छोटा धडा, मोठी शिकवण
जगातील कपड्यांचे सर्वोत्तम ब्रँड्स पहा, त्यांनी बनविलेल्या कपड्यांमध्ये एक गोष्ट common असते. ती म्हणजे कपड्यांमध्ये वापरलेल्या चैन चा (zip) चा brand.... YKK
YKK ही जगातील सर्वात मोठी zip बनवणारी कंपनी आहे. जगभरातील एकूण zip उत्पादनांत 50% वाटा एकट्या YKK चा आहे. खरंतर zip कडे कोणाचं लक्षही जात नाही, YKK चं हे उत्पादन तर कपड्यांवर दिसतही नाही. आणि तरीसुद्धा सर्व मोठमोठ्या ब्रॅण्डस ना आपल्या कापड्यांसाठी YKK च्याच zips पाहिजे असतात. असं का बरं ?

YKK एका वर्षात एवढ्या zips तयार करते की त्यात संपूर्ण पृथ्वी पाच वेळा गुंडाळता येतील. आहे की नाही आश्चर्यकारक ! चला तर मग जाणून घेऊया या हटके ब्रँडची गोष्ट
YKK म्हणजे Yoshida Kogyo Kabushikikaisha. ताडाओ योशिदा यांनी 1934 साली जपान मधील टोकियो येथे या कंपनीची स्थापना केली.त्याकाळी zip बनवण्याचं काम हाताने केलं जायचं, त्यामुळे उत्पादन वेगाने होत नसे आणि कामाच्या दर्जात तफावत असे. योशिदा यांनी यावर उपाय शोधायचे ठरवलं आणि खूप अभ्यास व मेहनत करून zips बनविण्यासाठी मशीन तयार केली.
त्यानी ही मशीन zips बनविणाऱ्या अनेक लघुउद्योगांना दाखवली, पण मुळात एवढ्या zips बनविण्याची गरजच नाही, मशिन उगाच पडून राहील या कारणांमुळे त्यांनी मशीन वापरायला नकार दिला.
शेवटी योशिदा यांनी स्वतःच मशिन वापरून चांगल्या गुणवत्तेच्या zips तयार करायचे ठरवले. पण यात आणखी एक अडचण होती. Zips साठी जसा धागा त्यांना पाहिजे होता त्या गुणवत्तेचा धागा काही त्यांना मिळत नव्हता. त्यांनी अनेक धागा उत्पादकांना सांगितले , पण एवढ्या छोट्या quantity साठी नवा धागा तयार करण्यासाठी त्यांनी नकार दिला. पण योशिदा यांनी हार न मानता स्वतःच धागा तयार करायचे ठरवले आणि तसा उत्कृष्ट प्रतीचा धागा तयारही केला.
हळूहळू त्यांनी झिप साठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्याच कारखान्यात बनवायला सुरुवात केली. सर्वोत्तम गुणवता आणि वेगवान प्रोडक्शन यामुळे त्यांना ऑर्डर्सही भराभर मिळू लागल्या.
फॅशन उद्योगात, कपड्यांमध्ये लवकर खराब होणारा ZIPS हा एकमेव भाग आहे. लोक काही पैसे जास्तीचे देऊन ब्रँडेड कपडे विकत घेतात. जर zip खराब झाली तर दोष या ब्रॅण्डसना मिळतो. Zip बनवणाऱ्या कंपनीला नाही. त्यामुळे ब्रँड्स चांगल्या प्रतीच्या आणि टिकाऊ zips घेणे पसंत करतात. YKK चं नाव इतकं मोठं झालं आहे की कंपन्या कमी किमतीत इतर चायनीज zips उपलब्ध असल्या तरी घेत नाहीत.
YKK च्या यशाचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची expansion strategy. केवळ एक्स्पोर्ट्स वर अवलंबून न राहता त्यांनी जगभरात विविध ठिकाणी कारखाने उभारले. त्यामुळे कमीत कमी वेळेत, उच्च दर्जाचे उत्पादन ग्राहकांना मिळत राहील आणि ग्राहकाला दुसऱ्या स्पर्धकांकडे जायची गरजच लागणार नाही याची काळजी YKK ने घेतली.
संस्थापक योशिदा यांचे एक ब्रीदवाक्य होते, Cycle of Goodness. म्हणजे कर भला तो हो भला. या नियमावर त्यांना प्रचंड विश्वास होता. आपल्या ग्राहकांना कधीही न फसवणे, कर्मचाऱ्यांना कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे वागवणे, कच्चा माल पुरविणाऱ्या व्हेंडर्सना उगाच न पिळणे, वेळेवर पैसे देणे या गोष्टी त्यांनी YKK च्या culture मध्ये आणल्या.
लिज्जत ने जसं पापड या एकाच छोट्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करून ब्रँड बनवला तसंच zip या अतिशय छोट्या Niche वर फोकस करून YKK मोठी झाली आहे.
उच्च गुणवत्ता, innovation आणि कमालीचा फोकस या गुणांच्या बळावर साधी zip बनवणारी कंपनी जगात आपली जागा निर्माण करते, कमी भावात विकणाऱ्या चायनीज स्पर्धकांना टक्कर देते आणि कधीही न दिसणाऱ्या उत्पादनामध्ये देखील ब्रँड तयार करते, हे सारेच मॅनेजमेंट च्या दुनियेत अद्भुत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा