सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

जड झालेले आई-बाप... नीट वाचा आणि मगच शेअर करा 🙏

जड झालेले आई-बाप... नीट वाचा आणि मगच शेअर करा 🙏

नेहमीप्रमाणे 5.30 ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5.44 ची बोरीवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो.ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा 'राजेशचा'मला फोन आला... म्हणाला,"मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच..!"
मी"हो थांबतो"म्हटलं. 

मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एम.एम. मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पाणपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो.

एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मळकटलेले सदरा-धोतर नेसलेले माझ्या जवळ आले. मी त्या लोखंडी अँगलवर 3-4 फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले,"ए बाबा.. एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल...!"

ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं..

अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं,"आजोबा तुम्हाला भूक लागलीय?हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते..!" 

ते म्हणाले,"नको बाबा नको.. पैसे नको..एक वडापाव घेऊन दे तेवढा"

मी म्हटलं,"थांबा इथेच मी घेऊन येतो."
एम एम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले.ते जमिनीवर बसून खाऊ लागले.
मला म्हटले,"वर नको बसू , पडशील... इथं बस माझ्या बाजूला,कुणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास !"

मी आदरंच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली...कुठून आलात?कुठे जायचंय?कोणाला शोधताय?वैगेरे वैगरे.

"मी हिंगोली वरून आलो आहे. तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्याएवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठया कंपनीत इंजिनीअर आहे.दोन वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय.त्याची बायको शिकलेली,नव्या विचारांची आहे. तिला सासू-सासरे म्हणजे आम्ही गावठी (गावंढळ) वाटतो.तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून.परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला,अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षांसाठी जात आहे...

इथं मुंबईत असताना येत होता गावी आम्हा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला.मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर,वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचंय असं म्हणाला. 

पुढचे 10 वर्ष जगतोय की मारतोय कोण जाणे.. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन.काल संध्याकाळ पासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय. पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोकं..!"

मी म्हणालो, "बरोबर म्हणतायत लोकं, इथं मालाडला नाही,सांताक्रुज ला आहे Airport.
आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले,"परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा. हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं... फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा...त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून"

आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पहिली...मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्क ही फुल होतं... 

मी विचारलं,"तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन?"
"मला फोन लावता येत नाही, उचलता येतो फक्त" ते म्हणाले.
मी received call मध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या call वर डायल केलं.. समोरून फोन cut करण्यात आला...

मग मी तो कागद उघडून पाहिला...त्या कागदावर पत्ता होता- छत्रपती शिवाजी विमानतळ, एम एम हॉटेल समोर, मालाड पश्चिम, मुंबई.
मी समजून गेलो होतो, त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता... मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं. 
तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला. त्याला मी म्हटलं दोन मिनिटं थांब फक्त राजेश... 

आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो...
मला कळत नव्हतं,मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती?  कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल.. 

आजोबांना मी म्हणालो, "आजोबा एव्हाणा तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल.. तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी.आजी तुमची वाट बघत असतील घरी.एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले.

अश्रू भरल्या डोळ्यांतून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले.. आणि विचारलं,"मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय,काय आहे त्या डब्यामध्ये? "

ते म्हणाले,"मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी...
आता मात्र एका धारदार सुऱ्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो....

तेवढ्यात मित्राचा आवाज आला,"चल ना ऐ...!" 
आणि मी भानावर आलो...त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो... 

घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती.राहून राहून एकच प्रश्न पडत होता... 

'आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस..आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातल्या एक लाडू खाऊ शकत नव्हता...? इतकं प्रेम????'

लेखक - माहित नाही 🙏

#म्हातारपण #आई #वडील #स्वार्थ #माणुसकी

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

ब्लॅक फ्रायडे हा दिवस खरेदीच्या सवलतींसाठी ओळखला जातो, पण त्यामागे एक अनोखी कथा आहे.

ब्लॅक फ्रायडे हा दिवस खरेदीच्या सवलतींसाठी ओळखला जातो, पण त्यामागे एक अनोखी कथा आहे. ही कथा 1950 च्या दशकातील फिलाडेल्फिया शहराशी जोडलेली आहे, जिथे Thanks Giving नंतरचा शुक्रवार नेहमी गोंधळाचा दिवस ठरत होता. 🌀

त्या काळात फिलाडेल्फियामध्ये दरवर्षी आर्मी-नेव्ही फुटबॉल सामना होत असे, जो खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना आकर्षित करायचा. सामन्याआधीच्या शुक्रवारी फुटबॉल चाहत्यांनी शहर गजबजून जात असे. रस्ते गर्दीने फुलून जायचे, इतकी गर्दी असायची की संपूर्ण शहरातील वाहतूक ठप्प होत असे.

स्थानिक पोलिसांना दिवस-रात्र काम करावे लागले, गर्दी सांभाळावी लागायची आणि ट्रॅफिक व्यवस्थापिन करताना पोलीस यंत्रणेची दमछाक होत असे. त्यामुळेच त्यांनी या दिवसाला “ब्लॅक फ्रायडे” हे नाव दिलं – त्यांच्या दृष्टिकोनातून हा एक डोकेदुखीचा दिवस होता! 🚔😵‍💫 . पण एवढ्या साऱ्या लोकांच्या अचानक येण्याने शहरामधील विविध दुकानांमध्ये विक्रीही आपोआपच वाढत असे.

1960 च्या दशकात, व्यापाऱ्यांनी या नावाला सकारात्मक वळण दिलं. 🛒 व्यापाऱ्यांनी हा दिवस तोट्यातून नफ्यात (अकाउंट्समधील "रेड" वरून "ब्लॅक" मध्ये जाणारा) जाणारा दिवस म्हणून प्रसिद्ध केला. गर्दीला आपल्याकडे खेचण्यासाठी आपोआपच भल्यामोठ्या सवलतींचीही प्रथाच पडली.

हळूहळू ब्लॅक फ्रायडे हा खरेदीचा मोठा सण म्हणून ओळखला जाऊ लागला, आणि आज तो फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात साजरा होतो! 🌍 🎁✨

धन्यवाद,

सतफुल सोनवणे
7057573102

गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०२४

उत्तराखंडच्या एका छोट्या गावातील मुलाने 5000 करोडची बँक उभी केली त्याची गोष्ट! 🌟🏦उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचचा गोविंद सिंग


 उत्तराखंडच्या एका छोट्या गावातील मुलाने 5000 करोडची बँक उभी केली त्याची गोष्ट! 🌟🏦


जिम कॉर्बेट नॅशनल पार्क पासून 40 किलोमीटर दूर असलेल्या एका गावात गोविंद सिंग जन्मला. त्याचं बालपण खूप कठीण होतं. रोज शाळेत जायला त्याला 7 किलोमीटर चालावं लागायचं. कॉलेज चालू असतानाच पैसे कमावण्यासाठी एका छोट्याशा 18x6x6 फूटाच्या घरात तो विद्यार्थ्यांना शिकवायचा. त्याच्या मनात काहीतरी करण्याची जिद्द होती. 💪🎓


BCom झाल्यावर, स्टेट बँक ऑफ पटियाला मध्ये probationary officer म्हणून त्यानं करिअरची सुरुवात केली. पाच वर्षांनंतर, 1988 मध्ये सूर्या फिनकॅप मध्ये जॉइन झाला. तिथे मुंबई ऑफिस सेट करण्यासाठी त्याला मुंबईला पाठविलं. नंतर बँक ऑफ इंडोनेशिया आणि UTI बँकेत काम केलं, आणि मग 2000 साल आलं. 🌍📈


गोविंद ICICI बँकेत जॉइन झाला आणि 2006 पर्यंत microfinance डिपार्टमेंटचा बिझनेस हेड झाला. त्यानं इतिहास रचला - भारतात पहिल्यांदा business correspondent मॉडेल सुरू केलं, ज्यामुळे गावकऱ्यांना बँकेत न जाता पैशांचे व्यवहार करता येऊ लागले. 🏦📲


पण गोविंदला दिसलं की अजूनही 40 करोड लोकांना 10,000 रुपये सारखी छोटी रक्कम उधार मिळणं कठीण होतं. टेक्नॉलॉजी पेक्षा आधी या इंडस्ट्रीला access ची गरज होती. म्हणून त्यानं ICICI मधली मोठ्या पगाराची नोकरी सोडली. आणि वाराणसीच्या घाटावर 2009 मध्ये उत्कर्ष मायक्रोफायनान्स ची सुरुवात केली. 🌱💡


त्याची कल्पना सोपी होती - जिथे गरज आहे पण सेवा उपलब्ध नाही तिथे फायनान्स करायचं. त्यानं UP आणि बिहार मार्केटवर फोकस केला, जिथे भारतातल्या गरीबी रेषेखालील 40% लोक राहतात. Aavishkar Goodwell या कंपनी कडून त्यानं 6 करोड रुपये कर्ज उभे केले. 💰📊


या पैशांचा वापर करून, पहिल्या वर्षातच उत्कर्ष ने 4 branches, 8000 कस्टमर्स आणि 6.3 करोडचं पोर्टफोलिओ उभा केला. पुढे एका सर्वेमध्ये त्यांना लक्षात आलं की भारतातील 3 करोड लघु उद्योजकांना 50,000 ते 3 लाख रुपयांमधले बिझनेस लोन मिळवणे देखील शक्य होत नाही. हा प्रॉब्लेम सोडवायचा होता. 📈📝


मार्च 2012 मध्ये, त्यानं Micro Enterprise Loan (MEL) स्कीम 'समृद्धी' सुरू केली. UP आणि बिहारच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात तीन दिवसांत विनातरण लोन द्यायला सुरुवात केली. 2013 पर्यंत NBFC लायसन्स मिळालं, 3 लाख कस्टमर्स झाले, आणि 448 करोडचं लोन बुक झालं. 📄🏘️


उत्कर्ष मध्ये डिफॉल्ट्स कमी होते कारण ते फक्त joint liability ग्रुप्सना लोन द्यायचे, जिथे 4-10 गावकरी मिळून लोन परतफेडीची गॅरंटी द्यायचे. 2016 मध्ये housing loan सेगमेंट मध्ये एंट्री केली, आणि RBI नं लायसन्स दिलं. 23 जानेवारी 2017 ला उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक जन्माला आली. 🏡💼


2017 मध्ये, उत्कर्ष Personal Loans, Commercial Vehicle Loans, आणि Construction Equipment Loans मार्केट मध्ये देखील उत्कर्षने सुरवात केली. त्यांचं लोन बुक 3200 करोड पर्यंत वाढलं, 15 लाख कस्टमर्सची सेवा करू लागले. 🚗🚜

क्या आपको ऐसा गुप्त कॅमेरा  चाहिए ?

