नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत . आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets GITO committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102 #GITO
शनिवार, ६ एप्रिल, २०२४
deep wok
शुक्रवार, ८ मार्च, २०२४
जीटो स्पाय कॅमेरा आणि स्त्रीचा विजय
शनिवार, २ मार्च, २०२४
बोर्डाची परीक्षा*
गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४
‘‘ मनाचा एक्स-रे’’
‘‘ मनाचा एक्स-रे’’
(प्रतिबिंब)( Copyright )🗿👁 डॉ .दत्ता कोहिनकर
सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमुक एक जागी जाऊ नकोस असं काही सांगितलं होतं का?’’ ती म्हणाली हो, ‘‘बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको असं बजावलं होतं. त्याने, लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कुच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणार्या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.’’ बायकोने मुलाला हाक मारली व फ्राईडचा हात धरत विचारलं, ‘‘तुम्हाला सिध्दी प्राप्त झालीय का ? हा कारंज्याजवळच आहे हे कसे तुम्हाला कळालं ?’’ फ्राईड म्हणाला - ‘‘सिध्दी-बिध्दी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.’’
खरोखर मित्रांनो कवयत्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशात जाते. प्रयोग करून पहा, डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला कि दोन-तीन माकडं डोळयासमोर येतील. एखादया दारावर आत डोकावू नये अशी पाटी लावली कि आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच.
एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ‘‘मित्रा मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.’’ राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घौडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला अरे यार ही किल्ली दुसर्या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही. पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती.
अंर्तमनाला एखादी गोष्ट करू नकोस असे ताकिद देऊन दरडावून सांगितले की ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते. त्यावेळी बर्हिमनाने त्याला सहजपणे - हळुवारपणे, तत्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले कि अंर्तमन-बर्हिमन यात सुसंवाद सुरू होतो. तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंर्तमन व बर्हिमन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात. आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये यासाठी आपण जागरूक असतो.
आपला भाव देवाला दिसावा असे भक्ताला वाटते, आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते, कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणांस दाद दयावी असे कवीला वाटते. आपल्या जीवनाचा काही भाग सगळयांना दिसावा पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळयांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही. कारण आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो.
मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार एक्स-रे काढण्यासाठी सजग राहून दिर्घश्वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सुर्यनमस्कार घालणे महत्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरिक्षण करावे त्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणार्या जाणार्या श्वासाला डोळे मिटून जाणत रहा. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागेल व मनाचा एक्स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनानेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल. शेवटी म्हणतात ना, ‘‘मन करा रे प्रसन्न - सर्व सिध्दीचे कारण’’ 🌹
सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३
पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्या घेतल्या लागलीच काही होत नाही विषाणू मेंदूपर्यंत जायला काही दिवस तर घेतोच..
जवळपास दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..
फ्रान्समधल्या एका गावात कुणी तरी एका नऊ वर्षाच्या मुलाची किंकाळी ऐकली..
किंचाळणाऱ्या मुलाचं नाव होतं ‘निकोल’ अन् ती ऐकणाऱ्याचं नाव होतं ‘लुईस.’
निकोलला कुत्र्यानं चावा घेतला अन् गर्दी जमा झाली..
निकोल किंचाळतांनाचा कुत्र्यासारखंच दात विचकून गुरगुरू लागला-त्याचं शरीर आकुंचन पावलं-त्याला पाण्याची भिती वाटू लागली-हळूहळू तो इतरांनाही चावण्याचा प्रयत्न करू लागला...
महिन्याभरात निकोल देवाघरी गेला आणि त्याचं किंचाळणं चाळीस वर्षे ऐकू येणारा त्याचा मित्र पुढं जाऊन जगातला एक महान शास्त्रज्ञ बनला..
पन्नास वर्षीय त्या शास्त्रज्ञाचं संपुर्ण नाव होतं ‘लुईस पाश्चर’
लुईस यांनी या काळात अनेक संशोधनं केले पण त्यांच्या कानात रोज निकोलच्या किंचाळण्याचा आवाज येत राहिला मग त्यांनी चावणाऱ्या-पिसाळलेल्या कुत्र्यांवर संशोधन सुरू केलं...
मदतनीस रक्सच्या सहाय्यानं त्यांनी अश्या काही कुत्र्यांना पकडून पिंजऱ्यात डांबलं आणि त्यांच्या तोंडाचा फेस-लाळ परीक्षानळीत जमा करत गेले..
या लाळेचं इंजेक्शन जेव्हा नाॅर्मल कुत्र्याला दिलं गेलं तेव्हा ते ही पिसाळल्यासारखं करू लागलं..
हेच इंजेक्शन सश्याला दिलं ते तर बिचारं पॅरालाईज होत काही क्षणात मरून गेलं..
यावरून एक गोष्ट मात्र लक्ष्यात आली ही ‘लाळ’ जीवघेणी आहे..
लुईसच्या या प्रयोगशाळेत दिवसरात्र भुंकणारे कुत्रे त्यांची काळजी घेणं-ते चावणार नाही याची काळजी घेणं-लाळ जमा करणं असं क्लिष्ट काम चाललं होतं..
मदतनीस रक्सनं पाश्चरना एक निरिक्षण सांगितलं ते म्हणजे ‘या लाळेचा संसर्ग थेट मेंदूवर परिणाम करतो.’
यावर प्रयोग करूयात म्हणजे लाळेचं इंजेक्शन शरीरात इतरत्र देण्यापेक्षा थेट डोक्यात देऊन बघितलं तर?
‘छे छेऽऽ’ पाश्चरनं त्याला थेट नकार दिला..
मानेल तो रक्स कसला? पाश्चर सुट्टीवर जाताच भावानं देऊन टाकलं दोन हेल्दी कुत्र्यांना हे लाळेचं इंजेक्शन
दोन आठवड्यातच हे दोन्ही कुत्रे दगावले..
रक्स थोडा हैराण झाला..आता पाश्चर रागावणार..
पाश्चर सुट्टीवरनं परतले..त्यांनी रक्सचं कांड ऐकलं
आणि त्यांनी ते ऐकून त्याला चक्क ‘शाबासकी’ दिली..
हे सिद्ध झालं होतं की लाळेतला विषाणु थेट मेंदूवर हल्ला करतो..
अश्यातच एक आधीच पिसाळेला (?) कुत्रा त्यांच्या प्रयोगशाळेत आणला..त्याला त्यांनी ते लाळेचं इंजेक्शन दिलं आणि ‘मरण’ तर दूर हा कुत्रा चक्क हळूहळू बरा होऊ लागला..
बघता बघता त्याची सगळी लक्षणं नाहीशी झाली थेट तसंच जसं आधी सर्दी खोकला होतो-वाढतो-आपोआप कमी होतो..
याचा अर्थ शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते..
आजारी कुत्र्यात पण ती तयार झाली होती..
पाश्चरनी ही संधी हेरली..या कुत्र्यात विषाणुविरुद्ध ॲंटिबाॅडी तयार झाल्या होत्या,ते बचावलं होतं आता वेळ होती ‘लस’ बनवायची..
पाश्चरनं प्रयोगशाळेतील चारपैकी दोन कुत्र्यांना लाळेचं इंजेक्शन दिलं ते वाचले इतर दोन गेले..
पाश्चरना वाटलं फ्रान्समधल्या यच्चयावत कुत्र्यांना हे इंजेक्शन द्यावं म्हणजे सगळे सुरक्षित होतील..
सल्ला महाग होता आणि श्वानप्रेमीही ‘सरसकट लस द्यावी की नको?’ या संभ्रमात होते..
विचारविमर्श झाला (फ्रान्स होतं म्हणून,आपल्याकडं एव्हाना मिडिया ‘पिसाळली’ असती) त्यातनं असं ठरलं की थेट कुत्र्यांना लस देण्याऐवजी त्यांनी ज्यांना चावा घेतला त्या माणसांना ही लस दिली तर?
हे लाॅजिकल होतं,तसंही पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्या घेतल्या लागलीच काही होत नाही विषाणू मेंदूपर्यंत जायला काही दिवस तर घेतोच..
पण इथंही एक समस्या होती आतापर्यंत असा प्रयोग माणसावर थेट कधीच झाला नव्हता,तो कसा व्हावा?
कुत्रा माणसाला चावल्यावर..
पण जाणुनबुजून कुणी कुत्र्याकडून कसं चाववून घेईल?
‘सर्किट’ नसेल तो शास्त्रज्ञ कसला..
अहो फक्त ‘पॅशन’ नाही तर एक ‘वेड’ असावं लागतं एखाद्या गोष्टीपाठी लागण्यासाठी..
पाश्चरनं पिसाळलेल्या कुत्र्याच्या जबड्यात हात घालायची तयारी केली पण तेवढ्यात शेजारच्या खेड्यातून ‘जोसेफ’ नावाच्या एका दहा वर्षीय मुलाला कुत्रा चावल्याची बातमी आली..
जोसेफची आई त्याला पाश्चरकडं घेऊन आली..
पाश्चरनं जोसेफला लस दिली..जोसेफ वाचला..तारीख होती ६ जुलै १८८५.
हळूहळू ही बातमी जगभर पसरली..जगभरातून पत्रांचा वर्षाव झाला..चर्चा झाल्या..
रशियात एके दिवशी एकोणीस शेतकऱ्यांना कोल्हा चावला..सगळे थेट पॅरीसला जाऊन धडकले..
प्रारंभी भाषेची जरा अडचण जाणवली पण ‘वेदनेची आणि सहवेदनेची’ एक वेगळी भाषा असते..
शेतकऱ्यांसाठी लसी तयार करण्यात आल्या सगळे वाचले..
त्याआधी अश्या हल्ल्यात अनेक लोकं दगावायचे..
रशियाचा राजा ‘झार’ पाश्चरवर खूष झाला त्यानं पाश्चरला थेट रत्नजडीत बक्षिस पाठवलं आणि संस्थेच्या स्थापनेसाठी पैसेही..
बालपणी शाळेत मंद-मठ्ठ म्हणून ज्याला हिणवलं गेलं त्यानं जगाची रेबिज-काॅलरा-ॲंथ्रक्स पासून सुटका करत पाश्चरायजेशनसारखी प्रक्रिया जगाला दिली..
विचार करा एकदा ‘रेबिज’ झाला की आजही औषध नाही..रेबिजनं होणारा मृत्यू हा सगळ्यात दयनीय आणि भयावह असावा..लस शोधून पाश्चरनी या जगातल्या असंख्य प्राणीमात्रांवर अनंत उपकार करून ठेवलेत.
GITO 7057573102
खऱ्या अर्थानं ‘महामानव’ असलेल्या या शास्रज्ञाचा आज स्मृतीदिन..विनम्र आदरांजली💐
विलास सोपानराव जाधव
सेवानिवृत्त मुख्य लेखा व वित अधिकारी
जि प औरंगाबाद
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
जे कधीच हार मानत नाही तेच जिंकतात
जे कधीच हार मानत नाही तेच जिंकतात
एकदा जंगलाच्या मध्यभागी असलेल्या सपाट जागेमध्ये एका शेतकर्याने त्याचा गुंरांच्या चार्यासाठी काही जंगली वनस्पती आणि बांबूच्या झाडांचे बियाणे पेराले. एका वर्षातच इतर जंगली वनस्पतींची वाढ इतक्या जोमाने झाली कि सगळीकडे हिरवळ पसरली मात्र बांबूचे बियाणे पेरलेल्या जागी काहीच उगवले नाही.
निराश न होता शेतकर्याने आपले प्रयत्न चालुच ठेवले. एका मागोमाग एक अशी चार वर्ष गेली तरीही काहीच उगवले नाही. शेतकरी निराश झाला पण त्याने प्रयत्न चालुच ठेवले. शेवटी पाचव्या वर्षी शेतकर्याला त्या जागेवर छोटे छोटे कोंब दिसू लागले आणि बघता बघता फक्त ६ महीन्यांच्या कालावधीतच त्या कोंबांचे रुपांतर १०० फूटांच्या घनदाट बांबूंच्या जंगलात झाले. ही बांबूची झाड फक्त ६ महीन्यांमध्ये इतकी उंची गाठू शकली कारण त्यांनी ४ वर्षे घेतली त्यांची मुळे मातीत घट्ट आणि मजबूत रोवण्यासाठी.
आपल आयुष्य सुध्दा असच आहे एखादा नवीन अभिनेता एका सुपरहीट चित्रपटामुळे रातोरात स्टार झाला असे आपण म्हणतो परंतु असा चित्रपट मिळवण्यासाठी त्यामागे त्याने कित्येक वर्षे घेतलेली मेहनत असते हे विसरुन चालणार नाही. अडचणींमुळे अपयश आले म्हणून वेळ वाया गेला असे समजू नका ह्याच अडचणी तुम्हाला इतके मजबूत बनवतील की तुम्ही काहीतरी साध्य करु शकाल त्यामुळे हार मानू नका प्रयत्न करत रहा.
SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets
GITO - जिटो
G- guarding (protection)
I- innovative products
T- technology
O- organisation
committed to give you more advanced service & products
regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102
#GITO 9503852341 spy 9822358631
https://linktr.ee/Satful
गुरुवार, २० जुलै, २०२३
अर्थाच्या शोधात ( Man's Search For Meaning) या पुस्तकातील काही महत्त्वाची वाक्ये -
अर्थाच्या शोधात ( Man's Search For Meaning) या पुस्तकातील काही महत्त्वाची वाक्ये -
शुक्रवार, ३० जून, २०२३
गुन्हा कोणताही असो, त्याविरुद्ध भक्कम पुरावा असेल तरच आपण गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकतो, बरोबर ना? हे शोधण्यासाठी लागणारे गॅजेट्स म्हणजेच स्पाय कॅमेरा, हिडन कॅमेरा,
रविवार, १८ जून, २०२३
स्पाय कॅमेरा चे 18 फायदे फायदे
बुधवार, ३ मे, २०२३
बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही.
बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही.
उणेपूरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य
त्यात ३० वर्षे शिक्षणात
आणि १९४६ नंतरचा काळ,
दिल्लीत व्यस्त राहीलेला.
अवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबांना
चळवळ आणि लेखनाला.त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो,
२३ ग्रंथ लिहितो,शेकडो लेख लिहून भाषणे करत राहतो.
मनुस्मृती दहन, चवदार तळे,काळाराम मंदिर आंदोलन,शिक्षणसंस्था स्थापना,
राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका,
गोलमेज परिषदआणि हजारो मैलांचा प्रवास.वाचन लेखनावरची पकड सुटू न देता.हे सारे सारे तुम्ही ,कसे जमवले असेल , बाबासाहेब ?
याचा हिशोब मला लागत नाही.
आजच्या नेत्यांसारखे विमान,हेलिकॉप्टर हाताशी नाही, मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोहोचणे नाही,अनुयायांना संदेश द्यायला Whatsapp नाही की बोलायला फोन नाही.
खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून
गावकुसाबाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यावस्त्यावर कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब ?
कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे,खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे.पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा,ती सारी माणसे टेक्नोसॅव्ही नसणारी.
फाटकी,निरक्षर,अन्यायाने पिचलेली,
भेदरलेली.
त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल? की, ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली.कधीही
न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल खेड्यापाड्यातील माणसांची?
नुसत्या टाइम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब,
आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला
हव्यात, कारण आज सगळी साधने हाताशी असूनही आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत, कोसो दूर....!
शनिवार, २९ एप्रिल, २०२३
गुप्तचर लपलेले कॅमेरे लपविलेले डिव्हाइस डीबगिंग शोधा पुणे, महाराष्ट्रातील डीबगिंग सेवा
गुप्तचर लपलेले कॅमेरे लपविलेले डिव्हाइस डीबगिंग शोधा
पुणे, महाराष्ट्रातील डीबगिंग सेवापुण्यातील घरे, कार्यालये, कार इत्यादीमधील छुपे कॅमेरे आणि रेकॉर्डिंग उपकरणे शोधून काढून टाकणे. डीबगिंग ही संगणक प्रोग्राम किंवा इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरमधील दोष किंवा दोषांची संख्या शोधण्याची आणि कमी करण्याची पद्धतशीर प्रक्रिया आहे, ज्यामुळे ते अपेक्षेप्रमाणे वागते.
आम्ही अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर उपकरणे, लागू केलेले ट्रेडक्राफ्ट आणि संपूर्ण भौतिक शोध वापरतो, आम्ही गुप्त ट्रान्समीटर, छुपे मायक्रोफोन, वायरलेस व्हिडिओ कॅमेरे, टेप रेकॉर्डर आणि फोन टॅपसाठी संपूर्ण रेडिओ स्पेक्ट्रम स्वीप करू. ऐकण्यासाठी उपकरणे किंवा GPS ट्रॅकिंग युनिटसाठी आम्ही वाहनांची तपासणी करू.
जर घर, कार्यालय, व्यवसाय किंवा वाहनामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवली गेली असतील, तर आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्यांना तटस्थ करू, काहीवेळा आम्ही मागे देखील ट्रॅक करू शकतो आणि त्यांना प्रथम स्थानावर कोणी ठेवले आणि ते कोणी ठेवले याची माहिती देण्यास आम्ही सक्षम आहोत.
बगिंग हा सध्या कोणत्याही पक्षांकडून माहिती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, आम्ही खाजगी तपासात पुण्याचे प्रमुख अधिकारी म्हणून बग्स, लपविलेल्या ऑडिओ/व्हिडिओ उपकरणे इत्यादींसाठी साइट डीबगिंग करण्याची शिफारस करतो. एक "बग स्वीप" (नसबंदी) आहे. कार्यालय, निवासस्थान, सेल फोन, कार, लँड लाईन किंवा इतर अनेक ठिकाणी जेथे इव्हस्ड्रॉपिंग होऊ शकते तेथे बग, वायरटॅप, ऑडिओ किंवा व्हिडिओ डिव्हाइस शोधण्यासाठी केले जाते. बग स्वीपला काही तासांपासून ते दोन दिवसांपर्यंत कुठेही लागू शकतो, हे सर्व बगच्या जटिलतेवर आणि उल्लंघनाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. कोणतीही बग शोध सेवा उपलब्ध नाही जरी काही फ्लाय बाय नाईट ऑपरेटर सक्षम असल्याचा दावा करू शकतात, अशा प्रकारे तुम्ही सर्वात व्यापक गुप्तहेर शोध, टेलिफोन बग शोध आणि पाळत ठेवणे प्रदान करणारी सेवा निवडावी. फक्त लक्षात ठेवा की शक्ती, पैसा, प्रभाव किंवा वैयक्तिक, संवेदनशील किंवा वर्गीकृत माहिती किंवा दस्तऐवजांमध्ये प्रवेश असलेल्या कोणत्याही व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक इव्हस्रॉपिंगचा गंभीर धोका असतो.
पुणे, महाराष्ट्रातील सर्वात जुने खाजगी गुप्तहेर सेवा प्रदात्यांपैकी एक म्हणून आम्ही शिफारस करतो की, ज्यांना त्यांच्या कार्यालय, कार, घरे इ. येथे आमच्या डीबगिंग सेवा पार पाडण्यासाठी त्यांच्या क्रियाकलाप रेकॉर्ड करण्याचा धोका आहे.
तुमचे घर किंवा ऑफिस बिघडले आहे का? शार्प डिटेक्टिव्ह एजन्सी पुणे ही पुणे, महाराष्ट्रातील पूर्ण परवानाप्राप्त, बंधपत्रित आणि विमाप्राप्त खाजगी गुप्तहेर एजन्सी आहे जी यशस्वीपणे बग स्वीप करू शकते आणि तज्ञ डीबगिंग सेवा देऊ शकते. तुमच्या घरात किंवा कार्यालयात बेकायदेशीरपणे ठेवलेले लपवलेले मायक्रोफोन, ट्रान्समीटर आणि व्हिडिओ कॅमेरे आम्ही सहजपणे शोधू. गोपनीय संभाषणे, कॉर्पोरेट गुपिते आणि इतर संवेदनशील माहिती सुरक्षित आणि सुरक्षित आहेत हे जाणून घेतल्याने तुम्हाला लवकरच मनःशांती परत मिळेल.
इलेक्ट्रॉनिक स्वीपद्वारे तुमची मौल्यवान माहिती सुरक्षित करा जी तुमचा आवाज परिसराबाहेर प्रसारित करणार्या सूक्ष्म ट्रान्समीटरच्या रूपात दोष शोधतात, ओळखतात आणि तटस्थ करतात, व्हिडिओ प्रसारित करणारे मायक्रो व्हिडिओ ट्रान्समीटर, आवाज रेकॉर्ड करणारे मायक्रो रेकॉर्डर तसेच महत्त्वाच्या कॉन्फरन्सचे व्हिडिओ देखील. , बोर्डरूम मीटिंग्ज, प्रीलाँच स्ट्रॅटेजीज इ. तुमच्या टेलिफोन उपकरणांमध्ये, टेलिफोन लाईन्स, पॉवर लाईन्स, कार इत्यादींमध्ये दोष असू शकतात जे या क्षेत्रातील तज्ञ म्हणून उभे असलेल्या हौशींच्या स्वीप दरम्यान लक्षात येऊ शकतात.
आमच्या तांत्रिक पाळत ठेवणे काउंटरमेजर स्वीपमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
• एकूण RF (रेडिओ वारंवारता) स्पेक्ट्रम स्वीप - 200 Hz ते 12 GHz
• वाहक चालू स्वीप - 20 KHz ते 400 KHz
• इन्फ्रारेड ट्रांसमिशन स्वीप
• मायक्रोवेव्ह (एक्स-बँड) ट्रान्समिशन स्वीप
• सेल फोन बग स्वीप
• मायक्रोफोन स्वीप
• रेडिओ ट्रान्समीटर स्वीप
• व्हिडिओ ट्रान्समीटर स्वीप
• लपविलेले व्हिडिओ कॅमेरा स्वीप
• ऑडिओ रेकॉर्डर स्वीप
• ध्वनिक गळती तपासणी
• फोन टॅप (रेकॉर्डर आणि ट्रान्समीटरचा समावेश आहे) स्वीप
• वाहन सक्रिय आणि निष्क्रिय GPS स्वीप
बहुतेक ठिकाणे जिथे बग लपलेले आहेत:
1. महत्त्वाच्या बैठकीपूर्वी आणि दरम्यान बोर्ड रूम
2. महत्त्वाची कार्यालये
3. कार
4. निवासस्थाने
5. फार्म हाऊसेस
आमच्या क्षमता:
1. सुविधेतील सर्व प्रकारचे रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटर शोधा.
2. सर्व प्रकारचे ऑडिओ तसेच व्हिडिओ रेकॉर्डर शोधा.
3. गुप्त मायक्रोफोन शोधा.
4. सर्व प्रकारचे टेलिफोन टॅप शोधा.
5. वाहक वर्तमान ट्रान्समीटर शोधा.
6. स्प्रेड स्पेक्ट्रम ट्रान्समीटर शोधा.
7. GSM बग शोधा
तुमचा फोन किंवा घर/कार्यालय पाळताखाली आहे किंवा टॅप केले जात आहे असे तुम्हाला वाटत असल्यास ते अत्यंत महत्त्वाचे आहे, तर त्या ठिकाणाहून कॉल करू नका तर आम्हाला स्थानिक टेलिफोन बूथवरून कॉल करा किंवा आमच्या कार्यालयाच्या आवारात येऊन आम्हाला भेटा.
There have been many a queries about locating hidden cameras and audio devices, spy gadgets hidden and covertly recording conversations and movements inside homes, corporate offices, cars, etc, this locating of such spy devices is called debugging, we have several devices that are used to help us identify where the secret device is actually hidden, our job as the foremost detective agency in Pune is identify the device, point it out to our clients and leave, we do not take the responsibility of disturbing the device or identifying who has installed it. Our pricing for detecting hidden devices in Pune, Maharashtra depends on the size of the property, to give you an idea a 1000 sft (standard 2 BHK property, with kitchen, bathrooms, sitting room, etc) full furnished shall cost around 35,000/- +Taxes and time taken ranges from 30 minutes to 2 hours.
SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets GITO - जिटो G- guarding (protection) I- innovative products T- technology O- organisation committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102 #GITO
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्यातून पैशांच्या गोणी बाहेर पडल्या. गोणी फुटून त्यातील नोटा इतस्ततः विखुरल्या. ड्रॉयव्हरला हे लगेच कळले नाही आणि गाडी तशीच भरधाव पुढे निघून गेली.
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडल...
-
स्पाय गुप्तचर कॅमेरा खरेदी चे 5 टिप नमस्कार! छुपा कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करताना, आपण अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. 1.. प्रथम, ...
-
नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत . आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे मिशन खरा ...

