युनिव्हर्सल बेसिक इनकम… की युनिव्हर्सल हाय इनकम?
अरब अमिरातीत नुकत्याच झालेल्या एका समारंभात एलॉन मस्कला UBI म्हणजेच युनिव्हर्सल बेसिक इनकम बद्दल विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला की AI आणि रोबोटिक्स मुळे उत्पादकता एवढी वाढेल की युनिव्हर्सल बेसिक इनकम ऐवजी युनिव्हर्सल हाय इनकमचा विचार आपल्याला करावा लागेल !
ही काय भानगड आहे ते पाहण्यासाठी UBI ची संकल्पना समजावून घेऊया !
आपण सारे "मानव". पोटापाण्यासाठी काही काम करतो. आपले श्रम, बुद्धी, कौशल्य वापरून पैसे कमावतो आणि त्यातून उदरनिर्वाह चालवतो. माणसाने शेतीनिमित्त हजारो वर्षांची भटकंती थांबवली आणि तेव्हापासून "काम > पैसे > उदरनिर्वाह" ही रचना उदयास आली. आणि हजारो वर्षे आपण या संरचनेला सरावलो आहोत.
पण आता AI आणि रोबोटिक्समुळे जग झपाट्याने बदलतंय. कामाचं स्वरूप बदलतंय, रोजगाराचं गणित बदलतंय, आणि सर्वात मोठं म्हणजे — मूल्यनिर्मितीची (Value Creation) व्याख्या बदलतेय. जर बहुतांशी सर्वच कामं मशिन्स कडे गेली (आणि ती जाणारच असे दिसतंय !) तर माणसाला करण्यासाठी कामच नसेल किंवा जगण्यासाठी कामाची आवश्यकताच नसेल.
### *नवीन गॅझेट्स आणि अपडेट्ससाठी कनेक्ट राहा!* 7057573102
*कॉम्प्युटर प्लॅनेट* तुम्हाला नवीनतम गॅझेट्स, कॅमेरे आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सबद्दल अपडेट्स देत आहे. आता *व्हाट्सअॅप ग्रुप* जॉईन करून सर्व माहिती मिळवा:
👉 *जॉईन लिंक*:
https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi
👉 *अधिक माहितीसाठी*:
https://linktr.ee/Satful
📢 *अजून रंजक प्रोडक्ट्स पाहण्यासाठी*:
*टेलिग्राम* अॅप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनेलवर जॉईन व्हा. येथे तुम्हाला CCTV, स्पाय, हिडन कॅमेरे आणि फॅन्सी इलेक्ट्रॉनिक गिफ्टिंग प्रोडक्ट्सची संपूर्ण यादी, वैशिष्ट्ये आणि किमती मिळतील!
👉 *टेलिग्राम लिंक*:
https://t.me/spy_planet
> 🧼 स्वच्छतेत बदल:
काहींनी शौचालय बांधले, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर घेतले.
स्वच्छतेची सवय लागली.
> 👩🦰 स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य:
महिलांनी शिवणकाम, मसाले तयार करणं, शेळीपालन असे व्यवसाय सुरू केले.
आर्थिक निर्णय स्वतः घेऊ लागल्या.
> 💰 बचत आणि गुंतवणूक:
बरेच लोक बँकेत खाते उघडून पहिल्यांदाच बचत करू लागले.
काहींनी शेतीसाठी नवीन साधनं विकत घेतली.
> 🧠 निर्णयक्षमता वाढली:
UBI मुळे कुटुंबांनी धोका पत्करून नवे पर्याय निवडले. व्यसनांमध्ये घट झाली.
---
मग लोक आळशी झाले का? नाही. उलट, कामाचा उत्साह वाढला.
UBI मुळे लोकांना आत्मविश्वास मिळाला.
जे पूर्वी शक्य नव्हतं, ते करण्याची हिंमत मिळाली.
## असेच प्रयोग जगभरात इतरत्रही करण्यात आले ?
🇫🇮 फिनलंड
→ 2,000 बेरोजगार नागरिकांना UBI दिलं
→ कमी तणाव, अधिक आनंद, आणि नोकरी शोधण्याची प्रेरणा वाढली
🇨🇦 कॅनडा (ओंटारियो)
→ लोकांनी शिक्षण पूर्ण केलं, व्यसने टाळली, मानसिक आरोग्य सुधारलं
## पण UBI चा प्रश्न तितका सोपा नाहीये !
AI, डेटा, आणि ऑटोमेशन जेव्हा इतकं सामर्थ्यवान होईल, तेव्हा त्यातून निर्माण होणारी संपत्ती आणि नियंत्रण जर फक्त एका सरकार किंवा कंपन्यांकडे राहिलं, तर…
UBI असेल — पण ते चालविण्याचा हक्क कुणाकडे?” हा खरा प्रश्न राहील.
एका सरकारकडे ?
एका कंपनीकडे ?
एका देशाकडे ?
कुणाला UBI मध्ये समाविष्ट करायचे ?
किती पैसे द्यायचे ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून शोधायची आहेत !
UBI ही फक्त आर्थिक योजना नसून, ती मानवी हक्क, पारदर्शकता आणि सहनिर्णयाची लढाई आहे.
आपण भविष्यात आपली स्वप्न पूर्ण करायला मोकळे असू, की कुणाच्यातरी सिस्टममध्ये एक ‘USER ID’ बनून राहू?
UBI ही सुरुवात आहे — एका नव्या अर्थव्यवस्थेची, जिथे माणूस काम न करताही मूल्य निर्माण करतो — आणि त्यात त्याचा वाटा मिळतो !
👇 याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये लिहा.
शेअर करा — कारण ही केवळ आर्थिक व्यवस्था नाही,
ही मानवतेच्या नव्या संकल्पनेची सुरुवात आहे.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा