satful sonawane
नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत . आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets GITO committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102 #GITO
गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्यातून पैशांच्या गोणी बाहेर पडल्या. गोणी फुटून त्यातील नोटा इतस्ततः विखुरल्या. ड्रॉयव्हरला हे लगेच कळले नाही आणि गाडी तशीच भरधाव पुढे निघून गेली.
बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५
माझी आयडिया उघड केल्यास कोणीतरी ती कॉपी करेल का? - माझ्या स्पर्धकांनी माझ्या बिझनेसची रणनीती कॉपी केली तर काय होईल?
गेल्या आठवड्यात एक तरुण मुलगा ऑनलाईन कन्स्लटिंगसाठी झूम कॉल वर भेटला होता. त्याला स्टार्टअप सुरु करायचं होतं. त्याच्याकडे एक चांगली बिझनेस आयडीया होती. आणि त्यावर तो बरेच दिवस काम करत होता.
त्याच्यामते त्याची आयडिया इतकी चांगली होती की तो ती मला सांगायलाही कचरत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते :
- माझी आयडिया उघड केल्यास कोणीतरी ती कॉपी करेल का?
- माझ्या स्पर्धकांनी माझ्या बिझनेसची रणनीती कॉपी केली तर काय होईल?
- माझ्या कल्पनेचे पेटंट (patent) घ्यायला हवे का? (खरंतर फक्त कल्पनेचं पेटंट घेता येत नाही. बऱ्याचदा लोकांना हे माहीतच नसतं !)
यावर माझं उत्तर नेहमीच एकच असतं: हो, कोणीही तुमची कल्पना कॉपी करू शकते आणि अनेक लोकांनी तसा प्रयत्न केलाही आहे. तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल तर ग्राहकांना तुमची कल्पना सांगावीच लागणार ? सुरुवात करण्याच्या आधी जरी कोणाला सांगितली नाही तरी सुरुवात केल्यानांतर कॉपी करणारे असंख्य लोक येतीलच.
पण मग तुम्ही अशा परिस्थितीत काय कराल?
मॅकडोनाल्ड्सने जे केले, तेच करा! 🍔🍟
मॅकडोनाल्ड्स (McDonald's) ही ५० वर्षांपेक्षा जास्त जुनी कंपनी आहे. त्यांच्या बिझनेसची सर्व माहिती, त्यांच्या रणनीती, आणि त्यांच्या कामाची पद्धत (standard operating procedures) अगदी सहजपणे उपलब्ध आहे. कोणीही त्यांच्याकडे नोकरी करून किंवा त्यांच्याबद्दलची पुस्तके वाचून त्यांची कार्यप्रणाली जाणून घेऊ शकतो. लाखो लोकांनी मॅकडोनाल्ड्सची रणनीती कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही आज मॅकडोनाल्ड्स जगातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक आहे.
याचं कारण काय? मॅकडोनाल्ड्सने स्पर्धकांकडे लक्ष देण्याऐवजी फक्त आपल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी हे पहिले की, ग्राहक जे पैसे देतील, त्या बदल्यात त्यांना सर्वोत्तम उत्पादन आणि अनुभव मिळेल. फास्ट फूड उद्योगात अनेक खेळाडू असले तरी, मॅकडोनाल्ड्सने ग्राहकांना सातत्याने उत्तम दर्जाचा बर्गर आणि सेवा दिली. त्यांच्या यशाचे रहस्य प्रतिस्पर्धकांना घाबरण्यात नाही, तर ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यात आणि त्यांना उत्तम सेवा देण्यात आहे.
Execution is way more important than Idea/Strategy !
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
ही कहाणी आहे एका वेड्या स्वप्नाची... एका अशा निर्धाराची, ज्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीलाही गुडघे टेकायला भाग पाडलं. ही कहाणी आहे रिचर्ड विल्यम्स नावाच्या एका पित्याची, ज्याने आपल्या मुलींच्या जन्माच्या आधीच त्यांच्या यशाची गाथा लिहिली होती
ही कहाणी आहे एका वेड्या स्वप्नाची... एका अशा निर्धाराची, ज्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीलाही गुडघे टेकायला भाग पाडलं. ही कहाणी आहे रिचर्ड विल्यम्स नावाच्या एका पित्याची, ज्याने आपल्या मुलींच्या जन्माच्या आधीच त्यांच्या यशाची गाथा लिहिली होती !
वर्ष होतं १९८०. कॅलिफोर्नियाच्या गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कॉम्प्टन शहरात, रिचर्ड नावाचा एक सामान्य माणूस टीव्ही पाहत होता. स्क्रीनवर एक दृश्य दिसलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला ! रोमानियाची एक टेनिसपटू, स्पर्धा जिंकल्यानंतर $४०,००० चा चेक स्वीकारत होती. ती रक्कम रिचर्डच्या वर्षभराच्या पगारापेक्षाही जास्त होती.
क्या आपको ऐसा गुप्त कॅमेरा चाहिए ?
जो किसी को नजर नाही आएगा जीसका live विडिओ केवल आप ही काहीसे भी मोबाईल पे देख पाएँगे
Website :- www.securityplanet.co
Product वीडियों :- - https://www.youtube.com/user/MrSatful?sub_confirmation=1
Website social media & Product Photo , व्हिडिओ information :- https://linktr.ee/Satful
Follow thislink to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919822358631
हॅलो📞📱 आपको प्रॉडक्ट देखना है तो व्हिडिओ कॉल लगाके दिखा सकतेहै. 11am to 7pm
त्याच्यासाठी तो फक्त एक चेक नव्हता, तर गरिबी आणि निराशेच्या अंधारातून बाहेर पडण्याचा एक तेजस्वी मार्ग होता. त्याच क्षणी, रिचर्डने निर्णय घेतला - माझ्या मुली टेनिसपटू बनतील!
रिचर्डने केवळ स्वप्न पाहिलं नाही, तर ते सत्यात उतरवण्यासाठी तब्बल ७८ पानांची एक तपशीलवार योजना लिहिली. कॉम्प्टनच्या अंधाऱ्या गल्ल्यांमधून आपल्या दोन मुलींना बाहेर काढून टेनिसच्या झगमगत्या दुनियेचं शिखर कसं गाठायचं, याचा तो आराखडा होता. पण या योजनेसमोर आव्हानांचे हिमालय उभे होते:
पहिली अडचण: रिचर्डला टेनिसचा 'ट' सुद्धा माहीत नव्हता.
दुसरी अडचण: हा महागडा खेळ शिकवण्यासाठी त्याच्या खिशात दमडीही नव्हती.
तिसरी आणि सर्वात मोठी अडचण: ज्या मुलींना चॅम्पियन बनवायचं होतं, त्यांचा अजून जन्मही व्हायचा होता!
पुढची पाच वर्षे रिचर्ड टेनिसची मासिकं, व्हिडिओ कॅसेट गोळा करून स्वतः टेनिस शिकला. आणि मग, त्याच्या योजनेनुसार, व्हीनस आणि सेरेना या दोन लहान मुलींच्या हातात टेनिसची रॅकेट आली. तो आता फक्त पिता नव्हता, तर त्यांचा प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि संरक्षकही होता.
परिस्थिती इतकी बिकट होती की, खेळाची साधी साधनं घेणंही परवडत नव्हतं. रिचर्ड श्रीमंतांच्या टेनिस क्लबबाहेरच्या कचरापेटीत फेकून दिलेले जुने, वापरलेले टेनिस बॉल गोळा करायचा आणि ते एका शॉपिंग कार्टमध्ये भरून सरावासाठी आणायचा. याच जुन्या चेंडूंवर त्या मुलींनी सार्वजनिक कोर्टवर स्वप्नांचा सराव सुरू केला.
तो बाप आपल्या मुलींसाठी एखाद्या पोलादी ढालीसारखा उभा राहिला. सरावादरम्यान स्थानिक गुंडांपासून मुलींना वाचवताना त्याला अनेकदा मारहाण झाली. एकदा कोर्ट सोडण्यास नकार दिल्यामुळे, गुंडांनी त्याचे नाक, जबडा आणि बोटं मोडली, अनेक दात पाडले. त्या रक्ताच्या थारोळ्यातही त्याचा निश्चय अटळ होता. त्या रात्री त्याने आपल्या डायरीत लिहिलं, "आजच्या दिवसानंतर, इतिहास या 'दात नसलेल्या' माणसाला धैर्याचा एक स्तंभ म्हणून ओळखेल."
टेनिस हा तेव्हा प्रामुख्याने गोऱ्या लोकांचा खेळ मानला जायचा. रिचर्ड जेव्हा आपल्या कृष्णवर्णीय मुलींना घेऊन स्पर्धांसाठी जायचा, तेव्हा लोकांच्या विचित्र नजरा, टोमणे आणि अपमान सहन करावा लागायचा. एकदा मुलींनी निरागसपणे विचारलं, "बाबा, हे लोक आमच्याकडे असे का बघतात?"
रविवार, १७ ऑगस्ट, २०२५
महार कोण होते? वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं…महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते.2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे.3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते.4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे.5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता.6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत.7. महार हे लढवैय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करुन महार रेजिमेंटच बनवली. पेशवाईच्या अस्ताचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो.8. पेशव्यांनीही अंगरक्षक, पहारेकरी म्हणून महारांनाच प्राधान्य दिले होते.9. महार हे ग्राम, नगर, राज्यात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटील किंवा नगराध्यक्षाला देत. एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक, उदा. नंदीवाले, गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपूर्ण माहिती घेणे आणि ती पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते.10. महारांवर शेतसारा, खजिना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी होती.11. महार समाज अस्पृश्य गणला गेला होता.थोडक्यात हा समाज आजच्या पोलीस, गुप्तचर आणि महसूल विभागाशी निगडीत कार्ये करत होता. महार या शब्दाची व्युत्पत्ती अनेकांनी शोधली आहे. डॉ. इरावती कर्वे म्हणतात, महार राहतात ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. मृताहारी (म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणून) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असेही इरावतीबाईंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गतः मृत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे मृताहारी बुद्ध धर्माच्या ज्ञात इतिहासात अगणित झालेले असतील. त्या सर्वांनाच महार म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात आणि आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे. म्हणजे महार शब्दाचे मूळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.महाआहारी (खूप खाणारे) असणार्या लोकांना महार म्हणू लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्कमध्ये (रोबेर्टसन) दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही. दुसरे असे की महार एक जात म्हणून कोणत्याही स्मृती, पुराणांमध्ये उल्लेखिलेली नाही. अस्पृश्यांच्या यादीतही ही जात पुराणे आणि स्मृत्यांनी नोंदलेली नाही. मनुस्मृतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचू, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे. त्यांनी गावाबाहेर राहावे असे म्हटलेले आहे. पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्पृश्य म्हटलेले नाही. तैत्तिरिय ब्राह्मणानुसार आणि विष्णुस्मृतीनुसार फक्त चांडळ ही जात अस्पृश्य आहे. त्यामुळे मुळात जन्मभूत अस्पृश्यता भारतात नेमकी कधी आणि का आली, ते सांगता येत नाही.मग प्रश्न असा उद्भवतो की की महार ही मुळात जात होती काय? महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?त्यासाठी आपण महार समाजातील प्रमुख आडनावांकडे एक दृष्टीक्षेप टाकूयात. महारांमध्ये आढाव, आडसुळे, अहिरे, अवचट, भेडे, भिलंग, भिंगार, भोसले, कांबळे, गायकवाड, पवार, कदम, शेळके, शिंदे आदी आडनावे आढळतात. या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते. व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा एकाच समाजघटकातून वेगवेगळ्या जाती विभक्त झाल्या. जाती जन्माधारीत बनत गेल्याने जातीधर्म आणि समाजधर्मात काही विभाजन झाले. हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे. (शिव, विष्णू, विठ्ठल, महलक्ष्मी इत्यादी) त्याचवेळी या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्पृश्यतेच्या काळात अन्य मंदिरांत स्थान आणि प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसीत होतात, हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहू शकतो.त्यासाठी सुरुवातीलाच सांगितलेले महार समाजाचे व्यवसाय पुन्हा एकदा तपासून घेऊयात.अ) महार हे ग्रामरक्षक होते- चोर्या, दरोडे आणि आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच वेशीआतचे लोक निर्घोर झोपू शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती. त्यांनाच भूमिपुत्र मानले जात होते. कारण त्यांच्या साक्षीनेच तर जमिनींच्या सीमा ठरत होत्या, संरक्षित राहत होत्या.पहिल्या सहस्त्रांतापर्यंत प्रादेशिक व्यापार मोठय़ा प्रमाणात होत असे. परक्या मुलुखातून जाताना चोर-दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके व्यापारी सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी, प्रामाणिक आणि लढवैय्या अशी राहिलेली आहे. म्हणजेच गावाचे, व्यापार्यांचे रक्षण हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.या दोन मुद्द्यांवरुन स्पष्ट दिसते की, महार हा शब्द महारक्षक (वा प्राकृत महारक्खित-महारक्ख) या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे. हे विधान ठामपणे करण्याची दोन कारणे आहेत. महार ही जात फक्त महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशातच अस्तित्वात आहे. या भूभागावर सातवाहनांनी साडेचारशे वर्ष इतका प्रदीर्घकाळ राज्य केले. सातवाहनांनी महाराष्ट्री प्राकृत हीच आपली शेवटपर्यंत राजभाषा ठेवली. त्यामुळे जातीनामांवर महाराष्ट्री प्राकृताचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. रक्षणाचे कार्य करणारे रक्ख आणि त्यांचे प्रमुख ते महारक्ख ही उपपत्ती रठ्हांचे प्रमुख ते महारट्ठ (जे नंतर मराठे म्हणून ओळखले जावू लागले. त्यांचीही स्वतंत्र जात बनली.) या उपपत्तीशी सुसंगतपणे जुळते. पदे आलटून-पालटून असल्याने सर्वांनी महारक्ख हे नाव धारण करुन कालौघात क्ख चा लोप होऊन फक्त महार हा शब्द जातीनाम म्हणून कायम झाला असे म्हणता येते.जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरुन त्यांना महारक्ख हेच पदाभिनाम होते हे अगदी महावंदमधील काही उल्लेखांवरुनही सिद्ध होते. जी कर्तव्ये तत्कालीन राजकीय अस्थिरता, धामधूम तर कधी पूर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जिवंत राहूच शकत नव्हती.जात म्हणून उदयमहार समाजाचा जात म्हणून उदय कधी झाला याचे भौतिक, लिखित पुरावे आज आस्तित्वात नाहीत. परंतू समाजेतिहास असे सांगतो, जेव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते तेव्हाच समाज आपल्यातूनच लढवैय्या व्यक्तींना नागर रक्षणासाठी नियुक्त करतो. युद्धातील सैनिक आणि नागर रक्षक यात मुलभूत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रू सैन्यावर तुटून पडण्याचे काम असते. परंतू ग्रामरक्षकाला तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते. शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव, शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधू काळापासून आहे. रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, लवकर लागावी म्हणून रक्षकांनी गाव, शहराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण तत्कालीन अर्थव्यवस्था मुख्यतः कृषिप्रधान होती. शत्रू नगर, गावांवर आक्रमण करताना प्रथम शेते जाळतच येत असे. ही प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात अस्तित्वात होती, हे सर्वविदितच आहे. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत होते. त्यामुळे वेशीबाहेर या बहाद्दर असणार्या रक्षकांची वसती केली गेली असावी. सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख महारक्षक (महारक्ख) पद भूषवत असणे स्वाभाविक आहे. परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तीत झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली. संक्षेपाने तीच जात महार म्हणून ओळखली जावू लागली असे दिसते.1. त्या काळात प्रत्येक गावाभोवती तटबंदी, कोट असत. रात्री त्यांचा मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण सत्ता कोणाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय गावात लुटालूट- जाळपोळ करत शिरणे हा आक्रमकांचा आणि दरोडेखोरांचाही प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहून गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र धोका पत्करुन, स्वतः आणि कुटुंबाला उघडय़ावर असुरक्षित ठेवत गावाचे रक्षण करत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते. अशा वेळी त्यांना प्राणांचे बलिदानही द्यावे लागले आहे. गावोगावी जे भडखंबे सापडतात ते अशाच संरक्षक लढायांत मारल्या गेलेल्यांची स्मारके होत.2. महार समाज प्राचीन काळी नसला तरी उत्तरकाळात प्रायः गरीबच राहिला आहे. उघडय़ावर राहत असल्याने संपत्तीसंचय करुनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालून करत तेच गाव त्यांना स्वतः लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते. पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत इतिहासातही दिसत नाही.3. जमिनींचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत. एवढे त्यांच्या साक्षीचे महत्व होते. परंतु (अगदी पेशवेकालीन निवाडय़ांतही) महारांनी खोटी साक्ष दिल्याचे एकही उदाहरण नाही.4. महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा मध्येच गायब केल्याचेही एकही उदाहरण नाही.5. महार समाजावर अस्पृश्यता लादली गेली, अन्याय बंधने लादली गेली, पण हा समाज जात्याच लढवैय्या असूनही आपल्या गावाविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध त्याने शस्त्र उचलले नाही.या काही मुद्द्यांवरुन अखिल समाजाने महार समाजाबाबत किती कृतज्ञ असले पाहिजे हे लक्षात येइल.अवनती कशी आणि का झाली?महार समाजाला नेमके कधी अस्पृश्य ठरवले गेले याबाबत इतिहास मूक आहे. या समाजाची आर्थिक आणि सामाजिक अवनती कशी आणि नेमकी कधी झाली, हे पुराव्यांअभावी ठरवता येणे अवघड आहे. परंतू तर्काने या प्रश्नांचा उलगडा होवू शकतो.1. गावाचे रक्षण करणार्यांना आणि जे आधी सर्वच समाजघटकांतून आले होते त्यांना आरंभापासून अस्पृश्य मानले गेले असण्याची शक्यता नाही.2. ज्या काळात भारतांतर्गत आणि विदेशी व्यापारही भरात होता तेव्हा त्या व्यापारी तांडय़ांचे रक्षण करणार्या महाराष्ट्रातील महारांना अस्पृश्य मानले जाण्याची शक्यता नाही. किंबहुना 8व्या शतकापर्यंतच्या स्मृतीही महारांचा अस्पृश्य म्हणून निर्देश करत नाहीत. असे असले तरी महार समाजाची हळुहळू सामाजिक पातळीवर अवनती होत गेली. त्यांच्या सर्व जबाबदार्या पूर्ववत तर ठेवल्याच. पण त्यात अमानुषपणे वाढ केली गेली. त्यामुळे महारांचे कंबरडे मोडले नसले तरच नवल. यामागील कारणांचा वेधही घेणे अत्यावश्यक आहे.जाती नव्हत्याचवर्णसंकरातून अस्पृश्य जातींचा विकास झाला हे मनुस्मृतीचे मत मानव वंशशास्त्राने खोटे ठरवले आहे. मनुस्मृतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशुद्र, मेघवाल इत्यादी भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा साधा उल्लेखही नाही. याचा अर्थ 10व्या शतकानंतर कधीतरी या जातींना अस्पृश्य बनवले गेले.मार्शल रेसमहार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवून ठेवले असेल, याचे हेच कारण आहे की परंपरागतच मुख्यतः संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवय्येपणा, चिकाटी हे मुलभूत गुण त्यांच्यात होते. वेळोवेळी ज्ञात इतिहासातही त्यांनी त्या गुणांचे प्रदर्शन केले आहे. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करुन त्यांनी हजारो वर्ष कसे अतुलनीय कार्य केले-लेखक संजय सोनवणी#post #fb #facebookviral #facebookpost #explorepage#contentmonetization
शुक्रवार, २५ जुलै, २०२५
आता कॉम्पुटर प्लॅनेट नवीन अपडेट्स गडजेट्स , कॅमेरा , प्रोडक्ट संदर्भात माहीती साठी whatsapp वर वर देखील उपलब्ध आहे.computer planet 1.1चा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi🕵♂For more exciting products, Download the Telegram app and join our Channel catalogue for product list of Cctv , spy , hidden cameras and fancy electronic, gifting products with specifications and prices. Link below 👇🏻👇🏻👇🏻https://t.me/spy_planethttps://linktr.ee/Satful
मंगळवार, १ जुलै, २०२५
“रिअॅक्ट” न करता “रिस्पॉन्ड” करायला शिकायचं .
पूर्वी मी ज्या कंपनीत काम करायचो तिथे माझा एक मित्र होता विवेक नावाचा. त्याचे आणि माझे डिपार्टमेंट वेगळे होते. पण ऑफिस बाहेरच्या चहाच्या टपरीवर किंवा कॅंटीनमध्ये नेहमी भेटायचा त्यामुळे मैत्री झाली होती.
विवेक हा एक साधा, पण हुशार व्यक्ती होता. थोडासा अबोल , काटेकोरपणे वेळ पाळणारा, आणि कामात पूर्णपणे झोकून देणारा माणूस. एका प्रोजेक्टसाठी त्याने महिनाभर जीव तोडून मेहनत केली होती. शनिवार-रविवारही काम करायचा. त्याने एवढं काम केलं होतं की सगळ्यांना खात्री होती की, हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट समोर सादर करायला विवेकचीच निवड होईल. कारण त्याने सर्वाधिक कष्ट घेतले होते.
पण बैठकीच्या दिवशी, त्याचा सीनियर समीरने प्रेझेन्टेशन केलं आणि सगळं क्रेडिट स्वतःच्या नावावर केलं.
विवेक तिथे बसून फक्त पाहत राहिला.
एक शब्दही न बोलता, फक्त पाहत राहिला.
त्या संध्याकाळी नेहमीच्या वेळी चहा प्यायलाही आला नाही. फोन केला आणि बळेच बाहेर घेऊन गेलो . त्याचं मन त्या कॉन्फरन्स रूममध्येच अडकलेलं. “मी एवढे कष्ट केले , आणि त्याने श्रेय लुटलं. असा चोर आणि कृतघ्न माणूस मी कधी पाहिलाच नाही.” विवेक रागारागात पुढचे पाच मिनिटे फक्त त्याच्या सिनिअरला शिव्या देत होता .
मला गॉडफादर मधल्या मायकेल कोर्लीओनचा डायलॉग आठवला आणि मी बोलून गेलो “Never hate your enemies. It affects your judgment.”
विवेक क्षणभर थबकला. मी त्याला म्हंटल माझ्यावर पण रागावणार नसशील तर तुला थेट सांगतो .“तू समीरवर रागावला आहेस , की स्वतःवरच ? तू रागावला आहेस कारण तू गप्प बसलास? तू रागावला आहेस कारण समीरने प्रेझेन्टेशन इतकं चांगलं केलं की त्यालाच क्रेडिट मिळालं ? तू replacable आहेस आणि तू याबद्दल काहीच करू शकत नाहीस म्हणून तुला राग येतोय !
राग म्हणजे काय?
राग म्हणजे फक्त ओरडणं, भांडणं किंवा शिव्या देणं नाही. कधी-कधी तो आत साठलेला, न बोलता आलेलं दुखावलेपण असतो, असहाय्य्यता असते. हा राग तुमच्या निर्णयांवर परिणाम करतो .
तुमच्या डोळ्यासमोर रागाचं चित्र कसं असतं ? लालबुंद चेहरा, थरथरणारी बोटं, काहीतरी फेकून देणं? पण खरा राग इतका नाट्यमय नसतो. तो शांत असतो. गप्प. आत साचलेला. बाहेर हसत बोलताना, आतमधून विचारांची आग पेटलेली असते. “तो मला असं बोलला … मी हे कधीही विसरणार नाही.”
आणि या साठलेल्या रागाचं सर्वात मोठं नुकसान कुठे होतं?
तुमच्या निर्णयक्षमतेवर !
मायकेल कोर्लीओनचं वाक्य सांगतं, की जेव्हा तुम्ही कोणावर राग धरता, तेव्हा तो राग तुमच्या डोक्यावर बसतो—त्याच्या नव्हे.
“तुम्ही शत्रूला शिक्षा देत नाही, तुम्ही स्वतःला गोंधळात टाकता.”
रागाच्या भरात प्रत्येक गोष्ट त्या चष्म्यातूनच दिसते. प्रत्येक सल्ला संशयास्पद वाटतो. प्रत्येक पर्यायात धोका जाणवतो. “तो पुन्हा फसवेल का?” “मी मवाळपणा दाखवला, तर लोक मला कमजोर समजतील का?” “मी त्याच्यासारखं वागलो, तर त्याचं नुकसान होईल का?”
हे प्रश्न स्वाभाविक वाटतात. पण त्यामागे भीती असते. आणि राग हे त्या भीतीचं कवच असतं.
राग तुमचा फोकस हरवतो.
कल्पना करा, तुम्ही एखादी मोठी डील साइन करणार आहात. पण समोर बसलेली व्यक्ती तीच आहे, जिने याआधी तुमच्यावर टीका केली होती. तुम्ही आतून तापलेले आहात, पण बाहेरून शांत दिसायचं आहे. मग काय होतं? तुमचं लक्ष डीलवर कमी आणि त्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेवर जास्त केंद्रित होतं. तिने geniunly एखादी जरी शंका विचारली तरी मुद्दामहून मला त्रास देण्यासाठीच विचारत आहे असं वाटू लागतं .
मग रागाचं करायचं काय?
खरं आहे, आपण कितीही समजूतदार असलो, तरी काही गोष्टी मनाला खूप लागतात . कोणी आपल्या मागे बोललं, मित्राने श्रेय चोरलं, ऑफिसात तुमची आयडिया दुसऱ्याच्या नावावर गेली, किंवा अगदी छोटी गोष्ट—ट्रॅफिकमध्ये कोणी कट मारून गेलं. तरी राग अनावर होतो.
यावर आपण काय करायचं?
“रिअॅक्ट” न करता “रिस्पॉन्ड” करायला शिकायचं .
“त्याने बोललं, म्हणून मी बोललो” — ही आहे प्रतिक्रिया.
पण “त्याने बोललं… तरी मी थांबून काय बोलणार ते आधी ठरवतो” — हा आहे प्रतिसाद.
लगेच उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ घ्या. दोन खोल श्वास घ्या. स्वतःला विचारा, “माझा खरा उद्देश काय आहे?” तुमचं उत्तर एकदम वेगळं असेल.
एक मिनिट थांबायला शिका
हा साधा, पण जबरदस्त उपाय आहे.
पुढच्या वेळी कोणी तुमच्या राग येईल असं काही करेल, तेव्हा जरा थांबा. घड्याळात एक मिनिट पाहा. काहीच बोलू नका. ना प्रतिक्रिया, ना प्रतिसाद.
त्या एका मिनिटात तुमचे भावनिक तापमान काही अंशांनी खाली येईल. आणि बऱ्याचदा, तुमचं उत्तर आपोआप सौम्य होईल.
रागाचं प्रेरणेत रूपांतर करा
रागाला संधी म्हणून पाहा.
“हा राग का येतोय? कोणती मूल्यं दुखावली गेली?”
उदाहरण: कोणी तुमचं काम चोरलं—म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे.
कोणी तुमचा वेळ वाया घालवला—म्हणजे तुम्ही वेळेची किंमत जाणता.
मग रागाची दिशा बदला. त्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी काम करा.
राग सतत मनात ठेवून चालत नाही. पण त्यातून प्रेरणा घेऊन काहीतरी चांगलं घडवता येतं.
तुमचं “मोठं ध्येय” लक्षात ठेवा
क्लायंट डील गमावली. तुमच्याशी कुणी चुकीचं वागलं. कोणी अपशब्द वापरले.
पण प्रत्युत्तर देताना आठवा, “माझं खरं ध्येय काय आहे?”
दोन मिनिटांचा वादविवाद जिंकणं? की पाच वर्षांचं उद्दिष्ट शांतपणे गाठणं?
रागाचं उत्तर तात्काळ मिळतं. पण शांततेचं उत्तर पुढे नेते.
आता विचार करा—
तुम्ही राग धरलात, तरी पुढच्या वेळी तो माणूस तसाच वागेल का?
की तुम्ही तुमचं उत्तर बदललंत, तर पुढचा अनुभवच वेगळा असेल?
राग ही फक्त एक भावना आहे. ती टाळता येत नाही. पण त्याला कसं उत्तर द्यायचं, हे शिकता येतं.
आपण बऱ्याचदा समजतो, की शांत राहणं म्हणजे कमजोरी. “तो काहीही बोलला, आणि मी गप्प राहिलो? लोक काय म्हणतील?”
पण खरं सांगायचं, तर शांत राहणं ही एक निवड आहे. एक न बोलता व्यक्त होणारी ताकद. जी ओरडण्यापेक्षा खोल आवाज निर्माण करते.
रागाला उत्तर न देणं म्हणजे हार मानणं नाही. तो म्हणजे, “मी तुझ्या वागण्यावर प्रतिक्रिया देणार नाही, कारण माझी ओळख माझ्या कृतीवरून ठरेल.”
हे पटण्यासाठी एक उदाहरण देतो . महाराष्ट्रात दोन नेत्यांचे पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आले . एक नेता संधी मिळेल तेव्हा प्रतारणा करणाऱ्यासंबंधी राग व्यक्त करत असतो . दुसरा नेता प्रतारणा करणाऱ्या विरोधी एक वाक्यही रागाने बोलला नाही.
तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का, जिथे तुम्ही रागात निर्णय घेतला आणि नंतर पश्चात्ताप झाला?
किंवा उलट—तुम्ही संयम ठेवला आणि काही दिवसांनी कळलं, “मी रागात उत्तर दिलं असतं, तर सगळं बिघडलं असतं…”
आपण अशा क्षणांतून शिकतो. आणि हळूहळू हे लक्षात येतं—शांत राहिल्याने तुम्ही निर्णय घेता. रागाने वागलात, तर निर्णय तुमच्यासाठी घेतले जातात.
मायकेल कोर्लीओनचं वाक्य नीट लक्षात ठेवा -
“Never hate your enemies. It affects your judgment.”
हा फक्त माफिया चित्रपटातला डायलॉग नाही. हे एक जीवनाचं तत्त्व आहे—जिथे संघर्ष आहे, तिथे रागाऐवजी विचारशील शांततेला स्थान द्यायचं.
कारण शेवटी, शत्रूने कितीही त्रास दिला तरी , तुमची निर्णयक्षमता जर सुस्पष्ट राहिली, तर तुम्ही कधीच हरत नाही.
पुढच्या वेळी…
कोणी अपमान करत असेल…
कोणी धमकी देत असेल…
कोणी फसवत असेल…
तेव्हा फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा:
“मी त्याच्या वागण्याप्रमाणे वागणार, की माझ्या मूल्यांनुसार?”
तुमचं उत्तर त्या क्षणी ठरेल. पण तुमचं वर्तन तुमचं भविष्य घडवेल.
हे वाचताना तुम्हाला एखादा प्रसंग आठवला का?
आजच ठरवा—पुढच्या अशा प्रसंगात तुम्ही “रिअॅक्ट” करणार की “रिस्पॉन्ड” करणार?
शत्रूचं वागणं कधीच आपल्या हातात नसतं. पण त्याला दिलेला प्रतिसाद—तीच आपली खरी ताकद असते !
सोमवार, २ जून, २०२५
Elon Musk सुरु करतोय AIRBNB for CARS !
Elon Musk सुरु करतोय AIRBNB for CARS !
Elon Musk ने नुकताच रोबोटॅक्सी ची घोषणा केली. रोबोटॅक्सी म्हणजे संपूर्णपणे स्वयंचलित टॅक्सी. अगदी ओला/उबर सारखी पण ड्रॉयव्हरशिवाय ! आपण फक्त अँप वापरून टॅक्सी बोलवायची. टॅक्सी येणार, आपण त्यात बसायचं आणि टॅक्सी स्वतःच आपल्याला अपेक्षित ठिकाणी पोहोचवणार !
टेस्ला लवकरच (१२ जूनला सुरु होईल अशा बातम्या आहेत !) एक self-driving कार्सची फ्लीट सुरू करणार आहे.सध्या या गाड्या केवळ टेस्लाच्या मालकीच्या असतील पण लवकरच त्यात ग्राहकांच्या समाविष्ट करून घेतले जाईल.
हो, ग्राहक आपली कार जेव्हा पार्क केलेली असते, तेव्हा ती दुसऱ्या लोकांना वापरायला देऊ शकतील ! जसं AirBNB ने लोकांच्या मोकळ्या real estate साठी बाजारपेठ तयार केली तसंच टेस्ला लोकांच्या पार्किंग उभ्या असलेल्या गाड्यांमधून त्यांना पैसे कमावून देण्याची तयारी करत आहे.
ना ड्रायव्हर, ना Uber सारखी तिसरी अॅप कंपनी, ना कमिशनचे टक्के. सगळं टेस्लाचंच — हार्डवेअर, सॉफ्टवेअर, पेमेंट्स, डेटा... सगळं!
पण हे फक्त कार्सपुरता मर्यादित नाही — तर ही आहे नवीन जगाची सुरुवात !
AI आता फक्त स्क्रीनवर दिसणारा chatbot राहिलेला नाही.
AI चं पुढचं पाऊल आहे — घरात राहणाऱ्या, रस्त्यांवर फिरणाऱ्या, वस्तू पोचवणाऱ्या, आणि काम करणाऱ्या "फिजिकल AI एजंट्स"चा हा उदय आहे ! AI ला "शरीर"मिळाल्यावर कोणकोणते बदल होऊ शकतात याची कल्पना करा !
ज्यांच्या हातात सर्व गोष्टींचा कंट्रोल आहे — हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क आणि डेटा — त्याच कंपन्या हे नवीन युग घडवणार.
याचीच तयारी म्हणून OPENAI एक device तयार करत आहे. जे वापरून कोणत्याही स्क्रिनशिवाय AI वापरता येईल. कल्पना करा chatgpt ला प्रश्न विचारायचा असेल तर लॅपटॉप किंवा मोबाईल बाहेर काढायची गरजच लागणार नाही !
थोडक्यात काय तर बिझनेस मॉडेल्स बदलत आहेत. मध्यस्थ निघून जात आहेत. पुढे काय?
आपण आजही अनेक व्यवसाय माणसांवर चालवतो: ड्रायव्हर, एजंट, डिलिव्हरी बॉय…
पण जर ते सगळं AI ने केलं, तर?
मग खरी ‘असेट’ काय असेल?
घर? दुकान? कार?
की… डेटा आणि स्वयंचलित मशीन जे तुम्हाला २४x७ उत्पन्न देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आणि खास सल्ल्यासाठी सत्फुल सोनवणे यांना 7057573102 या नंबरवर संपर्क करा! आणि हो, कॉम्प्युटर प्लॅनेट आता व्हॉट्सॲपवर पण आहे! नवीन अपडेट्स, गॅजेट्स, कॅमेरा आणि इतर प्रोडक्ट्सच्या माहितीसाठी आमचा 'computer planet 1.1' व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. लिंक आहे! "https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi
"एवढंच नाही, तर अजून आकर्षक प्रोडक्ट्स आणि त्यांच्या किंमती व स्पेसिफिकेशन्ससाठी आमचं टेलिग्राम चॅनेल 'spy_planet' https://t.me/spy_planet नक्की जॉईन करा! खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा!"
WhatsApp ग्रुप जॉईन करा: https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi
Telegram चॅनेल: https://t.me/spy_planet
आमचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी: https://linktr.ee/Satful
AI हे फक्त Silicon Valley किंवा कोडर्ससाठी नाही उरलं.
हे आता सर्वसामान्य माणसासाठी एक नवीन "income stream" बनू शकतं —
जर आपण समजून घेतलं, आणि थोडा पुढचा विचार केला तर !
Elon Musk काय करतोय याचा विचार करा.
पण त्याहून महत्त्वाचं — आपण त्यातून काय शिकतोय याचा विचार करा.
कुठे कुठे मध्यस्थी जाऊन AI च्या साहाय्याने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल का याचा विचार करा ! भविष्यातील संधी तेथेच दडलेल्या आहेत.
आशा आहे की ही पोस्ट वाचून "टेस्ला कार" पेक्षा "तुमच्या आयुष्यातली गाडी" कुठे चाललीय, याचा विचार कराल.
मंगळवार, २७ मे, २०२५
अन्न , वस्त्र आणि निवारा या केवळ तीनच गरजा राहिलेल्या नाहीत....वीज, इंटरनेट, स्मार्टफोन या आणखी काही गरजा गेल्या शतकात तयार झाल्या....आता आणखी एक नवीन गरज यामध्ये समाविष्ट होत आहे... ती म्हणजे AI ! एक अशी गरज जी प्रत्येक नागरिकाला विनामूल्य उपलब्ध करून देण्याची इच्छा एका देशाला झाली !
अन्न , वस्त्र आणि निवारा या केवळ तीनच गरजा राहिलेल्या नाहीत....वीज, इंटरनेट, स्मार्टफोन या आणखी काही गरजा गेल्या शतकात तयार झाल्या....आता आणखी एक नवीन गरज यामध्ये समाविष्ट होत आहे... ती म्हणजे AI ! एक अशी गरज जी प्रत्येक नागरिकाला विनामूल्य उपलब्ध करून देण्याची इच्छा एका देशाला झाली !
सोमवार, २६ मे, २०२५
जड झालेले आई-बाप... नीट वाचा आणि मगच शेअर करा 🙏
काही गोष्टी थांबत नाहीत — त्या एकतर आपल्याला बाजूला काढतात… किंवा आपल्याला बदलायला भाग पाडतात.
युनिव्हर्सल बेसिक इनकम… की युनिव्हर्सल हाय इनकम ? एलॉन मस्कला UBI म्हणजेच युनिव्हर्सल बेसिक इनकम
युनिव्हर्सल बेसिक इनकम… की युनिव्हर्सल हाय इनकम?
अरब अमिरातीत नुकत्याच झालेल्या एका समारंभात एलॉन मस्कला UBI म्हणजेच युनिव्हर्सल बेसिक इनकम बद्दल विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला की AI आणि रोबोटिक्स मुळे उत्पादकता एवढी वाढेल की युनिव्हर्सल बेसिक इनकम ऐवजी युनिव्हर्सल हाय इनकमचा विचार आपल्याला करावा लागेल !
ही काय भानगड आहे ते पाहण्यासाठी UBI ची संकल्पना समजावून घेऊया !
आपण सारे "मानव". पोटापाण्यासाठी काही काम करतो. आपले श्रम, बुद्धी, कौशल्य वापरून पैसे कमावतो आणि त्यातून उदरनिर्वाह चालवतो. माणसाने शेतीनिमित्त हजारो वर्षांची भटकंती थांबवली आणि तेव्हापासून "काम > पैसे > उदरनिर्वाह" ही रचना उदयास आली. आणि हजारो वर्षे आपण या संरचनेला सरावलो आहोत.
पण आता AI आणि रोबोटिक्समुळे जग झपाट्याने बदलतंय. कामाचं स्वरूप बदलतंय, रोजगाराचं गणित बदलतंय, आणि सर्वात मोठं म्हणजे — मूल्यनिर्मितीची (Value Creation) व्याख्या बदलतेय. जर बहुतांशी सर्वच कामं मशिन्स कडे गेली (आणि ती जाणारच असे दिसतंय !) तर माणसाला करण्यासाठी कामच नसेल किंवा जगण्यासाठी कामाची आवश्यकताच नसेल.
### *नवीन गॅझेट्स आणि अपडेट्ससाठी कनेक्ट राहा!* 7057573102
*कॉम्प्युटर प्लॅनेट* तुम्हाला नवीनतम गॅझेट्स, कॅमेरे आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सबद्दल अपडेट्स देत आहे. आता *व्हाट्सअॅप ग्रुप* जॉईन करून सर्व माहिती मिळवा:
👉 *जॉईन लिंक*:
https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi
👉 *अधिक माहितीसाठी*:
https://linktr.ee/Satful
📢 *अजून रंजक प्रोडक्ट्स पाहण्यासाठी*:
*टेलिग्राम* अॅप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनेलवर जॉईन व्हा. येथे तुम्हाला CCTV, स्पाय, हिडन कॅमेरे आणि फॅन्सी इलेक्ट्रॉनिक गिफ्टिंग प्रोडक्ट्सची संपूर्ण यादी, वैशिष्ट्ये आणि किमती मिळतील!
👉 *टेलिग्राम लिंक*:
https://t.me/spy_planet
> 🧼 स्वच्छतेत बदल:
काहींनी शौचालय बांधले, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर घेतले.
स्वच्छतेची सवय लागली.
> 👩🦰 स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य:
महिलांनी शिवणकाम, मसाले तयार करणं, शेळीपालन असे व्यवसाय सुरू केले.
आर्थिक निर्णय स्वतः घेऊ लागल्या.
> 💰 बचत आणि गुंतवणूक:
बरेच लोक बँकेत खाते उघडून पहिल्यांदाच बचत करू लागले.
काहींनी शेतीसाठी नवीन साधनं विकत घेतली.
> 🧠 निर्णयक्षमता वाढली:
UBI मुळे कुटुंबांनी धोका पत्करून नवे पर्याय निवडले. व्यसनांमध्ये घट झाली.
---
मग लोक आळशी झाले का? नाही. उलट, कामाचा उत्साह वाढला.
UBI मुळे लोकांना आत्मविश्वास मिळाला.
जे पूर्वी शक्य नव्हतं, ते करण्याची हिंमत मिळाली.
## असेच प्रयोग जगभरात इतरत्रही करण्यात आले ?
🇫🇮 फिनलंड
→ 2,000 बेरोजगार नागरिकांना UBI दिलं
→ कमी तणाव, अधिक आनंद, आणि नोकरी शोधण्याची प्रेरणा वाढली
🇨🇦 कॅनडा (ओंटारियो)
→ लोकांनी शिक्षण पूर्ण केलं, व्यसने टाळली, मानसिक आरोग्य सुधारलं
## पण UBI चा प्रश्न तितका सोपा नाहीये !
AI, डेटा, आणि ऑटोमेशन जेव्हा इतकं सामर्थ्यवान होईल, तेव्हा त्यातून निर्माण होणारी संपत्ती आणि नियंत्रण जर फक्त एका सरकार किंवा कंपन्यांकडे राहिलं, तर…
UBI असेल — पण ते चालविण्याचा हक्क कुणाकडे?” हा खरा प्रश्न राहील.
एका सरकारकडे ?
एका कंपनीकडे ?
एका देशाकडे ?
कुणाला UBI मध्ये समाविष्ट करायचे ?
किती पैसे द्यायचे ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून शोधायची आहेत !
UBI ही फक्त आर्थिक योजना नसून, ती मानवी हक्क, पारदर्शकता आणि सहनिर्णयाची लढाई आहे.
आपण भविष्यात आपली स्वप्न पूर्ण करायला मोकळे असू, की कुणाच्यातरी सिस्टममध्ये एक ‘USER ID’ बनून राहू?
UBI ही सुरुवात आहे — एका नव्या अर्थव्यवस्थेची, जिथे माणूस काम न करताही मूल्य निर्माण करतो — आणि त्यात त्याचा वाटा मिळतो !
👇 याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये लिहा.
शेअर करा — कारण ही केवळ आर्थिक व्यवस्था नाही,
ही मानवतेच्या नव्या संकल्पनेची सुरुवात आहे.
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्यातून पैशांच्या गोणी बाहेर पडल्या. गोणी फुटून त्यातील नोटा इतस्ततः विखुरल्या. ड्रॉयव्हरला हे लगेच कळले नाही आणि गाडी तशीच भरधाव पुढे निघून गेली.
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडल...
-
स्पाय गुप्तचर कॅमेरा खरेदी चे 5 टिप नमस्कार! छुपा कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करताना, आपण अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. 1.. प्रथम, ...
-
नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत . आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे मिशन खरा ...

.jpg)

.jpg)