नमस्कार मित्रहो,
तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !
तसं म्हंटलं तर वेळ-काळ मोजण्याची पद्धत ही मानवनिर्मितच आहे. ती नैसर्गिक नाही. कोणता दिवस, कोणता वार आणि कोणते वर्ष याचा नियतीला किंवा निसर्गला काहीच फरक पडत नाही.
मात्र तरीही आपण नववर्ष साजरं करतो. याचं कारण म्हणजे "कोणत्याही गोष्टीची नव्याने सुरुवात करणं" हे केवळ माणसालाच शक्य आहे. इतर सजीवांना ती देणगी नाही.
मग आपल्याला हा वर मिळाला आहेच तर तो नीट वापरूया की ! या वर्षी काय नवीन करायचं त्याचा संकल्प करूया. फार मोठं टार्गेट ठेवलं तर कदाचित इतर सर्व वर्षांप्रमाणे या वर्षीचा संकल्प देखील बारगळेल. म्हणून एखादी छोटी गोष्ट ठरवा जी जमेल . Small wins creates Big victories !!
आणि या वर्षी खराखुरा आनंद पाहिजे असेल तर खालील चारही भागांसाठी एक ध्येय निश्चीत करा.
1. Self स्वतःसाठी
2. Family कुटुंबासाठी
3. Community समाजासाठी
4. Humanity मानवतेसाठी (सर्व सजीवांसाठी)
स्वतःसाठी काय ध्येय ठेवावे हे वेगळे सांगायला नको. कुटुंबासाठी एखादी पिकनिक, एखादा वेगळा अनुभव, कधी कुटुंबाने एकत्र मिळून केली नसेल अशी एखादी activity प्लॅन करा.
Community - समाजासाठी आपल्या आजूबाजूला शेजारी, सोसायटी, संस्था यांना काही मदत /सुधारणा करता येईल का याचा विचार करा. झाडे लावणे, श्रमदान, सफाई इत्यादी.
Humanity - मानवजातीसाठी आपण आता काय करू शकतो याचा विचार करा (त्यासाठी गुगल करा ☺️) उदा. प्लास्टिकचा वापर मी यावर्षी अर्ध्यापेक्षा कमी करेन. ओला आणि सुका कचरा वेगळा करेन, किंवा शक्य तिथे वाहनांचा वापर टाळेन.
आपल्या पेक्षा आपल्या सोबतच्या इतरांचा विचार आपण करू लागतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने "अर्थपूर्ण" जगतो. अशा जीवनाचा प्रत्येक दिवस एक आनंद सोहळा बनतो. मग तारखा आल्या गेल्या, कॅलेंडर बदलले तरी काही फरक पडत नाही.
तुम्हा सर्वांना "नवजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा" !!