बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

अस्पृश्य जातीमधील संघर्ष


अस्पृश्य जातीमधील संघर्ष


        महाराष्ट्रातील महार हे नाग वंशाचे लोक असून, ते येथील मूळचे रहिवासी आहेत. राजकीय पराभवानंतर त्यांना अस्पृश्य बनविण्यात आले. अस्पृश्य वर्गातील मांग, चांभार व ढोर या जाती व्यवसायातून निर्माण झाल्या आहेत. या चारही अस्पृश्य जाती मेलेल्या ढोरावर आपला उदरनिर्वाह पेशवेकाळात करीत होत्या. त्यातील महार हे मेलेले ढोर ओढून त्याचे मांस खात होते.मांग हे ढोराच्या चरबी पासून वाद्ये तयार करून वाजवीत असत, चांभार हे ढोराच्या कातड्या पासून पादत्राणे तयार करीत, तर ढोर हे ढोराच्या शिंगा व हाडापासून बांगड्या व फण्या तयार करून विकत असत.


         पेशवे काळात महार, मांग, चांभार व ढोर अशा चार प्रमुख अतिशूद्र जाती होत्या. त्यांच्यातही लहान लहान व्यवसाया वरून अनेक उपजाती निर्माण झाल्या आणी त्या आपसात मानपान, दर्जा व हक्क यावरून संघर्ष करू लागल्या होत्या.


       भारताच्या दक्षिण भागात स्थित असलेल्या महाराष्ट्रात महार या जातीकडे वंशपरंपरागत कोतवाली होती आणी बहामनी सुलताना कडून 52 हक्क प्राप्त झाल्यामुळे सरकारी दरबारी या जातीला अधिक मान असे, तसा मांग, महार, चांभार व ढोर जातींना नव्हता. म्हणून महार आपल्याला या जातीपेक्षा उच्च समजत असत. बहामनी सुलतान कडून सर्व महार समाजाच्या लोकांना हे हक्क इ. स.1475 साली प्राप्त झाले होते. त्याची पुह्ना उजळणी इ. स.1563 साली महाराष्ट्राची अतिप्राचीन सातवाहन सम्राटाची राजधानी मुंगी पैठण येथे ब्राह्मण व इतर उच्च जातीच्या हक्कदाराची सभा एकनाथ स्वामींचे देवळात होऊन अठरा लाख सोमवंशीय महार जातीला हे 52 हक्क प्राप्त झाले होते. त्या काळात सर्वच महार जातीच्या लोकांना सोमवंशीय समजत असत. त्यानंतर पेशवे शाहीच्या काळात ते करीत असलेल्या लहान लहान धंद्यावरून महार समाजात अनेक उपजाती तयार झाल्या आणी त्या पुढील काळात पक्क्या झाल्या.


महार जातीतील पोटजाती -

      ते येणेप्रमाणे -

1) सोमस, 2) बावणे 3) बारके 4) कोसरे 5) लाडवन

6) आदवन 7) पानके 8)   येसकर 9) घोडके 10) डफळे  11)होलारे 12) कंकारे आणी अर्धी जात वरपारवडे ही होती.


      महार समाजातील पोट - जातींचे लोक काम धंद्याच्या शोधात ज्या ज्या खेड्यात किंवा मोठया गावात गेले तेथे त्यांनी आपल्या महार जाती पंचायती तयार केल्या. प्रत्येक उपजातीची एक जात पंचायत निर्माण झाली. पुढे त्यांच्यात दर्जा, हक्क व मानपान याबद्दल वाद - विवाद निर्माण होत गेले. सामाजिक बंधन तोडणाऱ्या व्यक्तीस महार जाती पंचायती द्वारे बहिष्कृत करण्यात येत असे, अशा बहिष्कृताची एक वेगळीच जात तयार झाली. ती वरपाखड्यांची अर्धी जात होय.जसे तांदळातून खडे किंवा सडी पाखडून बाहेर फेकल्या जातात तसेंच महार जातीतून कोणत्याही सामाजिक गुन्हा करिता समाजाबाहेर फेकल्या गेलेले लोक हे " वरपाखडे " होत. त्यांना अर्धी जात समजल्या जाते. अशाच प्रकारचे वर्गीकरण अस्पृश्य वर्गाच्या मांग, चांभार व ढोर या जातीत सुद्धा होत गेले.


      पेशवे शाहीच्या काळात ब्राह्मण समाजा पासून तर शूद्र - अतिशूद्र समाजापर्यत जाती - उपजातीची निर्मिती झाली. आणी संपूर्ण हिंदू समाज विस्कळीत होत गेला. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे ब्राह्मणा सारख्या उच्च जातीत, जातीय व उप - जातीय संघर्ष जरी दिसत असला तरी त्यांचे सामाजिक संघटन अगदी मजबूत आहे. त्यांच्या सर्व धार्मिक - चालीरिती, विधी विधान, व कर्मठपणा ह्या सर्व ब्राह्मण वर्गा भोवती आजही अगदी पिंगा घालीत असतात. त्या पूर्ण करण्यात ते कोणतीही चूक करीत नाहीत. तत्कालीन निरनिराळ्या चालीरितीचे स्वरूप पाहता पेशव्यानी ब्राम्हणत्वाचा ( Brahminism ) उदोउदो करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कारण त्यात संपूर्ण ब्राह्मण वर्गाचा फायदा होता.


        पूर्वी चार वर्णात विभागलेल्या वैदिक धर्म गुप्त काळात त्याचे रूपांतर हिंदू धर्मात झाले आणी पेशवाईचे काळापासून त्याची हिंदू जातीच्या अनेक तुकड्यात विभागणी होत गेली, असे असले तरीही धर्माच्या नावावर हिंदू लोक एक आहेत. हीच या धर्माची एक मोठी विशेषत: आहे. ब्राह्मण वर्गाने निर्माण केलेल्या हिंदू धर्माच्या अनेक जातीत विभागणी होत गेली असली आणी बहुजन समाजाची गणती शुद्रात होत असली तरी ब्राह्मणानी निर्माण केलेल्या जाती प्रथेवर बहुजन समाजाचा पक्का विश्वास बसलेला आहे. ते कर्म - कांड व पूजा -पाठामध्ये आकंठ डुबलेले आहेत. त्यांच्या गळ्याभोवती कर्म कांडाचे पाश पक्के गुरफटलेले असल्यामुळे ते बाजूला सारून आपला गळा मोकळा करून खुल्या पारदर्शी वातावरणात श्वास घेण्याची कल्पना, कोणताही बहुजन समाजातील हिंदू व्यक्ती करू शकत नाही आणी एखाद्याने तसें करण्याचा प्रयत्न केल्यास तो जाती बहिष्कृत ठरला जाईल ही भीती प्रत्येक हिंदू माणसाला जाणवत असते.


         अशा प्रकारे सामाजिक संघर्षातुन जाती - उपजातीची निर्मिती होत गेलेली आहे आणी ती आजही कायम आहे.


       पेशवे काळात अशा प्रकारच्या जाती - उपजातीचा संघर्ष चालत असतांना ब्राम्हण पुरोहित वर्गाने भोंदू अशा बहुजन समाजाला लुबाडण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या शोधून काढल्या त्यातील मुख्य म्हणजे नवीन नवीन देव - देवता यांची निर्मिती करणे व त्यांची देवळे बांधण्यास भोळ्या जनतेला प्रवृत्त करणे आणी त्याचे पुजारीपण आपल्याकडे घेणे हे होय!

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

      पेशवेकाळात सामाजिक संघर्ष चालत असतांना जाती - उपजाती मध्ये विभागलेल्या हिंदू धर्मातील लोक आपआपल्या जाती - उपजाती करिता वेगवेगळ्या देवाच्या नावाने अनेक देवालये बांधू लागले आहेत. ब्राह्मण वर्गाने आपले वर्चस्व बहुजन समाजावर कायम राहावे म्हणून नवीन नवीन देवाच्या कल्पना पुढे आणल्या आणी पाप - पुण्याचे भय भोळ्या जनतेला दाखवून, त्या कल्पनाना मूर्त स्वरूप देण्याचा सपाटा चालविला होता. प्रत्येक जाती - जमातीची वेगवेगळ्या देवाची वेगवेगळी देवळे बांधली जाऊ लागली होती आणी त्या देवळात पूजा - अर्चा ब्राह्मणांचे हाताने मोठया प्रमाणावर होऊ लागली होती.


( " भारतीय अस्पृश्याची शौर्य गाथा " या पुस्तकातून सादर.

पृष्ठ. क्रं.143 ते 145.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: