काही गोष्टी थांबत नाहीत — त्या एकतर आपल्याला बाजूला काढतात… किंवा आपल्याला बदलायला भाग पाडतात.
AI सध्या वॉल स्ट्रीटवर जे करतंय, ते अगदी हेच चित्र दाखवतंय.
हे तंत्रज्ञान आता फक्त मदतनीस राहिलेलं नाही.
ते आता प्रमुख भूमिकेत आलंय — आणि सगळं काही झपाट्याने बदलतंय.
गोल्डमन सॅक्सचे CEO डेव्हिड सोलोमन यांनी एक विधान केलं जे कुणालाही खडबडून जागं करायला पुरेसं आहे.
त्यांनी सांगितलं की, जे S1 IPO डॉक्युमेंट तयार करण्याचं काम पूर्वी सहा तज्ञांना आठवडाभर करावं लागायचं,
त्यापैकी ९५ % काम AI एका मिनिटात करू शकतं.
हो, खरंच.
एका क्लिकमध्ये.
एका मॉडेलनं.
एका मिनिटात.
आधी या कामासाठी कितीतरी तास, ईमेल्स, मिटिंग्स लागायच्या.
आता AI हे सारं "ड्राफ्टिंग" तुमच्यासाठी तयार करतं — आणि बिनचूक.
पण या सगळ्यातला खराखुरा धक्का काय आहे, माहीत आहे?
आजच्या जगात ९५% गोष्टींसाठी मानवी सहभागाची गरज उरलेलीच नाही.
हे ऐकायला कठीण आहे, पण सत्य आहे.
आज खरी किंमत ज्याची आहे — ते आहे उरलेलं ५% काम !
म्हणजे तुमचं निरीक्षण, निर्णयक्षमता, आणि संवेदनशीलता — हेच आता खरं युनिक काम आहे.
हे सगळं ऐकून तुम्ही जर विचार करत असाल –
"मग AI माझी जागा घेईल का?"
तर कदाचित तो प्रश्न आता फारसा उपयुक्त उरलेला नाही.
आजचा खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे —
‘मी इतका वेगळा आहे का, की माझं काम AI करू शकत नाही?’
हे उदाहरण केवळ IPO डॉक्युमेंट्ससाठी नाही.
आज कॉर्पोरेट जगतात, मार्केटिंगमध्ये, कायद्यात, मीडिया हाऊसेसमध्ये —
AI बेसलाइन कामं करतंय.
टेम्प्लेट्स भरतंय.
रिपोर्ट्स तयार करतंय.
प्रेजेंटेशन्स बनवतंय.
आता खरी लढाई आहे –
- कोण निर्णय चांगले घेतो?
- कोण विचाराला दिशा देतो?
- कोण चांगला कनेक्ट करू शकतो – ग्राहकांशी, वाचकांशी, माणसांशी?
ऑटोमेशनच्या युगातही काही गोष्टी केवळ माणूसच करू शकतो !
अशा गोष्टी ज्यात तुमचं judgment, अनुभव, आणि माणूसपण दिसतं.
पुढचं युग AI चं आहे – यात वाद नाही.
पण माणसाच्या अस्तित्वाला अर्थ देणाऱ्या गोष्टी अजूनही माणसाकडेच आहेत.
सर्जनशीलता, संवेदनशीलता, संवाद, आत्मनिरीक्षण —
हे अजूनही मशीनकडे नाही.
आणि कदाचित असणारही नाही.
तुमचं काम हे 'कॉपी करता येईल असं' आहे का ?
तुमचं काम baseline ९५ % सदरात आहे की निर्णय घेणाऱ्या ५% मधे तुम्ही येता ?
याचा विचार आज न करता…
उद्या वेळ मिळेल असं समजणं – हाच सर्वात मोठा धोका आहे.
AI बदलतंय…
पण माणूसही बदलू शकतो — जर तो योग्य वेळी जागा झाला तर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा