नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत . आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets GITO committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102 #GITO
शनिवार, २७ जुलै, २०२४
एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या..*जर आपण *'राग'* विकत घेतला, तर आपल्याला *'ॲसिडिटी'* फुकट मिळते
सोमवार, २२ जुलै, २०२४
पालक आपल्या मुलांवर ओझे असू शकतात. मुले त्यांच्यावर कधीच ओझे नसतात.
वडिलांचे अचानक आगमन झाल्याने....
बायकोला राग आल
“म्हाताऱ्याला पैशाची गरज आहे असं दिसतंय, नाहीतर इथे कोण येणार होतं! आमच्या पोटाचा खड्डा भरत नाही, तो तुमच्या घरच्यांच्या पोटात भरणार कुठून?
मी नजर हटवली आणि दुसरीकडे पाहू लागलो.
नळावर हात तोंड धुवून बाप प्रवासाचा थकवा दूर करत होता.
यावेळी माझा हात थोडा घट्ट झाला.
मोठ्या मुलाचा बूट फाटला आहे. शाळेत जाताना तो रोज कुरकुर करतो.
पत्नीच्या उपचारासाठी संपूर्ण औषधे खरेदी करता आली नाहीत.
बाबूजींना ही आता यायचं होतं.
घरात भयाण शांतता पसरली होती.
जेवण झाल्यावर वडिलांनी मला त्यांच्या जवळ बसण्याचा इशारा केला.
मला शंका आली की काहीतरी आर्थिक समस्या आली असावी.
बाबा उठून खुर्चीवर बसले.
पूर्णपणे बेफिकीर
"ऐक
म्हणत त्याने माझे लक्ष त्याच्याकडे वळवले.
श्वास रोखून मी तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो. रोम-रोमा होऊन पुढचं वाक्य ऐकून मी सावध झालो.
ते म्हणाले, “शेतीच्या कामात क्षणभरही मोकळा वेळ मिळत नाही. सध्या कामाचा ताण आहे रात्रीच्या ट्रेनने परत जाणार. तीन महिन्यांपासून तुमचे कोणतेही पत्र आलेले नाही. जेव्हा तुम्ही चिंतेत असता तेव्हा हे करता."
बाबूजी ने खिशातून शंभरची नोट ची बंडल काढली आणि माझ्यापुढे केली,
ठेवा. तुम्हाला उपयोगी पडेल. भाताचे पीक चांगले आले.
घरी काही अडचण नाही.
तू खूप अशक्त दिसत आहेस. व्यवस्थित खा आणि प्या. तुझ्या सुनेची पण काळजी घे."
मला काहीच बोलता येत नव्हते. शब्द माझ्या घशात अडकले होतें.
मी काही बोलायच्या आधीच वडिलांनी मला प्रेमाने रागावले.
"घ्या. तुम्ही मोठे झाले ना आता?
"नाहीतर." मी हात पुढे केला. बाबांनी माझ्या तळहातावर नोटा ठेवल्या.
वर्षापुर्वी माझे वडील मला शाळेत जातांना असे पैसे हातावर देत असत, पण तेव्हा माझे डोळे आजच्यासारखे खाली जात नव्हते.😥😥
मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की
पालक आपल्या मुलांवर ओझे असू शकतात.
मुले त्यांच्यावर कधीच ओझे नसतात.,❤️❤️
~अनामिक
कथाविश्व - नाते संबंध दृढ करायला शिकवणारे आपले कथांचे विश्व🎉
gito 7057573102
रविवार, २१ जुलै, २०२४
म्हातारपण येणे
मंगळवार, २ जुलै, २०२४
शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू
शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू
डोक्यात राग भरल्यावर
फुटणार कसं हसू ?
अहंकार बाळगू नका
भेटा बसा बोला
मेल्यावर रडण्यापेक्षा
जिवंतपणी बोला
नातं आपलं कोणतं आहे
महत्वाचे नाही
प्रश्न आहे कधीतरी
गोड बोलतो का नाही ?
चुका शोधत बसाल तर
सुख मिळणार नाही
चूक काय बरोबर काय
कधीच कळणार नाही
काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू .....ll 1 ll
चल निघ चालता हो
इथे थांबू नको
हात जोडून विनंती आहे
अशी भाषा नको
दारात पाय नको ठेऊ
तोंड नाही पहाणार
खरं सांगा असं वागून
कोण सुखी होणार ?
तू तिकडे आम्ही इकडे
म्हणणं सोपं असतं
पोखरलेलं मन कधीच
सुखी होत नसतं
सुखाचा अभास म्हणजे
खरं सुख नाही
आपलं माणूस आपलं नसणे
दुसरं दुःख नाही
करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू ....ll 2 ll
एकतर्फी प्रेम करून
उपयोग आहे का ?
समोरच्याला आपली आठवण
कधी तरी येते का ?
नातं टिकलं पाहिजे असं
दोघांनाही वाटावं
कधी गायीने कधी वासराने
एकमेकाला चाटावं
तुमची काहीच चूक नाही
असं कसं असेल
पारा शांत झाल्यावरच
सत्य काय ते दिसेल
बघा जरा एकांतात
डोळे मिटून आत
चूक कबूल करतांना
जोडताल दोन्ही हात
अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll
दुसऱ्याला दोष देणं
खूप सोपं असतं
वेळ आल्यावर कळतं की
कुणी कुणाचं नसतं
भेटत नाहीत बोलत नाहीत
गुन्हा तरी काय ?
जे वाटतं ते बोलून
रड धाय धाय
शक्य आहे ताण जाऊन
वाटेल हलकं हलकं
गुळणी धरून बसू नका
व्हा थोडं बोलकं
कोण चूक कोण बरोबर
हिशोब करून टाका
प्रत्येक क्षण जगून घ्या
घालवू नका मोका
त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll
आपली मतं दुसऱ्यावर
मुळीच लादू नका
समोरच्या व्यक्तीचा
अंत बघू नका
कोणताही विषय असो
जास्त नका ताणू
मीच शहाणा बाकी मूर्ख
असे नका मानू
कोण म्हणतं गोड बोलून
प्रश्न सुटत नाही
अनेकदा समजूतदार
माणूस भेटत नाही
जिभेवर साखर ठेवा
होणार नाही वाद
आवडल्यावर मनातून
द्या की हो दाद
तडतड बोलून उगीच मनं नका नासु
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू ....ll 5 ll
बचतच कामी येते
खर्च कमी कर
जरी मोठा झालास तरी
रहा जमिनीवर
विचार करून पाऊल टाका , कुठे नका फसू
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू ....ll 6 ll
ठीक आहे चूक नाही
तरीही जुळतं घ्या
बॉडी डेड होण्या आधीच
आलिंगन द्या
स्मशानभूमीत चांगलं बोलून
काय उपयोग आहे
जिवंतपणी कसे वागलात
जास्त महत्वाचं आहे
माझ्या कवितेत कोणतंही
तत्वज्ञान नाही
तुम्ही खुशाल म्हणू शकता
कवीला भान नाही
ठीक आहे तुमचा आरोप
मान्य आहे मला
माझं म्हणणं एवढंच आहे
वाद नको बोला
काय माहीत उद्या
आपण असू किंवा नसू
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू ll 7 ll
GITO 7057573102
रविवार, ३० जून, २०२४
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..*
जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?
जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?
वाचन तुम्हाला जगातून बाहेर काढते; जेव्हा तुम्ही स्वतःला तुमच्या कामाच्या वातावरणातून काढून टाकता, तेव्हा तुम्हाला अशा गोष्टी दिसू लागतील ज्या तुम्हाला खरोखर करायच्या असतील ज्या तुम्ही अद्याप करत नाही. "वाचनामुळे तुमच्या मनाला भटकण्याची संधी मिळते." निरोगी वाचनाने तुमचे मन निरोगी राहते.
१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.
२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.
३) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.
४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.
८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो.
९) या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.
१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
१२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.
१३) या जगात १% चागली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत.राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात,
हे पण समजते.
१४) प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे समजायला लागते.
१५) हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.
१६) करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे २००/- कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो...
सोमवार, १७ जून, २०२४
टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth Collegeनं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे
टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth Collegeनं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे.. फेडररचं भाषण प्रेरणादायी होतंच. पण उत्कृष्ट भाषण कसं असावं याचा नमुना म्हणून ते इतिहासात अजरामर ठरेल याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसासाठी ते उपयोगी आहे.
आपल्या सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यानं आजच्या भाषेत बोलायचं तर “तीन टेकअवेज” सांगितले आहेत.
१.
Effortless is a myth
एफर्टलेस - एखादी गोष्ट लीलया करणं, ती सहजगत्या अवगत असणं ही केवळ दंतकथा आहे. केवळ एखाद्याकडे टॅलेंट आहे म्हणून त्याला / तिला ते जमतं असं कधीच नसतं. अनेक वर्षांचे परिश्रम त्यामागे असतात. लोक म्हणतात मी लीलया खेळतो. त्यांना माझं कौतुकच करायचं असतं. मात्र “तो किती सहजगत्या खेळतो” हे सारखं ऐकून मी वैतागायचो. खरं तर मला प्रचंड मेहनत करावी लागत होती. मी अनेक वर्षं रडगाणं गायलो, चिडचिड केली, रागानं रॅकेट फेकून दिली आणि मग मी शांत रहायला शिकलो. मी इथपर्यंत केवळ टॅलेंटवर पोचलेलो नाही. माझ्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळापेक्षा चांगला खेळ करण्याचा अविरत प्रयत्न करुन मी इथवर पोचलो.
२.
It's only a point
आपण खेळलेल्या १५२६ सिंगल मॅचेसपैकी फेडरर ८० टक्के मॅचेस जिंकला. मात्र पॉईंटस ५४ टक्केच जिंकला.. म्हणजे सर्वोच्च स्थानावरचे टेनिस खेळाडूदेखील निम्मे पॉईंटस गमावतात.. तेव्हा तुम्ही It's only a point असा विचार करायला स्वत:ला शिकवायला हवं. आयुष्याच्या खेळात सतत आपण असे पॉईंटस गमावत असतो. मात्र तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नकारात्मक गोष्टींवर मात करायला शिकवतो. आत्मविश्वास त्यातूनच वाढतो. तळमळीनं, स्पष्टपणे आणि लक्ष केंद्रित करुन पुढचा गेम खेळायला तुम्ही तयार होता.
उत्तमोत्तम खेळाडू हे त्या स्थानापर्यंत प्रत्येक पॉईंट जिंकल्यानं पोचत नाहीत, तर आपण वारंवार हरणार आहोत आणि त्यावर कशी मात करायची ते सातत्यानं शिकत रहातात म्हणून उत्कृष्टतेपर्यंत पोचतात.
GITO 7057573102 जिटो सत्फुल सोनवणे COMPUTER PLANET कॉम्प्युटर प्लॅनेट ·
३.
‘Life is bigger than the court’
आयुष्य हे टेनिस कोर्टपेक्षा फार मोठं आहे. मी खूप परिश्रम घेतले, खूप शिकलो आणि टेनिस कोर्टाच्या त्या छोट्या मैदानात कित्येक मैल पळलो. मात्र मी पहिल्या पाचांमध्ये असतानाही मला आयुष्य जगण्याचं महत्व कळत होतं. प्रवास, निरनिराळ्या संस्कृतींचा अनुभव, नातीगोती आणि विशेषत:, माझं कुटुंब. मी माझी मुळं कधी सोडली नाहीत, मी कुठून आलो ते मी कधीच विसरलो नाही.
टेनिसप्रमाणेच तुम्ही तुमच्या आयुष्यात एका बाजूला उभे असता. तुमचं यश तुमच्या प्रशिक्षकावर, तुमच्या टीममधल्या सहका-यांवर, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून असतं. तुम्ही घडता ते या टीमवर्कमुळे..!
शुक्रवार, ३१ मे, २०२४
एखादं बाळ रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी Nanni AI हे अँप.
एखादं बाळ रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी पालकांना रात्र रात्र जागावं लागतं. पण त्याहून कठीण असतं: हे समजून घेणं की बाळ नेमकं का रडतंय? पालकांना असं वाटतं की जणू एखादं परदेशी भाषेचं शब्दकोशाशिवाय भाषांतर करण्याचा प्रयत्न करतोय.
चार्ल्स ओनू या मशीन लर्निंग एक्स्पर्ट ने AI च्या मदतीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तयार झालं Nanni AI हे अँप.
नायजेरियामध्ये बाळांच्या रडण्याचा अभ्यास करत असताना, ओनू यांनी एक कल्पना मांडली: बाळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रडण्याचे वेगवेगळे अर्थ असतील का? उदाहरणार्थ, "मला भूक लागली आहे" असं रडणं हे "मला शी आलीये" असं रडण्यापेक्षा वेगळं असेल. हे सिद्ध करण्यासाठी, त्यांनी जगभरातील हॉस्पिटलमधून शक्य तितक्या बाळांच्या रडण्याचे आवाज रेकॉर्ड करायचे ठरवले.
आत्तापर्यंत त्यांनी हजारो रेकॉर्डिंग्स जमा केले आहेत, ज्यासोबत प्रत्येक बाळाच्या अस्वस्थतेचे कारण देखील जमा केले आहे. पुढे, ओनू आणि त्यांच्या सहकाऱ्याने त्या डेटाला एक AI मॉडेलमध्ये फीड केले. परिणामी: पालकांसाठी Nanni AI नावाचे एक अॅप तयार झाले जे बाळाला अस्वस्थ करणारे नेमके कारण ओळखण्यात मदत करू शकते.
हे अँप कसे काम करते ?
पालक काही सेकंदांसाठी त्यांच्या बाळाच्या रडण्याचा आवाज रेकॉर्ड करून अॅपला ऑडिओ विश्लेषण करण्यास सांगू शकतात. Nanni AI त्यानंतर बाळाला शांत करण्यासाठी काही सल्ले देईल. त्यापैकी एक बाळाच्या रडण्याचे कारण असू शकते.
सत्फुल प्रल्हाद सोनवणे
GITO जिटो
मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह
एका वर्षात दहा हजार लोकांना त्यांचा खरा न्याय मिळवून देणे विथ स्ट्रॉंग इव्हिडन्स द्वारे हा माझा ध्यास आहे
Website social media & Product Photo , व्हिडिओ information :- https://linktr.ee/Satful
mission true justice with strong evidence
Mission to help 10000 people get true justice are right with strong evidence https://satful.blogspot.com/
आत्तापर्यंत 150,000 पेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केल्या गेलेल्या या अँपमधील, अल्गोरिदम दिवसेंदिवस अधिक अचूक होत आहे कारण अधिकाधिक पालक त्यांचे रेकॉर्डिंग मॉडेलमध्ये फीड करत आहेत.
Nanni AI इथेच थांबणार नाहीये ?
ओनू यांच्या मते बाळाच्या आदर्श झोपेच्या पद्धतींबद्दल (Sleep Patterns), तसेच काही आरोग्य समस्यांवर देखील Nanni AI सल्ला देऊ शकेल. काही न्यूरोलॉजिकल समस्यांचे रडण्याच्या आवाजातून शोध घेता येतात. ही तर केवळ सुरुवात आहे. यापुढे बाळाच्या रडण्याचा आवाज हा त्यांच्या हृदयाचा दर, रक्तदाब, किंवा तापमानासारखा एक महत्त्वाचा जीवनसूचक ठरेल आणि बालसंगोपन सुधारण्यासाठी महत्वाचे ठरेल," असे त्यांचे म्हणणे आहे.
फोनमधील अँप स्टोअरमध्ये NANNI AI नावाचे अँप उपलब्ध आहे. तुम्ही नवजात बाळाचे पालक असाल तर नक्की पहा. किंवा आपल्या इतर पालक मित्रांना ही पोस्ट पाठवा.
रविवार, २६ मे, २०२४
पाळीव प्राणी आणि त्यांची देखभाल एका वेगळ्याच लेव्हलवर पोचली आहे. पाळीव प्राण्यांनी घरातील सदस्यांचीच जागा घेतली आहे.
ज्यांच्याकडे पैसे खर्च करण्याची क्षमता आहे अशा लोकांसाठी पाळीव प्राणी आणि त्यांची देखभाल एका वेगळ्याच लेव्हलवर पोचली आहे. पाळीव प्राण्यांनी घरातील सदस्यांचीच जागा घेतली आहे.
या बदलत्या ट्रेंड्सवर लक्ष ठेवून असणारे जगभरातील अनेक स्टार्टअप्स काही इंटरेस्टिंग pet care ideas वर काम करत आहेत.
BarkAir हे त्यातील प्रमुख उदाहरण. पाळीव प्राणी पालकांना विशेषतः श्वानपालकाना विमान प्रवास करणे खूपच अवघड ठरते.
या एका दुर्लक्षित पण बऱ्यापैकी मोठ्या मार्केटवर नजर ठेवून BarkAir ही विमानसेवा न्यूयॉर्क मध्ये सुरू झाली आहे. तिकीट बुक झाल्यानंतर लगेचच प्रवासी श्वानबद्दल माहिती घेतली जाते, आवडीनिवडी जाणून घेतल्या जातात. प्रत्येक कुत्र्याच्या शरीर रचनेनुसार त्याच्यासाठी विशिष्ट सीट राखून ठेवली जाते.
विमानातील अंतर्गत रचना खास पाळीव प्राण्यांसाठी डिझाईन केली गेली आहे. विमानात कुत्र्यांना आवडतील असे व्हिडिओ, म्युझिक असते. अधून मधून पाठीवर पोटावर हात फिरवण्यासाठी केअर टेकर असतात…कुत्र्यांना चघळण्यासाठी खास बूट किंवा खेळणी असतात.
असा सगळा “luxury” थाट असतो. अनेक श्वानपालकांनी BarkAir च्या सेवेचा आनंद घेतला आहे.
दुसऱ्या एका स्टार्टअप ने ऑरो नावाचा pet robot बनवला आहे. घरातील सर्व माणसं बाहेर गेलेली असताना बिचारा कुत्र्याला एकट्याला किती बोअर होतं याची ज्या शहानपारकांना काळजी असते त्यांच्यासाठी हा उपाय आहे!
ऑरो हा रोबोट कुत्र्याचा सोबती म्हणून काम करतो. घरभर फिरतो, कुत्र्यासमोर एखादा बॉल किंवा खेळणं टाकून ते आणण्याचा खेळ खेळतो. सगळ्यात भारी म्हणजे ऑरो आपल्या स्क्रीनवर कुत्र्याला त्याच्या मालकाचा फोटो पण मधून मधून दाखवतो. आणि मालकाला देखील त्याच्या कुत्र्याचा live व्हिडिओ दाखवतो.
तिसरं स्टार्टअप आहे *Minitailz . जसं* माणसांसाठी स्मार्ट असतं तसा हा प्राण्यांसाठीचा बँड आहे (कॉलर बँड). तो प्राण्याच्या हृदयाचे ठोके मोजतो. इतर ऍक्टिव्हिटी मोजतो. GPS ट्रॅकर असल्याने आपला प्रिय प्राणी कुठे आहे ते ट्रॅक करता येते. आणि विशिष्ट अंतराच्या बाहेर गेला तर SMS द्वारे पालकाला कळविण्याची पण यात सोय आहे.
२०२४ साल आहे हे….माणसंच नव्हे तर प्राणीही Hi Tech होत आहेत.
पण खरी मजा तर पुढे आहे. इंस्टाग्राम वर चलतीत असलेल्या एका hashtag ची ! #barkitecture (बर्किटेक्चर) म्हणजे खास पाळीव प्राण्यांना सामावून घेणारे आर्किटेक्चर आणि इंटिरिअर डिझाईन !
आपल्या सोबत राहणाऱ्या प्राण्याला ते घर त्याचेही आहे (!) असे वाटावे म्हणून प्राणिपालक आपल्या घराला नव्याने रूपांतरित करत आहेत. उदा. कुत्र्यासाठीचा बेडरूम , खास कुत्र्यांसाठी डिझाईन केलेलं वेगळे बाथरूम , अगदी माणसांच्या डायनिंग टेबल खालीच कुत्र्याची जेवणाची केलेली सोय..म्हणजे संपूर्ण कुटुंबाला एकत्र जेवता येईल !
इंस्टाग्रामवर #barkitecture हा हॅशटॅग एकदा नक्की शोधून बघा !
लॉक डाऊन नंतर घरी प्राणी पाळण्याच्या संख्येत कमालीची वाढ झाली. माणसांचा या आपल्या शेपटीवाल्या मित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत गेला. आणि त्यातूनच हे नवे मार्केट तयार झाले आहे.
मंडळी, कदाचित तुम्हाला या गोष्टी “जरा जास्तच” आहेत असं वाटत असेल. पण कोणतेही नवीन ट्रेंड सुरुवातीला असेच असते. हळूहळू लोक नव्या गोष्टी स्वीकारायला लागतात…आणि बघता बघता त्या “गरजेच्या” होऊन जातात.
आसपास सजगपणे बघा….एखाडी चांगली बिझनेस आयडीया "चार पायांवर" चालताना कदाचित तुम्हालाही दिसेल ! तशी ती तुम्हाला दिसली आणि त्यावर काम केलंत तरच हा लेखनप्रपंच सफल होईल !
सत्फुल प्रल्हाद सोनवणे
GITO जिटो
मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह
एका वर्षात दहा हजार लोकांना त्यांचा खरा न्याय मिळवून देणे विथ स्ट्रॉंग इव्हिडन्स द्वारे हा माझा ध्यास आहे
mission true justice with strong evidence
Mission to help 10000 people get true justice are right with strong evidence
शनिवार, २५ मे, २०२४
स्पॅम कॉल्सचा AI कर्दनकाळ !
गुरुवार, २३ मे, २०२४
New AI Voice Cloning Scams
AI शी संबंधित दोन घटना आजच माझ्या वाचनात आल्या…पहिली अमेरिकेत घडलेली….दुसरी आपल्या भारतात…..!
लेक्सी बोगनच्या आयुष्यात गेल्या वर्षी मोठा बदल झाला. तिला मेंदूजवळ ट्युमर झाल्याचे कळले. दहा तासांच्या शस्त्रक्रियेमुळे बोगनच्या आवाजाच्या तारांवर (Voice Cord) परिणाम झाला आणि २२ वर्षांच्या बोगनला तिचा आवाज गमवावा लागला.
त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांनी तिला संपर्क करून एका प्रयोगात सहभागी होण्याची विचारणा केली. त्यांनी तिला OpenAI च्या नवीन व्हॉईसबॉट प्लॅटफॉर्म, Voice Engine, वापरण्यासाठी विचारले. बोगनने त्या प्रयोगामध्ये सहभागी व्हायचे ठरवले.
बोगनच्या आवाजाचा अभ्यास करण्यासाठी AI मॉडेलने तिच्या आधी रेकॉर्ड केलेल्या १५ सेकंदांच्या व्हिडिओचा वापर केला. आणि Voice Cloning करून तिचा आवाज फोन मधील अँप मध्ये save करून दिला. आता, बोगन तिच्या फोनवर काहीही टाईप करून तिच्या स्वतःच्या आवाजात वाचून घेऊ शकते. तिच्या आवाजात हसूही शकते. सर्व भावभावना आपल्या शब्दात आणि आवाजात व्यक्त करू शकते
आवाज गमावलेल्या रुग्णांसाठी दुसऱ्याचा आवाज ऐकणे, किंवा रोबोटिक आवाज ऐकणे फार रुक्ष आणि कठीण असते. मात्र OpenAI सारख्या आवाजाच्या क्लोनिंग तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या अनेक कंपन्या हा एक मोठा प्रॉब्लेम सोडवीत आहेत.
दुसरी घटना लखनौ मध्ये घडलेली. सरकारी नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीला एका अनोळखी नंबर वरून फोन आला. फोनवर त्याचा मेव्हणा बोलत होता. तो कोणत्यातरी अडचणीत सापडला होता आणि त्याला त्वरित पैशांची गरज होती. फोन घेणाऱ्या माणसाने (नाव मुद्दाम लपवलेले आहे) घाईघाईत दीड लाख रुपये ट्रान्सफर केले.
थोड्यावेळाने काम झालं का विचारण्यासाठी मेव्हण्याला फोन केला तेव्हा कळलं की मेव्हण्याने फोन केलाच नव्हता. स्कॅमरने सोशल मिडीया मधून त्याच्या मेव्हणाचा आवाज घेतला. Voice Cloning वापरून फोन केला आणि दीड लाख कमावले.
अशाच घटना मुलांच्या बाबतीतही होत आहेत. पालकांना मुलांच्या आवाजात खोटे फोन जात आहेत. त्यामुळे आपल्या मुलांचे फोटो, व्हिडिओ, त्यांचा ठावठिकाणा समजू शकेल अशा पोस्ट सोशल मीडिया वर टाकणे बंद करा.
दोन्ही घटनांमागचं तंत्र तसं सारखंच. पण वापर वेगवेगळे ! चांगले किंवा वाईट….तंत्रज्ञान आयुष्य बदलणार आहे..आणि ही प्रक्रिया थांबवणे जवळपास अशक्य आहे. तेव्हा स्वतःला तयार करा ..अपडेटेड राहा.
GITO 7057573102
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्यातून पैशांच्या गोणी बाहेर पडल्या. गोणी फुटून त्यातील नोटा इतस्ततः विखुरल्या. ड्रॉयव्हरला हे लगेच कळले नाही आणि गाडी तशीच भरधाव पुढे निघून गेली.
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडल...
-
स्पाय गुप्तचर कॅमेरा खरेदी चे 5 टिप नमस्कार! छुपा कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करताना, आपण अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. 1.. प्रथम, ...
-
नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत . आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे मिशन खरा ...



.jpg)
.jpg)

