छोटा धडा, मोठी शिकवण
जर कोणी आपल्या आयुष्यात मागे पडत असेल तर तुम्ही त्यांना याची आठवण करून देण्याची गरज नाही. कारण, त्यांना ते माहीत आहेच.
कोणाची आर्थिक घडी बिघडली असेल, नातेसंबंधात दुरावा झाला असेल, आरोग्य ठीक नसेल...ते त्यांना माहीत आहेच.
त्याच चिंतेने त्यांचे दिवसेंदिवस जात असतील.
त्यांना या सगळ्याची जाणीव करून देण्याऐवजी आपण त्यांना प्रेरणा देऊ शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो. यातून बाहेर पडून पुन्हा गाडी रुळावर आणणे शक्य आहे याचा विश्वास देऊ शकतो.
त्यांच्यात काय चांगलं आहे ते दाखवून देऊ शकतो... त्यांच्यात काय करण्याची क्षमता आहे ती त्यांच्याच लक्षात आणून देऊ शकतो..... ते जसे आहेत, जिथे आहेत तसे त्यांना स्वीकारु शकतो.
आपल्याला आपल्या कमतरता माहीत असतात. पण आपल्यातल्या गोष्टी दाखवून देण्यासाठी इतरांची गरज असते. मला हे जमू शकेल याची खात्री देणारे शब्द हवे असतात. कोणीतरी विश्वासाने खांद्यावर हात ठेवणारा माणूस हवा असतो.
आणि धडपडल्यावर मायेने पाठीवर फिरणारा हात हवा असतो.
आपणही ते हात होऊया, ते शब्द होऊया, दुसऱ्यांमध्ये लपलेल्या चांगल्या गोष्टी शोधणारे नेत्र होऊया....माणूस होऊया !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा