासून 45डॉलर्स पेक्षा काहीच मिळवता आले नाही. आणि फ्रँकलिनने मात्र यातून पैसे कामावणारी एक मशीनच तयार केली.

सोमवार, २३ जानेवारी, २०२३

वाटा शोधण्यासाठी, पुन्हा पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी जो जगतो तोच खरं जगतो

 (छोटा धडा, मोठी शिकवण)


तोच खरं जगतो.......!!


कल्पना करा , तुम्ही एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी उभे आहात. या जंगला मधून  जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या शेवटी एक वेगळं शहर आणि अतिशय सुंदर जागा आहेत. तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणांना भेट द्यायची इच्छा आहे पण प्रत्येक ठिकाणी जाण्याइतका वेळ नाही. आणि एका वेळी एकाच मार्गाने जाणे शक्य आहे. 

तुम्ही आसपास पाहता. ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात तिथून कुठलाच ठळक मार्ग दिसत नाही. कुठे मोठे खडक आहेत, कुठे महाकाय झाडे आहेत आणि कुठे झुळझुळ वाहणारा झरा आहे.  अश्यावेळी मार्ग शोधण्याचा एकमेव उपाय म्हणजे चालणे होय. तो मार्ग शोधत तुम्हाला कायम अवतीभवती पहात जोवर योग्य मार्ग दिसत नाही तोपर्यंत चालत राहावं लागणार आहे. जर थांबलात तर मार्ग कधीच मिळणार नाही. 


बऱ्याचदा तुम्ही अश्या वाटांवर जाता जिथून तुम्हाला परत येणं भाग पडतं, बरेच पर्याय सुरवातीला योग्य वाटतात पण ते पुढे जाऊन चुकीचे ठरतात. म्हंटलं तर प्रत्येक दिशेला जाऊ शकता तरी एकाच दिशेला जाण्याशिवाय पर्याय नसतो. अश्या वेळी ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मार्ग शोधावा लागेल आणि तो एकमेव मार्ग शोधणे म्हणजे काय तर प्रथम अपयशी होणं ! 


काही भाग्यवान लोकांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात मार्ग लगेच सापडेल. परंतु बहुतांश लोकांसोबत तसे घडत नाही. आपल्याला पहिल्यादा धाडसाने एक दिशा निवडावी लागते, एका मार्गावर जावे लागते, जमेल तसं adjust करावं लागतं , प्रसंगी चार पावलं मागे येऊन पुन्हा पुढे जावं लागतं. एवढं करूनही कधी कधी आपल्याला पाहिजे ते ठिकाण सापडतच नाही , वेगळेच काही हाती लागतं. त्याचाही आनंद घेऊन पुन्हा नव्याने प्रयत्न करावा लागतो.

 


आपण आयुष्यात असे अनेक प्रश्न हाताळत असतो. व्यवसाय कोणता करावा ? करावा की करू नये ? कोणत्या क्षेत्रात करिअर करावे ? आहे ते करिअर बदलावे की नाही....असे अनेक निर्णय घ्यायचे असतात. त्यावेळी मित्रानो, लक्षात ठेवा की तुम्ही एका जंगलाच्या मधोमध उभे आहात , ज्याचा कोणताही नकाशा नाही. फक्त आपल्याला बेस्ट वाटेल त्या दिशेला एक एक पाऊल टाकत राहणे आणि वेळोवेळी आपला मार्ग,दिशा, वेग adjust करत राहणे हाच एकमेव उपाय आहे . 


पण तुम्हाला सांगू मित्रानो, जेव्हा आपण अशा वाटा शोधत असतो तेव्हा आपोआप मागे पाऊलखुणा ठेवत जातो. त्याच्याच पुढे पाऊलवाटा होतात. आपण आपला मार्ग स्वतः बनवत जातो. तुमचा मार्ग बेस्ट नसेल, जलद नसेल, सोपा नसेल...पण तो तुमचा स्वतःचा असेल. प्रत्येक प्रयत्नात , प्रत्येक चुकीच्या वळणावर शिकलेला धडा तुम्हाला पुढे मदत करेल आणि हीच प्रोसेस तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल ! 

+91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

आणि शेवटी प्रवासच अंतिम स्थानावर पोहोचण्यापेक्षा जास्त आनंद देऊन जाईल ! या प्रवासासाठी , अनोळखी वाटा शोधण्यासाठी, पुन्हा पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी जो जगतो ...तोच खरं जगतो !!


“The journey is what brings us happiness not the destination” - Dan Millman, The Peaceful Warrior

रविवार, २२ जानेवारी, २०२३

सुख म्हणजे नक्की काय असतं!

*सुख म्हणजे नक्की काय असतं!*

सोलापूर इथल्या एका संस्थेने माझं दोन दिवसांचं मोटीवेशनल शिबिर आयोजीत केलं होतं. 

विविध वयोगटांतले आणि विविध व्यवसायातले शिबिरार्थी उत्साहाने सामील झाले होते.  

शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा विषय होता आनंदाने कसं जगावं?  

मी साऱ्या शिबिरार्थींना एक कॉमन प्रश्न विचारला आणि नोटपॅडमधल्या कागदावर आपापलं उत्तर लिहून द्यायला सांगितलं. प्रश्न अगदी साधा होता,


सुख म्हणजे काय?

उत्तरं अगदी भन्नाट होती.

कोणी लिहिले
निरोगी दीर्घायुष्य म्हणजे सुख. 
एकाने लिहिलं, घरात पत्नीने तोंड बंद ठेवणं म्हणजे सुख. एक उत्तर होतं, सकाळी उठल्यावर पोट साफ होणं म्हणजे सुख. 
एकाचं उत्तर होतं, म्हातारपणी मुलं आधाराला जवळपास असणं म्हणजे सुख. 
कुणाचं उत्तर होतं, भरपूर पैसा गाठीशी असणं म्हणजे सुख. 
तर कुणी लिहीलं होतं की शरीर धडधाकट असणं म्हणजे सुख. 
सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या.

साऱ्या शंभर शिबिरार्थींच्या सुखाच्या कल्पना जेव्हा मी एकत्र केल्या तेव्हा लक्षात आलं, प्रत्येकजण कोणत्या तरी एका बाबतीत दु:खी आहे. 
म्हणजे कुणाची बायको भांडखोर आहे, 
कुणाला बद्धकोष्ठाचा त्रास आहे, 
कुणाची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत.... 
आणि ती उणीव त्या प्रत्येकाला टोचते आहे.

 म्हणजे उरलेल्या नव्व्याणव टक्के बाबतीत तो सुखी आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकजण नव्व्याणव टक्के सुखी आहे आणि फक्त एक टक्का दु:खी आहे. 

हे केवळ एक टक्का दु:ख आपण चघळत बसतोय आणि उरलेल्या ९९% सुखाकडे दुर्लक्ष करतोय. आहे की नाही गंमत. 

मी जेव्हा त्या साऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली तेव्हा सारेच चकीत झाले.

*हीच तर सुखाची गंमत आहे. आपण सुखात असतो.  पण आपण सुखात आहोत हेच आपल्याला माहित नसतं.*

 जेव्हा काही कारणामुळे त्या गोष्टीची आपल्या आयुष्यात उणीव निर्माण होते तेव्हा आपल्याला कळतं, अरे... एवढा वेळ आपण सुखात होतो.

लहान असताना वाटतं, लहानपण म्हणजे परावलम्बित्व. 

केव्हा एकदा मोठे होतोय आणि स्वत:च्या पायावर उभे रहातोय. मोठं झाल्यावर वाटतं, किती टेन्शन रे बाबा.

 प्रत्येक गोष्टीत टेन्शन. 
जागा शोधायचं टेन्शन. कर्जाचे हप्ते भरायचं टेन्शन. ऑफीसमध्ये साहेबांना तोंड द्यायचं टेन्शन.

 त्यापेक्षा बालपण किती सुखाचं होतं. ग्रुह्स्थाश्रमात प्रवेश केल्यावर वाटतं,  संसारसंगे बहु कष्टलो मी!  

केव्हा एकदा मुलं मोठी होतायत आणि या जबाबदाऱ्यांतून मोकळा होतोय.

 मुलं मोठी  होतात तेव्हा आपण व्रुद्ध झालेलॊ असतो. आणि गात्रं कुरकुर करु लागतात. तेव्हा वाटतं, अरे तो बहराचा काळ किती सुखाचा होता.

माझे एक ज्येष्ठ मित्र रवीन्द्र परळकर अलीकडे बऱ्याच दिवसांनी मला भेटले. शिळोप्याच्या गप्पा झाल्या. म्हटलं,

“थोडे वाळलेले दिसताय. बरं नव्हतं की काय?”

तर ते म्हणाले, “प्रोस्टेट्च्या त्रासाने आजारी होतो.  काय झालं,  एक दिवस रात्री लघवी कोंडली. 

प्रोस्टेट ग्लॅंड वाढल्यामुळे त्याचा भार ब्लॅडरवर आला होता आणि लघवीलाच होईना. ओटिपोटावर भार असह्य झाला. मी वेदनांनी गडाबडा
 लोळू लागलो. 

अख्खी रात्र पेनकीलर घेऊन काढली. दुसऱ्या दिवशी फॅमिली डॉक्टरना घरी बोलवलं तर ते म्हणाले युरॉलॉजिस्टकडे घेऊन जा. 

युरॉलॉजिस्टकडे जाऊन ॲडमिट व्हायला दुपारचे अकरा वाजत आलेले. म्हणजे गेले पंधरा सोळा तास मला लघवीला झालं नव्हतं. वेदना असह्य होत होत्या. 

ब्लॅडर फुगून पोटातच फुटायची भिती निर्माण झाली होती. शेवटी एकदाचं मला ॲडमिट करुन घेण्यात आलं. 

आणि ब्लॅडर पंक्चर करुन सर्व युरीन बाहेर काढण्यात आली. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला.

 आपल्याला दिवसातून वेळेवर लघवीला होणं ही सुद्धा किती सुखाची गोष्ट आहे.”

परळकरांचं उदाहरण हे सुखाच्या शोधात दु:खी असलेल्या प्रत्येकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. 

हातपाय धडधाकट आहेत. दोन घास पोटात जातायत हे सुख नव्हे काय? 

परमात्मा मेहेरबान होऊन पावसा पाण्यापासून रक्षण करतोय हे सुख नव्हे काय?  

घराबाहेर पडल्यावर मागे एक वाट पहाणारं दार आहे हे सुख नव्हे काय?  ’एका लग्नाची गोष्ट’ या प्रशांत दामलेंच्या नाटकातलं गाणं मला आठ्वतय,,

*मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं*
*काय पुण्य असतं की ते, घरबसल्या मिळतं*

मित्र हो, जाणीवांच्या खिडक्या सताड उघड्या ठेऊन विचार कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही खूप सुखी आहात. 

चला तर मग, सगळ्या तक्रारी उडवून लावा, सारी निराशा झटकून टाका 
 आनंदाने जगू लागा.

😊

शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले

 नुसतं माझा धर्म भारी आणि माझी जात भारी म्हणून चालत नसत


बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं.*


मुळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो. पर्शिया म्हणजे आजचे इराण. तिथेच झोराष्ट्रीयन हा समाज जन्माला आला. या धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे.


पण हे पारसी भारतात कसे आले याची एक कथा सांगितली जाते.

अस म्हणतात की शेकडो वर्षापूर्वी मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. जुलमी आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती. यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.


अशीच एक जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातला नवसारी इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. तिथल्या राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.


राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे आता आम्हाला आणखी माणसे नकोत.


तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या दुधात थोडासा मध टाकला. त्याचा अर्थ होता की आम्ही इथे दुधात मध मिसळल्या प्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू. राजा खुश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली.


पारसी लोक बुद्धिमान होते, उद्यमी होते. ते गुजरात बाहेर पडले, देशभर पसरले. इथल्या मातीशी एकरूप झाले.

ब्रिटीश भारतात आले तेव्हा पारसी लोकांनी त्यांची भाषा शिकून घेतली. याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. ब्रिटीशांच्या मुंबईसारख्या महानगरात त्यांनी बस्तान बसवलं. आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला. अनेक पारसी कुटुंबांनी आपल नाव कमवल. पैसा कमावला.


पण पारसी फक्त पैशांच्या मागे लागलेले नव्हते. हजारो वर्षांपूर्वी आपल्यावर झालेला अन्याय, हालअपेष्टा ते विसरले नाहीत. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवली त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा समाजाला काही तरी देण्यासाठी वापरला.


पुण्यात ब्रिटीशांनी लष्करी छावणी उभारली तेव्हा त्यांच्या मदतीसाठी इंग्रजी भाषा जाणनारे स्थानिक कर्मचारी लागणार होते. त्यांनी उच्चशिक्षित पारसी लोकांना पुण्यात आणलं. बऱ्यापैकी कॅम्पच्या भागात हे पारसी वसले. इथले आल्हाददायक हवामान त्यांना मानवल.


त्यामुळे अनेक पारसी कुटुंबांनी आपले बिऱ्हाड पुण्यात कायमच हलवलं.

पारसीप्रमाणेच आपला देश सोडून परागंदा झालेले बगदादचे ज्यू डेव्हिड ससून हे देखील भारतात आले होते. व्यापारात त्यांनी व त्यांचे पारसी पार्टनर जमशेदजी जीभॉय यांनी प्रचंड पैसा कमावला होता. यातूनच पुण्यात पहिले हॉस्पिटल उभे राहिले. त्याला त्यांचे नाव देण्यात आले, डेव्हिड ससून रुग्णालय.


पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले. हे हॉस्पिटल उभे राहत असताना एक पारसी उद्योजक बैरामजी जीजीभोय हे मुंबईहून पुण्याला आले होते. त्यांनी मुंबईत अनेक शिक्षण संस्था उभारल्या होत्या. जीजीभोय यांनी पुण्यात ससून रुग्णालयाच्या शेजारी एक छोट वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र उभ केलं. त्याला त्यांचच नाव देण्यात आलं.

 

१८७१ साली स्थापन झालेलं हे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन पुण्याचे सुप्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेज बनलं.


एकोणिसाव्या शतकात पुण्याला प्लेग सारख्या रोगराईने चांगलंच सतवलं होत. इंग्रजांच्या राज्यात पुण्यात आरोग्य सेवा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नव्हत्या. अजूनही लोक वैद्य, हकीम यांच्यावर अवलंबून असायचे. ससून सोडले तर मोठे रुग्णालय नव्हते.


याकाळात छोटी छोटी पारसी रुग्णालये उभी राहत होती. असाच एक दवाखाना चालवणाऱ्या एडलजी कोयाजी यांनी एक हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. पारसी समाजातील उद्योगपती पुढे आले. वाडियांनी त्यांना पैशांची मदत केली. तर सर कोवासजी जहांगीर व लेडी हिराबाई या दांपत्याने जागा दिली अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून दिल.

 

या हॉस्पिटलला त्यांच्या मुलाचं जहांगीरच नाव देण्यात आलं.


१९४६ साली त्या काळच्या सर्वोत्तम सेवा सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्पदरात  उपलब्ध करून देण्याचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करण्यात आला होता.

याच जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृद्यरोगावर उपचार करायला केकी बैरामजी हे सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अमेरिकेतून हृद्यरोगावरील विशेष उपचाराचा प्रशिक्षण घेतलं होतं. पण तिथेच स्थायिक होण्याऐवजी आपल्या मूळ गावी पुण्याला परत आले. जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांचे काही कारणांनी एडलजी कोवासजी यांच्याशी मतभेद झाले. यामुळे केकी 

बैरामजी यांनी स्वतःच फक्त चार खाटांच एक हॉस्पिटल सुरु केलं. त्यावेळच्या गव्हर्नरने त्यांना जागा दिली होती. या गव्हर्नरच्या बायकोच्या स्मरणार्थ हॉस्पिटलचं नाव रुबी हॉल क्लिनिक असे करण्यात आले. एकेकाळी ४ बेडचे हॉस्पिटल पुढे जाऊन ७५० बेडचे पुण्यातले सर्वात अत्याधुनिक रुग्णालय बनले.



