शनिवार, १८ मार्च, २०२३

परमेश्वराची कृतज्ञता बाळगा

 परमेश्वराची कृतज्ञता  बाळगा

( प्रेरक कथा )

एका जंगलात एक शिकारी आपल्या सावजाचा पाठलाग करता करता रस्ता चुकला. सावज तर पळूनच गेले आणि ह्या शिकाऱ्याला जंगलाच्या बाहेर पडायचा मार्ग मिळे ना! मार्ग शोधता शोधता तो आणखीनच जंगलाच्या आतल्या भागात गुंतत गेला.



एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले तरी हा शिकारी जंगलाच्या बाहेर पडू शकला नाही.


भुकेने व्याकूळ झालेला हा माणूस कुठे काही खायला मिळतेय का ते शोधू लागला.


तेवढ्यात एक सफरचंदाचे झाड त्याच्या दृष्टीस पडले. धावतच तो त्या झाडाकडे गेला आणि त्याने सफरचंद काढण्यास सुरुवात केली. दहा सफरचंद काढल्यानंतर त्याने एका जागी बसून ती खायला सुरुवात केली.


तीन दिवसांचा उपास घडलेल्या त्या शिकाऱ्याने पहिले सफरचंद मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्याच बरोबर ते सफरचंद मिळाल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभारही मानले.


दुसरे सफरचंद खाताना त्याला पहिल्या सफरचंदाएवढा आनंद मिळाला नाही. तरीही त्याने भुकेपोटी ते खाल्लेच; आणि देवाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.


जसजसे त्याचे पोट भरू लागले तसतशी त्याला त्या पुढच्या सर्व  सफरचंदांमधील गोडी कमी वाटू लागली. दहावे सफरचंद तर त्याने टाकून दिले.


ह्या मानवी वृत्तीला अर्थशास्त्रामध्ये Law of Diminishing Marginal Utility म्हणजेच "घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत" असे म्हणतात.


ही केवळ घटती उपभोग्यता नसते तर ती "घटती कृतज्ञता" असते!


आयुष्यात आपल्याला मिळालेल्या विविध सुखसोयींबद्दल विधात्याप्रति ऋण व्यक्त करण्याची आपली मानसिकताही घटतीच असते.


आणि सर्व काही मिळाल्यानंतर तर ती शून्य होऊन जाते. कारण आपल्याला जे काही मिळाले आहे तो तर आपला हक्कच आहे, त्यात कुणाचे ऋण कसले व्यक्त करायचे, अशी वृत्ती होऊन जाते.


ह्या कथेत तो शिकारी म्हणजे आपण सर्वजण आहोत आणि ती सफरचंदं म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात मिळालेल्या सर्व सुखसोयी!


आपल्याकडे ह्या सर्व सोयी उदंड असताना आपल्याला कुणाच्या ऋणाची जाणीवही होत नव्हती. उलट आपण सतत कुठल्या ना कुठल्या कारणांनी उदा. नोकरीतील काम,वाढत्या किंमती, सरकारी धोरण, वाढलेला ट्रॅफिक, प्रदूषण ह्यांबाबत तक्रारीच करीत होतो. पण आज आपण 'तक्रार  मोडवरून' एकदम 'कृतज्ञता मोडमध्ये' आलेले आहोत.


आज 'मला भाजी मिळाली', 'मला दूध मिळालं', 'मी सुरक्षित आहे', 'मी तंदुरुस्त आहे' असल्या गोष्टींसाठी आपण देवाचे आभार मानतो.


दोन महिन्यांपूर्वी जर कुणी आपल्याला सांगितलं असतं की ह्या सर्व गोष्टी हा आपला हक्क होऊ शकत नाही, त्या आपल्याला कुणामुळे तरी मिळताहेत; तर ते पटलंही नसतं. ह्या परिस्थितीनं आपल्याला कृतज्ञ व्हायला शिकवलं हे निश्चित! 


आता पुढल्या आयुष्यात आपण 'कृतज्ञ' म्हणून वागायचं की 'उद्विग्न' म्हणून वागायचं हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.


कृतज्ञ म्हणून वागण्याने आपला आनंद वाढतो; कारण आपल्याला काय काय मिळालं आहे याचेच विचार आपल्या मनात घोळत असतात.पण उद्वेग धारण करून वागण्याने आपल्या दुःखात भर मात्र पडते.


ह्याचे एक फारच सुंदर उदाहरण म्हणजे गेल्या महिन्यात इटलीमध्ये घडलेली कथा.


साठ वर्षे वयाचा एक रुग्ण बरा होऊन दवाखान्यातून घरी जायला निघतो. दवाखान्याचे बिल बघून तो ओक्साबोक्शी रडायला लागतो. डाॅक्टर मंडळी त्याला धीर देतात आणि त्याचे बिल कमी करण्याची तयारी दाखवितात. पण त्याचे रडण्याचे कारण ऐकल्यावर डाॅक्टरांच्या डोळ्यातही पाणी येते.


तो म्हणतो "मी बिलाची रक्कम पाहून नाही रडलो. माझी आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. पण ह्या बिलामध्ये शेवटच्या रकान्यात एक दिवसाच्या ऑक्सिजनचा आकार जो ५००० युरो लावलेला आहे, ते पाहून माझ्या मनात विचार आला की मी परमेश्वराचे किती देणे लागतो; कारण हा एवढा महागडा प्राणवायू मी गेली साठ वर्षे परमेश्वराकडून विनामूल्य मिळवतोय."


अशी कृतज्ञता असेल तर जीवनात फक्त आनंदच दिसणार आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त 'धन्यवाद' ह्या शब्दाची पारायणं करायची आहेत. अन्य काहीच नाही.

जेवढ्या जास्त वेळा कृतज्ञता व्यक्त कराल तेवढ्या जास्त घटना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घडतच जातील.


कृतज्ञता परमेश्वराप्रति  आणि व्यक्तींप्रतिही!


जे विनामूल्य आहे तेच सर्वात मौल्यवान आहे

झोप, शांतता, आनंद, हवा, पाणी, प्रकाश आणि सर्वात जरूरी आपला श्वास, नेहमी आनंदी रहा 

SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets

GITO - जिटो
G- guarding (protection)
I- innovative products
T- technology
O- organisation

committed to give you more advanced service & products

regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102
#GITO

शनिवार, ११ मार्च, २०२३

टीव्हीवर एक सीआयडी ही मालिका पाहिली असेल त्यामध्ये डॉक्टर साळुंखे ना फॉरेन्सिक तज्ञ म्हणून दाखवले आहे. ते केसेस सॉल्व करायला मदत करतात . वेगवेगळे EVIDENCE गोळा करतात

 आपण सगळेजण आत्ता एकविसाव्या जगात राहतो,  जगतो आपली लाइफस्टाइल सुद्धा खूप बदललेली आहे.  आता आपल्याला लाईफस्टाईल मध्ये आपण नवीन मोबाईल तसेच न्यू एप्लीकेशनसॉफ्टवेअर वापरतोत्यामधून आपणाला खूप आनंद मिळतो, पण त्यामधूनच आपण खूप सारे क्राईम करत असतो  होत असतात.  त्या क्राईम मध्ये आपल्याकडे एव्हिडन्स सुद्धा खूप असतात. ते एव्हिडन्स आपणाला वाचवू शकत असतात. आपणाला ते क्राईम केलं नाही हे समजावून सांगण्यासाठी उपयोगी असतात, पण ते एव्हिडन्स आपणाला कोर्टासमोर तसेच पोलिसांच्या समोर मांडता येत नाहीत. ते मांडण्यासाठी किंवा ते PROOF करण्यासाठी आपणाला तज्ञांची मदत घ्यावी लागते.



आपण आपण सगळेजण टीव्हीवर एक सीआयडी ही मालिका पाहिली असेल त्यामध्ये डॉक्टर साळुंखे ना फॉरेन्सिक तज्ञ म्हणून दाखवले आहे. ते केसेस सॉल्व करायला मदत करतात.

 तर आपण आज फॉरेन्सिक म्हणजे काय आणि फॉरेन्सिक चा शोध कसा लागला  ते क्राईम मध्ये हे SOLVE करायला कसे मदत करतात ते पाहूया.


फॉरेन्सिक हा शब्द लॅटिन आहे फॉरेन्सिक म्हणजे “कोर्ट ऑफ जस्टिस” OR “पब्लिक डिस्कशन” हा अर्थ होतो.

फॉरेन्सिक सायन्स सुरुवातीला CHINA सारख्या COUNTRY मध्ये वापरली त्यानंतर बाकीच्या COUNTRY वापरू लागले. सुरुवातीला SIR ARUTHOUR CONON DOYLE या व्यक्ती SHERLOK HOMES या इन्वेस्टीगेशन ऑफिसर च्या गोष्टी लिहायचे व ते प्रसिद्ध व्हायचे. ही एक काल्पनिक कथा होती व आहे त्यावर मूवी सुद्धा आलेले पण ह्याच एका गोष्टीमुळे फॉरेन्सिकचा शोध लागला.  ह्यामध्ये ते समजावून सांगायचे की क्राइम सॉल करायला SHERLOK HOMES कस कसे वेगवेगळे फॉरेन्सिक मेथड वापरायचा व तो एकच कसे इन्वेस्टीगेशन करून ही केस सॉल, हे सॉल करायला फॉरेन्सिक सायन्स मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट सुद्धा आहेत. ते वेगवेगळे डिपार्टमेंट आपले रिपोर्ट बनवत असतात त्यामध्ये ते वेगवेगळे सायंटिफिक मेथड, सायंटिफिक OBSERVATION मांडत असतात.


वर्ल्ड वर एक पासून क्रिमिनल इन्वेस्टीगेशन करायला फॉरेन्सिकचा वापर करायचे. त्यानंतर 1923 ला यूएसए मध्ये लॉस एंजलिस पोलीस डिपार्टमेंट त्यानंतर 1932 मध्ये एफबीआय यांनी नॅशनल फॉरेन्सिक LAB चालू केली. आता युनायटेड स्टेट कडे त्यांचे स्वतःचे अडीचशे फॉरेनची LAB आहे.


भारतामध्ये इंग्रजांनी फॉरेन्सिक सुरुवात केली मद्रास मध्ये पहिली फिंगरप्रिंट ब्युरो त्यांनी 1897 ला कोलकत्ता मध्ये चालू केली. त्यानंतर 1910 वेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिंगरप्रिंट बिरो चालू झाल्या. 1906 ला गव्हर्मेंट ने स्थापन केली गव्हर्मेंट एक्झामिनेशन QUESTION DOCUMENT.  इन शिमला त्यानंतर 1910 ला कोलकत्ता मध्ये केमिकल एक्झामिनेशन लॅब ओपन केली स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूल ओपन केले ट्रेनिंग सेंटर चालू केल्या.


विसाव्या दशकामध्ये स्टेट सीआयडी चालू केली त्यामध्ये  FINGER PRINT, QUESTION DOCUMENT अँड फोटोग्राफर या सर्विस प्रोव्हायडर केल्या. त्यानंतर आता 21व्या शतकामध्ये प्रत्येक स्टेट ची स्वतःची फॉरेन्सिक LAB तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची रिजनल फॉरेनची चालू केलेले आहे त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट सुद्धा आहेत वेगवेगळ्या डिपारमेंट आपणाला केस कॉल करायला मदत करतात

एखाद्या ठिकाणी खून झाला असेल तर फॉरेन्सिक सायंटिस्ट त्या गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन तेथील वेगवेगळे EVIDENCE गोळा करतात म्हणजे तेथील रक्त गोळा करणे, हाताचे ठसे गोळा करणे, तेथील कागदपत्रे मिळालेले गोळा करणे, तेथे आजूबाजूला असलेले फिजिकली ,केमिकली EVIDENCE गोळा करणे, तसेच इलेक्ट्रिकल उपकरणे म्हणजे लॅपटॉप ,कम्प्युटर, पेन ड्राईव्ह, इत्यादी हे सगळे एव्हिडन्स किंवा गुन्ह्यामुळे तसेच वापरण्यात आलेले हत्यार, पायाचे ठसे असे सर्व पुरावे ते गोळा करून तेथील जवळच्या फॉरेनची कल्याण ला पाठवतात.