 जो किसी को नजर नाही आएगा जीसका live विडिओ  केवल     आप ही काहीसे भी मोबाईल पे देख पाएँगे


Website :- www.securityplanet.co


Product  वीडियों :- - https://www.youtube.com/user/MrSatful?sub_confirmation=1


Website social media & Product Photo , व्हिडिओ information :-  https://linktr.ee/Satful


Follow thislink to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919822358631


हॅलो📞📱 आपको  प्रॉडक्ट देखना है तो व्हिडिओ कॉल लगाके दिखा सकतेहै. 11am to 7pm


आप मुझे hi मेसेज भेजने के बाद उपर की लिंक ऍक्टिव्हेट ओपन होगी🙏

उत्कर्षचं लोन बुक 14,000 करोड आणि डिपॉझिट्स 19,496 करोड पर्यंत पोहोचल्यावर, 21 जुलै 2023 ला कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली. त्यांच्या 500 करोडच्या IPO ला तब्बल 102 पट सब्स्क्रिप्शन मिळालं! 📊💥


आज, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचचा पोर्टफोलिओ 18,000 करोड, डिपॉझिट्स 17,000 करोड आहेत आणि 2023 मध्ये त्यांनी आतापर्यंतचा सर्वाधिक 3579 करोडचा रेव्हेन्यू आणि 452 करोडचा प्रॉफिट कमावला. 26 राज्यांमध्ये 888 ब्रँचेस आणि 320 ATMs सोबत, आज बँकेची किंमत 4708 करोड आहे. 💵🏦


कोणाला वाटलं होतं की उत्तराखंडच्या एका छोट्या गावातला मुलगा भारतातली चौथी सर्वात मोठी स्मॉल फायनान्स बँक उभी करेल? 🌟🚀


बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता

तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती.टीव्ही चा रिचार्ज संपला होता.त्यामुळे टीव्ही ही बंद होता.रोजचं येणारं दूध बंद केलं होतं.घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता.तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते.तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता.गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे.तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे.दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही.उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती.आणि माझ्यासोबत लढत होती.परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती.घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते.बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते.एका वेळची सोय होणार होती.आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो.पण माझा फोन कुणीच उचलत नव्हतं.कारण,त्यांना माहीत होतं हा पैसे मागायलाच फोन करतोय.सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते.त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती.एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला "नितीन थोडेफार पैसे असले तर दे ना,"मी काहीच उत्तर दिलं नाही फोन कट केला.आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही.आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो.

          तिची अंघोळ झाली होती.आम्ही पुण्यात पिंपळे निलख मध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो.टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं.तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे गाणं गुणगुणत असायचो."मी गाणं गायला सुरवात केली,पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोट फिरवत होती.तिने लक्षच दिलं नाही.माझ्या कवितेवर ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरवात केली तेव्हा,तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिलं.मी मान खाली घातली.घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही.हे कळलं.

       आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही.ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक.सात महिन्याची गरोदर असणारी,एक नवा जन्म पोटात वाढवू पाहणारी,आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दिपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी.मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो.ती स्वताला सावरत हळूहळू उठली.आणि दार उघडून बाहेर गेली.मी काहीच बोललो नाही.तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला.कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती.रविवार होता पेपरला पुरवण्या होत्या.तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली.

      मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो.आणि ती पेपरची पाने चाळू लागली.आणि अचानक ती जोरात ओरडली. "ओ चंदनशिवे हे बघा काय आलंय पेपरला."मी म्हणलं 'काय दिपाली"? तर तिने मला विचारलं "काय ओ चंदनशिवे तुम्ही कवी आहात ना"? मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं "हो आहे पण काय करणार कवी असून आणि कविता तरी काय करणार आहे माझी" तिने हाताला गच्च धरून जवळ ओढलं आणि माझ्या समोर ते पेपरचं पान धरलं.आणि त्या पानावर असलेली जाहिरात मला आजही आठवतेय.!!अंशुल क्रियेशन प्रस्तुत,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्यवाचन स्पर्धा.!! रोख रकमेची तीन बक्षिसे.खाली पत्ता होता चिंचवड,पुणे.आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता.मी ती जाहिरात बघितली.दिलेल्या नंबरवर फोन केला.नाव सांगितलं.नावनोंदणी केली.आणि मी दिपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसायला लागली होती.ती म्हणाली, "चंदनशिवे घरात शेवटचे सत्तर रुपये आहेत.ते मी तुम्हाला देतेय.या स्पर्धेत जा.आजच स्पर्धा आहे ही. तिथं कविता म्हणा, आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षिस घेऊनच घरी या.पण एक सांगते आज,जर तुम्ही बक्षिस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल.कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे."तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं.

         ती पुढे म्हणाली, "जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोय." सात महिन्याची गरोदर असणारी,सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दिपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही.मी ते तिचं आवाहन स्वीकारलं.तिने घरातले जपून ठेवलेले सत्तर रुपये माझ्या 
हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुंदका आला.मी अंगात कपडे घातले.तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो.

           मी चिंचवडला आलो.बसच्या तिकीटला दहा रुपये गेले होते.तिथं प्रवेश फी पन्नास रुपये होती.ती भरली.ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार.परत जाण्यासाठी दहा रुपये शिल्लक राहिले होते.मी ते जपून ठेवले.बाजूला सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती.मला खावंसं वाटलं नाही.कारण ती घरात उपाशी होती.मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो.मी स्पर्धेला आलो होतो खरा पण,आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती.कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती.आणि हरलो तर,फक्त शरीर घेऊन मेलेल्या मड्यागत जगणं समोर दिसत होतं.

      स्पर्धा सुरू झाली.बराच वेळ होत चालला होता.इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या.कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती.आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली "ओ चंदनशिवे" ही हाक ऐकू येत होती.

       माझं नाव पुकारलं गेलं.मी स्टेजवर जायला निघालो.तेव्हा,मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती.अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना,स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला.अंगावर काटा आला.अंग थरथर कापलं.विज चमकावी तसं मेंदूत काहीतरी झालं.रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं.इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो.माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली.कविता संपली.टाळ्या कानावर यायला लागल्या.त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.

          स्पर्धा संपली.पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाले.त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार होतं.मंचावर ते उपस्थित होते.सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला.आणि छातीत धडधड सुरू झाली.त्याने सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला.टाळ्या सुरू झाल्या.तो तीन नंबरचा विजेता स्टेजवर गेला.त्याच्या हातात ट्रॉफी,गळ्यात शाल,पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पाकीट राजकुमार बडोले यांनी दिलं.त्याला तिथेच थांबवला.माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती.सूत्रसंचालकाने दुसरा नंबर घोषित केला.माझं नाव नव्हतं.पोटात अजून गोळा आला.तो विजेता ही तसाच जाऊन स्टेजवर थांबला.आणि आता सुत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता.मी डोळे गच्च मिटून घेतले.पोटात कळ यायला लागली होती.छातीत धडधड वाढेलेली होती.दोन डोळ्यांच्या बंद पापणीच्या आड फक्त गरोदर असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती.आणि कानावर आवाज आला."आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे,ज्याने तमाशा कविता सादर केली असा नितीन चंदनशिवे."टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता.बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बांध सोडला आणि गालावर पाणी घळघळ वाहायला लागलं. सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे.होय मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे.

       टाळ्या थांबत नव्हत्या.आतल्या आत हुंदके देत मी स्टेजवर गेलो.बाजूच्या विंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली.मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिलो होतो.फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेऱ्या डोळ्याला लावून तयार झाला होता.मी खिशातला मोबाईल काढला.आणि दिपालीला फोन केला.पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणली,"चंदनशिवे काय झालं सांगा ना लवकर,"ती बिचारी वेड्यासारखं हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत बसली होती.मी फोन कानाला दाबून गच्च धरला आणि म्हणलं,"दिपाली पहिला नंबर आलाय." मला एक अपेक्षा होती तिने अभिनंदन वैगेरे म्हणावं अशी.पण ती तसलं काही बोलली नाही.ती पटकन म्हणाली,  'ते पहिला नंबर आलाय ठीक आहे पण रक्कम किती आहे ते सांगा आधी."आणि तेवढ्यात ती मुलगी ट्रे घेऊन जवळ आली.ती प्रमुख पाहुण्यांच्या हातात ट्रे देत होती.इकडं कानाजवळ दिपाली फोनवरून रक्कम विचारत होती.माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकीट दिसू लागलं.मी कसलाच विचार केला नाही.ते पाकीट मी हिसकावून हातात घेतलं.सगळेजण तोंडाकडे बघत होते.मला काहीच वाटत नव्हतं.मी स्टेजवर ते पाकीट फोडलं.दोन बोटं आता घालून त्या पाचशे रुपयाच्या नोट्या मोजल्या.दहा नोटा होत्या.आणि मी फोन कानाला लावून म्हणलं,"दिपाली,पाच हजार रुपये आहेत."हे वाक्य बोलताना घळकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली.त्यावर दिपाली काहीच बोलली नाही.तिचा एक बारीक हुंदका मात्र ऐकू आला.आणि जवळ जवळ वीस पंचवीस सेकंद आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही.फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो.मला वाटतं आम्ही दोघेजण किती जगू माहीत नाही.पण,आयुष्यातला तो पंचवीस  सेकंदाचा काळ हा  सुवर्णकाळ वाटतो मला.आम्ही नवरा बायकोने त्या पंचवीस सेकंदाच्या काळात आमचं जन्मोजन्मीचं नातं मुक्याने समजून घेतलं.नंतर हातात ती ट्रॉफी आली.गळ्यात शाल पडली.फुलांचा तो गुच्छ घेतला.आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालोसुद्धा.त्या फोटोवाल्याला हवी तशी पोझ मिळालीच नाही.आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होते.फोटोवाला ही रागानेच बघत होता.मी थेट गेटमधून पांढरं पाकीट खिशात कोंबून बाहेर पडलो.

        घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली.तिला समोसे आवडतात.म्हणून गरमागरम समोसे ही घेतले.तिसऱ्या मजल्यावर आमचं घर होतं.मी अक्षरशा पायऱ्या तुडवत पळत पळत धापा टाकत दारात आलो.दार वाजवणार तेवढ्यात तिनेच दार उघडलं.आणि म्हणाली,"कवी नितीन चंदनशिवे यांचं माझ्या संसारात स्वागत आहे." हुंदका दाटून आला.मला स्पर्धा जिंकल्याचा,पाच हजार मिळाल्याचा,आनंद नव्हताच.मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो.कवी म्हणून जिवंत राहणार होतो.याचा आनंदच नाही तर मी हा महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होतो.तिने माझे पाणावलेले डोळे पुसले.तिच्यासाठी खायला आणलेलं तिच्या हातात दिलं.आम्ही दोघेही खायला बसलो.आणि ती म्हणाली, "चंदनशिवे आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव निर्भय ठेवायचं.कारण आज पोटात तो सारखं लाथा मारून मला त्रास देत होता.तो सोबतीला होता म्हणून मनात भितीच नव्हती.तुमचा फोन येणार आणि तुम्हीच जिंकलाय असं सांगणार  असंच वाटत होतं. " 

       सगळी मिठाई दोघांनी खाल्ली.तिने कागद आणि पेन घेतलं.आणि किराणा मालाची यादी लिहायला सुरुवात केली.तिने ती यादी लिहून झाल्यावर माझ्या हातात दिली.आणि “जा घेऊन या लवकर सामान” अस म्हणून ती पिशवी घेण्यासाठी उठली.
आणि त्याच कागदाच्या मागील बाजूस मी कविता लिहिली.ती अशी….

              “माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा,
              माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात
              किराणा मालाची यादी लिहिते,
              ती यादीच 
              माझ्यासाठी जगातली 
              सर्वात सुंदर कविता असते…
              आणि यादीची समिक्षा
              फक्त आणि फक्त
              तो दुकानदारच करत असतो
              तो एक एक शब्द खोडत जातो
              पुढे आकडा वाढत जातो
              आणि कविता
              तुकड्या तुकड्याने 
               पिशवीत भरत जातो
              आयुष्यभर माहीत नाही
              पण,कविता आम्हाला
              महिनाभर पुरून उरते
              कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते”

      मित्रहो,संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात.बंद डोळ्यांनाच फक्त सुखाचे भास असतात.पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की,संसाराच्या या गाडीत बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधी थांबत नाही.आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक वेदनेचे अभंग गात असली तरीही आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे.यासाठी शब्दांचा लळा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे.कारण,आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्याचं गाणं हे अशाच सुख दुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे.
   चालत राहा आयुष्याचे आनंदगाणे हसत हसत गात राहा.

लेखक नितीन चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ
जि सांगली.
7020909521

(आपली प्रतिक्रिया आपण लेखकाला जरूर कळवू शकता.लेखकाशी थेट कॉल वर बोलू शकता. किंवा व्हाट्सअप ला मेसेज करू शकता.)

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

मला आवडलाय तुम्हालाही नक्कीच आवडेल जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.

 मला आवडलाय तुम्हालाही नक्कीच आवडेल



🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎

🌎   "बिल गेट" चे भारतीय   🌎

🌎      लोकांविषयी मत...    🌎

🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎

         सर्वांनी हे नक्की वाचाच 

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



तो म्हणतो, 

"भारत हा जगात 

सगळ्यात श्रीमंत देश आहे.

या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी "भारत हा महासत्ता होऊ शकतो,

परंतु ,

मजेची गोष्ट ही आहे कि, या देश्यातील 

लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून,

शेतकरी देवाला 

दोष देत आत्महत्या करतो...।

कारण ,

त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण 

आहे हेच त्याला कळत नाही ...।


या देश्यातील गरीब जनतेला कळत 

नाही कि तुमच्या गरिबीला कोण जबाबदार आहे ?


इथल्या तरुणाला 

कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे...?


भयाण वास्तव...


१) इथल्या तरुणाला गुलामी कळू नये 

म्हणून, क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदीरे, यांची अफूची गोळी दिलेली असते तो त्यामध्येच गुंग झालेला असतो...

तसेच,

पायी, वारी, सण, उत्सव यांच्या नादी 

लावले जाते....।


मग, ताण (Tension)  आला कि दारूची दुकान जवळ असते....


करतो जीवन बरबाद...,

मग, स्वतःला दोष देतो ...


२) इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून...

भांडणे लावणाऱ्या मालिका,

 तसेच उपास- तापास, व्रत-वैकल्ये....

यांमध्ये त्या गुंग 

असतात ...


मग त्यांचे कुटुंब आणि 

त्या...


त्यांना मग कोण सहन होत नाही ...(सासू, सासरे)


३) इथला नौकरी असणारे पुरुष असतात...


ते घाण्याला लावलेल्या 

बैलासारखे राब-राब राबत असतात...


बँकेने दिलेले हफ्ते फेडण्यासाठी....


त्यालाच कळत नसते तो काय करतो ...

कारण, पगार जरी एक 

लाख असला तरी ८०,००० हफ्ते 

फेडण्यासाठी घालवत असतो ....।


एक बँकेचे कर्ज फेडले कि मग, बायको दुसरे (मोठे घर) कर्ज 

काढायला सांगते...


काम एवढे असते 

कि तो डोके वर काढू शकत नाही...



4) जेष्ट नागरिक ...

नोकरी करून शेवटी कुणीही त्याचे ऐकत नाही ...।


आश्रमाची वाट बघत असतो...


आणि,

जे लोकं जागरूक आहेत त्यांना...

अंधश्रद्धा निर्मुलन समिती, भ्रष्टाचार निर्मुलन समिती..


अनेक NGo मार्फत ..

वेगवेगळ्या पक्ष्याद्वारे गुंतून ठेवले जाते ...



मग कसा बदल होणार...?

कोण करणार...?


आता बाकी आहेत 

त्यांनी विचार करावा..


 केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते?

                             

 नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते?

                            


     केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार...😊

 

सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते? 


सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव...😊 


काय उपयोग सांग मानवा

अशा या दान धर्माचा ??😳


कधी शेतक-याला बियाणं

दान देऊन बघ... 😊


कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ.... 😊


कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ... 😊


कधी एखाद्या उपाश्याला घlस भरवुन बघ...😊


कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ...😊


कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ...😊


कधी एखाद्या वृध्दाश्रमास

दान करून बघ....😊


कधी एखाद्या आश्रमातील

निराधारांवर प्रेम करून बघ...😊


एकदा दान धर्माच्या व्याख्या

बदलून तर बघ !!😊


जेव्हा मंदिरात आणि मस्जीद मध्ये जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल...😇


पुस्तकानं माणसाच मस्तक सशक्त होत...😇


सशक्त झालेलं मस्तक

कुणाच हस्तक होत नसत...😇


आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...! 😇


शाळेचे छत गळके आणि

मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?😳


शाळेत आज मुलांना बसायला

साधी फरशी नाही मंदिराला मात्र संगमरवरी ?😳


शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही...😔


आपला भारत नक्की महासत्ता होणार?😳


पायात घालायची चप्पल AC मधे विकायला ठेवतात आणि

भाजीपाला फूटपाथवर...😔


म्हणे आमचा देश कृषी प्रधान

आणि आत्महत्या करतो शेतकरी...😔


शेकडो मैल चालतो वारकरी...😳


अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो सत्ताधारी मंत्री..! 


वाचा,

विचार करा,

🙏🙏🙏

शनिवार, २७ जुलै, २०२४

एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या..*जर आपण *'राग'* विकत घेतला, तर आपल्याला *'ॲसिडिटी'* फुकट मिळते

*एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या..*
जर आपण  *'राग'* विकत घेतला, 
तर आपल्याला *'ॲसिडिटी'* फुकट मिळते.

जर आपण *'ईर्ष्या'* विकत घेतली, 
तर आपल्याला *'डोकेदुखी'* फुकट मिळते.

जर आपण *'द्वेष'* विकत घेतला, 
तर आपल्याला *'अल्सर'* फुकट मिळतो.

जर आपण  *'ताणतणाव'* विकत घेतला,
तर आपल्याला *'रक्तदाब (BP)'* फुकट मिळतो.

जर आपण *'विश्वास'* विकत घेतला, 
तर आपल्याला *'मैत्री'* फुकट मिळते.

जर आपण *'व्यायाम'* विकत घेतला,
तर आपल्याला *'निरोगी आयुष्य'* फुकट मिळते.

जर आपण *'शांती'* विकत घेतली, 
तर आपल्याला *'समृद्धी'* फुकट मिळते.

जर आपण *'प्रामाणिकपणा'* विकत घेतला, 
तर आपल्याला  *'झोप'* फुकट मिळते.

*आता हे सर्व आपल्यावर* अवलंबून आहे की, 
आपण काय विकत घेतलं पाहिजे....
*ते आपणचं ठरवायचं आहे.*

सोमवार, २२ जुलै, २०२४

पालक आपल्या मुलांवर ओझे असू शकतात. मुले त्यांच्यावर कधीच ओझे नसतात.

 वडिलांचे अचानक आगमन झाल्याने....

 बायकोला राग आल

 “म्हाताऱ्याला पैशाची गरज आहे असं दिसतंय, नाहीतर इथे कोण येणार होतं!  आमच्या पोटाचा खड्डा भरत नाही, तो तुमच्या घरच्यांच्या पोटात भरणार कुठून?

 मी नजर हटवली आणि दुसरीकडे पाहू लागलो.

 नळावर हात तोंड धुवून बाप प्रवासाचा थकवा दूर करत होता.

 यावेळी माझा हात थोडा घट्ट झाला.

 मोठ्या मुलाचा बूट फाटला आहे.  शाळेत जाताना तो रोज कुरकुर करतो.

 पत्नीच्या उपचारासाठी संपूर्ण औषधे खरेदी करता आली नाहीत.

 बाबूजींना ही आता यायचं होतं.

 घरात भयाण शांतता पसरली होती.

 जेवण झाल्यावर वडिलांनी मला त्यांच्या जवळ बसण्याचा इशारा केला.

 मला शंका आली की काहीतरी आर्थिक समस्या आली असावी.

 बाबा उठून खुर्चीवर बसले.

 पूर्णपणे बेफिकीर

 "ऐक 

 म्हणत त्याने माझे लक्ष त्याच्याकडे वळवले.

 श्वास रोखून मी तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो.  रोम-रोमा होऊन पुढचं वाक्य ऐकून मी सावध झालो.

 ते म्हणाले, “शेतीच्या कामात क्षणभरही मोकळा वेळ मिळत नाही.  सध्या कामाचा ताण आहे  रात्रीच्या ट्रेनने परत जाणार.  तीन महिन्यांपासून तुमचे कोणतेही पत्र आलेले नाही.  जेव्हा तुम्ही चिंतेत असता तेव्हा हे करता."

 बाबूजी ने खिशातून शंभरची नोट ची बंडल काढली आणि माझ्यापुढे केली,

 ठेवा.  तुम्हाला उपयोगी पडेल.  भाताचे पीक चांगले आले.

 घरी काही अडचण नाही.

 तू खूप अशक्त दिसत आहेस.  व्यवस्थित खा आणि प्या.  तुझ्या सुनेची पण काळजी घे."

 मला काहीच बोलता येत नव्हते.  शब्द माझ्या घशात अडकले होतें.

 मी काही बोलायच्या आधीच वडिलांनी मला प्रेमाने रागावले.

 "घ्या.  तुम्ही मोठे झाले ना आता?

 "नाहीतर." मी हात पुढे केला. बाबांनी माझ्या तळहातावर नोटा ठेवल्या.

 वर्षापुर्वी माझे वडील मला शाळेत जातांना असे पैसे हातावर देत असत, पण तेव्हा माझे डोळे आजच्यासारखे खाली जात नव्हते.😥😥


 मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की


पालक आपल्या मुलांवर ओझे असू शकतात.

 मुले त्यांच्यावर कधीच ओझे नसतात.,❤️❤️

~अनामिक

कथाविश्व - नाते संबंध दृढ करायला शिकवणारे आपले कथांचे विश्व🎉

gito 7057573102

रविवार, २१ जुलै, २०२४

म्हातारपण येणे

म्हातारपण येणे*

[20/07, 06:49] Rajan  Patwardhan: मला आज वाचनात आलेला उत्तम लेख 

'            *म्हातारपण येणे*            '

*" हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठीच आहे असे नव्हे, तर सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे. म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे का आवश्यक आहे, काय करायला पाहिजे, हे समजावून सांगणाऱ्या कादंबरीची ही एक संक्षिप्त ओळख. "*  

*"The Sky Gets Dark, Slowly." हळूहळू आभाळ गडद होत चालले आहे, संधिकाल होऊ लागला आहे.*

*'Mao Dun साहित्य पुरस्कार' मिळालेले "श्री Zhou Daxin" यांची नवी कादंबरी “The Sky Gets Dark, Slowly” लवकरच प्रकाशित होत आहे. वृद्धापकाळातील परिस्थितीचा संवेदनशील शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे, तसेच वेगाने वृद्ध होणाऱ्या लोकांमधील लपलेल्या पण व्यक्त न होणाऱ्या जटिल अशा भावना उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कादंबरीत केला आहे.*  
 
त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की बरेचसे वयोवृद्ध असे वागतात बोलतात की त्यांना जणू काही सगळेच माहित आहे. पण अशा उतार वयात ते लहान मुलांइतकेच अज्ञानी असतात. बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग गुजरणार आहे, किंवा आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे माहित नसते व म्हणूनच त्या दृष्टीने त्यांनी काहीच तयारी केलेली नसते. .

*वयाची ६० वर्षे उलटल्यावर  व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही.*

*१.* :-  जस-जसे वय वाढत जाते तस-तसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळू हळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल, व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यग्र-व्यस्त असेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरितजीवनातील आनंद कसा मिळवायचा, हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे.    
*२.* :-  उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षित करेल. तुमच्या पूर्वायुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल, अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल, तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला वार्धक्य हे येणारच आणि वार्धक्यात तुमच्या आजू-बाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी-हांजी करणारे लोक तुमच्या पासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल. तुमच्या समोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे त्याचे कुठलाही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे, त्याला पसंती दर्शवणे, हेच अशा उतार वयात तुमच्या हातात आहे.
*३.* :-  वय झाल्यावर आता पुढचा रस्ता अडचणींचा व अडथळ्यांचा आहे. हाडे कमकुवत होणे, हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूसंबंधी विविध विकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासमोर कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही. तुमचे आजार, तुमची दुखणी-खुपणी यांना तुमचे मित्र समजा, कारण यांच्याबरोबरच आता तुम्हाला उर्वरित आयुष्य काढायचे आहे. तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशाभ्रमात राहूनका. पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार-विहार करणे हे तुमचे आता कर्तव्य आहे. आणि यात सातत्यठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे.    

*४.* :-  एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे, ह्याची तयारी ठेवा. आपण मातेच्या गर्भातून ह्या जगात आलो ते प्रथम पलंगावरच. आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढ-उतार, हेलकावे, जीवनसंघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे, पलंगाकडे येतो. इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार ह्या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोचतो, फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण ह्या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही. असे कोणी असले तरी ते आपल्या आईसारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते. परिचारिका 'nursing staff' वगैरेंवर अवलंबून राहण्याची वेळ वृद्धापकाळात येऊ शकते, पण त्यांच्या जवळ आईची माया कुठून असणार? चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने, कंटाळून, त्या परिचारिका तुमची सेवा करतील. पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा.  

*५.* :-  आता जीवनमार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतीलच. त्यातील बहुतेक जणांना माहित असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे, आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेजेस पाठवतील, ई-मेल करतील. तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील, 'लवकर श्रीमंत व्हा' यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील, दीर्घायुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील, वगैरे वगैरे. थोडक्यात म्हणजे तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोकं कुठल्याही थराला जातील. म्हणूनच सावध राहा, काळजी घ्या,आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाहीत तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही, म्हणून ह्या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा.

शेवटची घटिका येण्यापूर्वी, आयुष्यातील संधीकालात, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्वकाही अंधारून आल्यासारखे वाटेल, आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीण होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच, *एकदा का वयाची ६० वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा, आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या, शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा अनुभवा. समाजातील कुठलेही ओझे अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडामध्ये अडकून राहू नका. वागणूक साधी व नम्र ठेवा, आपण वयाने मोठे आहोत म्हणून आपण फार शहाणे आहोत असे समजू नका* व तसे इतरांना दाखवू पण नका. *उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना होईलच, पण तुम्हाला त्याचा त्रास जास्त होईल.* आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. *कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तशीच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे.* निसर्गाचा मार्ग म्हणजेच जगण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत , जीवनातील शेवटच्या टप्प्यावरील आपले मार्गक्रमण संतुलित करा.    
 
आपण सर्वांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे, खूप छान, खूप सुंदर

आत्ताच दिवस सुरु झाला ... आणि बघता बघता संध्याकाळचे ६ वाजले.
काल सोमवार होता असे वाटत होते ... आणि आज शुक्रवार आला सुद्धा.  

*... महिना संपत आला,*
*... वर्ष संपायला आले,*
*...आणि वयाची ५०, ६०, ७० वर्षे केव्हां निघून गेली हे कळलेच नाही*
*..आपले आई-वडील,आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे?*  

चला तर मग, जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊ.
*आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही ...*
*आपल्या आयुष्यात रंग भरुया ...* 
*छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया ...*  
*हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया ...*  

उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे
तरमग कुठलीही कृती पुढे ढकलू नका
*... हे नंतर करेन*
*... हे नंतर सांगीन*
*... यावर नंतर विचार करेन*  
'नंतर' आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे .....
कारण, आपण हे समजून घेत नाही की
चहा थंड झाल्यानंतर ...
प्राधान्य बदलल्यानंतर ...
उत्साह निघून गेल्यानंतर...
आरोग्य बिघडल्यानंतर ...
मुले वयात आल्यानंतर ...
आई-वडील म्हातारे झाल्यानंतर ...  
आश्वासन न पाळल्यानंतर...
दिवसाची रात्र झाल्यानंतर ...
आयुष्य संपल्यानंतर ...
आणि ह्या सगळ्या 'नंतर'  आपल्याला कळते अरे बापरे... उशीर झाला की ...  

*"आणि म्हणूनच 'नंतर' काही ठेवू  नका. 'नंतर' ने 'अंतर' वाढते व चांगल्या गोष्टी,*     *चांगले क्षण हातातून निसटून जातात उदाहरणार्थ...उत्तम अनुभव, उत्तम मित्रमंडळी, उत्तम कुटुंब"*

*दिवस आजचा ... आणि क्षण आत्ताचा ...*  

*आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही, कारण आता आपले वय उतरणीस लागलेय.*

तर बघूया की वेळ न दवडता हा संदेश इतर लोकांपर्यंत कोण कोण पोचवत आहे? कारण, *हा संदेश नंतर पाठवीन असा कोणी विचार केला तर ... तर कदाचित  पुढे कधीच पाठविला जाणार नाही.*

*जे वयस्कर नाहीत त्यांच्या पर्यंत सुद्धा हा संदेश पोहोचावा.*

*सर्वजण आरोग्य संपन्न व आनंदी राहोत हीच सदिच्छा.*  
               😔🙏😌

=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=--=-
कुठेतरी छानसे वाचलेले..

चांगले म्हणुन काॅपी पेस्ट केले..
[20/07, 06:51] Rajan  Patwardhan: आभार श्री शरदचंद्र रिसवाडकर ,कांदिवलीपश्र्चिम ,ब्लू एरिया !

मंगळवार, २ जुलै, २०२४

शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू

 शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू 




डोक्यात राग भरल्यावर 

फुटणार कसं हसू ?

अहंकार बाळगू नका 

भेटा बसा बोला 

मेल्यावर रडण्यापेक्षा

जिवंतपणी बोला 

नातं आपलं कोणतं आहे

महत्वाचे नाही

प्रश्न आहे कधीतरी

गोड बोलतो का नाही ?

चुका शोधत बसाल तर

सुख मिळणार नाही 

चूक काय बरोबर काय

कधीच कळणार नाही 

काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू .....ll 1 ll

चल निघ चालता हो

इथे थांबू नको

हात जोडून विनंती आहे

अशी भाषा नको

दारात पाय नको ठेऊ 

तोंड नाही पहाणार 

खरं सांगा असं वागून 

कोण सुखी होणार ?

तू तिकडे आम्ही इकडे

म्हणणं सोपं असतं

पोखरलेलं मन कधीच 

सुखी होत नसतं

सुखाचा अभास म्हणजे 

खरं सुख नाही 

आपलं माणूस आपलं नसणे

दुसरं दुःख नाही 

करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ....ll 2 ll

एकतर्फी प्रेम करून

उपयोग आहे का ?

समोरच्याला आपली आठवण

कधी तरी येते का ?

नातं टिकलं पाहिजे असं

दोघांनाही वाटावं

कधी गायीने कधी वासराने 

एकमेकाला चाटावं

तुमची काहीच चूक नाही 

असं कसं असेल 

पारा शांत झाल्यावरच 

सत्य काय ते दिसेल 

बघा जरा एकांतात

डोळे मिटून आत

चूक कबूल करतांना

जोडताल दोन्ही हात

अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू

आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll

दुसऱ्याला दोष देणं

खूप सोपं असतं

वेळ आल्यावर कळतं की

कुणी कुणाचं नसतं

भेटत नाहीत बोलत नाहीत

गुन्हा तरी काय ?

जे वाटतं ते बोलून

रड धाय धाय

शक्य आहे ताण जाऊन

वाटेल हलकं हलकं

गुळणी धरून बसू नका

व्हा थोडं बोलकं

कोण चूक कोण बरोबर

हिशोब करून टाका

प्रत्येक क्षण जगून घ्या

घालवू नका मोका

त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू

आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll

आपली मतं दुसऱ्यावर

मुळीच लादू नका

समोरच्या व्यक्तीचा

अंत बघू नका

कोणताही विषय असो

जास्त नका ताणू

मीच शहाणा बाकी मूर्ख

असे नका मानू

कोण म्हणतं गोड बोलून

प्रश्न सुटत नाही

अनेकदा समजूतदार

माणूस भेटत नाही

जिभेवर साखर ठेवा

होणार नाही वाद

आवडल्यावर मनातून

द्या की हो दाद

तडतड बोलून उगीच मनं नका नासु

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ....ll 5 ll

बचतच कामी येते

खर्च कमी कर

जरी मोठा झालास तरी

रहा जमिनीवर

विचार करून पाऊल टाका , कुठे नका फसू

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ....ll 6 ll

ठीक आहे चूक नाही 

तरीही जुळतं घ्या 

बॉडी डेड होण्या आधीच 

आलिंगन द्या

स्मशानभूमीत चांगलं बोलून

काय उपयोग आहे 

जिवंतपणी कसे वागलात

जास्त महत्वाचं आहे

माझ्या कवितेत कोणतंही

तत्वज्ञान नाही 

तुम्ही खुशाल म्हणू शकता

कवीला भान नाही

ठीक आहे तुमचा आरोप

मान्य आहे मला

माझं म्हणणं एवढंच आहे

वाद नको बोला 

काय माहीत उद्या

आपण असू किंवा नसू

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू ll 7 ll


GITO 7057573102

रविवार, ३० जून, २०२४

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..*

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..* 

*आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..* 
*- अच्युत गोडबोले*

*आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, ह्याची चुणुक जगाला दिसू लागली आहे ..!!* 

*ह्या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन ह्यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी ..* 

👇 

*"कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो" हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन ह्यांचे ..!!* 

*गुगल मधून राजीनामा देताना, 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’, आणि त्या तंत्राच्या भयावह शक्यता ह्या विषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे ..!!"* 

*मी ह्याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो ..!!* 

*सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला ..!!*  

*सन १९४५ मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा ..!!* 

*आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने,  ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली ..!!* 

*आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल ह्या विषयीची ‘याची देही, याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पाप-क्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली ..!!* 

*गंमत म्हणजे ह्याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहाइमरने खेद व्यक्त केला होता ..!!* 

*आताचा डॉ. जेफ्री हिंटन ह्यांचा राजीनामा आणि त्यानंतरची 'खेदयुक्त काळजी' हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच ..!!* 

*इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे ..* 

*‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे ..!! त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल ..!!* 

*दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ ..!!*  

*आणि ..* 

*तिसरे म्हणजे, ह्या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती ..!!* 

*‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात ..!! एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास, हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात ..!! ह्या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही ..!!* 

*ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली त्यात, डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे ..!!* 

*‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे, सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते ..!! हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास, जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे ..!!* 

*याच्याही पुढे जात ..* 

*'जगाचा विनाश होईल का ..??*  

*ह्यापेक्षा ..* 

*‘कधी होईल' ..??’* 

*एव्हढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत ..!!* 

*ह्याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत ..!! आपण ती ऐकत आणि वाचत आहोत ..!!* 

*व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला  ह्यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर करणे आणि त्यासाठीचा आराखडा करणे, ह्यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत ..!!* 

*‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अती-प्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात, डॉ. हिंटन ह्यांचे मोलाचे योगदान आहे. ह्या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे ..!!*  

*डॉ. हिंटन म्हणतात की, हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती खूप भयावह आहे ..!!* 

*काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली ..!!* 

*वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे ..!!* 

*‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, ह्याच्या अनेक पाऊलखुणा दिसत आहेत ..!!* 

*‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर ह्या लेखकांना कोण मानधन देणार ..??* 

*परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला ..!!* 

*‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती ..!!* 

*‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४.०’ किंवा ‘आय ४’ ..!!* 

*ह्याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५.०’ उदयाला आली आहे. ह्यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी ..??) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल ..!!* 

*प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) ह्याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे की, ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल ..!!* 

*यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे ..!! त्यांनी असेही म्हटले आहे की, एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले तर, त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा ..!!* 

*‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत ..!! तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम,  आणि मानवाने केलेले काम,  ह्यांत फरक करता आला नाही तर, त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात ..!!* 

*‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५.०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत ..!!* 

*एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल तर,  ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो ..!! शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे, आणि त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात ..!!* 

*‘एआय’मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना, त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन, स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय ..!!* 

*या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षण-पद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’ ..!!  म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि, विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा ..!!* 

*ह्या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल ..!!* 

🙏🙏https://whatsapp.com/channel/0029Va6C2CgLdQeZKIu1kn1L

*- अच्युत गोडबोले*

जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?

 


जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?

वाचन तुम्हाला जगातून बाहेर काढते; जेव्हा तुम्ही स्वतःला तुमच्या कामाच्या वातावरणातून काढून टाकता, तेव्हा तुम्हाला अशा गोष्टी दिसू लागतील ज्या तुम्हाला खरोखर करायच्या असतील ज्या तुम्ही अद्याप करत नाही. "वाचनामुळे तुमच्या मनाला भटकण्याची संधी मिळते." निरोगी वाचनाने तुमचे मन निरोगी राहते.

१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.


२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.


३) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.


४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.


५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.


६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.


७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.


८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो. 


९) या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.


१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.


११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.


१२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.


१३) या जगात १% चागली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत.राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात, 

हे पण समजते.


१४) प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे समजायला लागते.


१५) हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.


१६) करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे २००/- कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो...

gito 7057573102

सोमवार, १७ जून, २०२४

टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth Collegeनं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे

 टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth Collegeनं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे.. फेडररचं भाषण प्रेरणादायी होतंच. पण उत्कृष्ट भाषण कसं असावं याचा नमुना म्हणून ते इतिहासात अजरामर ठरेल याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसासाठी ते उपयोगी आहे.



आपल्या सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यानं आजच्या भाषेत बोलायचं तर “तीन टेकअवेज” सांगितले आहेत. 


१.


Effortless is a myth 


एफर्टलेस - एखादी गोष्ट लीलया करणं, ती सहजगत्या अवगत असणं ही केवळ दंतकथा आहे. केवळ एखाद्याकडे टॅलेंट आहे म्हणून त्याला / तिला ते जमतं असं कधीच नसतं. अनेक वर्षांचे परिश्रम त्यामागे असतात. लोक म्हणतात मी लीलया खेळतो. त्यांना माझं कौतुकच करायचं असतं. मात्र “तो किती सहजगत्या खेळतो” हे सारखं ऐकून मी वैतागायचो. खरं तर मला प्रचंड मेहनत करावी लागत होती. मी अनेक वर्षं रडगाणं गायलो, चिडचिड केली, रागानं रॅकेट फेकून दिली आणि मग मी शांत रहायला शिकलो. मी इथपर्यंत केवळ टॅलेंटवर पोचलेलो नाही. माझ्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळापेक्षा चांगला खेळ करण्याचा अविरत प्रयत्न करुन मी इथवर पोचलो.


२.


It's only a point


आपण खेळलेल्या १५२६ सिंगल मॅचेसपैकी फेडरर ८० टक्के मॅचेस जिंकला. मात्र पॉईंटस ५४ टक्केच जिंकला.. म्हणजे सर्वोच्च स्थानावरचे टेनिस खेळाडूदेखील निम्मे पॉईंटस गमावतात.. तेव्हा तुम्ही It's only a point असा विचार करायला स्वत:ला शिकवायला हवं. आयुष्याच्या खेळात सतत आपण असे पॉईंटस गमावत असतो. मात्र तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नकारात्मक गोष्टींवर मात करायला शिकवतो. आत्मविश्वास त्यातूनच वाढतो. तळमळीनं, स्पष्टपणे आणि लक्ष केंद्रित करुन पुढचा गेम खेळायला तुम्ही तयार होता.


उत्तमोत्तम खेळाडू हे त्या स्थानापर्यंत प्रत्येक पॉईंट जिंकल्यानं पोचत नाहीत, तर आपण वारंवार हरणार आहोत आणि त्यावर कशी मात करायची ते सातत्यानं शिकत रहातात म्हणून उत्कृष्टतेपर्यंत पोचतात.

GITO 7057573102 जिटो सत्फुल सोनवणे COMPUTER PLANET कॉम्प्युटर प्लॅनेट ·

३.


‘Life is bigger than the court’


आयुष्य हे टेनिस कोर्टपेक्षा फार मोठं आहे. मी खूप परिश्रम घेतले, खूप शिकलो आणि टेनिस कोर्टाच्या त्या छोट्या मैदानात कित्येक मैल पळलो. मात्र मी पहिल्या पाचांमध्ये असतानाही मला आयुष्य जगण्याचं महत्व कळत होतं. प्रवास, निरनिराळ्या संस्कृतींचा अनुभव, नातीगोती आणि विशेषत:, माझं कुटुंब. मी माझी मुळं कधी सोडली नाहीत, मी कुठून आलो ते मी कधीच विसरलो नाही.


टेनिसप्रमाणेच तुम्ही तुमच्या आयुष्यात एका बाजूला उभे असता. तुमचं यश तुमच्या प्रशिक्षकावर, तुमच्या टीममधल्या सहका-यांवर, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून असतं. तुम्ही घडता ते या टीमवर्कमुळे..! 



शुक्रवार, ३१ मे, २०२४

एखादं बाळ रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी Nanni AI हे अँप.




एखादं बाळ रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी पालकांना रात्र रात्र जागावं लागतं. पण त्याहून कठीण असतं: हे समजून घेणं की बाळ नेमकं का रडतंय? पालकांना असं वाटतं की जणू एखादं परदेशी भाषेचं शब्दकोशाशिवाय भाषांतर करण्याचा प्रयत्न करतोय. 


चार्ल्स ओनू या मशीन लर्निंग एक्स्पर्ट ने AI च्या मदतीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तयार झालं Nanni AI हे अँप.


नायजेरियामध्ये बाळांच्या रडण्याचा अभ्यास करत असताना, ओनू यांनी एक कल्पना मांडली: बाळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रडण्याचे वेगवेगळे अर्थ असतील का? उदाहरणार्थ, "मला भूक लागली आहे" असं रडणं हे "मला शी आलीये" असं रडण्यापेक्षा वेगळं असेल. हे सिद्ध करण्यासाठी, त्यांनी जगभरातील हॉस्पिटलमधून शक्य तितक्या बाळांच्या रडण्याचे आवाज रेकॉर्ड करायचे ठरवले.


आत्तापर्यंत त्यांनी हजारो रेकॉर्डिंग्स जमा केले आहेत, ज्यासोबत प्रत्येक बाळाच्या अस्वस्थतेचे कारण देखील जमा केले आहे. पुढे, ओनू आणि त्यांच्या सहकाऱ्याने त्या डेटाला एक AI मॉडेलमध्ये फीड केले. परिणामी: पालकांसाठी Nanni AI नावाचे एक अ‍ॅप तयार झाले जे बाळाला अस्वस्थ करणारे नेमके कारण ओळखण्यात मदत करू शकते.


हे अँप कसे काम करते ? 


पालक काही सेकंदांसाठी त्यांच्या बाळाच्या रडण्याचा आवाज रेकॉर्ड करून अ‍ॅपला ऑडिओ विश्लेषण करण्यास सांगू शकतात. Nanni AI त्यानंतर बाळाला शांत करण्यासाठी काही सल्ले देईल. त्यापैकी एक बाळाच्या रडण्याचे कारण असू शकते.

सत्फुल प्रल्हाद सोनवणे
GITO जिटो

मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह

एका वर्षात दहा हजार लोकांना त्यांचा खरा न्याय मिळवून देणे विथ स्ट्रॉंग इव्हिडन्स द्वारे हा माझा ध्यास आहे
Website social media & Product Photo , व्हिडिओ information :- https://linktr.ee/Satful
mission true justice with strong evidence
Mission to help 10000 people get true justice are right with strong evidence https://satful.blogspot.com/


आत्तापर्यंत 150,000 पेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केल्या गेलेल्या या अँपमधील, अल्गोरिदम दिवसेंदिवस अधिक अचूक होत आहे कारण अधिकाधिक पालक त्यांचे रेकॉर्डिंग मॉडेलमध्ये फीड करत आहेत.


Nanni AI इथेच थांबणार नाहीये ?


ओनू यांच्या मते बाळाच्या आदर्श झोपेच्या पद्धतींबद्दल (Sleep Patterns), तसेच काही आरोग्य समस्यांवर देखील Nanni AI सल्ला देऊ शकेल. काही न्यूरोलॉजिकल समस्यांचे रडण्याच्या आवाजातून शोध घेता येतात. ही तर केवळ सुरुवात आहे. यापुढे बाळाच्या रडण्याचा आवाज हा त्यांच्या हृदयाचा दर, रक्तदाब, किंवा तापमानासारखा एक महत्त्वाचा जीवनसूचक ठरेल आणि बालसंगोपन सुधारण्यासाठी महत्वाचे ठरेल," असे त्यांचे म्हणणे आहे.


फोनमधील अँप स्टोअरमध्ये NANNI AI नावाचे अँप उपलब्ध आहे. तुम्ही नवजात बाळाचे पालक असाल तर नक्की पहा. किंवा आपल्या इतर पालक मित्रांना ही पोस्ट पाठवा.



रविवार, २६ मे, २०२४

पाळीव प्राणी आणि त्यांची देखभाल एका वेगळ्याच लेव्हलवर पोचली आहे. पाळीव प्राण्यांनी घरातील सदस्यांचीच जागा घेतली आहे.

 


ज्यांच्याकडे पैसे खर्च करण्याची क्षमता आहे अशा लोकांसाठी पाळीव प्राणी आणि त्यांची देखभाल एका वेगळ्याच लेव्हलवर पोचली आहे. पाळीव प्राण्यांनी घरातील सदस्यांचीच जागा घेतली आहे.


या बदलत्या ट्रेंड्सवर लक्ष ठेवून असणारे जगभरातील अनेक स्टार्टअप्स काही इंटरेस्टिंग pet care ideas वर काम करत आहेत.


BarkAir हे त्यातील प्रमुख उदाहरण. पाळीव प्राणी पालकांना विशेषतः श्वानपालकाना विमान प्रवास करणे खूपच अवघड ठरते. 


या एका दुर्लक्षित पण बऱ्यापैकी मोठ्या मार्केटवर नजर ठेवून BarkAir ही विमानसेवा न्यूयॉर्क मध्ये सुरू झाली आहे. तिकीट बुक झाल्यानंतर लगेचच प्रवासी श्वानबद्दल माहिती घेतली जाते, आवडीनिवडी जाणून घेतल्या जातात. प्रत्येक कुत्र्याच्या शरीर रचनेनुसार त्याच्यासाठी विशिष्ट सीट राखून ठेवली जाते.


विमानातील अंतर्गत रचना खास पाळीव प्राण्यांसाठी डिझाईन केली गेली आहे. विमानात कुत्र्यांना आवडतील असे व्हिडिओ, म्युझिक असते. अधून मधून पाठीवर पोटावर हात फिरवण्यासाठी केअर टेकर असतात…कुत्र्यांना चघळण्यासाठी खास बूट किंवा खेळणी असतात. 


असा सगळा “luxury” थाट असतो. अनेक श्वानपालकांनी BarkAir च्या सेवेचा आनंद घेतला आहे. 


दुसऱ्या एका स्टार्टअप ने ऑरो नावाचा pet robot बनवला आहे. घरातील सर्व माणसं बाहेर गेलेली असताना बिचारा कुत्र्याला एकट्याला किती बोअर होतं याची ज्या शहानपारकांना काळजी असते त्यांच्यासाठी हा उपाय आहे!


ऑरो हा रोबोट कुत्र्याचा सोबती म्हणून काम करतो. घरभर फिरतो, कुत्र्यासमोर एखादा बॉल किंवा खेळणं टाकून ते आणण्याचा खेळ खेळतो. सगळ्यात भारी म्हणजे ऑरो आपल्या स्क्रीनवर कुत्र्याला त्याच्या मालकाचा फोटो पण मधून मधून दाखवतो. आणि मालकाला देखील त्याच्या कुत्र्याचा live व्हिडिओ दाखवतो.


तिसरं स्टार्टअप आहे *Minitailz . जसं* माणसांसाठी स्मार्ट  असतं तसा हा प्राण्यांसाठीचा बँड आहे (कॉलर बँड). तो प्राण्याच्या हृदयाचे ठोके मोजतो. इतर ऍक्टिव्हिटी मोजतो. GPS ट्रॅकर असल्याने आपला प्रिय प्राणी कुठे आहे ते ट्रॅक करता येते. आणि विशिष्ट अंतराच्या बाहेर गेला तर SMS द्वारे पालकाला कळविण्याची पण यात सोय आहे.


२०२४ साल आहे हे….माणसंच नव्हे तर प्राणीही Hi Tech होत आहेत. 


पण खरी मजा तर पुढे आहे. इंस्टाग्राम वर चलतीत असलेल्या एका hashtag ची ! #barkitecture (बर्किटेक्चर) म्हणजे खास पाळीव प्राण्यांना सामावून घेणारे आर्किटेक्चर आणि इंटिरिअर डिझाईन !


आपल्या सोबत राहणाऱ्या प्राण्याला ते घर त्याचेही आहे (!) असे वाटावे म्हणून प्राणिपालक आपल्या घराला नव्याने रूपांतरित करत आहेत. उदा. कुत्र्यासाठीचा बेडरूम , खास कुत्र्यांसाठी डिझाईन केलेलं वेगळे बाथरूम , अगदी माणसांच्या डायनिंग टेबल खालीच कुत्र्याची जेवणाची केलेली सोय..म्हणजे संपूर्ण कुटुंबाला एकत्र जेवता येईल !


इंस्टाग्रामवर #barkitecture हा हॅशटॅग एकदा नक्की शोधून बघा !


लॉक डाऊन नंतर घरी प्राणी पाळण्याच्या संख्येत कमालीची वाढ झाली. माणसांचा या आपल्या शेपटीवाल्या मित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत गेला. आणि त्यातूनच हे नवे मार्केट तयार  झाले आहे.


मंडळी, कदाचित तुम्हाला या गोष्टी “जरा जास्तच” आहेत असं वाटत असेल. पण कोणतेही नवीन ट्रेंड सुरुवातीला असेच असते. हळूहळू लोक नव्या गोष्टी स्वीकारायला लागतात…आणि बघता बघता त्या “गरजेच्या” होऊन जातात.


आसपास सजगपणे बघा….एखाडी चांगली बिझनेस आयडीया "चार पायांवर" चालताना कदाचित तुम्हालाही दिसेल ! तशी ती तुम्हाला दिसली आणि त्यावर काम केलंत तरच हा लेखनप्रपंच सफल होईल !


सत्फुल प्रल्हाद सोनवणे 

GITO जिटो 


मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह


एका वर्षात दहा हजार लोकांना त्यांचा खरा न्याय मिळवून देणे विथ स्ट्रॉंग इव्हिडन्स द्वारे हा माझा ध्यास आहे


mission true justice with strong evidence

Mission to help 10000 people get true justice are right with strong evidence

शनिवार, २५ मे, २०२४

स्पॅम कॉल्सचा AI कर्दनकाळ !


स्पॅम कॉल्सचा AI कर्दनकाळ !

सध्याच्या काळात, दररोजचे काम करत असताना माझ्यासमोरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे सतत वाजणारा फोन. दररोज जवळजवळ २५-३० स्पॅम कॉल्स येतात. आणि त्यातही वाईट म्हणजे यातीलही बहुतांशी रोबोकॉल्स असतात. रोबो कॉल्स म्हणजे आधीच रेकॉर्डिंग केलेले ऑटोमॅटिक कॉल्स. (त्यांना रागावून शिव्याही देता येत नाही !). 
अगदी अनपेक्षितपणे यावरचा उपाय अचानक काल माझ्या वाचनात आला. Truecaller ने नुकताच मायक्रोसॉफ्ट AI च्या सोबतीने आणलेले एक नवीन फीचर “Personal Voice Assistant”
कल्पना करा: तुमचा फोन वाजला आणि "कोण असेल?" असा विचार करण्याऐवजी, Truecaller च्या स्पॅम-डिटेक्टिंग AI ने आधीच “तुमच्या आवाजात” तो फोन घेतला. कॉल करणाऱ्याची ओळख आणि कॉल चे कारण विचारले. आणि लगेचच ते स्क्रीनवर तुम्हाला दाखविले. आता पुढे फोनवर स्वतः बोलायचे, AI असिस्टंटला आणखी प्रश्न विचारायला सांगायचे की कॉल बंद करायचा हे ठरवायचे ! 
आहे की नाही जबरदस्त. ऑटोमॅटिक रोबो कॉल्सना ऑटोमॅटिक AI उत्तर. 

हा तुमचा डिजिटल सहाय्यक अगदी तुमच्यासारखा आवाज काढतो. Truecaller च्या या नवीन फिचरमुळे, तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करू शकता आणि AI त्याची पूर्णपणे नक्कल करून बोलू शकेल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या AI-चालित आवाजात कॉल्स उत्तर देऊ शकता, अगदी फोन उचलल्याशिवाय. हे जणू तुमचा “डिजिटल जुळा भाऊ” (Digital Twin) तुमच्यासाठी कॉल्स हाताळत आहे.

▪️Truecaller ने हे फिचर साकारण्यासाठी Microsoft च्या Azure AI स्पीच टेक्नॉलॉजीशी भागीदारी केली आहे.

▪️Truecaller मध्ये पर्सनल व्हॉइस सेटअप कसे करावे ?

▪️Truecaller मध्ये तुमचा पर्सनल व्हॉइस सेटअप करणे सोपे आहे. येथे कसे करायचे ते दिले आहे:

▪️Truecaller अॅप डाउनलोड किंवा अपडेट करा: तुमच्या स्मार्टफोनवर Truecaller चे नवीनतम आवृत्ती असणे आवश्यक आहे.

▪️Truecaller प्रीमियम सबस्क्राईब करा: हे फिचर प्रीमियम वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, ज्याची किंमत भारतात प्रति महिना ९९ रुपये आणि प्रति वर्ष ६९९ रुपये आहे.

👉सेटिंग्ज मध्ये जा: अॅप उघडा, सेटिंग्ज मध्ये जा आणि नंतर असिस्टंट सेटिंग्ज उघडा.

👉ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा: तुमचा पर्सनल व्हॉइस सेटअप करण्यासाठी सूचनांचे पालन करा, इथे तुमचा आवाज रेकॉर्ड करता येईल. या रेकॉर्डिंगमधून AI शिकेल आणि तुमच्या आवाजात फोन कॉल वर real time मध्ये बोलू शकेल.
gito 7057573102 GITO

गुरुवार, २३ मे, २०२४

New AI Voice Cloning Scams




 AI शी संबंधित दोन घटना आजच माझ्या वाचनात आल्या…पहिली अमेरिकेत घडलेली….दुसरी आपल्या भारतात…..!


लेक्सी बोगनच्या आयुष्यात गेल्या वर्षी मोठा बदल झाला. तिला मेंदूजवळ ट्युमर झाल्याचे कळले. दहा तासांच्या शस्त्रक्रियेमुळे बोगनच्या आवाजाच्या तारांवर (Voice Cord) परिणाम झाला आणि २२ वर्षांच्या बोगनला तिचा आवाज गमवावा लागला. 


त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी तिला संपर्क करून एका प्रयोगात सहभागी होण्याची विचारणा केली. त्यांनी तिला OpenAI च्या नवीन व्हॉईसबॉट प्लॅटफॉर्म, Voice Engine, वापरण्यासाठी विचारले. बोगनने त्या प्रयोगामध्ये सहभागी व्हायचे ठरवले.


बोगनच्या आवाजाचा अभ्यास करण्यासाठी AI मॉडेलने तिच्या आधी रेकॉर्ड केलेल्या १५ सेकंदांच्या व्हिडिओचा वापर केला. आणि Voice Cloning करून तिचा आवाज फोन मधील अँप मध्ये save करून दिला. आता, बोगन तिच्या फोनवर काहीही टाईप करून तिच्या स्वतःच्या आवाजात वाचून घेऊ शकते. तिच्या आवाजात हसूही शकते. सर्व भावभावना आपल्या शब्दात आणि आवाजात व्यक्त करू शकते


आवाज गमावलेल्या रुग्णांसाठी दुसऱ्याचा आवाज ऐकणे, किंवा रोबोटिक आवाज ऐकणे फार रुक्ष आणि कठीण असते. मात्र OpenAI सारख्या आवाजाच्या क्लोनिंग तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या अनेक कंपन्या हा एक मोठा प्रॉब्लेम सोडवीत आहेत.


दुसरी घटना लखनौ मध्ये घडलेली. सरकारी नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीला एका अनोळखी नंबर वरून फोन आला. फोनवर त्याचा मेव्हणा बोलत होता. तो कोणत्यातरी अडचणीत सापडला होता आणि त्याला त्वरित पैशांची गरज होती. फोन घेणाऱ्या माणसाने (नाव मुद्दाम लपवलेले आहे) घाईघाईत दीड लाख रुपये ट्रान्सफर केले. 


थोड्यावेळाने काम झालं का विचारण्यासाठी मेव्हण्याला फोन केला तेव्हा कळलं की मेव्हण्याने फोन केलाच नव्हता. स्कॅमरने सोशल मिडीया मधून त्याच्या मेव्हणाचा आवाज घेतला. Voice Cloning वापरून फोन केला आणि दीड लाख कमावले.


अशाच घटना मुलांच्या बाबतीतही होत आहेत. पालकांना मुलांच्या आवाजात खोटे फोन जात आहेत. त्यामुळे आपल्या मुलांचे फोटो, व्हिडिओ, त्यांचा ठावठिकाणा समजू शकेल अशा पोस्ट सोशल मीडिया वर टाकणे बंद करा. 


दोन्ही घटनांमागचं तंत्र तसं सारखंच. पण वापर वेगवेगळे ! चांगले किंवा वाईट….तंत्रज्ञान आयुष्य बदलणार आहे..आणि ही प्रक्रिया थांबवणे जवळपास अशक्य आहे. तेव्हा स्वतःला तयार करा ..अपडेटेड राहा.

GITO 7057573102

बुधवार, २२ मे, २०२४

प्रवासात मला एक सुखद अनुभव मिळाला त्याची पोस्ट टाकत आहे.


 प्रवासात मला एक सुखद अनुभव मिळाला त्याची पोस्ट टाकत आहे.


काही अफलातून व्यक्तिची भेट अचानक आपल्याशी होते आणि आपली एका नवीन जगाशी ओळख होते.

काल गोव्याहून येताना केवळ कर्मधर्मसंयोगाने  किंवा ब्रह्मांडाची योजना असेल म्हणून श्रीयाशी ओळख झाली.

आपण मेडिटेशनद्वारे सर्व जगताला एर्जी,उर्जा देतो. एनर्जीलेव्हलवर सगळे एकच आहोत. तशाच प्रकारची माहिती श्रीयाकडून मिळाली.

श्रीयाने प्रवासात आपल्या बॅगेत एक पर्शियन मांजर आणले होते. तिने सांगितले ती त्याच्याशी चक्क बोलते आणि त्याच्याशीच नव्हे तर जगातल्या कुठल्याही प्राण्याशी अगदी पाली,झुरळांपासून हत्ती, पेग्विन पर्यन्त.

तिने Animal communicaters चा कोर्स केला आहे.

तिने प्राण्यांबद्दल एवढ्या गमतीजमती सांगितल्या. प्राणी ही हटवादी,नटखट असतात.त्याच्या मनात नसेल तर ते आपल्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत.

ति तिच्या लाडक्या कुत्र्याच्या सोलशी बोलते,तो जाऊन ४ वर्ष झाली. तिला तो परत येयला हवा आहे आणि नियती,किंवा तिची इच्छाशक्ति म्हणा तो तिच्यापोटीच जन्म घेणार आहे. झाडांशी,घराशी सुध्दा ती बोलते. ती होपोनोपोनो प्राण्यांना करते.

तिच्या घरात कोणी नसतानाचोरी झाली होती. तिच्याकडे त्यावेळेला शेजारचे मांजर आले होते. त्याच्याशी संवाद साधल्यावर तिला कशी चोरी झाली ते कळले.(अर्थात कायदयाच्या संज्ञेत हे बसत नाही.)

 माझ्या झाडाला काही केल्या फुले येतच नाहीयेत,कळ्या खूप येतात पण गळून पडतात. ती माझ्या झाडांशी बोलून मला उपाय सांगणारआहे.

श्रीयाशी माझी भेट होणे यामागे नक्कीच ब्रह्मांडाचा काहीतरी हेतू असेलच

मेडिटेशनमुळेच खूप छान,छान नवनवीन मार्ग सापडत आहेत.

यासाठी वृंदा मॅडम व नेटभेटला मनापासून परत,परत धन्यवाद 

शनिवार, ६ एप्रिल, २०२४

deep wok

Deep Work
Book by Cal Newport

डीप वर्क म्हणजे काय?  डीप वर्क (2016) हे तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे कामांवर सखोल लक्ष केंद्रित करण्याची आमची क्षमता कशी नष्ट झाली आहे – आणि या नाकेबंदीवर मात कशी करावी याबद्दल आहे.  या ब्लिंक वेगवेगळ्या धोरणांचे वर्णन करतात जे तुम्हाला तुमच्या कामाचे आउटपुट सुधारण्यात आणि तुमच्या मोकळ्या वेळेचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यात मदत करू शकतात.

1. "सखोल कामामुळे निर्माण झालेल्या प्रवाहाच्या अनुभवाभोवती तुमचे कार्य जीवन तयार करणे हा खोल समाधानाचा सिद्ध मार्ग आहे"
2. "कधी कधी खोलवर जाण्यासाठी, तुम्हाला प्रथम मोठे व्हायला हवे"
3. तुम्ही तुमचा उरलेला वेळ कंटाळवाण्यापासून दूर राहण्यात घालवल्यास तुम्ही एकाग्रतेची सखोल पातळी गाठण्यासाठी संघर्ष कराल
4. "लीड मेजर्स" वर कृती करा—यश मिळवून देणाऱ्या वर्तनांचे मापन करा
5. इच्छाशक्ती मर्यादित आहे, विधी आणि सवय तुम्हाला सखोल कार्यात नेईल
6. नवशिक्यासाठी, दिवसभरात कुठेतरी एका तासाच्या आसपास तीव्र एकाग्रतेची मर्यादा आहे असे दिसते, तर तज्ञांसाठी ही संख्या चार तासांपर्यंत वाढू शकते—पण क्वचितच अधिक
7. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा कठोर परिश्रम करा.  तुम्ही पूर्ण झाल्यावर, पूर्ण करा”

कॅल न्यूपोर्ट यांच्या "डीप वर्क" पुस्तकातील महत्वाचे मुद्दे:

डीप वर्क म्हणजे काय?

डीप वर्क म्हणजे अशा प्रकारचे काम जे पूर्ण लक्ष आणि एकाग्रतेने केले जाते ज्यामुळे मानसिक क्षमतेचा पूर्ण वापर होतो. यामध्ये जटिल समस्या सोडवणे, सर्जनशील विचार करणे आणि नवीन कौशल्ये शिकणे यांचा समावेश होतो.

डीप वर्क का महत्त्वाचे आहे?

आजच्या जगात, आपण सतत विचलनांनी वेढलेले आहोत. सोशल मीडिया, ईमेल आणि स्मार्टफोन सारख्या तंत्रज्ञानामुळे आपले लक्ष विभागले जाते आणि आपल्याला लक्ष केंद्रित करणे कठीण होते. यामुळे आपली उत्पादकता आणि सर्जनशीलता कमी होते.

डीप वर्क आपल्याला आपले लक्ष केंद्रित करण्यास आणि आपल्या सर्वात महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते. यामुळे आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो, चांगल्या दर्जाचे काम करू शकतो आणि आपल्या ध्येयांना जलद गाठू शकतो.

डीप वर्क कसे विकसित करायचे?

डीप वर्क विकसित करण्यासाठी, आपल्याला आपल्या सभोवतालचे वातावरण व्यवस्थापित करणे आणि आपले लक्ष केंद्रित करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. न्यूपोर्ट पुस्तकात डीप वर्क विकसित करण्यासाठी चार रणनीती प्रदान करतो:

शेड्यूल: आपल्या दिवसात डीप वर्कसाठी वेळ निश्चित करा आणि त्या वेळेचे संरक्षण करा.
रिट्यूअल: आपल्या डीप वर्क सत्रांसाठी सुरुवात आणि शेवट तयार करा. यामुळे आपल्याला "मध्ये प्रवेश" आणि "बाहेर पडण्यास" मदत होईल.
कमीत कमी विचलन: आपल्या डीप वर्क सत्रांमध्ये विचलन कमी करण्यासाठी रणनीती तयार करा. यात आपल्या फोन बंद करणे, सोशल मीडिया वेबसाइट्स ब्लॉक करणे आणि शांत ठिकाणी काम करणे यांचा समावेश असू शकतो.

प्रतिबद्धता: डीप वर्क कठीण असू शकते, परंतु त्याला वेळ आणि सराव लागतो. हार मानू नका आणि सराव करत रहा.


Satful Sonawane, , 
Director Computer Planet & GITO Pune
7057573102
*We are Leading Distributor in Spy Camera and Product related to Evidence, Detective Agency, *

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

जीटो स्पाय कॅमेरा आणि स्त्रीचा विजय

जीटो स्पाय कॅमेरा आणि स्त्रीचा विजय

स्त्रीला तिच्या पतीवर संशय होता आणि त्याला घटस्फोट देण्याचा विचार करत होती.
तिला पुरावे गोळा करण्यासाठी मदतीची गरज होती.
तिने computer planet च्या मदतीने जीटो स्पाय कॅमेरा खरेदी केला.
तिने कॅमेरा तिच्या घरात लपवून ठेवला आणि तिच्या पतीचे कृत्य रेकॉर्ड केले.
व्हिडिओमध्ये पतीचे गैरवर्तन दिसून आले.
स्त्रीने घटस्फोटाच्या केसमध्ये व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला.
न्यायालयाने स्त्रीला घटस्फोट आणि पोटगी मंजूर केली.

स्त्रीने जीटो स्पाय कॅमेरा, computer planet आणि सतफुल सोनवणे यांचे आभार मानले.
ती म्हणाली की जीटो स्पाय कॅमेरामुळे तिला पुरावे गोळा करण्यात आणि तिचा केस जिंकण्यात मदत झाली.
ती computer planet च्या मदतीसाठी आणि सतफुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनासाठी कृतज्ञ होती.

जीटो स्पाय कॅमेरा स्त्रीला तिचा केस जिंकण्यास आणि न्याय मिळवण्यास मदत करणारे प्रभावी साधन ठरले. स्त्रीने जीटो स्पाय कॅमेरा, computer planet आणि सतफुल सोनवणे यांचे आभार मानले आणि त्यांच्या मदतीची प्रशंसा केली.

GITO SPY 7057573102 CAMERA

Spy camera Meesho
Spy Camera gadgets
Belt Spy Camera
GITO SPY CAMERA 7057573102
Customised Spy Camera
Smallest Spy Camera
Sony Spy Camera
Odonil Spy Camera
Remote Control Hidden Camera

शनिवार, २ मार्च, २०२४

बोर्डाची परीक्षा*

*बोर्डाची परीक्षा*

मँगो मस्तानी पिताना माझ्या डोळ्यांत पाणीच आलं !...
तुम्ही म्हणाल कसं काय ? मँगो मस्तानी तिखट होती का तिचा घोट घेताना ठसका लागतो ?
थांबा , तुम्हाला अख्खी स्टोरीच सांगतो.
दहावीची प्रिलिम झाली , रिझल्ट लागला आणि मी स्वतःच दचकलो. मला पासष्ठ टक्के पडले होते. फक्त. तसे ऐंशीपर्यंत पडायला हवे होते. तेवढा मी आहे बरं का ! हे झालं माझं . पण आमचे बापूसाहेब ! त्यांना वाटतं की मी बोर्डात नव्वद टक्क्यांच्यावर मार्क्स पाडावेत.
पण सगळी वाट लागली होती. कारण ? - पव्या !
हा पव्या कोण, तेही सांगायला पाहिजे ना. हा पव्या म्हणजे तुमच्या आजूबाजूला असा एखादा पोरगा असतो तोच. तो पव्याच असतो असं नाही. तो अव्या असू शकतो किंवा देव्याही असू शकतो. नाव वेगळं असलं तरी ही अशी मुलं वागायला मात्र सेमच असतात.
माझा मित्र पव्या हा अंगाने दांडगट. केस चित्रविचित्र, पंक स्टाईल ठेवलेला. दहावीत चार वेळा गटांगळ्या खाल्लेला .अन मग शाळाच सोडलेला. शिक्षण नाही तर दुसरं काहीतरी करायला पाहिजे ना. पण नाही, तो तसं काहीच करत नाही.तो छान- छान कपडे घालून शायनिंग मारतो. मोबाईलवर गेम्स खेळतो. दुसऱ्यांच्या गाड्या घेऊन फिरवतो. तो ' भारी ' वाटतो . त्याच्या बरोबर राहिलं की भारी वाटतं. त्याच्यासारखं रहावंसं वाटतं, वागावंसं वाटतं. तो डेअरिंगबाज आहे, त्याचं आकर्षण वाटतं.
त्याची संगत लागली आणि माझा टीपी सुरु झाला. परिणाम ? - प्रिलिमचा निकाल.
तुम्हाला काय वाटतं - मी काय केलं असेल ? अशा वेळी तुम्ही जे करता तेच... मी घरी रिझल्ट सांगितलाच नाही.
पण आमचे बापूसाहेब ! ते काय गप बसतात होय.
आमच्या शाळेतले एक सर त्यांची गाडी बापूंकडेच टाकतात. बापू एकदम भारी मेकॅनिक आहेत. ते सर आले तेव्हा बापूंनी विचारलं, " सर, रिझल्ट लागला का हो ? "
" हो. कधीच . का ? अक्षयने सांगितला नाही का ? "
" नाही. मीच विचारलं नाही. मध्ये काम खूप होतं ना," बापू खोटं बोलले.
जेव्हा बापू घरी आले, तेव्हा त्यांनी मला रिझल्ट विचारला ...
" अक्षय, मला ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं दहावी आहे , तू नव्वदच्या पुढे जाशील. तुझ्याकडे ती क्षमता आहे. जर नसती - तर शिक्षण सोड म्हणलो असतो, गॅरेज मध्ये चल म्हणलो असतो ..."
माझं तर डोकंच फिरलं. मला एकदम पव्याचं वागणं आठवलं. तो त्याच्या आई-वडिलांना उलटं बोलतो, काहीपण बोलतो.
मीही म्हणालो, " बापू, तुम्हीतर दहावीतच शाळा सोडली. पुढे शिकला नाही आणि पोरांनी मात्र भरपूर मार्क्स पडायचे होय ?"
बापूंचा चेहराच उतरला. आईचाही.
त्यांनी माझ्याशी बोलणंच बंद केलं. दोन दिवस वाईट वाटलं . नंतर नाही. पव्या होता ना -आदर्श !
त्यानंतर दोन दिवस आई काहीतरी शोधत होती. तिला ते सापडत नव्हतं. खूप अस्वस्थ होती. मी तिला विचारलं, मी मदत करू का ? नको म्हणाली.
आणि तिला ते सापडलं. काय असावं ?...
ते बापूंचं प्रगतीपुस्तक होतं. जुनं, रंग गेलेल्या हिरव्या कागदाचं. जीर्ण झालेलं, कडा फाटलेलं. बापू नववीत होते - तेव्हाचं !
आणि - मी उडालोच ! बापूंना नववीमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क्स होते !
मग आईने मला सांगितलं, " बापू खूप हुषार होते. त्यांना खूप शिकायचं होतं. पण ते दहावीत गेले आणि त्यांचे वडील देवाघरी गेले. घराची जबाबदारी बापूंवर आली . मग त्यांनी शाळा सोडली व गॅरेजमध्ये नोकरी धरली.नाईलाजाने ! म्हणून त्यांना वाटतं, आपल्या मुलाने खूप शिकावं. त्यासाठी ते किती कष्ट करतात, हे तुला कळणार नाही. तर तू ? तू अभ्यास करत नाहीस. त्या पव्याबरोबर सारखा बिनकामाचा हिंडतोस. आत्ताच मागे पडलास .मग बोर्डाच्या परीक्षेला काय करणार तू ?
वर - आणि वर उलटं बोललास त्यांना - तुम्ही शिकला नाहीत म्हणून ?"
आईचा आवाज चढला.
आई रागावली की कसंतरी होतं. माझ्या मनाला काटा टोचल्यासारखं झालं. टोचला काय, मनात रूतूनच बसला जणू !
गेम्समध्ये पळणाऱ्या कारसारखे माझे विचार पळत होते. ते बाजूला ठेवले. आणि पहिलं काम केलं, पव्याची मैत्री सोडली. माझ्यामुळे त्याला काही फरक पडला नाही. त्याला त्याच्यासारखे खूप मित्र होते. त्यामुळे माझे डोळे उघडले. दुसरं काम केलं - बापूंच्या प्रगतीपुस्तकाला लॅमिनेशन करून आणलं.
आणि ते समोर ठेवून अभ्यासाला सुरुवात केली. देवाचा फोटो असल्यासारखं. अर्थात बापूंना मी ते कधीच दिसू दिलं नाही. हातामध्ये वेळ थोडा होता.पण ठरवलं तर जमतं हां मित्रांनो . बोर्डाची परीक्षा म्हणलं तर तेवढी कठीण नक्कीच नसते .
- आणि बोर्डाच्या परीक्षेत मला ब्याण्णव टक्के पडले.
मी गॅरेजवर गेलो. बापूंनी माझी पाठ दणादणा थोपटली आणि म्हणाले, " अभिनंदन ! पोरा येस्स ! " त्यांचा चेहरा आनंदाने उजळला होता.
बापू शिकले नाहीत. पण ते काही कमी नाहीत. त्यांनी इंटरनेटवर स्वतः - स्वतः माझा रिझल्ट, माझ्याआधी पाहिला होता. ते माझी वाटच पहात होते.
त्यांनी माझ्याशी असलेला त्यांचा अबोला सोडला. ते मला मँगो मस्तानी प्यायला घेऊन गेले. अगदी लगेच. मला ती आवडते हे त्यांना माहितीये.
मस्तानी पिताना ते म्हणाले, " थँक्स पोरा."
" कशासाठी बापू ? थँक्स काय ? "
" अरे. तू शेवटी करून दाखवलंस ! आणि - माझ्या प्रगतिपुस्तकाला तू लॅमिनेशन केलंस ना... मला सगळं माहितीये. मी काही विसरलेलो नाहीये..."
आता त्यांच्यासमोर बसणं, बोर्डाच्या परीक्षेला बसण्यापेक्षा जास्त अवघड वाटू लागलं.
"...पण तू यश मिळवलंस. मला आता काही म्हणायचं नाही. तुला काय हवं ते...." त्यांना पुढे काही बोलताच येईना. डोळे पाण्याने डबडबले.
मग मँगो मस्तानी समोर असली तरी माझ्याही डोळ्यांत पाणी येणारच ना !

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

‘‘ मनाचा एक्स-रे’’


 ‘‘ मनाचा एक्स-रे’’

(प्रतिबिंब)(  Copyright )🗿👁 डॉ .दत्ता कोहिनकर


सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्‍या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमुक एक जागी जाऊ नकोस असं काही सांगितलं होतं का?’’ ती म्हणाली हो, ‘‘बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको असं बजावलं होतं. त्याने, लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कुच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणार्‍या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.’’ बायकोने मुलाला हाक मारली व फ्राईडचा हात धरत विचारलं, ‘‘तुम्हाला सिध्दी प्राप्त झालीय का ? हा कारंज्याजवळच आहे हे कसे तुम्हाला कळालं ?’’ फ्राईड म्हणाला - ‘‘सिध्दी-बिध्दी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.’’ 

खरोखर मित्रांनो कवयत्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशात जाते. प्रयोग करून पहा, डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला कि दोन-तीन माकडं डोळयासमोर येतील. एखादया दारावर आत डोकावू नये अशी पाटी लावली कि आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच. 


 एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ‘‘मित्रा मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.’’ राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घौडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला अरे यार ही किल्ली दुसर्‍या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही. पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती. 


 अंर्तमनाला एखादी गोष्ट करू नकोस असे ताकिद देऊन दरडावून सांगितले की ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते. त्यावेळी बर्हिमनाने त्याला सहजपणे - हळुवारपणे, तत्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले कि अंर्तमन-बर्हिमन यात सुसंवाद सुरू होतो. तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंर्तमन व बर्हिमन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात. आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये यासाठी आपण जागरूक असतो. 


 आपला भाव देवाला दिसावा असे भक्ताला वाटते, आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते, कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणांस दाद दयावी असे कवीला वाटते. आपल्या जीवनाचा काही भाग सगळयांना दिसावा पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळयांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही. कारण आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो. 


 मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार एक्स-रे काढण्यासाठी सजग राहून दिर्घश्‍वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सुर्यनमस्कार घालणे महत्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरिक्षण करावे त्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणार्‍या जाणार्‍या श्‍वासाला डोळे मिटून जाणत रहा. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागेल व मनाचा एक्स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनानेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल. शेवटी म्हणतात ना,  ‘‘मन करा रे प्रसन्न - सर्व सिध्दीचे कारण’’ 🌹