computer laptop लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
computer laptop लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

नवीन लॅपटॉप विकत घेताय ! मग जरा थांबा

 सावधान... सावधान... सावधान

नवीन लॅपटॉप विकत घेताय !

मग जरा थांबा 



आज बरेच भोंदू दुकानदार ज्यांचे कॉम्प्युटर चे दुकान नाही, ज्यांना कॉम्प्युटर लॅपटॉप बद्दल काही माहीत नाही असे लोक नवीन लॅपटॉप अत्यंत कमी दरात विकत आहेत. 

व ग्राहकांची फसवणूक करून लूट करत आहेत आपणास जाणून घेणं अत्यंत गरजेचे आहे की इतकी कमी किंमत मधे हे लॅपटॉप कसे विकतात.

१. GST न भरता विकलेला लॅपटॉप १८% कमी दरात बाजार मधे उपलब्ध होतो त्यामुळे किंमत जवळ जवळ १३ ते १५ हजार ने  कमी होते परंतु अशा लॅपटॉप ला गॅरंटी मिळत नाही. 

२. मुंबई, पुणे तसेच दिल्ली वरून 

ओपन बॉक्स लॅपटॉप मार्केट मध्ये धुमाकूळ घालत आहेत कंपनी अशा लॅपटॉपला वारंटी देते पण असे लॅपटॉप डिफेक्टिव पिस असल्यामुळं याची किंमत मूळ किमतीपेक्षा जवळ जवळ दहा हजार ने कमी असते परंतु ते नवीन बॉक्स पॅक करून विकले जातात असे लॅपटॉप अजिबात खरेदी करू नका.

३. बरेच लोक टॅक्स चोरी करून लॅपटॉप विकतात त्यामुळे सुध्धा लॅपटॉप ची किंमत जवळ जवळ १५ हजार ने कमी मिळते परंतु अशा लॅपटॉप ला गॅरंटी मिळत नाही. 

@लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर कोठून घ्याल ?

१. ज्यांचे दुकान ८ ते १० वर्षापासून कार्यरत आहे अशा दुकादारांकडून खरेदी करा 

२. ज्यांना कॉम्प्युटर लॅपटॉप ची दुरूस्ती करता येते अशा दुकानातून खरेदी करा जेणे करून वर्षभर सर्व्हिस घेता येईल.

३. कॉम्प्युटर लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराचा GST नंबर कार्यरत आहे की नाही ते चेक करा कारण अशा प्रकारची सुध्धा फसवणूक खूप होत आहे 

खोटे GST बिल दिले जात आहे. 


आज आपल्या गावामधे फसवणूक झाल्याचे तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा दाखल आहेत.

स्वस्त च्या नादी लागाल तर फसवणूक अटळ आहे.

Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv,Spy / Hidden Camera, Stun gun,Spy Pen. M-9822358631,9503852341  . 7057573102 gito

लॅपटॉप ची खरी किंमत ऑनलाईन एवढी किवा त्या पेक्षा फक्त ५०० रू जास्त आहे 

ऑनलाईन आपणास बॅग मिळत नाही व दुकादारांकडून आपणास ओरिजनल बॅग मिळते तेव्हा आपणास विनंती आहे की 

जे खरे दुकानदार आहेत अशा दुकादारांकडूनच खरेदी करा.