अशीच कथा केईएमची.

पुण्याच्या रास्ता पेठेत सरदार मुदलियार यांचं एक छोट प्रसूतीगृह होतं. सर्वसामान्य गरीब रुग्णांचा आधार असलेले हे हॉस्पिटल चालवणे सरदार मुदलियार यांना अवघड चालले होते. त्यांनी जहांगीर हॉस्पिटलच्या एडलजी कोयाजी यांना एखादा तज्ञ डॉक्टर व चांगला प्रशासक मिळवून देण्याची मागणी केली. त्यावेळी


एडलजी यांनी प्रसूतीशास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या आपल्या वहिनीकडे म्हणजेच बानू कोयाजी यांच्याकडे ही जबाबदारी दिली.


काही महिन्यांसाठी लक्ष द्यायचं म्हणून डॉ.बानू कोयाजी यांनी ही जबाबदारी उचलली खरी मात्र केईएम हे पुढच्या आयुष्यभराच हे मिशन बनलं.


बानू कोयाजी यांनी केईएमचा कार्यक्षेत्र पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत वाढवल. त्यांचं कार्य फक्त वैद्यकीय सेवेपुरत मर्यादित राहिलं नाही तर कुटुंब नियोजनासारखे समाजहिताचे कार्यक्रम जनजागृती अशा अनेक उपक्रमांची जोड दिली.


डॉ. बानू कोयाजी हे पुणेकरांसाठी एक आदराच आणि आपलेपणाचं नाव बनलं. 

आजही ही जहांगीर पासून ते केईएमपर्यंत अनेक रुग्णालये पुंण्यात तितक्याच कार्यक्षमतेने कार्य करत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या संकटात मेडिकल इमर्जन्सीमध्ये या हॉस्पिटलनी पुण्याला जगवल आहे.


 सायरस पूनावाला यांच्यासारखे उद्योगपती औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जातात.

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

प्रत्येक समाज पिढ्यानपिढ्या आपापल्या परंपरा जपत असतो पण पुण्याच्या पारसींनी वैद्यकीय क्षेत्रात छाप पाडून एक वेगळीच ओळख निर्माण केली एक अजरामर पायंडा पाडला.


टिपः नुसतंच गर्व से कहो असं म्हणून माणसं जगत नसतात... प्रत्येक धर्मियांचा आदर हेच भारतीयत्व.... Live & Let Live


रतन टाटा .,आदर पुनावाला..डाॕ.बानू कोयाजी...डाॕ.ग्र्ँट...होमी भाभा अशा अनेक पारसी धर्मियांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करुन भारताचा नावलौकिक वाढवला आहे. 


आणि कोणत्याही जाती धर्माचा द्वेष हे महान लोक करत नाहीत....बघा जमलं तर विचार करा

साभार

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

Customer Focus अमेझॉन चे संस्थापक जेफ बेझॉस

छोटा धडा, मोठी शिकवण


अमेझॉन चे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या विविध भाषणां


Customer Focus म्हणजे केवळ ग्राहकांचे ऐकणे नव्हे तर ग्राहकांना समोर ठेवून प्रत्येक process, product, service ठरविणे. आणि सगळ्यात महत्वाचे , ग्राहकांच्या वतीने त्यांच्यासाठी innovation करणे.



आजही अमेझॉन मधील महत्वाच्या मीटिंग मध्ये एक रिकामी खुर्ची ठेवली जाते. आणि ही खर्ची ग्राहकांचे प्रतिनिधित्व करत असते. ग्राहक या मीटिंग मध्ये सहभागी असता तर कसा विचार केला असता, काय बोलला असता हा दृष्टिकोन समोर ठेवून ऍमेझॉन मध्ये निर्णय घेतले जातात.

एमाज़ॉन. कॉम की स्थापना जेफ बेजोस ने 5 जुलाई 1994 को की थी, और एक ऑनलाइन बुकस्टोर के रूप में शुरू किया था, लेकिन बाद में वीडियो डाउनलोड / स्ट्रीमिंग, एमपी 3 डाउनलोड / स्ट्रीमिंग, ऑडियोबुक डाउनलोड / स्ट्रीमिंग, सॉफ्टवेयर, वीडियो गेम, इलेक्ट्रॉनिक्स, परिधान, फर्नीचर बेचने के लिए विस्तारित किया गया।

spy hidden camera , voice recorder, mobile jammer, security items, and electronics item and many more http://www.securityplanet.co 

7057573102 , 9822358631, 9503852341.

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

श्रीमंत माणूस, ज्याने आपल्या बेंटले गाडीचे दफन केले... मला कार दफन करायची नाही आहे, पण अवयव दानासंबंधी जागृती निर्माण व्हावी म्हणून मी हे नाटक रचलं."

 श्रीमंत माणूस, ज्याने आपल्या बेंटले गाडीचे दफन केले....

ब्राझील मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, अतिशय सामर्थ्यशाली व्यक्ती "चिकुन्हो स्कारपा" यांनी एक दिवस एक अजब घोषणा केली की ते त्यांच्या लाखो डॉलर्सच्या बेंटले कारचे दफन करणार आहेत. स्कारपा यांनी मृत्यूनंतर पण ऐषोआरामाचा आनंद घेता यावा म्हणून बेंटले गाडीचं दफन करायला घेतलं याचं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.



साहजिकच त्यांच्या या घोषणेला चांगलंच मीडिया कव्हरेज मिळालं. त्यांच्या या वेडेपणाबद्दल अनेकांनी त्यांना मूर्खांत काढलं, टीका केली. या माणसाला वेड लागलंय,अतिश्रीमंतांचे चोचले आहेत, एवढ्या महागड्या गोष्टीचा असा विनाश का करत आहेत?, त्यापेक्षा दान देऊन टाका, गरिबांना मदत करा, हा माणूस नक्की कोणत्या जमान्यात वावरतोय अशा अनेक सूचना, नकारात्मक प्रतिक्रिया ब्राझीलच्या जनतेकडून येत होत्या.


अखेरीस कारचं दफन करण्याचा दिवस उजाडला. मोठा खड्डा खणण्यात आला. अनेक पत्रकार याचं live coverage करत होते.

कार दफन करण्याची वेळ आली तेव्हा स्कारपा म्हणाले की "मी एवढी मौल्यवान गोष्ट वाया घालवतो आहे म्हणून माझ्यावर केवढी टीका झाली. पण लोकांना हे लक्षात येत नाही की या मिलियन डॉलर कार पेक्षाही मौल्यवान गोष्टी लोक दफन करत आहेत. लोक त्यांचे डोळे, किडनी, हृदय, फुफ्फुसे असे कितीतरी सुदृढ अवयव मृत्यूनंतर दफन करतात.


हा शुद्ध मूर्खपणा आहे. हजारो लोक ट्रान्सप्लांट साठी अवयव मिळण्याची वाट बघत आहेत. अशा लोकांना नवीन जीवन देण्यासाठी अवयवदान करण्यापेक्षा आपण त्यांचे दफन करत आहोत.

+91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो. G- guarding (protection)

मला कार दफन करायची नाही आहे, पण अवयव दानासंबंधी जागृती निर्माण व्हावी म्हणून मी हे नाटक रचलं."


मित्रानो, डोळ्यात अंजन घालणारी ही गोष्ट आहे. कधी आपण याचा साधा विचार पण करत नाही. मात्र काही लोकांना जीवनदान देण्याची क्षमता असताना केवळ अज्ञान आणि दुर्लक्ष यामुळे आपण या पुण्यकर्माला मुकत आहोत.