लाॅ ऑफ अट्रॅक्शन
हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे 😭, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हटल्याबरोबर पळुन जातील!

१) कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्चर्याने बघा –
- आज दुकानात 🏪 नोकर नाही आला, “अरे वा!, बघु आज, काय काय अडतयं त्याच्यावाचुन!”,
- आज घरी कामवाली नाही आली, “असं का? मज्जा 🤩 आहे मग आज!”
- पंचवीस तारीख आहे, पैसे 💵 संपत आलेत, “छान, मस्त काटकसर करु आता पाचसहा दिवस!”
- तो माझ्यावर निष्कारण चिडला 😡, “अरे, तो असंपणं करतो का? असु दे! असु दे!”
- तिने माझ्याशी उगीचचं भांडण केले, “हो का? किती मज्जा, आता रुसवा 😏 काढायची संधी मिळणार!”
बघा, कसलीही, कितीही भयानक 👹 समस्या आणा, ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवुन बघा, आश्चर्य व्यक्त केल्यास, समस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते,
“ओह ! हे असं आहे का?,
अरे! हे असं पण असतं का?
ओके!” आहे त्याचा स्विकार 🫱🏻🫲🏽केल्यास नव्याणव टक्के चिंता पळुन जातात.
समजा, एखादा दात 🦷 तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार? एक उपाय आहे. डोळे बंद करुन, त्या दुखणार्या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर 💯 टक्के मन एकाग्र करा. बघा वेदनांची तीव्रता कमी होईल,
गंमत 😄 अशी आहे, की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत, जितकं वेदनांमुळे मनात येणारे विचार 💭त्रास देतात, वेदनांना विचारांपासून तोडलं की चिंता पळुन जाते!
२) भुतकाळात घुटमळणे बंद करा –
बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र 🌪️ सुरु असते,
- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास 📖 केला असता, तर आज मीही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.”
- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट 🏠 घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.”
- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला 😑 नको होते! खुप वाईट आहे मी!”
- “मी खुप कमी पगारावर 💵 काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”
- “त्या कार्यक्रमाच्या दिवशी, ती 🗣️ मला अशी म्हणाली!”
अरे! व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा 🔥फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन 🤔 गेलेलं बरं!
३) इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! –
बहुतांश दुःखांच 😖मुळ हे तुलनेत असतं,
- त्यांचं पॅकेज बारा लाखाचं 💰 आहे, मी कधी पोहचणार त्या ठिकाणी?
- त्यांच्याकडे इनोव्हा 🚘 आहे, आपल्याकडे खटारा गाडी!
- ते मेट्रो सिटीत 🌃 राहतात, किती ऐश करतात, नाहीतर आपण?
- ती किती सुंदर 👩🏻🦱 दिसते. स्लीमट्रीम! माझं वजन थोडं जास्तच आहे.
- हिला सासुचा 👵🏻 ‘जाच’ नाही, किती ‘सुखी’ आहे ही!
- तीचा नवरा 👨🏻 तिचा प्रत्येक शब्द झेलतो, माहीतेय!
इत्यादी इत्यादी..
ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवाद्वितीय आहे,
गुलाब 🌹 दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख!
त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का?
प्रत्येक फुल अद्वितीय आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक फळाचा 🍎 स्वतःचा एक गोडवा आहे, एक चव आहे,
आंबा 🥭 रसाळ, चवदार म्हणून चिक्कु, अननस खराब म्हणावेत का?
संत्रा-मोसंबीने 🍊 ईर्ष्या करावी का?
केळीने माझे नशीबच फुटकं म्हणुन रडत बसावे का?
सफरचंद 🍎-डाळींबाने आत्महत्या कराव्यात का?
कोणतं फळ चवदार आहे,
कुणात औषधी 💊 गुणधर्म आहेत,
कोणी पाणीदार आहेत,
कोणी कोरडी.
ज्याचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, जसं फळांचं, तसंच, माणसांचं!,
कोणी शार्प बिजनेसमन 👨🏻💼 आहे,
कोणी प्रचंड मेहनती आहे,
कोणी कलाकार 👨🏻🎤 आहे,
कोणी बोलुन मनं जिंकण्यात तरबेज, कोणी प्रेमळ आहे,
कोणी शिस्तप्रिय 🧍🏻♂️,
कोणी यशासाठी भुकेला आहे,
कोणी प्रेमासाठी ❤️ आतुर!
आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी 😖 व्हायचं!
तुम्हाला माहीतेय, ह्या जगात 🌏साडेसहा अब्ज लोक राहतात, आणि प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा चेहरा 👱🏻♂️ एक दुसर्यापासून वेगळा आहे,
म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण.!
४) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. –
- आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल 🎁 भेट आहे,
- आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे,
- आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे,
- आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं 💭 बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे,
- आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्यावर हसु 😄 फुलवण्यासाठी आहे!
जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी 🦹🏻♂️भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्यांचे ओझे 😣, सगळे सगळे फेकुन द्या. मोकळे आणि रिते व्हा. प्रत्येक क्षणाला, निरापराध 😇 वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!
माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील,
अ) अपेक्षा
ब) अपुर्ण स्वप्ने,
क) ध्येयप्राप्ती 🏆नंतर येणारा रिक्तपणा!
बहूदा आपण 'भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी?' या विचारात असतो. तो कसा सुखी ☺️ आहे, ती कशी मस्त जगते, त्याच आयुष्य आरामशीर आहे, माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दुःखी 😫 होत तर नाही ना?
बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना 🛌🏻 एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं 😖 कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्यावर राहत नाही, चिडचिड वाढते.
स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल 🏃🏻♂️ करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!
आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते) मग अचानक आयुष्यातले थ्रील 🧗🏻♂️खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु.
जॉब लागु दे, जॉब लागु 👨🏻💻दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा 😕 यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो,
आयुष्य कशासाठी?
जीवनाचा निर्भेळ आनंद 😁 घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य 😞, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!
५) सेवा करण्यार्याला आत्मिक समाधान मिळते. -
बघा! किती मजेशीर आहे हे,
- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,
- दिव्याची 🪔 वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.
- झाड तप्त सुर्याच्या 🌞 उन्हाचा मारा सहन करतो, आणि वाटसरुला सावली देतो,
- ज्यात कसलंही पौष्टीक तत्व नाही असे गवत, गाय 🐄 खाते, आणि सकस, चविष्ट दुध देते.
- सुर्य जिथं भरपुर पाणी 💧 आहे, त्याची वाफ करतो, ढग बनवुन, जिथं पुरेसं पाणी नाही, अशा दुष्काळी प्रदेशात पाऊस पाडतो.
आणि म्हणुनच की काय, ह्या सर्वांना आपल्या संस्कृत्तीत पुजनीय 🙏🏻मानलं गेलयं.
माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा. 🤗
काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत 🏃🏻♂️असतो, पण खरे समाधान कुठे आहे?
इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्यामध्ये एक वेगळे समाधान आहे, आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा 🛡️ वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी 😄 करणार्यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.
याच पाच सुत्रांचा मिळुन बनतो, लॉ ऑफ अॅट्रॅक्शन! आणि हेच आहे The Art of Living
Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv,Spy / Hidden Camera, Stun gun,Spy Pen. M-9822358631,9503852341 ,Gito Spy
+91 70575 73102
मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणाऱ्या, सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी 😇 आणि समृद्ध होवो, या प्रार्थनेसह शुभेच्छा आणि धन्यवाद!
🙏🏻🙏🏻😊😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा