गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

हे सगळं एखाद्या जेम्स बॉण्डपटासारखं वाटू शकतं. , सावधान, तुम्ही तुमच्या खिशातच एक गुप्तहेर घेऊन फिरत आहात

 हे सगळं एखाद्या जेम्स बॉण्डपटासारखं वाटू शकतं. , सावधान, तुम्ही तुमच्या खिशातच एक गुप्तहेर घेऊन फिरत आहात


अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन म्हणजे जग दाखवणारा एक झरोका असतो. पण हाच फोन कोणाला तरी तुमच्या खासगी आयुष्यातही डोकावू देत असेल तर?



तुमच्या खिशामध्येच एक गुप्तहेर लपलेला असू शकतो, असा विचार कधी तुम्ही केलाय का?

कल्पना करा, की तुमच्या फोनवरच्या सगळ्या गोष्टींचा - अगदी एनक्रिप्टेड मेसेजेचा अॅक्सेस मिळेल असं एखादं सॉफ्टवेअर दुरूनच (रिमोटली) हॅकर्सना तुमच्या फोनवर इन्स्टॉल करता आलं तर? त्या सॉफ्टवेअरने त्यांना तुमच्या फोनचा माईक आणि कॅमेराही कन्ट्रोल करता आला तर?

हे वाटतंय तितकं अशक्य नाही आणि या सॉफ्टवेअरचा वापर हा जगभरातल्या पत्रकार, कार्यकर्ते आणि वकिलांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याचे ठोस पुरावे आम्ही तपासलेले आहेत.

पण कोण करतंय हे आणि का? आणि आपल्या खिशातल्या या संभाव्य स्पायवेअरचं करायचं काय?

हे सॉफ्टवेअर इतकं शक्तिशाली आहे की त्याचं वर्गीकरण शस्त्रांमध्ये केलं आहे.

हेरगिरी (Espionage)साठीचं आतापर्यंतच सर्वांत आधुनिक सॉफ्टवेअर कसं काम करतं, हे ते समजावून सांगतात. हे सॉफ्टवेअर इतकं प्रभावी आहे की त्याचं वर्गीकरण शस्त्रांमध्ये करण्यात आलं आहे आणि काही सक्त नियमांनुसारच त्याची विक्री करता येते.

"हे सॉफ्टवेअर वापरणारा तुम्हाला तुमच्या जीपीएसवरून ट्रॅक करू शकतो,

"ते कोणत्याही क्षणी मायक्रोफोन आणि कॅमेरा ऑन करू शकतात आणि तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतात. तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या सोशल मीडिया अॅप्सचा अॅक्सेस त्यांना मिळतो, तुमचे सगळे फोटो, तुमचे कॉन्टॅक्ट्स, तुमच्या कॅलेंडरमधली माहिती, तुमचा इमेल आणि तुमच्याकडील प्रत्येक डॉक्युमेंट हे सॉफ्टवेअर चोरतं."

"हे सॉफ्टवेअर तुमच्या फोनचं रूपांतर अक्षरशः एखाद्या उपकरणात करतं, ज्याच्या साहाय्याने ते तुमचं सगळं बोलणं ऐकू शकतात, तुमच्यावर पाळत ठेवू शकतात आणि फोनमधलं सगळं चोरू शकतात."

स्पायवेअर गेले अनेक वर्षं अस्तित्वात आहे, पण या सॉफ्टवेअरने एक वेगळीच पातळी आता गाठली आहे.

डेटा पाठवला जात असताना हे सॉफ्टवेअर इंटरसेप्ट (मधल्या मधे पकडणं) करत नाही, कारण तोपर्यंत हा डेटा इनक्रिप्टेड (एखाद्या कोडमध्ये रूपांतरित) झालेला असतो.

सॉफ्टवेअर तुमचा डेटा तुमच्या फोनवर असतानाच चोरतं. त्यासाठी तुमच्या फोनवरचं प्रत्येक फंक्शन ते आपल्या ताब्यात घेतं आणि हे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की ते लक्षात येणं जवळपास अशक्य आहे.

"ते कोणत्याही क्षणी मायक्रोफोन आणि कॅमेरा ऑन करू शकतात आणि तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतात. तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या सोशल मीडिया अॅप्सचा अॅक्सेस त्यांना मिळतो, तुमचे सगळे फोटो, तुमचे कॉन्टॅक्ट्स, तुमच्या कॅलेंडरमधली माहिती, तुमचा इमेल आणि तुमच्याकडील प्रत्येक डॉक्युमेंट हे सॉफ्टवेअर चोरतं."

"हे सॉफ्टवेअर तुमच्या फोनचं रूपांतर अक्षरशः एखाद्या उपकरणात करतं, ज्याच्या साहाय्याने ते तुमचं सगळं बोलणं ऐकू शकतात, तुमच्यावर पाळत ठेवू शकतात आणि फोनमधलं सगळं चोरू शकतात."

स्पायवेअर गेले अनेक वर्षं अस्तित्वात आहे, पण या सॉफ्टवेअरने एक वेगळीच पातळी आता गाठली आहे.

डेटा पाठवला जात असताना हे सॉफ्टवेअर इंटरसेप्ट (मधल्या मधे पकडणं) करत नाही, कारण तोपर्यंत हा डेटा इनक्रिप्टेड (एखाद्या कोडमध्ये रूपांतरित) झालेला असतो.

सॉफ्टवेअर तुमचा डेटा तुमच्या फोनवर असतानाच चोरतं. त्यासाठी तुमच्या फोनवरचं प्रत्येक फंक्शन ते आपल्या ताब्यात घेतं आणि हे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की ते लक्षात येणं जवळपास अशक्य आहे.

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M- 9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

एका पत्रकाने आपलं म्हणणं मांडलं. ते म्हणतात त्याचं तंत्रज्ञान परवानाधारी सरकारी एजन्सीजना गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि तपास करण्यासाठी आवश्यक साधनं पुरवते आणि त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळे अनेक आयुष्यं वाचलेली आहेत.

हे सगळं एखाद्या जेम्स बॉण्डपटासारखं वाटू शकतं. पण नवीन जगातल्या या गोष्टी आहेत.

हे धोके खरे आहेत आणि या गोष्टी अशा आहेत की ज्या आपण लक्षात ठेवायला हव्यात.


मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

ऑडिओ (डिजिटल) पुरावे म्हणजे काय ??? ऑडिओ पुरावे कसे वापरता येतात.. AUDIO EVIDENCE

 ऑडिओ (डिजिटल) पुरावे म्हणजे काय ??? ऑडिओ पुरावे कसे वापरता येतात.. AUDIO EVIDENCE



ऑडिओ हा आवाज आहे, जो मानवाला श्रवण शक्तीच्या दोन्ही श्रेणीच्या आत आहे. हा दोन्ही वारंवार आपल्या कानावर येतो जो वेगवेगळ्या प्राण्यांच्या माध्यमातून येतो किंवा आपण ते ऐकतो. यामध्ये प्राणी आणि माणूस हे दोघे पण वेगवेगळ्या आवाजाची तीव्रता ऐकतात. उदाहरणार्थ:- हत्ती मनुष्या पेक्षा कमी आवाज ऐकू शकतो आणि माणूस हा खूप मोठा सुद्धा आवाज ऐकू शकतो आवाज हा माणसाच्या स्वर पेटीतून बाहेर पडतो.



 आवाज हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे माणूस बोलतो, प्राण्यांचे आवाज, एखादी वस्तू एकमेकावर पडल्यावर त्याचा आवाज, गाडीच्या माध्यमातून येणारा आवाज, स्पीकर, डॉल्बी यांच्या माध्यमातून येणाऱ्या गाण्यांचा आवाज हे आवाज खूप छोटे किंवा मोठे सुद्धा असू शकतात. हे त्या आवाज येणाऱ्या माध्यमातून अवलंबून असतात की तो आवाज मोठा येतो की बारीक येतो. आवाज हे रेकॉर्ड करण्याचे साधन आहे. आपण आवाज वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल डिव्हाइस मध्ये साठवू शकतो किंवा त्याचे रेकॉर्डिंग करू शकतो आवाज हे हर्ट्स या एकेकांमध्ये मोजले जाते.

AUDIO TYPE: -

आवाज कोण कोणते असतात मानवी त्यामध्ये माणसाचा हसणे-बोलणे, गाणे, रडणे एकमेकावर ओरडणे हळू आवाजामध्ये गाणी गुणगुणणे हे सर्व मानवी आवाजामध्ये येतात. आवाजावरून आपण आपला राग, आश्चर्य, भीती, आनंद किंवा दु यासारख्या आपल्या भावना आपण प्रकट करू शकतो. ते त्या स्वरांमध्ये मानवी आवाजाचा उपयोग हा भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो. आवाजावरून आपणाला एखादी व्यक्तीच लिंग आणि त्याचं वय सांगू शकतो. माणूस त्याच्या भावना स्वराद्वारे प्रकट करू शकतो त्यासाठी तो कोणतीही भाषा वापरू शकतो.

मानवी आवाज निर्माण करताना आपणाला मेन फुफुसाचा उपयोग होतोया फुफ्फुसांमध्ये हवेचा प्रवाह आणि दाब तयार करणे आवश्यक असतं.


AUDIO FORMAT TYPE: -

रेकॉर्ड केल्यानंतर त्या आवाजाचे म्हणजे त्या एडिओचे वेगवेगळे टाईप सुद्धा असतात

  • 1.      M4A MPEG 
  • 2.       FLAC (FREE LOSSLESS AUDIO CODEC)
  • 3.      MP3 (MPEG AUDIO LAYER 3)
  • 4.      MP4 (MP4 AUDIO FILE)
  • 5.      WAV  (WAV AUDIO FILE)
  • 6.      WMA (WINDOWS MEDIA AUDIO)
  • 7.      AAC (ADVANCED AUDIO CODING)

आपण केलेल्या ऑडिओ फाईल चे रेकॉर्डिंग कोणत्यातरी केस मध्ये आपण आपलं फोन रेकॉर्डिंग म्हणजे, कॉल रेकॉर्डिंग किंवा आपण एखाद्याचं केलेलं रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करू शकतोआता DIVORCE केस मध्ये ज्यावेळी दोन्ही पार्टीचे मीटिंग भरतात, त्यावेळी ऑडिओ रेकॉर्डिंग करतात आणि ते रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करता येतो. त्यासाठी आपणाला इंडियन इव्हिडन्स अॅक्ट ची मदत घ्यावी लागते. तुमच्याकडे असलेले फोन रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग हे तुम्ही कोर्टामध्ये तुमच्या केस मध्ये इव्हिडन्स म्हणून सादर करू शकता. मग ते तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग असू दे किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल डिव्हाइस वापरून तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं सुद्धा असेल तर ते उपयोगी होतं.

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M- 9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

जे आपल्याकडे रेकॉर्डिंग असतं जे आपणाला रेकॉर्डिंग कोर्टाच्या कामांमध्ये पुरावा म्हणून द्यायचा आहे तू ऑडिओ सॅम्पल आपण  तज्ञांच्या कडून तपासून त्याचा  अहवाल  65 बी सर्टिफिकेट घ्यावं.

यामध्ये  तज्ञ काय करतात तर ते सुरुवातीला तुमच्या AUDIO,

  • 1.      CLONE COPY OF AUDIO SAMPLE.
  • 2.      MULTIMEDIA EXAMINATION (BASIC EXAMINATION)
  • 3.      HASH VALUE.
  • 4.      METADATA.
  • 5.      OBSERVATION
  • 6.      WAVEFROM.
  • 7.      SPECTROGRAM.
  • 8.      OPINION.
  • 9.      REPORT
  • 10 65 B CERTIFICATE




डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नी रमाबाई यांना लिहिलेले पत्र

 डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नी रमाबाई यांना लिहिलेले पत्र 

दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंडहुन डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नी रमाबाई यांना लिहिलेले पत्र आजही काळीज पिळून टाकतं•••••



प्रिय रमा ,


कशी आहेस रमा तू ? 

तुझी आणि यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. 

मागल्या काही दिवसांतील माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे,प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.


दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. 

या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! 

खूप भावना मनात दाटून आल्या आहेत.खूपच हळवे झाले आहे मन.खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली.तुझी आठवण आली.यशवंताची आठवण आली.


मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस.मी नको नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो.माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून झाली होतीस.तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांनी सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठांपर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.


आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत.मन नाजूक झाले आहे.जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतोय तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा ! 

यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो,अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज.रमा यशवंताला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथांचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.


रमा,   

वैभव,श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच.माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात.या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत


मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे


आपणाला वेगळी दुनिया नाही.आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. 

आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.


मला कळत नाही असं नाही रमा,मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा !


मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.


खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.


माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.


रमा,

 तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.


रमा, 

तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे,मुंबईत कोण पसंत करील.घराला ठिगळे लावणे,वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य,एवढेच तेल-मीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.


सर्वांस कुशल सांग.

कळावे,

तुझा

भीमराव

लंडन

३० डिसेंबर १९३०.

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

अस्पृश्य जातीमधील संघर्ष


अस्पृश्य जातीमधील संघर्ष


        महाराष्ट्रातील महार हे नाग वंशाचे लोक असून, ते येथील मूळचे रहिवासी आहेत. राजकीय पराभवानंतर त्यांना अस्पृश्य बनविण्यात आले. अस्पृश्य वर्गातील मांग, चांभार व ढोर या जाती व्यवसायातून निर्माण झाल्या आहेत. या चारही अस्पृश्य जाती मेलेल्या ढोरावर आपला उदरनिर्वाह पेशवेकाळात करीत होत्या. त्यातील महार हे मेलेले ढोर ओढून त्याचे मांस खात होते.मांग हे ढोराच्या चरबी पासून वाद्ये तयार करून वाजवीत असत, चांभार हे ढोराच्या कातड्या पासून पादत्राणे तयार करीत, तर ढोर हे ढोराच्या शिंगा व हाडापासून बांगड्या व फण्या तयार करून विकत असत.


         पेशवे काळात महार, मांग, चांभार व ढोर अशा चार प्रमुख अतिशूद्र जाती होत्या. त्यांच्यातही लहान लहान व्यवसाया वरून अनेक उपजाती निर्माण झाल्या आणी त्या आपसात मानपान, दर्जा व हक्क यावरून संघर्ष करू लागल्या होत्या.


       भारताच्या दक्षिण भागात स्थित असलेल्या महाराष्ट्रात महार या जातीकडे वंशपरंपरागत कोतवाली होती आणी बहामनी सुलताना कडून 52 हक्क प्राप्त झाल्यामुळे सरकारी दरबारी या जातीला अधिक मान असे, तसा मांग, महार, चांभार व ढोर जातींना नव्हता. म्हणून महार आपल्याला या जातीपेक्षा उच्च समजत असत. बहामनी सुलतान कडून सर्व महार समाजाच्या लोकांना हे हक्क इ. स.1475 साली प्राप्त झाले होते. त्याची पुह्ना उजळणी इ. स.1563 साली महाराष्ट्राची अतिप्राचीन सातवाहन सम्राटाची राजधानी मुंगी पैठण येथे ब्राह्मण व इतर उच्च जातीच्या हक्कदाराची सभा एकनाथ स्वामींचे देवळात होऊन अठरा लाख सोमवंशीय महार जातीला हे 52 हक्क प्राप्त झाले होते. त्या काळात सर्वच महार जातीच्या लोकांना सोमवंशीय समजत असत. त्यानंतर पेशवे शाहीच्या काळात ते करीत असलेल्या लहान लहान धंद्यावरून महार समाजात अनेक उपजाती तयार झाल्या आणी त्या पुढील काळात पक्क्या झाल्या.


महार जातीतील पोटजाती -

      ते येणेप्रमाणे -

1) सोमस, 2) बावणे 3) बारके 4) कोसरे 5) लाडवन

6) आदवन 7) पानके 8)   येसकर 9) घोडके 10) डफळे  11)होलारे 12) कंकारे आणी अर्धी जात वरपारवडे ही होती.


      महार समाजातील पोट - जातींचे लोक काम धंद्याच्या शोधात ज्या ज्या खेड्यात किंवा मोठया गावात गेले तेथे त्यांनी आपल्या महार जाती पंचायती तयार केल्या. प्रत्येक उपजातीची एक जात पंचायत निर्माण झाली. पुढे त्यांच्यात दर्जा, हक्क व मानपान याबद्दल वाद - विवाद निर्माण होत गेले. सामाजिक बंधन तोडणाऱ्या व्यक्तीस महार जाती पंचायती द्वारे बहिष्कृत करण्यात येत असे, अशा बहिष्कृताची एक वेगळीच जात तयार झाली. ती वरपाखड्यांची अर्धी जात होय.जसे तांदळातून खडे किंवा सडी पाखडून बाहेर फेकल्या जातात तसेंच महार जातीतून कोणत्याही सामाजिक गुन्हा करिता समाजाबाहेर फेकल्या गेलेले लोक हे " वरपाखडे " होत. त्यांना अर्धी जात समजल्या जाते. अशाच प्रकारचे वर्गीकरण अस्पृश्य वर्गाच्या मांग, चांभार व ढोर या जातीत सुद्धा होत गेले.


      पेशवे शाहीच्या काळात ब्राह्मण समाजा पासून तर शूद्र - अतिशूद्र समाजापर्यत जाती - उपजातीची निर्मिती झाली. आणी संपूर्ण हिंदू समाज विस्कळीत होत गेला. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे ब्राह्मणा सारख्या उच्च जातीत, जातीय व उप - जातीय संघर्ष जरी दिसत असला तरी त्यांचे सामाजिक संघटन अगदी मजबूत आहे. त्यांच्या सर्व धार्मिक - चालीरिती, विधी विधान, व कर्मठपणा ह्या सर्व ब्राह्मण वर्गा भोवती आजही अगदी पिंगा घालीत असतात. त्या पूर्ण करण्यात ते कोणतीही चूक करीत नाहीत. तत्कालीन निरनिराळ्या चालीरितीचे स्वरूप पाहता पेशव्यानी ब्राम्हणत्वाचा ( Brahminism ) उदोउदो करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कारण त्यात संपूर्ण ब्राह्मण वर्गाचा फायदा होता.


        पूर्वी चार वर्णात विभागलेल्या वैदिक धर्म गुप्त काळात त्याचे रूपांतर हिंदू धर्मात झाले आणी पेशवाईचे काळापासून त्याची हिंदू जातीच्या अनेक तुकड्यात विभागणी होत गेली, असे असले तरीही धर्माच्या नावावर हिंदू लोक एक आहेत. हीच या धर्माची एक मोठी विशेषत: आहे. ब्राह्मण वर्गाने निर्माण केलेल्या हिंदू धर्माच्या अनेक जातीत विभागणी होत गेली असली आणी बहुजन समाजाची गणती शुद्रात होत असली तरी ब्राह्मणानी निर्माण केलेल्या जाती प्रथेवर बहुजन समाजाचा पक्का विश्वास बसलेला आहे. ते कर्म - कांड व पूजा -पाठामध्ये आकंठ डुबलेले आहेत. त्यांच्या गळ्याभोवती कर्म कांडाचे पाश पक्के गुरफटलेले असल्यामुळे ते बाजूला सारून आपला गळा मोकळा करून खुल्या पारदर्शी वातावरणात श्वास घेण्याची कल्पना, कोणताही बहुजन समाजातील हिंदू व्यक्ती करू शकत नाही आणी एखाद्याने तसें करण्याचा प्रयत्न केल्यास तो जाती बहिष्कृत ठरला जाईल ही भीती प्रत्येक हिंदू माणसाला जाणवत असते.


         अशा प्रकारे सामाजिक संघर्षातुन जाती - उपजातीची निर्मिती होत गेलेली आहे आणी ती आजही कायम आहे.


       पेशवे काळात अशा प्रकारच्या जाती - उपजातीचा संघर्ष चालत असतांना ब्राम्हण पुरोहित वर्गाने भोंदू अशा बहुजन समाजाला लुबाडण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या शोधून काढल्या त्यातील मुख्य म्हणजे नवीन नवीन देव - देवता यांची निर्मिती करणे व त्यांची देवळे बांधण्यास भोळ्या जनतेला प्रवृत्त करणे आणी त्याचे पुजारीपण आपल्याकडे घेणे हे होय!

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

      पेशवेकाळात सामाजिक संघर्ष चालत असतांना जाती - उपजाती मध्ये विभागलेल्या हिंदू धर्मातील लोक आपआपल्या जाती - उपजाती करिता वेगवेगळ्या देवाच्या नावाने अनेक देवालये बांधू लागले आहेत. ब्राह्मण वर्गाने आपले वर्चस्व बहुजन समाजावर कायम राहावे म्हणून नवीन नवीन देवाच्या कल्पना पुढे आणल्या आणी पाप - पुण्याचे भय भोळ्या जनतेला दाखवून, त्या कल्पनाना मूर्त स्वरूप देण्याचा सपाटा चालविला होता. प्रत्येक जाती - जमातीची वेगवेगळ्या देवाची वेगवेगळी देवळे बांधली जाऊ लागली होती आणी त्या देवळात पूजा - अर्चा ब्राह्मणांचे हाताने मोठया प्रमाणावर होऊ लागली होती.


( " भारतीय अस्पृश्याची शौर्य गाथा " या पुस्तकातून सादर.

पृष्ठ. क्रं.143 ते 145.

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

स्पाय गुप्तचर कॅमेरा खरेदी चे 5 टिप

स्पाय गुप्तचर कॅमेरा खरेदी  चे 5  टिप

नमस्कार!

छुपा कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करताना, आपण अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे.

1.. प्रथम, तुम्हाला कॅमेरा कुठे बसवायचा आहे याचा विचार करा.

2.. तुम्हाला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की ते अशा भागात स्थित आहे जे सहजपणे दिसले जाणार नाही. तसेच,

3..कॅमेराचे रिझोल्यूशन आणि दृश्य क्षेत्र विचारात घ्या. आपण तपशीलवार प्रतिमा कॅप्चर करू इच्छित असल्यास, आपल्याला उच्च रिझोल्यूशनसह कॅमेरा मिळवायचा आहे.

4..याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या बजेटमध्ये असलेला कॅमेरा खरेदी केल्याची खात्री करा.

5..शेवटी, जर तुम्ही वायरलेस कॅमेरा शोधत असाल, तर तुम्हाला विश्वासार्ह कनेक्शन असलेला कॅमेरा मिळेल याची खात्री करा.

मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला परिपूर्ण स्पाय छुपा कॅमेरा शोधण्यात मदत करेल!

SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice , gps ,wifi , corporate gifts, customized camera,  technology gadgets

GITO - जिटो
G- guarding (protection)
I- innovative products
T- technology
O- organisation

committed to give you more advanced service & products

regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102
#GITO

Spy camera purchase tips

Spy hidden camera purchas tips

Hi there! When looking to purchase a hidden camera, there are several things you should consider. First, think about where you would like the camera to be installed. You'll need to make sure it is located in an area that won't be easily spotted. Also, consider the resolution and field of view of the camera. If you are looking to capture detailed images, you'll want to get a camera with a higher resolution. Additionally, make sure you purchase a camera that is within your budget. Finally, if you are looking for a wireless camera, make sure you get one with a reliable connection. I hope this information helps you in your search for the perfect hidden camera!

ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय ? व त्याचे महत्व काय आहे ?

 🟢 ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय ? व त्याचे महत्व काय आहे? 🟢


सर्वप्रथम आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहीजे की ब्रह्ममुहूर्त असा शब्द नसून ब्राह्ममुहूर्त असा योग्य शब्द आहे.


ब्राह्ममुहूर्त

 हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन तासाचा असतो.

याला रात्रीचा चौथा प्रहर अथवा उत्तररात्र असेही म्हणतात.

याकाळात अनेक गोष्टी अशा ‌घडत असतात ज्या दिवसभराच्या कामासाठी लागणारी ऊर्जा देत असतात.

या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी नऊ फायदे मिळतात.



१) पहीला फायदा म्हणजे या काळात ओझोन हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो. या ओझोन मध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू (आॅक्सिजन) मोठ्या प्रमाणात असतो.

त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्तशुद्धी होते

रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे ९० टक्के रोगांपासून मुक्ती मिळते.

२) दुसरा फायदा असा कि याकाळात मंद प्रकाश असतो

डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपणास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहीले तर डोळ्यांचे विकार जडतात व दृष्टी क्षीण होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावे.

३) तिसरा फायदा म्हणजे या काळात पंचतत्वापॆकी वायूतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपानवायू हा कार्यरत असतो.

हा अपानवायू मलनिःसारण व शरीरशुद्धीचे कार्य करतो.

हा वायू कार्यरत असताना मलबाहेर टाकण्याचे कार्य कोणताही जोर न लावता सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीरशुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलनिःसारण करावे. तसेच जैविक घड्याळाप्रमाणे याकाळात मोठ्या आतड्यामध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते.

४) चौथा फायदा म्हणजे

आपल्या शरीरात , दिवसभरात जमा झालेली घाण नऊ ठिकाणाहून बाहेर पडत असते.

या नऊ ठिकाणांना नवद्वार म्हणतात.

ती नऊ द्वारे पुढीलप्रमाणे : 

दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान, एक तोंड, एक शिश्नद्वार व एक गुदद्वार.

या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते. त्या घाणीत अनेक जीवाणू विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात.

या जीवाणू विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो.  हे होऊ नये यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर काढून टाकली पाहिजे.

५) पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरिर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो.

६) सहावा फायदा म्हणजे याकाळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात ती जागृत असतात. याकाळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते.

तसेच याकाळात ॐकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात.

७) सातवा फायदा म्हणजे सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणांद्वारे येत असतात. त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात.

त्यासाठी ब्राह्ममुहुर्तावर उठून शरीर शुद्धी केली पाहिजे.

८) या काळात आपण ॐ मंत्र जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात, कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात व या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृती होते.

९) नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे,  सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात. 

या पुण्यात्म्यांना, सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो.

Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv,Spy / Hidden Camera, Stun gun,Spy Pen. M-9822358631,9503852341

असे एकूण नऊ फायदे आपण एकाच वेळेस ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नानादी कर्मे केल्याने मिळवू शकतो.

प्रेरणा प्रोत्साहन विश्वास

 छोटा धडा, मोठी शिकवण


जर कोणी आपल्या आयुष्यात मागे पडत असेल तर तुम्ही त्यांना याची आठवण करून देण्याची गरज नाही. कारण, त्यांना ते माहीत आहेच.



कोणाची आर्थिक घडी बिघडली असेल, नातेसंबंधात दुरावा झाला असेल, आरोग्य ठीक नसेल...ते त्यांना माहीत आहेच.


त्याच चिंतेने त्यांचे दिवसेंदिवस जात असतील.

त्यांना या सगळ्याची जाणीव करून देण्याऐवजी आपण त्यांना प्रेरणा देऊ शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो. यातून बाहेर पडून पुन्हा गाडी रुळावर आणणे शक्य आहे याचा विश्वास देऊ शकतो.


त्यांच्यात काय चांगलं आहे ते दाखवून देऊ शकतो... त्यांच्यात काय करण्याची क्षमता आहे ती त्यांच्याच लक्षात आणून देऊ शकतो..... ते जसे आहेत, जिथे आहेत तसे त्यांना स्वीकारु शकतो.


आपल्याला आपल्या कमतरता माहीत असतात. पण आपल्यातल्या गोष्टी दाखवून देण्यासाठी इतरांची गरज असते. मला हे जमू शकेल याची खात्री देणारे शब्द हवे असतात. कोणीतरी विश्वासाने खांद्यावर हात ठेवणारा माणूस हवा असतो.

आणि धडपडल्यावर मायेने पाठीवर फिरणारा हात हवा असतो.


आपणही ते हात होऊया, ते शब्द होऊया, दुसऱ्यांमध्ये लपलेल्या चांगल्या गोष्टी शोधणारे नेत्र होऊया....माणूस होऊया !!

+91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, hidden camera , voice recoder , gps ,self defense device, Cctv camera, GITO - जिटो. G- guarding (protection)

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

हे तुम्हाला माहिती आहे का ??? एखादा पुरावा आपणाला किती उपयोगी होतो, चॅटिंग EVIDENCE

 हे तुम्हाला माहिती आहे का ???   एखादा पुरावा आपणाला किती उपयोगी होतो, हे तुम्हाला माहिती आहे का ???    चॅटिंग EVIDENCE



आत्ताच्या 21व्या युगामध्ये माणसाने खूप प्रगती केलेली आहे. यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चा खूप प्रमाणात शोध लावलेला आहे आणि त्याचा वापर आपण करत आहोत. आताच्या युगामध्ये प्रत्येक माणसाकडे एक ना एक मोबाईल असतोच, त्या मोबाईलचा माणूस चांगल्या कारणासाठी आणि वाईट करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करतो. तोच मोबाईल आपणाला कधी अडचणीच्या काळात उपयोगाला सुद्धा येतो आणि वाईट काळात मदत सुद्धा करतो. लांब राहिलेल्या आपल्या एखाद्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकाला एका मिनिटाच्या आत आपण त्याला संदेश पाठवू शकतो किंवा त्याच्याबरोबर आपण फोनवर बोलू शकतो पूर्वी लोक एकमेकांना पत्र व्यवहार करायचे पण आता पत्र व्यवहार पूर्णपणे बंद झालेले आहे. आताच्या काळात माणसे एकमेकांशी फक्त आणि फक्त फोनवरच कनेक्ट होतात, त्याच फोनवर आपण वेगवेगळे एप्लीकेशन वापरत असतो. त्यावर आपण सोशल मीडिया वापरत असतो त्याच सोशल मीडियात आपण एखाद्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करतो. ते चॅटिंग आपणाला कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही ,तुमच्या दुःखाच्या काळात  तुमच्यावर वाईट आलेल्या परिस्थितीत तेच CHAT तुम्हाला त्यातून बाहेर सुद्धा काढू शकतो किंवा ते चॅटिंग तुम्हाला चांगल्या वेळेत वाईट सुद्धा करू शकतो. एखादी व्यक्ती व्हाट्सअप वर फेसबुक वरील इंस्टाग्राम वर किंवा अनेक अशा वेगवेगळ्या सोशल मीडियावर बोलत असते वेगवेगळ्या माणसांच्या बरोबर तेथेच आपल्यावर आपल्याला काहीतरी पुरावे मिळतात तेच पुरावे उद्या आपणाला कोर्टामध्ये सादर करता येतात. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पैसे देणार आहे म्हटले किंवा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला धमकी दिली किंवा त्या एखाद्या व्यक्तीने सुद्धा चेक बाउन्स केला तर ते चॅटिंग तुमच्या व्हाट्सअप वर असेल तर ते तुम्ही कोर्टामध्ये हजर करू शकता. तुमच्याकडे असलेले चॅटिंग हे तुम्ही कोर्टामध्ये देऊ शकता.

SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets
GITO - जिटो
G- guarding (protection)
I- innovative products
T- technology
O- organisation
committed to give you more advanced service & products
regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102 , 9503852341 , 9822358631
Website social media & Product Photo , व्हिडिओ information :- https://linktr.ee/Satful

जे आपल्याकडे चॅटिंग असतं जे आपणाला चॅटिंग कोर्टाच्या कामांमध्ये पुरावा म्हणून द्यायचा आहे  चॅटिंग सॅम्पल आपण  तज्ञांच्या कडून तपासून त्याचाअहवाल  65 बी सर्टिफिकेट घ्यावं.