शनिवार, ७ जानेवारी, २०२३

भौतिक पुरावा फिजिकल एव्हिडन्स म्हणजे काय ??

 

भौतिक  पुरावा  फिजिकल एव्हिडन्स  म्हणजे काय ??


फिजिकल एव्हिडन्स म्हणजे काय ??

फिजिकली एव्हिडन्स म्हणजे भौतिक पुरावा, सुरुवातीला आपण पुरावा म्हणजे काय ??? पाहूया.

एखादी गोष्ट घडत असताना त्या गोष्टीला काहीतरी निमित्त असतं. ते निमित्त घडले की, मग त्यानिमित्ताला लागून एखादे कार्य होते. मग ते कार्य चांगले किंवा वाईट होते. वाईट झाले कि गोष्ट illegal होते. त्या गोष्टीमुळे समाजामध्ये एक वाईट वृत्ती उत्पन्न होते. ज्यावेळी आपण निमित्त घडतो आणि कार्य करतो त्या कार्याच्या वेळी आपण काहीतरी पुरावा सोडतो. तो पुरावा एखाद्या व्यक्तीला न्याय देताना उपयोगी होतो.

 पुराव्याच्या अभावीच आपल्या देशामध्ये भरपूर केसेस पेंडिंग आहेत .भरपूर केसेस चा निकाल लागत नाहीजे खरोखर गुन्हेगार असतात,  पण पुराव्या अभावी ते सुटतात आणि समाजामध्ये एक निवांत असे फिरत असतात. समाज त्या व्यक्तींना काही करू शकत नाही. पुरावा असला तर एखाद्या व्यक्तीला शिक्षा सुद्धा होतेपुराव्यामुळे एकादी केस सॉल्व होते. पुरावा नसेल तर ते के  काहीही उपयोगाची नसते. मग पुराव्यामध्ये सुद्धा दोन प्रकार होतात. ते दोन प्रकार खालील प्रमाणे,

GITO

TECHNOVIEW

Generic

FREDI HD PLUS

Paroxysm

Spy Mission

smars

Safety Net

Asleesha

Second Vision

AXYMLEN

SPYTECTIFY

Brands

  • 1.     TESTIMONIAL EVIDENCE (STATEMENT MADE UNDER OATH, USUALLY QUESTION)
  • 2.    PHYSICAL EVIDENCE.
SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets
GITO - जिटो
G- guarding (protection)
I- innovative products
T- technology
O- organisation

भौतिक पुरावा असतो किंवा त्याला पण REAL EVIDENCE असे म्हणतो. तो पुरावा आपणाला खूप उपयोगी असतो. तो पुरावा कोणताही असू शकतो हाताचे ठसे असतील, पायाचे ठसे असतील, एखादा गुन्हा करताना वापरलेले शस्त्र असेल किंवा एखादा गुन्हा करताना वापरलेली वस्तू असेल.  त्या वस्तूमुळे व्यक्तीला इजा झाली असेल हे भौतिक पुरावे आपणाला उपयोगी पडतात. कोर्ट कामांमध्ये तसेच हेच रिअलिव्हिडन्स पोलिसांना सुद्धा पुढील इन्वेस्टीगेशन करायला मदत करतात. मग एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी भौतिक पुरावा सापडला तर तो कसा साठवला जातो किंवा कशा प्रकारे उपयोगात आणला जातो त्याची माहिती खालील प्रमाणे,

मग तो पुरावा सापडल्यावर  एक्सपोर्ट त्यामध्ये काम करतात. ते त्या एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या शस्त्राची, पायाचे ठसे असतील, हाताचे ठसे असतील तर त्याचे ते साईज, डायमेन्शन , शेप सांगतातत्याचबरोबर त्या वस्तूचे किंवा शस्त्राचे INDIVIDUAL  क्लास कॅरेक्टर सांगतात आणि ते रिपोर्ट आपणाला कोर्टामध्ये उपयोगी पडतं.



मग पुरावं सुद्धा देत असताना काही लोकं त्या गुन्ह्याच्या संबंधित  अस संबंधित असे दोन्ही पुरावे देतात. पण आपणाला संबंधित पुरावे उपयोगी पडतात संबंधित पुराव्यामुळे पोलिसांना इन्वेस्टीगेशन करायला सुद्धा अडथळा येतो, त्यामुळे जो गुन्हा घडला त्या गुन्हावरून पोलिसांचं लक्ष विचलित करण्याचे सुद्धा काम हे असं संबंधित पुरावे करतात संबंधित पुराव्यामध्ये तुम्ही दोन्ही प्रकारचे पुरावे देऊ शकता जे तुम्हाला माहित आहे ते संबंधित पुराव्यामुळे पोलिसांना चांगले इन्वेस्टीगेशन करता येतं. त्यामुळे चांगला रिझल्ट आपणाला मिळतो लवकरात लवकर केस मदत होते हे पुरावे कशाप्रकारे काम करतात तर ते खालील प्रमाणे,

एखादे उदाहरण पाहायचं म्हटलं तर,

एखाद्या घरी चोरी झाली असेल तर आपण आपणाला पुरावे कुठे मिळतील ?? तर सुरुवातीला दारावर त्यात चोर व्यक्तीचे हाताचे ठसे मिळतील तेथेच आपणाला खाली त्यांच्या पायाचे ठसे मिळतील त्यांनी दरवाजा मोडला असेल किंवा आपल्या घराचे कुलूप तोडला कुलूप तोडले असेल, तर त्या कुलूप वर आपणाला मार्क्स दिसतील. त्या मार्क्स वरून आपण त्या व्यक्तीने कोणती वस्तू वापरून आपले कुलूप तोडले आपणाला समजेल. त्यानंतर घरामध्ये त्यांनी कुठे कुठल्या वस्तू चोरलेले आहेत तर त्या ठिकाणी आपणाला त्यांचे ठसे मिळतील हे झाले संबंधित पुरावे.

आता ह्याच वेळी आपण अस संबंधित पुरावे ओळखत फिरतो की ती व्यक्ती कुठून आली कशी आली मग आपण त्यांच्या ठेवलेल्या त्या कुलूप वर आपल्याच हाताचे ठसे येतात दरवाजावर आपण न बघता हात लावतो आणि आपलेच ठसे तिथे दिसतात. आपण कोणताही पुरावा न बघता डायरेक्ट घरामध्ये फिरतो आणि पाहतो की माझं काय काय चोरीला गेलेला आहे. मग ह्या ठिकाणी तुम्ही स्वतःच संबंधित पुरावे नष्ट करून अस संबंधित पुराव्यांना प्रोत्साहन देता आणि यामुळेच भरपूर चोरी झालेली प्रकरणे उघडकीस येत नाहीत.

 Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो  Satful Sonawane. Computer Planet, Security Planet, email id- Info@computerplanet.info. Cctv, Spy Hidden Camera, Stun gun , voice recorder ,Spy Pen , Gito Spy 

+91 70575 73102 M - 9822358631, 9503852341

त्यामुळे आपण पुरावा मिटू नये म्हणून भरपूर काळजी घेतली पाहिजे.
तज्ञांचा रिपोर्ट घेतो तर तो कोर्टामध्ये INDIAN EVIDENCE ACT 45 नुसार तो मान्य होतो.

भौतिक पुरावे कोणकोणते आहेत ते पुरावे खालील प्रमाणे,
  1. 1.      BODY MATERIALS (DEAD BODY, PARTS OF BODY, BONES, TEETH, HAIR, SKIN, NAILS, MUSCLES, BLOOD, BLOOD STAINES, URINE, SWATE, VOMIT, BREAST MILES ETC)
  1. 2.      BOTANICAL MATERIALS (PLANT, LEAVES, ROOTS, FRUIT, FLOWER, SEEDS, FIBERS, WOOD ETC)
  1. 3.      CHEMICAL SUBSTANCE (RESIDUE, FUSE, EXPLSIVE ETC)
  1. 4.      WEAPONS (FIREARMS, AMMUNITION ETC)
  1. 5.      TOOLS (HAMMER, LIFTS, SCREW-DRIVER, MARKING GAUGE, CHISEL, DRILL ETC)
  1. 6.      IMPRESSIONS (FINGERPRINT, PALM PRINT, FOOTPRINT, SOLEPRINT, SHOEPRINT) TYRE MARK, TOOL MARK, TRACK MARK, SKID MARK, PAV MARK, HOOF MARK, TEETH MARK ETC.)
  1. 7.      VEHICLES AND THEIR PART (TRUCK, TRACTOR, BUS, JEEP, CAR, MOTOR-CYCLE, SOOTER, MOPED, BROKEN PARTS, TYRE, GLASS, BOLTS, PAINTS, GRESE, NUMBER PLATE, CHEESES NUMBER ETC.)
  1. 8.      FIBERS (CLOTH, HUMAN, AMIMAL HAIR, BAGS, ROPES, STRING, THREADE ETC)
  1. 9.      DOCUMENT
  1. 10.  POISONS AND THEIR CONTAINER (FOOD, PILLS, CAPSULES, AMPOULES, POWDE, SEEDS, DRUGS ETC)
  1. 11.  MISCELLANEOUS (OBJECT BELONGING TO THEIR CULPRIT OR VICTIM, IDENITY CARD, POCKET DAIERY, LICENSE ETC)

धन्यवाद….

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

लाॅ ऑफ अट्रॅक्शन पाच सुत्रे

 लाॅ ऑफ  अट्रॅक्शन


हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे 😭, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हटल्याबरोबर पळुन जातील! 



१) कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्चर्याने बघा – 


- आज दुकानात 🏪 नोकर नाही आला, “अरे वा!, बघु आज, काय काय अडतयं त्याच्यावाचुन!”, 


- आज घरी कामवाली नाही आली, “असं का? मज्जा 🤩 आहे मग आज!”


- पंचवीस तारीख आहे, पैसे 💵 संपत आलेत, “छान, मस्त काटकसर  करु आता पाचसहा दिवस!”


- तो माझ्यावर निष्कारण चिडला 😡, “अरे, तो असंपणं करतो का? असु दे! असु दे!” 


- तिने माझ्याशी उगीचचं भांडण केले, “हो का? किती मज्जा, आता रुसवा 😏 काढायची संधी मिळणार!” 


बघा, कसलीही, कितीही भयानक 👹 समस्या आणा, ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवुन बघा, आश्चर्य व्यक्त केल्यास, समस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते, 

“ओह ! हे असं आहे का?, 

अरे! हे असं पण असतं का? 

ओके!” आहे त्याचा स्विकार 🫱🏻‍🫲🏽केल्यास नव्याणव टक्के चिंता पळुन जातात. 


समजा, एखादा दात 🦷 तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार? एक उपाय आहे. डोळे बंद करुन, त्या दुखणार्‍या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर 💯 टक्के मन एकाग्र करा. बघा वेदनांची तीव्रता कमी होईल, 


गंमत 😄 अशी आहे, की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत, जितकं वेदनांमुळे मनात येणारे विचार 💭त्रास देतात, वेदनांना विचारांपासून तोडलं की चिंता पळुन जाते! 


२) भुतकाळात घुटमळणे बंद करा – 

बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र 🌪️ सुरु असते, 


- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास 📖 केला असता, तर आज मीही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” 


- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट  🏠 घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.” 


- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला 😑 नको होते! खुप वाईट आहे मी!” 


- “मी खुप कमी पगारावर 💵 काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”


- “त्या कार्यक्रमाच्या दिवशी, ती 🗣️ मला अशी म्हणाली!”


अरे! व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा 🔥फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन 🤔 गेलेलं बरं!


३) इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! – 


बहुतांश दुःखांच 😖मुळ हे तुलनेत असतं,


- त्यांचं पॅकेज बारा लाखाचं 💰 आहे, मी कधी पोहचणार त्या ठिकाणी?


- त्यांच्याकडे इनोव्हा 🚘 आहे, आपल्याकडे खटारा गाडी!


- ते मेट्रो सिटीत 🌃 राहतात, किती ऐश करतात, नाहीतर आपण?


- ती किती सुंदर 👩🏻‍🦱 दिसते. स्लीमट्रीम! माझं वजन थोडं जास्तच आहे.


- हिला सासुचा 👵🏻 ‘जाच’ नाही, किती ‘सुखी’ आहे ही!


- तीचा नवरा 👨🏻 तिचा प्रत्येक शब्द झेलतो, माहीतेय!

इत्यादी इत्यादी..


ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवाद्वितीय आहे, 

गुलाब 🌹 दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! 

त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का?

प्रत्येक फुल अद्वितीय आहे.


त्याचप्रमाणे प्रत्येक फळाचा 🍎 स्वतःचा एक गोडवा आहे, एक चव आहे, 


आंबा 🥭 रसाळ, चवदार म्हणून चिक्कु, अननस खराब म्हणावेत का? 


संत्रा-मोसंबीने 🍊 ईर्ष्या करावी का? 


केळीने माझे नशीबच फुटकं म्हणुन रडत बसावे का? 


सफरचंद 🍎-डाळींबाने आत्महत्या कराव्यात का?


कोणतं फळ चवदार आहे, 

कुणात औषधी 💊 गुणधर्म आहेत, 

कोणी पाणीदार आहेत, 

कोणी कोरडी. 

ज्याचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, जसं फळांचं, तसंच, माणसांचं!,


कोणी शार्प बिजनेसमन 👨🏻‍💼 आहे, 

कोणी प्रचंड मेहनती आहे,

कोणी कलाकार 👨🏻‍🎤 आहे, 

कोणी बोलुन मनं जिंकण्यात तरबेज, कोणी प्रेमळ आहे, 

कोणी शिस्तप्रिय 🧍🏻‍♂️,

कोणी यशासाठी भुकेला आहे,

कोणी प्रेमासाठी ❤️ आतुर!


आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी 😖 व्हायचं!


तुम्हाला माहीतेय, ह्या जगात 🌏साडेसहा अब्ज लोक राहतात, आणि प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा चेहरा 👱🏻‍♂️ एक दुसर्‍यापासून वेगळा आहे,


म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण.!


४) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. – 


- आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल  🎁 भेट आहे, 

- आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे,

- आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, 

- आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं 💭 बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, 

- आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु 😄 फुलवण्यासाठी आहे!


जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी 🦹🏻‍♂️भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे 😣, सगळे सगळे फेकुन द्या. मोकळे आणि रिते व्हा. प्रत्येक क्षणाला, निरापराध 😇 वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!


माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, 


अ) अपेक्षा

ब) अपुर्ण स्वप्ने,

क) ध्येयप्राप्ती 🏆नंतर येणारा रिक्तपणा!


बहूदा आपण 'भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी?' या विचारात असतो. तो कसा सुखी ☺️ आहे, ती कशी मस्त जगते, त्याच आयुष्य आरामशीर आहे, माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दुःखी 😫 होत तर नाही ना? 


बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना 🛌🏻 एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं 😖 कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. 


स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल 🏃🏻‍♂️ करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!


आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते) मग अचानक आयुष्यातले थ्रील 🧗🏻‍♂️खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु.

जॉब लागु दे, जॉब लागु 👨🏻‍💻दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा 😕 यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो, 


आयुष्य कशासाठी? 


जीवनाचा निर्भेळ आनंद 😁 घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य 😞, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत! 


५) सेवा करण्यार्‍याला आत्मिक समाधान मिळते. - 


बघा! किती मजेशीर आहे हे,


- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,


- दिव्याची 🪔 वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.


- झाड तप्त सुर्याच्या 🌞 उन्हाचा मारा सहन करतो, आणि वाटसरुला सावली देतो,


- ज्यात कसलंही पौष्टीक तत्व नाही असे गवत, गाय 🐄 खाते, आणि सकस, चविष्ट दुध देते.


- सुर्य जिथं भरपुर पाणी 💧 आहे, त्याची वाफ करतो, ढग बनवुन, जिथं पुरेसं पाणी नाही, अशा दुष्काळी प्रदेशात पाऊस पाडतो.


आणि म्हणुनच की काय, ह्या सर्वांना आपल्या संस्कृत्तीत पुजनीय 🙏🏻मानलं गेलयं. 


माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.  🤗

काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत 🏃🏻‍♂️असतो, पण खरे समाधान कुठे आहे?


इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्यामध्ये एक वेगळे समाधान आहे, आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा 🛡️ वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी  😄 करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.


याच पाच सुत्रांचा मिळुन बनतो, लॉ ऑफ अॅट्रॅक्शन! आणि हेच आहे The Art of Living 

Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv,Spy / Hidden Camera, Stun gun,Spy Pen. M-9822358631,9503852341 ,Gito Spy

+91 70575 73102

मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध  घेऊ पाहणाऱ्या, सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी 😇 आणि समृद्ध होवो, या प्रार्थनेसह शुभेच्छा आणि धन्यवाद!

🙏🏻🙏🏻😊😊

मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

भाऊबंदकी, भावावरला राग कोर्ट- कचेरी

 बोधकथा:-


भाऊबंदकी, भावावरला राग


कोर्ट- कचेरी :-रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण --


एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा " -


नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढलेली दाढी. मळलेली कपडे. म्हणाले.., सगळ्याच जमीनीवर, इस्टटीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागदं पाहीजेत? किती खर्च येईल?


मी त्यांना बसायला सांगितलं.


ते खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली. त्यांच्या कडून माहीती घेतली.


अर्धा पाउण तास गेला.

 

मी त्यांना सांगितलं. , मी अजून कागदपत्रे पाहतो. तुमच्या केसचा विचार करू या. तुंम्ही असं करा ४ दिवसांनी परत या.


४ दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावा बद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता. मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले.


मग मीच बोलायला सुरूवात केली. मी तुमची कागदपत्रे पाहीली. तुम्ही दोघे भाऊ. एक बहीण. आई वडील लहानपणीच गेले. 


तुमच शिक्षण ९ वी पास. धाकला भाऊ M.A.B.ed. तुंम्ही भावाच्या शिक्षणा साठी शाळा सोडली. रानात लंगोटी वर राबला. नेवरा दाजीच्या विहीरीवर दगड फोडली. सदाबापूच्या उसात स-या पाडल्या. पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही.


एकदा बहीण शेतात गुरं चारत होती. तुमचा भाऊ शाळेतून आला होता. कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याला शिंग लागली, संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. तुंम्ही खांद्या वरून त्याला बोरगावला नेलं. खरं म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळतं वय नव्हतं....फक्त कळती माया होती..आई बापाच्या मागं यांचा मीचआई बाप ही भावना होती...


तुमचा भाऊ B.A ला गेला. उर भरून आलं. तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट उपसायला लागला. पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला. दवाखानं केल..बाहेरचं केलं. पण, गुण आला नाही..शेवटी डॉक्टरनं किडनी काढायला सांगितली. तुंम्ही तुमची किडनी दिली. ऑफिसर झाल्यावर खुप फिरायचं आहे.. नोकरी करायची आहे..तुला आमच्या पेक्षा लय त्रास.. आंम्ही रानातली माणसं.आंम्हाला एक किडनी असली तरी चालतय. तुम्ही बायकोच सुध्दा न ऐकता किडनी दिली.


भाऊ M.A ला गेला. होस्टेल वर रहायला गेला. गावात मटण पडलं..डबा नेवून द्यावा. शेतात कणसं आली..कणस नेवून द्यावी. कुठला सण आला..पोळ्यांचा डबा द्यावा. घरा पासून हॉस्टेलचं अंतर २५ की.मी. पण तुंम्ही सायकलने गेला. घासातला घास घातला. भावाला नोकरी लागली. तुंम्ही गावात साखर वाटली.


३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..झालं म्हणजे त्यानंच केलं.  तुंम्ही फक्त हजर होता. पण तरी अभिमान होता..


भावाला नोकरी लागली. भावाच लग्न झालं..आता तुम्हाला आणि बायका पोरांना सुख लागणार होतं; पण झाल उलटंच....लग्न झाल्या पासुन भाऊ घरी येत नाही. बोलावलं तर म्हणतो; मी बायकोला शब्द दिलाय. घरी पैसा देत नाही. विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे. गेल्या वर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला. विचारल तर म्हणतो, कर्जकाढून घेतलाय..!!


सगळं सांगून झाल्यावर मी थोडा वेळ थांबलो नंतर म्हणालो, आता तुमचं म्हणणं आहे की त्याने घेतलेल्या मिळकती वर स्टे लावायचा ?


तो पटकन म्हणाला; हो बरोबर.


मी म्हणलं; स्टे लावता येईल. भावाने खरेदी केलेल्या मिळकती मधला हिस्सा पण मिळेल. पण......


पण तुंम्ही दिलेली कीडनी परत मिळणार नाही. तुम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुंम्ही त्याच्या साठी खर्च केलेलं आयुष्य पण परत मिळणार नाही. आणि मला वाटतयं, या गोष्टी पुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत शुन्य आहे. त्याची नियत बदलली. तो त्याच्या वाटंनं गेला. तुंम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा. तो भिकारी निघाला, तुंम्ही दिलदार होता, दिलदारच रहा. तुम्हाला काहीएक कमी पडणार नाही.!! उलट मी म्हणेन वडीलो पार्जित मिळकती मधला तुमचा हिस्सा तेवढा पेरा.. त्याचा हिस्सा पडीक राहु द्या. कोर्ट कचेरी करण्या पेक्षा मुलांना शिकवा. शिकुन तुमचा भाऊ बिघडला ; म्हणुन पोरं बिघडणार नाहीत.


त्यान १० मिनीटं विचार केला, सगळी कागद पिशवीत कोंबली, डोळं पुसत म्हणाला, चलतो सायेब... !! "


या गोष्टीला ५ वषॅ झाली.


परवा तो पक्षकार अचानक ऑफीसला आला. बरोबर गोरागोमटा पोरगा. हातात कसली तरी पिशवी.


मी म्हटले बसा..



तो म्हणाला, बसायला न्हाय आलो सायेब, पेढं द्यायला आलोय, .हा माझा पोरगा. न्युझिलॅंन्डला असतो. कालच आलाय. आता गावात ३ मजली घर हाहे , ८-९ एकर शेत घेतलय. तुंम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरीच्या वाटला लागू नका. मी पोरांच्या शिक्षणाची वाट धरली.


मला भरुन आलं, हातातला पेढा हातातच राहीला.


रागाला योग्य दिशा दिली तर, पुन्हा रागवायची वेळ येणार नाही.

Cctv, Spy Hidden Camera, Stun gun , voice recorder ,Spy Pen , Gito Spy +91 70575 73102 M - 9822358631, 9503852341

कितीही कमवा पण, कधी गर्व करू नका कारण, बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर, ऱाजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात,


आयुष्य खूप सुंदर आहे, एकमेकांना समजून घ्या व जीव लावा, हाक तुमची साथ आमची असं असावं 🙏 🙏🏻

आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी धडपडणारा मराठी तरुण राईज फाउंडेशन' चे संस्थापक ऋषिकेश खिलारे

 आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी धडपडणारा मराठी तरुण


महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, नंदूरबार, धुळे या आदिवासीबहुल जिल्ह्यात कोकरू, भिल, पावरा, निहाल, भिलाला या समाजाचे वास्तव्य आहे. या समाजातील विद्यार्थ्यांची मातृभाषा वेगळी असल्याने केवळ मराठीतील पुस्तक त्यांना फारशी उपयोगाची ठरत नाहीत व त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागत नाही जे वेळोवेळी समोर येत आहे. या समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना वाचनाची गोडी लागावी, याकरिता स्वतंत्रपणे विचार करणे गरजेचे बनले होते. हि गरज ओळखून मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी कार्यरत 'राईज फाउंडेशन' ने २०१८ मध्ये कोकरू विद्यार्थ्यांसाठी 'ज्ञानकोश' हा बहुभाषीय शब्दकोश तयार केला. त्यानंतर सॅन २०१९ मध्ये पावरा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असा शब्दकोश तयार करण्याचा निर्धार करण्यात आला. 



गुणवत्ता असूनही आदिवासी विद्यार्थ्यांनी केवळ भाषिक अडसरामुळे शालेय शिक्षणात मागे पडू नये या हेतूने गेल्या अडीच वर्षाच्या संशोधनातून 'राईज फाउंडेशन' ने पाच भागात 'पावरी भाषाकोश' साकारला आहे. सुमारे साडेचार हजार शब्दांचा समावेश असणाऱ्या या भाषाकोशामुळे पावरा समाजातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मातृभाषा, राज्यभाषा, देशभाषा आणि ज्ञानभाषा इंग्रजीतील शब्दसंग्रह उपलब्ध होणार आहे. 


हा पवार भाषाकोश साकारण्यामागील प्रवास होता तरी कसा ? यात काय काय आव्हानं होती ? हे जाणून घेऊया 'राईज फाउंडेशन'  चे संस्थापक ऋषिकेश खिलारे

Cctv, Spy Hidden Camera, Stun gun , voice recorder ,Spy Pen , Gito Spy +91 70575 73102 M - 9822358631, 9503852341


सोमवार, २ जानेवारी, २०२३

हा असं वागला , तो तसं वागला

 हा असं  वागला , 

तो तसं वागला , 

कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा . आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा . त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.

        या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख , अडचणी ,  नाहीत . ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय . आपण तर साधारण मनुष्य आहोत . सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो . कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं . मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं . आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं .इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे ,

        आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते . आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका . फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे . जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत*.

          जगणं कोणाचंही सोपं नसतं . आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं . सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो .

         आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका . कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.



 ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.

    कृतज्ञ रहा.


ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही.

    कृतज्ञ रहा.


तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.

    कृतज्ञ रहा.


ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचेजीवन विसंवादात आहे.

   कृतज्ञ रहा.


तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.

     कृतज्ञ रहा.

चिरंतन स्मरणात असू द्या जीवन क्षणभंगुर आहे हृदयाची स्पंदन फक्त आणि फक्त त्याच्या इशारावर चालू द्या कुठलाही अहंकार आकस किल्मिष द्वेष वैर मनाला विकृत बनवणार आहे नवीन वर्षात हे सगळं टाकून मित्र जमा करूया प्रेमाने मायेने ममतेने 

असू द्या कुणाच्याही मनात आपल्या बाबत वैर आपणच असं वागूया की त्याला आपल्या जवळ यावसं वाटेल 

ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.
कृतज्ञ रहा.
#कृतज्ञ_रहा कारण तुमच्याकडे जे काही आहे ती फक्त
"ईश्वरी कृपा" आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.
म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा.
पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून, आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात.कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, आत्मविश्वास.
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून.
🙏धन्यवाद 🙏

गेल्या वर्षाला निरोप देताना   

Cctv, Spy Hidden Camera, Stun gun , voice recorder ,Spy Pen , Gito Spy +91 70575 73102 M - 9822358631, 9503852341

*नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।।

Electronic Devices in spy hidden camera

 

Electronic Devices in spy camera 

 

List of Spy Hidden Camera In  Electronic Devices 

Following is a list of 100 common electronic devices in spy camera

  • Spy Hidden Camera In Air purifier
  • Spy Hidden Camera In Air conditioner
  • Spy Hidden Camera In Alarm clock
  • Spy Hidden Camera In Backup charger
  • Spy Hidden Camera In Bread maker
  • Spy Hidden Camera In Banknote counter
  • Spy Hidden Camera In Blender
  • Spy Hidden Camera In Bluetooth speaker
  • Spy Hidden Camera In Bulb
  • Spy Hidden Camera In Calculator
  • Spy Hidden Camera In Car toy
  • Spy Hidden Camera In Ceiling fan
  • Spy Hidden Camera In Chandelier
  • Spy Hidden Camera In Clock
  • Spy Hidden Camera In Clothes dryer
  • Spy Hidden Camera In Coffee maker
  • Spy Hidden Camera In Computer
  • Spy Hidden Camera In Copier
  • Spy Hidden Camera In Curling iron
  • Spy Hidden Camera In Digital camera
  • Spy Hidden Camera In Dishwasher
  • Spy Hidden Camera In Doorbell camera
  • Spy Hidden Camera In Drill
  • Spy Hidden Camera In Dvd player
  • Spy Hidden Camera In Earphones
  • Spy Hidden Camera In Electric frying pan
  • Spy Hidden Camera In Electric grill
  • Spy Hidden Camera In Electric guitar
  • Spy Hidden Camera In Electric pencil sharpener
  • Spy Hidden Camera In Electric razor
  • Spy Hidden Camera In Electric stove
  • Spy Hidden Camera In Exhaust fan
  • Spy Hidden Camera In External hard drive
  • Spy Hidden Camera In Fan
  • Spy Hidden Camera In Facial cleansing machine
  • Spy Hidden Camera In Fax
  • Spy Hidden Camera In Fish tank
  • Spy Hidden Camera In Floor lamp
  • Spy Hidden Camera In Game controller
  • Spy Hidden Camera In Garage
  • Spy Hidden Camera In Grandfather clock
  • Spy Hidden Camera In Hair dryer
  • Spy Hidden Camera In Headset
  • Spy Hidden Camera In Inkjet printer
  • Spy Hidden Camera In iPod
  • Spy Hidden Camera In Iron
  • Spy Hidden Camera In juicer
  • Spy Hidden Camera In Kettle
  • Spy Hidden Camera In Kitchen scale
  • Spy Hidden Camera In Hair straightening machine
  • Spy Hidden Camera In Laser printer
  • Spy Hidden Camera In Lawn mower
  • Spy Hidden Camera In Lift
  • Spy Hidden Camera In Meat grinder
  • Spy Hidden Camera In Microphone
  • Spy Hidden Camera In Microwave
  • Spy Hidden Camera In Mixer
  • Spy Hidden Camera In Monitor
  • Spy Hidden Camera In Mosquito racket
  • Spy Hidden Camera In Mouse
  • Spy Hidden Camera In Mp3 player
  • Spy Hidden Camera In Oil-free fryer
  • Spy Hidden Camera In Piano
  • Spy Hidden Camera In Oven.

एविडेंस रिकॉर्डिंग और घर की सुरक्षा के लिए बेस्ट हैं ये Spy Cam, देंगे क्रिस्टल क्लियर वीडियो क्वालिटी

ऑडियो और वीडियो रिकॉर्डिंग करने के लिए ये कुछ बेस्ट स्पाई कैमरा है। इन्हें आप घर की सुरक्षा और सर्विलांस के लिए भी इस्तेमाल कर सकते हैं।

घर पर सुरक्षा और गलत लोगों का वीडियो रिकॉर्ड करने के लिए आपके पास स्पाई कैम होना बहुत जरूरी है। यहां पर हम आपके लिए सिक्योरिटी पर्पज के लिए इस्तेमाल किए जाने वाले  अलग-अलग तरह के हाई रिजोल्यूशन वाले Spy Camera लेकर आए हैं। इनमें आपको 4K तक की हाई क्वालिटी वीडियो रिकॉर्डिंग मिलती है। यह कैमरा आपको पेन, चार्जर, एलईडी बल्ब, होल्डर और चश्मे के मॉडल में मिल रहे हैं।

सामने वाले को इन स्पाई कैमरा की जरा भी भनक नहीं लगेगी। आप इनसे अपने घर की सुरक्षा भी कर सकते हैं। साथ ही गलत लोगों के वीडियो भी रिकॉर्ड कर सकते हैं।

  • Spy Hidden Camera In Plotter
  • Spy Hidden Camera In Pressure cooker
  • Spy Hidden Camera In Printer
  • Spy Hidden Camera In Projector
  • Spy Hidden Camera In Radiator
  • Spy Hidden Camera In Radio
  • Spy Hidden Camera In Reading lamp
  • Spy Hidden Camera In Refrigerator
  • Spy Hidden Camera In Remote control
  • Spy Hidden Camera In Rice cooker
  • Spy Hidden Camera In Safe
  • Spy Hidden Camera In Robotic vacuum cleaner
  • Spy Hidden Camera In Sandwich maker
  • Spy Hidden Camera In Scale
  • Spy Hidden Camera In Scanner
  • Spy Hidden Camera In Sewing machine
  • Spy Hidden Camera In Smart television
  • Spy Hidden Camera In Smartphone
  • Spy Hidden Camera In Speakers
  • Spy Hidden Camera In Tablet
  • Spy Hidden Camera In Television
  • Spy Hidden Camera In Timer
  • Spy Hidden Camera In Toaster
  • Spy Hidden Camera In Torch
  • Spy Hidden Camera In USB drive
  • Spy Hidden Camera In Vacuum cleaner
  • Spy Hidden Camera In Walkie-talkie
  • Spy Hidden Camera In Washing machine
  • Spy Hidden Camera In Watch
  • Spy Hidden Camera In Water pumps
  • Spy Hidden Camera In Water purifier
  • Spy Hidden Camera In Wall fan
  • Spy Hidden Camera In Water heater
  • Spy Hidden Camera In Webcam
  • Spy Hidden Camera In Wifi modem



  • तुम्ही जेम्स बाँडचे मोठे चाहते आहात आणि 007 बनण्याची तुमची इच्छा आहे का. जर होय, तर स्पाय गॅझेट्सचे नवीनतम मॉडेल वापरा. स्पाय गॅजेट्सचे विविध प्रकार आहेत. प्रत्येक गुप्तचर उपकरणाची वैशिष्ट्ये आणि आकार वेगवेगळे असतात, तथापि, त्यांचे कार्य एकच आहे जे कोणत्याही अडथळ्याशिवाय पाळत ठेवणे, सुरक्षा आणि हेरगिरी प्रदान करणे आहे. computer planet , gito spy  Product ही एकमेव कंपनी आहे जी पुणे भारतात सर्वोत्तम आणि नवीनतम गुप्तचर गॅझेट्स आणि स्पाय कॅमेरा विकते. आम्ही पुणे भारतातील सर्वोत्तम उत्पादक, डीलर्स, पुरवठादार, उत्पादक, संपूर्ण विक्रेते आणि सर्वोत्तम स्पाय कॅमेरा कंपनी आहोत.
    
    आम्हाला विश्वास आहे की प्रत्येकाला सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे, आम्ही स्वस्त दरात गुप्तचर उपकरण विकतो जेणेकरून प्रत्येकाला ते परवडेल. स्पाय कॅमेरा, मिनी कॅमेरा, स्पाय ऑडिओ उपकरणे, स्पाय वायरलेस कॅमेरा, मोबाईल फोन जॅमर, जीपीएस ट्रॅकर, स्पाय मोबाईल फोन सॉफ्टवेअर, मोबाईल वॉच फोन आणि सिक्युरिटी कॅमेरा अशी विविध प्रकारची गुप्तचर उत्पादने आमच्याकडे उपलब्ध आहेत. नॅनी कॅम आणि गुप्त छुपा कॅमेरा म्हणून ओळखला जाणारा स्पाय कॅमेरा लहान कॅमेरा आहे जो कोणत्याही सामान्य घरगुती उत्पादनांमध्ये लपविला जाऊ शकतो.

  • Follow this link to join my WhatsApp group:

  • https://chat.whatsapp.com/HeXqJIVcwkBHBzbjiF1jDc
Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv,Spy , Hidden Camera, Stun gun,Spy Pen. voice recoder Gito Spy
+91 70575 73102  M-9822358631,9503852341

रविवार, १ जानेवारी, २०२३

तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ! 2023

नमस्कार मित्रहो,

तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ! 
तसं म्हंटलं तर वेळ-काळ मोजण्याची पद्धत ही मानवनिर्मितच आहे. ती नैसर्गिक नाही. कोणता दिवस, कोणता वार आणि कोणते वर्ष याचा नियतीला किंवा निसर्गला काहीच फरक पडत नाही.

मात्र तरीही आपण नववर्ष साजरं करतो. याचं कारण म्हणजे "कोणत्याही गोष्टीची नव्याने सुरुवात करणं" हे केवळ माणसालाच शक्य आहे. इतर सजीवांना ती देणगी नाही.

मग आपल्याला हा वर मिळाला आहेच तर तो नीट वापरूया की ! या वर्षी काय नवीन करायचं त्याचा संकल्प करूया. फार मोठं टार्गेट ठेवलं तर कदाचित  इतर सर्व वर्षांप्रमाणे या वर्षीचा संकल्प देखील बारगळेल. म्हणून एखादी छोटी गोष्ट ठरवा जी जमेल . Small wins creates Big victories !!

आणि या वर्षी खराखुरा आनंद पाहिजे असेल तर खालील चारही भागांसाठी एक ध्येय निश्चीत करा.
1. Self स्वतःसाठी
2. Family कुटुंबासाठी
3. Community समाजासाठी
4. Humanity मानवतेसाठी (सर्व सजीवांसाठी)

स्वतःसाठी काय ध्येय ठेवावे हे वेगळे सांगायला नको. कुटुंबासाठी एखादी पिकनिक, एखादा वेगळा अनुभव, कधी कुटुंबाने एकत्र मिळून केली नसेल अशी एखादी activity प्लॅन करा.

Community - समाजासाठी आपल्या आजूबाजूला शेजारी, सोसायटी, संस्था यांना काही मदत /सुधारणा करता येईल का याचा विचार करा. झाडे लावणे, श्रमदान, सफाई इत्यादी. 

Humanity - मानवजातीसाठी आपण आता काय करू शकतो याचा विचार करा (त्यासाठी गुगल करा ☺️) उदा. प्लास्टिकचा वापर मी यावर्षी अर्ध्यापेक्षा कमी करेन. ओला आणि सुका कचरा वेगळा करेन, किंवा शक्य तिथे वाहनांचा वापर टाळेन.

आपल्या पेक्षा आपल्या सोबतच्या इतरांचा विचार आपण करू लागतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने "अर्थपूर्ण" जगतो. अशा जीवनाचा प्रत्येक दिवस एक आनंद सोहळा बनतो. मग तारखा आल्या गेल्या, कॅलेंडर बदलले तरी काही फरक पडत नाही.

तुम्हा सर्वांना "नवजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा" !!