हे EVIDENCE फॉरेन्सिक लॅबला आल्यावर तेथील ऑफिसर ते सर्व पुरावे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला पाठवतात. व तिथून त्याचा रिपोर्ट मागून घेतात ते रिपोर्ट बनवत असताना तेथे वेगवेगळे सायंटिफिक मेथड्स, OBSERVATION, सायंटिफिक तसेच केमिकल बायोलॉजिकल टेस्ट केले जातात.


रिपोर्टच्या इन्वेस्टीगेशन ऑफिसरला पाठवले जातात त्यानंतर त्या रिपोर्टवर फॉरेन्सिक चा रिपोर्ट वर पोलीस आपले इन्वेस्टीगेशन चालू करतात आरोपीला पकडतात कोर्टामध्ये हजर करतात आणि तेथे फॉरेन्सिक तज्ञ येऊन आपली मत तेथे मांडतात आणि ते कसे  सॉल करायला  मदत करतात.


त्यानंतर कोर्टाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होते त्यांचे वेगळे स्टेजेस कंप्लेंट होतात त्यानंतर कोर्ट त्या आरोपीला शिक्षा सुनावते त्या व्यक्तीला न्याय मिळवून देते आणि यामध्ये छोटासा पण इम्पॉर्टंट असा रोड फॉरेन्सिक सायंटिस्ट प्ले करतात. आपण हा भाग आपण या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की फॉरेन्सिक म्हणजे काय. फॉरेनची शोध कसा झाला. फॉरेन्सिक कसं कसं वाढत गेलं आपल्या इंडियामध्ये त्याची कशी सुरुवात झाली. आता पुढल्या भागांमध्ये फॉरेन्सिकचे वेगवेगळे डिपार्टमेंट पाहूया.

धन्यवाद.

COMPUTER PLANET  Computer Planet Shop No. 1, Shaniwar Peth 53 Amruteshwar Co Operative Housing Society, near Shaniwar Wada, Shaniwar Peth, Pune, Maharashtra 411030.. Satful sonawane 098223 58631, 095038 52341 

 https://maps.app.goo.gl/cMFECCRASkzSpk179 

 https://www.securityplanet.co 

 SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets, computer , laptop GITO - जिटो G- guarding (protection) I- innovative products T- technology O- organisation committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102 #GITO



बुधवार, ८ मार्च, २०२३

यशस्विनी रेखा सत्फुल सोनवणे,

 आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू

झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…



Happy Women’s Day!!

आज आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे औचित्य साधून, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रांत जाऊन , विविध महिला उद्योजकांसोबत चर्चा करून, त्यांचे अनुभव जवळून अनुभवून त्यावर लिहिलेल्या जवळपास २५ यशस्वी स्त्री उद्योजकांवरच्या 'यशस्विनी' या नितांतसुंदर पुस्तकाचं प्रकाशन होतंय आज पुण्यात. 8 th March 2023 at Lemon Tree, Pune Station, Pune येथे होत आहे
On the occasion of International women’s Day, ‘Yashaswini’ a Book launch of 25 Sucessful women entrepreneurs wrote by Ms Seema Kamble.
या पुस्तकामध्ये रेखा सत्फुल सोनवणे, यांच्या व्यवसायाच्या वाटचालीबद्दल यांच्या बद्दल थोडी माहिती सांगितली आहे
कम्प्युटर प्लॅनेट रेखा सोनवणे
यशस्विनी
कम्प्युटर प्लॅनेट, रेखा सोनवणे गेल्या काही वर्षात टीव्हीवर अनेक शोधकथांवर गुन्हेगारी शोधांवर आधारित मालिका पाहिल्या कोणत्यातरी गुप्त कॅमेऱ्यामुळे रहस्याची उकल होते हे पाहताना खूप गंमत वाटायची नंतर सोसायटीत दुकानांमध्ये सार्वजनिक ठिकाणी हे कॅमेरे बसवले जातात इतपत काय तो आपला संबंध पण आपल्यासारख्या साधारण दिसणारी बाई मात्र हे कॅमेरे हाताळते नवे त्याचा व्यवसाय करते हे समजल्यावर फार विलक्षण वाटते या अशा आगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारी उद्योजिका म्हणजेच रेखा सतफुल सोनवणे रेखा पुण्यातच लहानाची मोठी झाली कोरेगाव पार्क भागातील अगदी सामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला तिचे वडील रिक्षाचालक तर आई गृहिणी महानगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ती आगरकर हायस्कूल मध्ये गेली वाडिया कॉलेजमधून तिने आपले कला शाखेतील पदवीधर पदवीचे शिक्षण पूर्ण केले घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे घरी शिक्षण घेऊन तिने आपले कॉलेज शिक्षण पूर्ण केले घरची पालकांची परिस्थिती मुलीने
लवकर मोठा बनण्यास जबाबदार होण्यास भाग पाडते रेखाला लहान वयात परिस्थितीचं भान आलं होतं म्हणून तिने हातात पदवी येतात दहाड इन्स्टिट्यूट मध्ये काम करण्यास सुरुवात केली मुलीचे लग्न झाले
की पालकांना मोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखे वाटते ते गरीब असतील तर हे फार गरजेची बाब ठरते रेखाने आई-वडिलांची त्याला अपवाद नव्हते त्यांनी आपल्या मुलीचे लग्न लवकरात लवकर करून देण्याची घाई झाली होती एम ए झालेल्या रेखाचे सत्फुल सोनवणे या उमद्या तरुणांशी लग्न झाले
रेखाच्या सासरी व्यवसायाचे वातावरण होते सतफुल संगणक दुरुस्ती आणि त्यासंबंधीचे कामे करत होते पण त्यांना त्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करायचं पाहिजे असं मनापासून वाटत होते रेखाला ही आपण काही व्यवसायात पाहिजे असं वाटत होते दोघेही अशा संधीच्या शोधात होते एका आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रदर्शन चालू होते सोनवणे संगणकाचे वेगवेगळे सुट्टे भाग आणण्यास वरचेवर मुंबईला जात असत रेखा आणि सत्फुल दोघेही ते प्रदर्शन बघण्यासाठी जात असे तिथे अनेक वेगवेगळ्या गोष्टी बघून ते हरवून गेले होते एका स्टॉलवर एक व्यक्ती विविध वस्तू विकत होता त्यात पेन होतं पेनामध्ये कॅमेरा होता त्या व्यक्तीकडून एक पेन विकत घेतला अत्यंत वशिष्ठ पूर्ण असे त्या पेनामध्ये कॅमेरा बसवला होता दोघांनीही काहीतरी वेगळं गवसल्याने वाटत होतं सुरुवातीला एक पेन घेतला आणि अशा अनेक पेन पुण्यात विकण्यास सुरुवात केली. हळूहळू जाहिरात करून पेन अशा वेगवेगळ्या वस्तू आणायच्या विकायचा सपाटाच त्यांनी लावला या गुप्त कॅमेरा चे काम कसे चालते याची गरज ओळखून याची गरज कोणाला आहे दुरुस्ती करता येते का इत्यादी गोष्टीचे प्रशिक्षण घेतले व कस्टमरच्या गरजेनुसार त्याला त्याच्या वस्तूमध्ये कॅमेरा किंवा ऑडिओ बसून देण्याचा व्यवसाय करू लागले हळूहळू व्यवसायाची माहिती घेऊन दोघांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली GITO जितो नावाचा स्वतःचा ब्रँड प्रस्थापित स्थापित केला
या व्यवसायात वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात यामध्ये स्पाय कॅमेरा कस्टमाईजर कॅमेरा, सेल्फ डिफेन्स डिवाइस सेफ्टी स्प्रे, स्टंट गन बुलेटप्रूफ जॅकेट जीपीएस ट्रॅकर, व्हॉइस रेकॉर्डर व कॉर्पोरेट गिफ्टिंग अशा विविध प्रोडक्टची माहिती करून त्या वस्तूचे सुट्टे भाग जोडून देण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले यातील बऱ्याच वस्तूचे सुट्टे भाग आयात करून त्याची जुळणी असेंबल केली जाते
गुन्हा उकल करण्यासाठी सीआयडी , पोलीस , सर्वसामान्य व्यक्ती यांनाही याची गरज लागते रेल्वेमध्ये सुरक्षेसाठी तसेच शासकीय लोकांसाठी , नॉर्मल लोकांसाठी ऑफिस साठी घरासाठी कामगारावर लक्ष ठेवण्यासाठी या वस्तूचा उपयोग केला जातो
शासकीय निवेदिता प्रक्रियेत लक्ष ठेवण्यासाठी याची गरज असते सुरुवातीला त्यांनी साऱ्या वस्तूचे तांत्रिक ज्ञान प्राप्त करून घेतले हळूहळू त्याची विक्री वाढली अनेक ठिकाणी प्रदर्शन मुळे या वस्तूची मागणी वाढली
या सर्व प्रवासात सतफुल यांच्याबरोबर रेखा ही व्यवसायात लक्ष देत होती ती सुद्धा स्पाय कॅमेऱ्याच्या सर्व उत्पादनाचे प्रोडक्सचे तांत्रिक शिक्षण प्रशिक्षण घेत होती हळूहळू ती सुद्धा वस्तूची जुळणी करायला शिकली स्वतंत्र पणे व्यवहार करू लागली ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या तऱ्हेने प्रोडक्टची जुळणी करायला शिकली एखांदी वस्तू आणली तर ती रेखा ती वस्तू पूर्णपणे उघडून तिचे सर्व सुट्टे करून बघत असे कारण जर एखादी वस्तू आपल्याकडे दुरुस्तीला आली तर तिची माहिती आपल्याला असली पाहिजे असा तिचा विचार रेखा स्वतंत्रपणे काम करू लागली ग्राहकांशी बोलणे त्यातून त्यांची नेमकी गरज समजून घेणे हे करताना त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांच्यासाठी काय योग्य राहील याचे मार्गदर्शन करू लागली
त्यांच्या प्रोडक साठी काय लागणार आहे त्यासाठी किती खर्च येईल अशा अगदी बारीक सारीक पण अतिशय महत्त्वाच्या बाबी ती ग्राहकांशी चर्चा करून सांगू लागली रेखा कडे उत्पन्नाचे फक्त पुण्यात किंवा महाराष्ट्रात विकले जात नाही तर महाराष्ट्र बाहेरही त्याची मागणी आहे व काही काही वेळेस ते प्रॉडक्ट बाहेरच्या देशात सुद्धा गेले आहेत राजस्थानमध्ये काही उत्पन्न अँटीकरप्शनला विकली गेली उडमपूर मध्ये
भारतीय सैनिकांना एक विशेष प्रकारचे उपकरण बनवून हवे होते ते रेखाने एका दगडामध्ये कॅमेरा असेंबल बनवून करून दिला हे उत्पादन देशाच्या सुरक्षेसाठी वापरले गेले याचा रेखाना प्रचंड अभिमान आणि आनंद वाटतो जवळपास बरेच उत्पादनाची ऑर्डर त्यांनी पूर्ण केली आपलं तांत्रिक ज्ञान अद्यावत करण्यासाठी रेखा आणि बाहेरच्या देशात प्रदर्शनासाठी भेट देत असतात
ते आत्तापर्यंत दुबई ,चीन, हॉंगकॉंग , तैवान या देशांमध्ये कामानिमित्त प्रवास करत असतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गुप्त कॅमेऱ्याची नवीन शोध नवीन तंत्रज्ञान विकसित होतं त्याची माहिती ते सतत घेतात सुरुवातीला तांत्रिक कारागिरावरती अवलंबून राहिल्यामुळे काही ऑर्डर्स गमवाव्या लागल्या फसगत ही झाली त्यातून स्वतःचे स्वतःला कायम अपडेट ठेवण्याचे व शिकत राहण्याचे धडा त्यांनी घेतला रेखाकडे अनेक ग्राहकांचे किस्से आहेत वेगवेगळ्या कारणासाठी त्यांचा कॅमेऱ्यांचा उपयोग केला जातो
एकदा एका गृहस्थाने पोलिसात तक्रार केली की त्यांची पत्नी त्यांना मारहाण करते छळ करते परंतु कोणताही पुरावा नसल्यामुळे त्यांना ते सिद्ध करता येत नव्हते त्या गृहस्थांना त्यांच्या घरात एक छोटासा हिडन कॅमेरा बनवुन दिल्यामुळे त्या गृहस्थाची पत्नीकडून होणारा छळ त्या कॅमेरात बंदिस्त झाला पुरावा सादर असल्याने गृहस्थाला न्याय मिळाला
दुसरा एक प्रसंग रेखाने सांगितला असा एक शाळकरी मुलीला अतिशय वाईट प्रसंगाला समोर जावे लागत होते तिचे शिक्षक काही गैरवर्तन करत होते मुलीच्या दप्तरात कॅमेरा बसवल्यामुळे या गोष्टीचा उकल झाली व पुरावा मिळाला अशा वेळी कामाचे चीज झाले असे वाटते
उदमपूर मधून भारतीय सैन्याची ऑर्डर पूर्ण केल्याचं समाधान रेखाला वाटते
याबरोबर रेखा कॉर्पेटिंग कॉर्पोरेट गिफ्टिंगचे काम करून देते कॉर्पोरेट गिफ्टिंगला लागणाऱ्या वस्तू ते देतात उदाहरणार्थ गुलाब वर फोटो प्रिंट करणे लोगो प्रिंट करणे कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असेल तर अशी ऑर्डर येते त्यासाठी तिने मशीन विकत घेतली नाही कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी वेगळे उत्पादन रेखा उपलब्ध करून देते कस्टमाईज कॉर्पोरेटिंग गिफ्टिंग साठी अनेक जसे पेन ड्राईव्ह ,पॉवर बँक इलेक्ट्रॉनिक वस्तू ते देतात
असे अनेक अडथळ्यांवर मात करावी लागली जिद्दीने तिने ते मशीन आणून स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू केला रेखाचा स्वभाव अतिशय शांत आहे शिकण्याची वृत्ती असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं तांत्रिक ज्ञान नसतानाही ती शिकत गेली रेखा अजून व्यवसायात बारकावे शिकत आहे या व्यवसायामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक बदल झाले
मार्केटिंग कौशल्य शिकता आले हळूहळू व्यवसायात लागणारी निर्णय क्षमता आत्मसात केली व्यवसायाच्या निर्णयामध्ये तिच्या तिचा बरोबरचा वाटा आहे तिने अनेक गव्हर्मेंट ची ऑर्डर सुद्धा कम्प्लीट केले आहेत त्यांनी रेल्वेसाठी, टाटा ,साठी सीआयडी साठी वकिलांसाठी ,पोलीस ,सैन्य , भारत फोर्स फिनोलेक्स, शॉप ,नगरसेवक , सदन कमांड अशा विविध एजन्सी आणि विविध स्तरातील व्यक्तींना त्यांना रेखाने कंपनीने सेवा व प्रोडक्ट पुरवले आहेत
आपल्या उत्पादनाचा डेमो प्रत्यक्ष दाखवण्यासाठी रेखा स्वतः त्या ठिकाणी जाते अजय बायोटेक , रुबी हॉल, ससून हॉस्पिटल , शाळा कॉलेज ,हॉस्पिटल अशांसाठीही त्यांनी प्रॉडक्ट व सर्विस दिली आहे हे काम रेखा पाहते रेखा स्वतः हिडन स्पाय गुप्त कॅमेरा आणि वेगवेगळ्या वस्तू लपवणे
व काही ठिकाणी जर कॅमेरे लावले असतील तर शोधण्यासाठीही ते काम करतात त्याला डी बघिंग असे म्हणतात म्हणजे जर तुमची महत्त्वाची काही इन्फॉर्मेशन लीक होत असेल असे तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी ऑडिओ किंवा व्हिडिओ लावला जातो नकळत हे शोधण्याचे काम ही ते करतात
काही सेफ्टी प्रॉडक्ट म्हणजे पेपर स्प्रे स्तन गन हे ज्वेलरी वाले व लेडीज यांच्याकडून सेफ्टी साठी त्याची मागणी असते रेल्वेच्या निवेदिता प्रक्रियेसाठी रेखाने काम केले निविद्यतासाठी डिजिटल की बनण्यापासून दस्तावेज बनवण्यापर्यंत सर्व कामे रेखाने करते
रेखाच्या या व्यवसायात सध्या स्पर्धा वाढली आहे परंतु रेखा आपल्या व्यवसायात कायमस्वरूपी काही पथ्य पाळी आहेत ती कोणतेही काम सचटीने करते आपल्या उत्पादनाचा वापर चुकीच्या कामासाठी होणार नाही याची ती पूर्ण खबरदारी घेते त्यासाठी आयडी प्रूफ व इतर गोष्टींची काळजी घेतली जाते एवढे करूनही कदाचित एखाद्या व्यक्तीने त्याचा गैर वापर केल्यास त्रास सहन करावा लागतो पोलीस यंत्रणे कडून तपासणीसाठी बोलवले जाते असा अगदी वेगळा व्यवसाय करत असताना रेखाच्या घरच्या जबाबदारी नीटकेपणाने नीटनेटकेपणाने पार पाडते घरी सासू-सासरे आहेत त्यांची काळजी घेते तिचा बारा वर्षाचा मुलगा पारस याच्या शिक्षणाकडेही तिचे पूर्ण लक्ष आहे तो लहान असताना तर त्याला सोबत घेऊन तिला कामाला जावे लागायचे रेखा अनेक गोष्टी लक्षपूर्वक आणि जिद्दीने करत राहिली याची तिच्या कुटुंबियांना कौतुक आहे
ती स्पर्धेला घाबरत नाही कस्टमर कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये रस असल्यामुळे त्यातून अजून प्रगत प्रशिक्षण घेण्याची तिला इच्छा आहे तिला शॉपिंग खूप आवडते , आपल्याजवळ बीएमडब्ल्यू किंवा ऑडी सारखी गाडी असावी अशी तिची इच्छा आहे.
स्पाय कॅमेरा आणि कॉर्पोरेट गिफ्टिंग गिफ्टिंग च्या क्षेत्रात आपलं मोठं नाव व्हावं आणि आपली कंपनी भारतातच नव्हे तर जगात एक नंबर एकची कंपनी व्हावी असे तिचे स्वप्न आहे या प्रकारची धडपड ती सतत करते ती पाहता तिचं एक स्वप्न एक दिवस नक्की सत्यात उतरेल त्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा
लेखिका सीमा मिलिंद कांबळे ( डिक्की वूमन विंग )
त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व आभार
"ती आहे म्हणून सारे विश्र्व आहे
ती आहे म्हणून सारे घर आहे
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत
ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे"
महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा"
कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजता येते.
बी. आर. आंबेडकर

गुरुवार, २ मार्च, २०२३

Best Spy camera, CCTV camera & Hidden camera store in Pune, Maharashtra | Computer Planet | 7057573102

 

Best Spy camera, CCTV camera & Hidden camera store in Pune, Maharashtra | Computer Planet | 7057573102




Wiki Article

CCTV cameras have been common in business and residential settings for a while now. They can be used to monitor areas for safety or to keep an eye on a property. But what if you want to spy on someone? If you're looking for a good spy camera, here are some of the best options.

What are the benefits of a spy camera?
Some people may use spy cameras for personal safety or as part of their business. Spy cameras offer a number of benefits that can make them useful, including:
-The ability to monitor your surroundings discreetly.
-The ability to capture footage of events or activities that you are not able to witness firsthand.
-The ability to keep track of activity in certain areas that might be dangerous or sensitive.

”

What are the benefits of a CCTV camera?
CCTV camera has become a must-have for businesses and homeowners alike because of their many benefits. Here are just a few:
01. Security: A CCTV camera offers an effective way to monitor your property and keep tabs on who is coming and going. If there’s ever a problem, you can quickly identify who was involved and take appropriate action.
02. Compliance: Surveillance cameras are often required by law in places like schools and hospitals, so having one installed can help ensure compliance with regulations.
03. Data capture: With video footage captured continuously, you can use the footage to generate reports and studies that will help you track trends and make better decisions.
04. Increased customer satisfaction: Having surveillance footage of your business can boost customer confidence, making them more likely to return in the future. Plus, if there are any problems, customers can quickly find out about them and take corrective action.

What are the benefits of a Hidden camera?
There are many benefits to using a Hidden camera, the most obvious being the fact that it is not obvious that someone is filming. This can be useful in a number of situations, such as if you want to film an embarrassing moment without your partner or family knowing, it or if you want to film a crime in progress without being seen. Hidden cameras are also useful for taking pictures and recording videos without anyone knowing.

What are the best spy camera and CCTV camera brands?
There are many different brands of spy cameras and CCTV cameras on the market, so it can be hard to decide which one is the best for you. Here are some of the best spy camera and CCTV camera brands.
01. Panasonic
Panasonic is a well-known brand for spy cameras and CCTV cameras. They make quality products that are known for their reliability. Panasonic spy cameras and CCTV cameras are often recommended by experts as the best on the market.
02. Sony
Sony is another well-known brand for spy cameras and CCTV cameras. They make quality products that are known for their picture quality. Sony spy cameras and CCTV cameras are often recommended by experts as the best on the market.
03. Nikon
Nikon is a well-known brand for spy cameras and CCTV cameras. They make quality products that are known for their durability. Nikon spy cameras and CCTV cameras are often recommended by experts as the best on the market.

What are the best features of a spy camera, CCTV camera & Hidden camera?
Choosing the right Spy camera or CCTV camera can be a daunting task. There are so many to choose from and each has its own unique features that make it the perfect choice for a particular situation. Here are some of the best features to look for when choosing a spy camera or CCTV camera:
-Photo and video quality: Spy cameras and CCTV cameras both produce high-quality photos and videos, so you need to make sure that the model you choose can handle the resolution of your photos and videos.
-File size: With spy cameras and CCTV cameras, you'll want to make sure that the file size is small enough to upload quickly but large enough to keep your evidence safe.
-Remote access: You'll want a spy camera or CCTV camera with a remote access feature so you can view footage from any location without having to be there in person. This is especially helpful if you need to monitor a certain area at night or during a busy time period.
-Alerts: Make sure that the spy camera or CCTV camera you choose has alerts so you're alerted when footage is captured. This will help you avoid missing any important moments.

What are the best prices for spy cameras, CCTV cameras & Hidden cameras?
There are many different types of spy cameras and CCTV cameras on the market. It can be tough to decide which one is the best for your needs. To start, it's important to think about what you want the camera for. If you're just looking to keep an eye on your property, a basic security camera may be enough. On the other hand, if you're investigating a crime or want to document public events, you'll need something more advanced.
Once you've determined what kind of camera you need, it's time to look at the various prices and features available. Some basic security cameras only have a night vision mode and don't have many other features, while more expensive models may have click here GPS tracking, motion detection, and Wi-Fi capabilities.
It's also important to consider your budget and what kind of warranty the camera has. Some models offer a lifetime warranty while others only have a one-year warranty.

Difference Between a spy camera, a CCTV camera & Hidden camera?
A spy camera is a small, inconspicuous device that can be used to capture images or videos of people or activities without their knowledge. Contrastingly, a CCTV camera is a large, publicly visible security camera used to monitor areas and events.
The main difference between spy cameras and CCTV cameras is their purpose. Spy cameras are designed to capture personal information or unnoticed activity, while CCTV cameras are typically used for security purposes. Another key difference is the size and shape of the cameras: spy cameras are usually smaller and more discreet than CCTV cameras.
Both types of cameras have their pros and cons. Spy cameras can be a useful tool for spying on someone without them knowing, while CCTV cameras can be helpful for monitoring public areas. It's important to consider the specific needs of each situation before choosing a camera type.

Conclusion
As the world becomes more and more digitalized, it is important to have a spy camera or CCTV camera in your home to keep an eye on your property and loved ones. Not only can these cameras help you monitor what's happening inside and outside of your house, but they can also be used as evidence in case of theft or other crimes. If you're looking for a quality spy camera or CCTV camera that won't break the bank, be sure to check out our selection!

Contact us-
Computer Planet
near, Shop No. 1, Shaniwar Peth 53 Amruteshwar Co-Operative Housing Society, Shaniwar Wada, Shaniwar Peth, Pune, Maharashtra 411030
Call-7057573102
http://www.securityplanet.co/

रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

महार समाजाचा शिवकाळ व पेशवाईतील शूरवीरांचा इतिहास

 


महार समाजाचा  शिवकाळ व पेशवाईतील  शूरवीरांचा इतिहास


1) सातवहान राजवटीत नाव=महारक्ख ते महारक्षक ( महार).

2)मोगलांशी झुंज देवून वैराटगड जिंकणारा= नागनाक  महार नागेवाडी वाई सातारा. छत्रपती राजाराम यांनी दिलेले इनाम= पाटील की  नागेवाडी गाव हे वतन म्हणून देण्यात आले.

3)  जीवाजी महाराची कामगिरी= प्रतापगडच्या  सुभान  खान व बेदरच्या अब्दुल शहाचे बंड शमवले. बंगालच्या वाघास पिंजर्‍यात बंद करून आणले(आठ  परगण्याची सरनाईक की)म्हणून बक्षीस दिले.

4) वाल्हे येथील महारांची कामगिरी= श्री  शिवाजी महाराजांची कन्या सखुबाई  एकदा संकट कोसळले असता तिचे रक्षण केले.

5) रायनाक महार= दुसर्‍या बाजीरावाच्या काळात रायगड किल्ल्याचा किल्लेदार (इंग्रजांशी लढताना ठार).

6) सिद्धनाक पहिला= बहमनी राज्याचे सेनापती होते.

7) सिद्धनाक  महाराचा नातू तिसरा (सिदनाक महार उर्फ सिद्धनाक बाजी हा होय)= छत्रपती शिवाजी महाराजांना वाई प्रांतात लष्करी मदत, जावळीच्या चंद्रराव मोरया'च्या पाडव करण्यास मदत.

8) सिद्धनाक 3रा उर्फ सिद्धनाक बाजी=अफजल खानाच्या वधानंतर  प्रताप गडाच्या पायथ्याशी  झालेल्या  लढाईत मोठा पराक्रम दाखवला.

9) तिसऱ्या सिद्धनाक याचा मुलगा  कृष्णनाक महार= वाई प्रांतात मराठा व मोगल लढाईत ठार झाला.

10) पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार= चीव्हे नाईक (महार) रा. ठी.अवसरी ता. पुरंदर जि.पुणे.

11) प्रत्येक किल्ल्यावरील  मेटनाइकी=त्यात महार समाजाचा भरणा जास्त होता.

12) सातारा  किल्ला मेटनाइकी=महादनाक कलद राजनाक  महार यांचेकडे होते.

13) महार  समाजाची लष्करी पथके= हुलस्वार पथक, पायदळ, किल्लेदार मेटनाइकी, अंगरक्षक.

14) शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे भगवे निशान तयार करून देणार, सातारा सदाशिव पेट ढाले पणाचे  वतन देण्यात  आले=महादनाक  सरदार.

15) छत्रपती शाहू यांस सातारच्या गादीवर बसविण्यास मदत= सिद्धनाक महार तिसरा कळम (कळकी)  हे गाव इनाम (वतन) देण्यात आले.

16) सण 1659 साली बाजी  पासलकर यांनी शौर्य गाजवून सिधीचा तालिबानी राजवटीचा पराभव केला त्यांचा अंगरक्षक=खंड्या महार ( अंगरक्षक)

17) वसईच्या रणसंग्राम  महारांची कामगिरी 

(युद्धाचे सामान पाण्यातून युद्धाचे ठिकाणी   पोहोचवण्याचे अवघड काम केले)= तुकनाक महार याने मांडवी कडील मोर्चा संभाळून टक्कर दिली त्यावेळी त्याचा गौरव करण्यात आला, सोन्याचे कडे बक्षीस देण्यात आले.

18) खरड्याची लढाई  व सिद्धनाक महार चौथा (शेवटचा) सरदार-परशुरामभाऊ पटवर्धन यांचे प्राण वाचविले =मराठे व निजाम 11मार्च 1715 रोजी आपल्या पथकासह लढाईत शौर्य दाखवले यात निजामचा पराभव झाला.

19) रायप्पा महार= लाखोंच्या फौजेत घुसून

शंभूराजांना  वाचवण्याचा प्रयत्न रायप्पा महार यांनी केला व स्वतःचे बलिदान दिले.

20)   धोंडनाक  सरदार=(कोंडाणा किल्ल्यावरील 'महार' वीरांची कर्तबगारी)=  मुघलांच्या ताब्यातील कोंडाणा किल्ला सण 6 फेब्रुवारी 1670  घनघोर लढाईत सहभाग.

21) मिरज जवळील कळंबीचे सिद्धनाक सरदार=  सण 1761 साली तिसऱ्या पानिपतच्या लढाईत होते आणि  त्यांना  शुरवीर मरण आले( मिरज इतिहास संशोधन मंडळ) (इतिहासकार - मानसिंग कुमठेकर सांगली) व  हुलस्वार पथकासह सहभागी झाले होते.

22) विठू (महार)=  आदिलशहाच्या कैदेत असलेले दामाजी पंत यांची सुटका  करून त्याच्या मोबदल्यात सोन्याच्या मोहरा  विठू महार यांनी दिल्या.

23) मदारी  मेहत्तर= औरंगजेबाच्या कैदेतून  छत्रपती शिवाजी  महाराज यांना सोडवण्यासाठी मदत केली  व आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

24)गोविंद गोपाळ महार= वडू बुदृक भिमा  कोरेगाव  येथे संभाजी महाराजांची समाधी  बांधण्यास जागा दिली व महार  वाड्यात छत्रपती शाहू महाराज यांनी समाधीस बांधल्या बद्दल  त्यांना सनद देऊन जमीन ईनाम म्हणून  देण्यात आली.

25)नागनाक सरदार=  मुघलांच्या ताब्यात असलेला वैराटगड जिंकून  स्वराज्यात सामील केला.  छत्रपती राजाराम यांनी  वैराट गड जिंकून दिल्याबद्दल नागनाक यास नागेवाडी हे गाव इनाम म्हणून देण्यात आले व पाटील की  बक्षीस देण्यात आली.

[लेखक= डॉ. अनिल कटारे, संजय सोनवणी, सर चिंतामण मोरे, डॉ. कैलास फुलमाळी, डॉक्टर कृष्णकांत क. डोंगरे, डॉ. पी.ए.  गवळी, चांगदेव भ. खैरमोडे,प्रो.  विलास खरात,विश्वास पाटील ( पानिपत कार).]

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

पूर्वीच्या काळी मुंबई पुणे प्रवासासाठी १८ तास लागायचे धोंडी महार

धोंडी महार


अठराव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात "थिओडोर कुक" या बोरघाटात ग्रेट इंडीयन पेनिनसूला रेल्वेसाठी काम करणाऱ्या ब्रिटीश अभियंत्याने धोंडी महार या त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगाराच्या मदतीने खंडाळा घाटातील वनस्पतींच्या नोंदी करून सखोल अभ्यास केला आणि "फ्लोरा ऑफ दि प्रेसिडेंन्सी ऑफ बाॅम्बे" हा वनस्पती शास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ त्याने त्यावेळी  त्याच "धोंडी महार" या व्यक्तीस सादर अर्पण केला होता त्याची गोष्ट.....



मुंबईत रेल्वे आली होती. पण पुण्यात येण्यासाठी रेल्वेमार्ग नव्हता त्या काळतली ही गोष्ट. पूर्वीच्या काळी मुंबई पुणे प्रवासासाठी १८ तास लागायचे. इतक्या कमी वेळात पुण्यातून मुंबईस जाता येतं म्हणून लोक खूषीत असायचे.


तो प्रवास कसा असायचा, तर पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की, सगळ्या लोकांना खाली उतरवून तिथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यात बसवून सर्वांना घाटाखाली खोपोलीत आणले जायचे. ठाकर आणि कातकरी लोकांच्याकडे सामान वहाण्याचे काम होते. लोकांना अशा प्रकारे खंडाळ्यातून खोपोलीस घेवून जाण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटची या पारशी व्यापाऱ्याकडे होते. हा प्रवास अठरा तासात पूर्ण व्हायचा आणि इतक्या कमी वेळात पुणे-मुंबई प्रवास होतो म्हणून लोक खूष असायचे.


याच काळात कर्जत पळसदरी वरून बोरघाट खोदण्याचे काम चालू होते. इंग्रज अभियंता असलेला थिओडोर कुक यांच्या मार्गदर्शनाखाली बोरघाटात रेल्वे लाईन टाकण्याचे व बोगदे खोदण्याचे काम सुरू होते.


आजही घाट पाहिल्या नंतर जाणवते की, त्याकाळात पुरेशा सोईसुविधा नसताना देखील हे काम कसे केले असेल. या कामासाठी लाखांहून अधिक कामगार दिवसरात्र खपत होते. कोणतीही यांत्रीक अवजारं नसल्याने मजुरांकरवी साधी घमेली, फावडे व लोखंडी पहारी अशी जुजबी हत्यारं वापरून हे काम चालायचे. सहाजिक त्यामुळे दररोज शेकडो अपघात होतं असत. 


दिवसाला याची गणती कशी होती तर दर दिवशी १०० एक अपघात व्हायचे. त्यामध्ये कित्येकांची हाडे तुटायची, कुणाच्या पायावर भल्लामोठ्ठा दगड पडायचा. खरचटण्या पासून जीवजाण्या अपघाता पर्यन्तच्या जखमा व्हायच्या. इतक्या मोठ्या कामगारांसाठी वैद्यकिय सेवा उभारणे ही त्यावेळी अशक्य कोटीतली गोष्ट होती. नाही म्हणायला आठ दहा डॉक्टर प्राथमिक उपचार करण्यासाठी तळ ठोकून असल्याच्या नोंदी मिळतात, मात्र लाखोंच्या संख्येने असणाऱ्या कामगारांवर उपचार करण्यासाठी असणारी डॉक्टरांची संख्या असून नसल्या सारखी होती.


अशा वेळी लाखभर लोकांसाठी उपचार असायचा तो धोंडी नावाच्या व्यक्तीचा. धोंडी इथेच मजूर म्हणून काम करीत होता पण त्याला वनस्पतीशास्त्राची चांगली  माहीती व जाणीव होती. कुणाचा पाय मुरगळला किंवा मोठमोठ्या जखमा झाल्या तर मजूर धोंडीकडे जात. तो जंगलातला पाला तोडून आणत आणि त्यावर  तात्काळ उपचार करीत असे. पिचलेली हाडे तो वनस्पतींचा लेप लावून ठिक करत असे. आपल्या डॉक्टरांकडून उपचार होत नाहीत पण इथे असणाऱ्या या धोंडी महार या व्यक्तीकडून कसे पटकन उपचार होतात, जखमा बऱ्या होतात असा प्रश्न मुख्य इंजिनियर असणाऱ्या थिओडोर कुक्स या अधिकाऱ्याला पडत असे.


त्याने धोंडी महार या व्यक्तीला सोबत घेतलं आणि संपूर्ण बोरघाट पालथा घातला. घाटात असणाऱ्या वनस्पतींची इत्यंभूत माहिती, त्यांचे औषधी गुणधर्म नोंद करुन घेतले. वनस्पतींचे नमुने गोळा करून त्यांची हुबेहुब चित्रं काढून घेतली आणि वनस्पतीशास्त्रावर इंत्यभूत माहिती असणारा इंग्रजी ग्रंथ लिहला. या ग्रंथाचे नाव ' फ्लोरा आॅफ दि प्रेसिडेंन्सी ऍट बाॅम्बे". वनस्पतीशास्त्रात हा ग्रंथ आजही आधारभूत गणला जातो.


विशेष म्हणजे कुकने हा ग्रंथ धोंडी महार या व्यक्तींस अर्पण केला. त्याने पुस्तका मध्ये हा ग्रंथ 'धोंडी महार' यास नम्रपणे  अर्पण करत असल्याचे नमुद केले आहे.


संदर्भ : प्रबोधनकार ठाकरे समग्र साहित्य

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M- 9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो.