500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट !
आजपासून साठ वर्षांआधीची गोष्ट. १९६३ साली अमेरिकेतील हार्वे बॉल नावाच्या एका डिझायनर ला त्याच्या एका लोकल क्लाएंट चा फोन आला. या फोनमुळे हार्वे बॉल हे नाव इतिहासात कायमचं कोरलं जाणार होतं.
तो क्लाएंट एक इन्शुरन्स कंपनीचा कर्मचारी होता. त्या कंपनीने नुकताच एक स्पर्धक कंपनीसोबत मर्जर केलं होतं. दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे कर्मचारी एकत्र काम करणार होते. त्यामुळे ऑफिस मधील तणावाचे वातावरण हलके करण्यासाठी त्यांनी हार्वेला काही आनंदी व हलक्याफुलक्या डिझाइन्स बनवायला सांगितल्या.
फोन ठेवल्यानंतर केवळ 10 मिनिटातच हार्वेने पुढे जाऊन जगप्रसिद्ध झालेले डिझाइन बनविले. एक पिवळ्या रंगाचा गोल आणि त्यावर काळ्या रंगात काढलेले उभट डोळे आणि मोठं स्माईल. तेच चित्र ज्याला आज आपण स्माइली ☺️ म्हणून ओळखतो. या कामाचे हार्वेला 45 डॉलर्स मिळाले. इतिहासातील हा पहिला स्माईली आयकॉन होता.
लवकरच अमेरिकन कल्चर मध्ये हे सोपे आणि तरीहि परिणामकारक स्माईली चिन्ह सर्वत्र दिसू लागले. स्माईली ची लोकप्रियता पाहून अनेकांनी या चिन्हाचा वापर सुरू केला. गिफ्टशॉप चालविणाऱ्या दोघा भावांनी स्माईली चिन्ह छापून त्याखाली Have a nice day असं लिहिलं. त्यांच्या या नव्या गिफ्ट च्या 50 लाख प्रती विकल्या गेल्या.
हार्वेची ही डिझाईन लाखो डॉलर्स किमतीची होती हे एव्हाना कळले होते. पण हार्वे ने एक चूक केली, त्याने कधीच स्माईली ट्रेडमार्क रजिस्टर केले नाही.
Dear All,
Proudly launching our new brand in SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets
GITO - जिटो
G- guarding (protection)
T- technology
O- organisation
committed to give you more advanced service & products
regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102
त्यानंतर 8 वर्षांनी 1971 मध्ये जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात फ्रान्स मध्ये एक तरुण पत्रकार आपल्या करिअरची सुरुवात करत होता. फ्रँकलीन लोफरानी असं त्याचं नाव. फ्रान्स-सोयर नावाच्या एका वर्तमानपत्रात सकारात्मक बातम्यांचं एक सदर करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. सकारात्मक बातमीला शोभेल असं स्माईली सारखच दिसणारं एक चिन्ह त्याने वापरलं. हे चिन्ह हार्वे बॉल च्या स्माईली सारखंच होतं.
पत्रकार असला तरी फ्रँकलीन चं "उद्योजक" डोकं काम करत होतं. त्याला या चिन्हांची ताकद कळली होती. त्याने लगेचच फ्रेंच ट्रेडमार्क रजिस्टर केलं. त्याकाळी licensing हा प्रकार फारसा नव्हताच. त्यामुळे ट्रेडमार्क रजिस्टर केले तरी आर्थिक फायदा होत नव्हता. काही वर्तमान पत्रांनी स्माईली चिन्ह वापरण्याची तयारी दाखविली आणि त्यासाठी पैसे ही दिले.
पण फ्रँकलीन ला मोठ्या प्रमाणावर हे चिन्ह वापरले जावे असं वाटत होते. त्यासाठी तो योग्य संधी शोधत होता. त्या काळात फ्रान्स मध्ये तरुणांमध्ये एक सांस्कृतिक बदलाची चळवळ (Counter - cultural movement) जोर धरत होती. जुने सांस्कृतिक बंधन झुगारून तरुण विद्यार्थी मुक्त प्रेमाची, वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा स्वीकार करत होते. फ्रँकलीन ने हीच संधी साधली आणि आपल्या स्माईलीचे दहा लाख स्टिकर्स छापून विनामूल्य विद्यार्थ्यांना वाटून टाकले. लवकरच हे स्टिकर्स भिंतींवर, कार्सवर सर्वत्र दिसू लागले. एका अर्थाने स्माईली या चळवळीचं प्रतीकच बनला.
Mr. SatfulSonawane (Proprietor)
Shop No. 1, ShaniwarPeth - 53, Opposite AmruteshwarMandir, Amruteshwar Co -
Operative, Hosing Society, Near Shaniwar Wada Pune - 411 030, Maharashtra, India
Mobile: +(91)-9822358631 , +(91)-9503852341
स्माईली लोकप्रिय झालं तसे ब्रँड्स आपोआपच फ्रँकलिन कडे यायला लागले. लवकरच चोकलेट, टी-शर्टस,जीन्स, वह्या, पेन्सिल्स अशा अनेक उत्पादनांवर स्माईली चिन्ह झळकू लागले. पुढे रॉक कल्चर येऊ लागले तेव्हा फ्रँकलिन ने अनेक DJ आणि म्युझिक स्टार्स बरोबर स्माईलीच्या वापरासाठी करार केले.
20-25 वर्ष स्माईली चर्चेत होता आणि फ्रँकलीन ला कमावून देखील देत होता. पण 90 च्या दशकात स्माईलीची लोकप्रियता ओसरू लागली आणि licensing deals देखील कमी झाल्या. फ्रँकलिनने त्याच्या मुलाला निकोलस ला बिझनेस मध्ये आणले. निकोलस ने सूत्र सांभाळल्या नंतर त्याला जाणवलं की त्याच्या वडिलांनी केवळ लोगो वापरून 25 वर्षे व्यवसाय केला. पण ना त्याला नाव होते, ना कोणती कंपनी.
निकोलस ने पहिल्यांदा आपल्या लोगो नाव दिले "स्माईली" आणि एक कंपनी स्थापन केली "The Smiley Company" . त्यानंतर आपले ब्रँड नाव, चिन्ह त्याने 100 पेक्षा जास्त देशांमध्ये रजिस्टर केले. जिथे ते चिन्ह आधीच कुणी रजिस्टर केले त्यांच्याकडून विकत घेतले किंवा कायदेशीर लढाई करून जिंकून घेतले.
एवढं करून निकोलस थांबला नाही तर त्याने आपल्या लोगोसोबत अशी गोष्ट केली जी करण्याची हिंमत Branding च्या जगात कोणीही करणार नाही. संगणक आणि इंटरनेट क्रांती होऊ घातली आहे आणि त्यात स्माईली वापरता येत आहे हे पाहून निकोलस ने स्माईलीची असंख्य रूपं डिझाईन करून घेतली. हसणारा 😊, रडणारा 😢, रागावलेला ☹️, आश्चर्य चकित झालेला 😮 अशी 300 पेक्षा जास्त चिन्ह निकोलस ने केली. यांनाच आपण EMOTICONS म्हणून ओळखतो. SmileyWorld नावाने "जगाची नवीन भाषा" असं ब्रीदवाक्य घेऊन निकोलस ने कंपनीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. सॅमसंग आणि नोकिया या मोबाईल कंपन्यांनी देखील त्यांच्याबरोबर licensing deal केली.
फ्रँकलीन आता 76 वर्षांचा आहे आणि पिवळा गोल हसरा चेहरा असलेले हे चिन्ह घेऊन The Smiley Company आजही दरवर्षी 500 मिलियन डॉलर्सचा बिझनेस करत आहे. मॅक डोनाल्डस, कोका-कोला, न्युटेला, निविआ असे 300 ब्रँड्स आजघडीला SMILEY वापरत आहेत. एवढेच नव्हे तर लंडन मध्ये The Smiley Company च्या ऑफिस मध्ये 40 लोकांची मार्केटिंग टीम कोणत्या नव्या ब्रँड्स सोबत डील करता येईल याचा शोध घेत असते.
हा स्माईली ज्याने सर्वप्रथम बनवला त्या हार्वे बॉलला यापासून 45डॉलर्स पेक्षा काहीच मिळवता आले नाही. आणि फ्रँकलिनने मात्र यातून पैसे कामावणारी एक मशीनच तयार केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा