नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत . आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets GITO committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102 #GITO
शुक्रवार, २५ जुलै, २०२५
आता कॉम्पुटर प्लॅनेट नवीन अपडेट्स गडजेट्स , कॅमेरा , प्रोडक्ट संदर्भात माहीती साठी whatsapp वर वर देखील उपलब्ध आहे.computer planet 1.1चा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi🕵♂For more exciting products, Download the Telegram app and join our Channel catalogue for product list of Cctv , spy , hidden cameras and fancy electronic, gifting products with specifications and prices. Link below 👇🏻👇🏻👇🏻https://t.me/spy_planethttps://linktr.ee/Satful
मंगळवार, १ जुलै, २०२५
“रिअॅक्ट” न करता “रिस्पॉन्ड” करायला शिकायचं .
पूर्वी मी ज्या कंपनीत काम करायचो तिथे माझा एक मित्र होता विवेक नावाचा. त्याचे आणि माझे डिपार्टमेंट वेगळे होते. पण ऑफिस बाहेरच्या चहाच्या टपरीवर किंवा कॅंटीनमध्ये नेहमी भेटायचा त्यामुळे मैत्री झाली होती.
विवेक हा एक साधा, पण हुशार व्यक्ती होता. थोडासा अबोल , काटेकोरपणे वेळ पाळणारा, आणि कामात पूर्णपणे झोकून देणारा माणूस. एका प्रोजेक्टसाठी त्याने महिनाभर जीव तोडून मेहनत केली होती. शनिवार-रविवारही काम करायचा. त्याने एवढं काम केलं होतं की सगळ्यांना खात्री होती की, हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट समोर सादर करायला विवेकचीच निवड होईल. कारण त्याने सर्वाधिक कष्ट घेतले होते.
पण बैठकीच्या दिवशी, त्याचा सीनियर समीरने प्रेझेन्टेशन केलं आणि सगळं क्रेडिट स्वतःच्या नावावर केलं.
विवेक तिथे बसून फक्त पाहत राहिला.
एक शब्दही न बोलता, फक्त पाहत राहिला.
त्या संध्याकाळी नेहमीच्या वेळी चहा प्यायलाही आला नाही. फोन केला आणि बळेच बाहेर घेऊन गेलो . त्याचं मन त्या कॉन्फरन्स रूममध्येच अडकलेलं. “मी एवढे कष्ट केले , आणि त्याने श्रेय लुटलं. असा चोर आणि कृतघ्न माणूस मी कधी पाहिलाच नाही.” विवेक रागारागात पुढचे पाच मिनिटे फक्त त्याच्या सिनिअरला शिव्या देत होता .
मला गॉडफादर मधल्या मायकेल कोर्लीओनचा डायलॉग आठवला आणि मी बोलून गेलो “Never hate your enemies. It affects your judgment.”
विवेक क्षणभर थबकला. मी त्याला म्हंटल माझ्यावर पण रागावणार नसशील तर तुला थेट सांगतो .“तू समीरवर रागावला आहेस , की स्वतःवरच ? तू रागावला आहेस कारण तू गप्प बसलास? तू रागावला आहेस कारण समीरने प्रेझेन्टेशन इतकं चांगलं केलं की त्यालाच क्रेडिट मिळालं ? तू replacable आहेस आणि तू याबद्दल काहीच करू शकत नाहीस म्हणून तुला राग येतोय !
राग म्हणजे काय?
राग म्हणजे फक्त ओरडणं, भांडणं किंवा शिव्या देणं नाही. कधी-कधी तो आत साठलेला, न बोलता आलेलं दुखावलेपण असतो, असहाय्य्यता असते. हा राग तुमच्या निर्णयांवर परिणाम करतो .
तुमच्या डोळ्यासमोर रागाचं चित्र कसं असतं ? लालबुंद चेहरा, थरथरणारी बोटं, काहीतरी फेकून देणं? पण खरा राग इतका नाट्यमय नसतो. तो शांत असतो. गप्प. आत साचलेला. बाहेर हसत बोलताना, आतमधून विचारांची आग पेटलेली असते. “तो मला असं बोलला … मी हे कधीही विसरणार नाही.”
आणि या साठलेल्या रागाचं सर्वात मोठं नुकसान कुठे होतं?
तुमच्या निर्णयक्षमतेवर !
मायकेल कोर्लीओनचं वाक्य सांगतं, की जेव्हा तुम्ही कोणावर राग धरता, तेव्हा तो राग तुमच्या डोक्यावर बसतो—त्याच्या नव्हे.
“तुम्ही शत्रूला शिक्षा देत नाही, तुम्ही स्वतःला गोंधळात टाकता.”
रागाच्या भरात प्रत्येक गोष्ट त्या चष्म्यातूनच दिसते. प्रत्येक सल्ला संशयास्पद वाटतो. प्रत्येक पर्यायात धोका जाणवतो. “तो पुन्हा फसवेल का?” “मी मवाळपणा दाखवला, तर लोक मला कमजोर समजतील का?” “मी त्याच्यासारखं वागलो, तर त्याचं नुकसान होईल का?”
हे प्रश्न स्वाभाविक वाटतात. पण त्यामागे भीती असते. आणि राग हे त्या भीतीचं कवच असतं.
राग तुमचा फोकस हरवतो.
कल्पना करा, तुम्ही एखादी मोठी डील साइन करणार आहात. पण समोर बसलेली व्यक्ती तीच आहे, जिने याआधी तुमच्यावर टीका केली होती. तुम्ही आतून तापलेले आहात, पण बाहेरून शांत दिसायचं आहे. मग काय होतं? तुमचं लक्ष डीलवर कमी आणि त्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेवर जास्त केंद्रित होतं. तिने geniunly एखादी जरी शंका विचारली तरी मुद्दामहून मला त्रास देण्यासाठीच विचारत आहे असं वाटू लागतं .
मग रागाचं करायचं काय?
खरं आहे, आपण कितीही समजूतदार असलो, तरी काही गोष्टी मनाला खूप लागतात . कोणी आपल्या मागे बोललं, मित्राने श्रेय चोरलं, ऑफिसात तुमची आयडिया दुसऱ्याच्या नावावर गेली, किंवा अगदी छोटी गोष्ट—ट्रॅफिकमध्ये कोणी कट मारून गेलं. तरी राग अनावर होतो.
यावर आपण काय करायचं?
“रिअॅक्ट” न करता “रिस्पॉन्ड” करायला शिकायचं .
“त्याने बोललं, म्हणून मी बोललो” — ही आहे प्रतिक्रिया.
पण “त्याने बोललं… तरी मी थांबून काय बोलणार ते आधी ठरवतो” — हा आहे प्रतिसाद.
लगेच उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ घ्या. दोन खोल श्वास घ्या. स्वतःला विचारा, “माझा खरा उद्देश काय आहे?” तुमचं उत्तर एकदम वेगळं असेल.
एक मिनिट थांबायला शिका
हा साधा, पण जबरदस्त उपाय आहे.
पुढच्या वेळी कोणी तुमच्या राग येईल असं काही करेल, तेव्हा जरा थांबा. घड्याळात एक मिनिट पाहा. काहीच बोलू नका. ना प्रतिक्रिया, ना प्रतिसाद.
त्या एका मिनिटात तुमचे भावनिक तापमान काही अंशांनी खाली येईल. आणि बऱ्याचदा, तुमचं उत्तर आपोआप सौम्य होईल.
रागाचं प्रेरणेत रूपांतर करा
रागाला संधी म्हणून पाहा.
“हा राग का येतोय? कोणती मूल्यं दुखावली गेली?”
उदाहरण: कोणी तुमचं काम चोरलं—म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे.
कोणी तुमचा वेळ वाया घालवला—म्हणजे तुम्ही वेळेची किंमत जाणता.
मग रागाची दिशा बदला. त्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी काम करा.
राग सतत मनात ठेवून चालत नाही. पण त्यातून प्रेरणा घेऊन काहीतरी चांगलं घडवता येतं.
तुमचं “मोठं ध्येय” लक्षात ठेवा
क्लायंट डील गमावली. तुमच्याशी कुणी चुकीचं वागलं. कोणी अपशब्द वापरले.
पण प्रत्युत्तर देताना आठवा, “माझं खरं ध्येय काय आहे?”
दोन मिनिटांचा वादविवाद जिंकणं? की पाच वर्षांचं उद्दिष्ट शांतपणे गाठणं?
रागाचं उत्तर तात्काळ मिळतं. पण शांततेचं उत्तर पुढे नेते.
आता विचार करा—
तुम्ही राग धरलात, तरी पुढच्या वेळी तो माणूस तसाच वागेल का?
की तुम्ही तुमचं उत्तर बदललंत, तर पुढचा अनुभवच वेगळा असेल?
राग ही फक्त एक भावना आहे. ती टाळता येत नाही. पण त्याला कसं उत्तर द्यायचं, हे शिकता येतं.
आपण बऱ्याचदा समजतो, की शांत राहणं म्हणजे कमजोरी. “तो काहीही बोलला, आणि मी गप्प राहिलो? लोक काय म्हणतील?”
पण खरं सांगायचं, तर शांत राहणं ही एक निवड आहे. एक न बोलता व्यक्त होणारी ताकद. जी ओरडण्यापेक्षा खोल आवाज निर्माण करते.
रागाला उत्तर न देणं म्हणजे हार मानणं नाही. तो म्हणजे, “मी तुझ्या वागण्यावर प्रतिक्रिया देणार नाही, कारण माझी ओळख माझ्या कृतीवरून ठरेल.”
हे पटण्यासाठी एक उदाहरण देतो . महाराष्ट्रात दोन नेत्यांचे पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आले . एक नेता संधी मिळेल तेव्हा प्रतारणा करणाऱ्यासंबंधी राग व्यक्त करत असतो . दुसरा नेता प्रतारणा करणाऱ्या विरोधी एक वाक्यही रागाने बोलला नाही.
तुम्हाला असा एखादा प्रसंग आठवतो का, जिथे तुम्ही रागात निर्णय घेतला आणि नंतर पश्चात्ताप झाला?
किंवा उलट—तुम्ही संयम ठेवला आणि काही दिवसांनी कळलं, “मी रागात उत्तर दिलं असतं, तर सगळं बिघडलं असतं…”
आपण अशा क्षणांतून शिकतो. आणि हळूहळू हे लक्षात येतं—शांत राहिल्याने तुम्ही निर्णय घेता. रागाने वागलात, तर निर्णय तुमच्यासाठी घेतले जातात.
मायकेल कोर्लीओनचं वाक्य नीट लक्षात ठेवा -
“Never hate your enemies. It affects your judgment.”
हा फक्त माफिया चित्रपटातला डायलॉग नाही. हे एक जीवनाचं तत्त्व आहे—जिथे संघर्ष आहे, तिथे रागाऐवजी विचारशील शांततेला स्थान द्यायचं.
कारण शेवटी, शत्रूने कितीही त्रास दिला तरी , तुमची निर्णयक्षमता जर सुस्पष्ट राहिली, तर तुम्ही कधीच हरत नाही.
पुढच्या वेळी…
कोणी अपमान करत असेल…
कोणी धमकी देत असेल…
कोणी फसवत असेल…
तेव्हा फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा:
“मी त्याच्या वागण्याप्रमाणे वागणार, की माझ्या मूल्यांनुसार?”
तुमचं उत्तर त्या क्षणी ठरेल. पण तुमचं वर्तन तुमचं भविष्य घडवेल.
हे वाचताना तुम्हाला एखादा प्रसंग आठवला का?
आजच ठरवा—पुढच्या अशा प्रसंगात तुम्ही “रिअॅक्ट” करणार की “रिस्पॉन्ड” करणार?
शत्रूचं वागणं कधीच आपल्या हातात नसतं. पण त्याला दिलेला प्रतिसाद—तीच आपली खरी ताकद असते !
सोमवार, २ जून, २०२५
Elon Musk सुरु करतोय AIRBNB for CARS !
Elon Musk सुरु करतोय AIRBNB for CARS !
Elon Musk ने नुकताच रोबोटॅक्सी ची घोषणा केली. रोबोटॅक्सी म्हणजे संपूर्णपणे स्वयंचलित टॅक्सी. अगदी ओला/उबर सारखी पण ड्रॉयव्हरशिवाय ! आपण फक्त अँप वापरून टॅक्सी बोलवायची. टॅक्सी येणार, आपण त्यात बसायचं आणि टॅक्सी स्वतःच आपल्याला अपेक्षित ठिकाणी पोहोचवणार !
टेस्ला लवकरच (१२ जूनला सुरु होईल अशा बातम्या आहेत !) एक self-driving कार्सची फ्लीट सुरू करणार आहे.सध्या या गाड्या केवळ टेस्लाच्या मालकीच्या असतील पण लवकरच त्यात ग्राहकांच्या समाविष्ट करून घेतले जाईल.
हो, ग्राहक आपली कार जेव्हा पार्क केलेली असते, तेव्हा ती दुसऱ्या लोकांना वापरायला देऊ शकतील ! जसं AirBNB ने लोकांच्या मोकळ्या real estate साठी बाजारपेठ तयार केली तसंच टेस्ला लोकांच्या पार्किंग उभ्या असलेल्या गाड्यांमधून त्यांना पैसे कमावून देण्याची तयारी करत आहे.
ना ड्रायव्हर, ना Uber सारखी तिसरी अॅप कंपनी, ना कमिशनचे टक्के. सगळं टेस्लाचंच — हार्डवेअर, सॉफ्टवेअर, पेमेंट्स, डेटा... सगळं!
पण हे फक्त कार्सपुरता मर्यादित नाही — तर ही आहे नवीन जगाची सुरुवात !
AI आता फक्त स्क्रीनवर दिसणारा chatbot राहिलेला नाही.
AI चं पुढचं पाऊल आहे — घरात राहणाऱ्या, रस्त्यांवर फिरणाऱ्या, वस्तू पोचवणाऱ्या, आणि काम करणाऱ्या "फिजिकल AI एजंट्स"चा हा उदय आहे ! AI ला "शरीर"मिळाल्यावर कोणकोणते बदल होऊ शकतात याची कल्पना करा !
ज्यांच्या हातात सर्व गोष्टींचा कंट्रोल आहे — हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क आणि डेटा — त्याच कंपन्या हे नवीन युग घडवणार.
याचीच तयारी म्हणून OPENAI एक device तयार करत आहे. जे वापरून कोणत्याही स्क्रिनशिवाय AI वापरता येईल. कल्पना करा chatgpt ला प्रश्न विचारायचा असेल तर लॅपटॉप किंवा मोबाईल बाहेर काढायची गरजच लागणार नाही !
थोडक्यात काय तर बिझनेस मॉडेल्स बदलत आहेत. मध्यस्थ निघून जात आहेत. पुढे काय?
आपण आजही अनेक व्यवसाय माणसांवर चालवतो: ड्रायव्हर, एजंट, डिलिव्हरी बॉय…
पण जर ते सगळं AI ने केलं, तर?
मग खरी ‘असेट’ काय असेल?
घर? दुकान? कार?
की… डेटा आणि स्वयंचलित मशीन जे तुम्हाला २४x७ उत्पन्न देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आणि खास सल्ल्यासाठी सत्फुल सोनवणे यांना 7057573102 या नंबरवर संपर्क करा! आणि हो, कॉम्प्युटर प्लॅनेट आता व्हॉट्सॲपवर पण आहे! नवीन अपडेट्स, गॅजेट्स, कॅमेरा आणि इतर प्रोडक्ट्सच्या माहितीसाठी आमचा 'computer planet 1.1' व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. लिंक आहे! "https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi
"एवढंच नाही, तर अजून आकर्षक प्रोडक्ट्स आणि त्यांच्या किंमती व स्पेसिफिकेशन्ससाठी आमचं टेलिग्राम चॅनेल 'spy_planet' https://t.me/spy_planet नक्की जॉईन करा! खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा!"
WhatsApp ग्रुप जॉईन करा: https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi
Telegram चॅनेल: https://t.me/spy_planet
आमचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी: https://linktr.ee/Satful
AI हे फक्त Silicon Valley किंवा कोडर्ससाठी नाही उरलं.
हे आता सर्वसामान्य माणसासाठी एक नवीन "income stream" बनू शकतं —
जर आपण समजून घेतलं, आणि थोडा पुढचा विचार केला तर !
Elon Musk काय करतोय याचा विचार करा.
पण त्याहून महत्त्वाचं — आपण त्यातून काय शिकतोय याचा विचार करा.
कुठे कुठे मध्यस्थी जाऊन AI च्या साहाय्याने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल का याचा विचार करा ! भविष्यातील संधी तेथेच दडलेल्या आहेत.
आशा आहे की ही पोस्ट वाचून "टेस्ला कार" पेक्षा "तुमच्या आयुष्यातली गाडी" कुठे चाललीय, याचा विचार कराल.
मंगळवार, २७ मे, २०२५
अन्न , वस्त्र आणि निवारा या केवळ तीनच गरजा राहिलेल्या नाहीत....वीज, इंटरनेट, स्मार्टफोन या आणखी काही गरजा गेल्या शतकात तयार झाल्या....आता आणखी एक नवीन गरज यामध्ये समाविष्ट होत आहे... ती म्हणजे AI ! एक अशी गरज जी प्रत्येक नागरिकाला विनामूल्य उपलब्ध करून देण्याची इच्छा एका देशाला झाली !
अन्न , वस्त्र आणि निवारा या केवळ तीनच गरजा राहिलेल्या नाहीत....वीज, इंटरनेट, स्मार्टफोन या आणखी काही गरजा गेल्या शतकात तयार झाल्या....आता आणखी एक नवीन गरज यामध्ये समाविष्ट होत आहे... ती म्हणजे AI ! एक अशी गरज जी प्रत्येक नागरिकाला विनामूल्य उपलब्ध करून देण्याची इच्छा एका देशाला झाली !
सोमवार, २६ मे, २०२५
जड झालेले आई-बाप... नीट वाचा आणि मगच शेअर करा 🙏
काही गोष्टी थांबत नाहीत — त्या एकतर आपल्याला बाजूला काढतात… किंवा आपल्याला बदलायला भाग पाडतात.
युनिव्हर्सल बेसिक इनकम… की युनिव्हर्सल हाय इनकम ? एलॉन मस्कला UBI म्हणजेच युनिव्हर्सल बेसिक इनकम
युनिव्हर्सल बेसिक इनकम… की युनिव्हर्सल हाय इनकम?
अरब अमिरातीत नुकत्याच झालेल्या एका समारंभात एलॉन मस्कला UBI म्हणजेच युनिव्हर्सल बेसिक इनकम बद्दल विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला की AI आणि रोबोटिक्स मुळे उत्पादकता एवढी वाढेल की युनिव्हर्सल बेसिक इनकम ऐवजी युनिव्हर्सल हाय इनकमचा विचार आपल्याला करावा लागेल !
ही काय भानगड आहे ते पाहण्यासाठी UBI ची संकल्पना समजावून घेऊया !
आपण सारे "मानव". पोटापाण्यासाठी काही काम करतो. आपले श्रम, बुद्धी, कौशल्य वापरून पैसे कमावतो आणि त्यातून उदरनिर्वाह चालवतो. माणसाने शेतीनिमित्त हजारो वर्षांची भटकंती थांबवली आणि तेव्हापासून "काम > पैसे > उदरनिर्वाह" ही रचना उदयास आली. आणि हजारो वर्षे आपण या संरचनेला सरावलो आहोत.
पण आता AI आणि रोबोटिक्समुळे जग झपाट्याने बदलतंय. कामाचं स्वरूप बदलतंय, रोजगाराचं गणित बदलतंय, आणि सर्वात मोठं म्हणजे — मूल्यनिर्मितीची (Value Creation) व्याख्या बदलतेय. जर बहुतांशी सर्वच कामं मशिन्स कडे गेली (आणि ती जाणारच असे दिसतंय !) तर माणसाला करण्यासाठी कामच नसेल किंवा जगण्यासाठी कामाची आवश्यकताच नसेल.
### *नवीन गॅझेट्स आणि अपडेट्ससाठी कनेक्ट राहा!* 7057573102
*कॉम्प्युटर प्लॅनेट* तुम्हाला नवीनतम गॅझेट्स, कॅमेरे आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सबद्दल अपडेट्स देत आहे. आता *व्हाट्सअॅप ग्रुप* जॉईन करून सर्व माहिती मिळवा:
👉 *जॉईन लिंक*:
https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi
👉 *अधिक माहितीसाठी*:
https://linktr.ee/Satful
📢 *अजून रंजक प्रोडक्ट्स पाहण्यासाठी*:
*टेलिग्राम* अॅप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनेलवर जॉईन व्हा. येथे तुम्हाला CCTV, स्पाय, हिडन कॅमेरे आणि फॅन्सी इलेक्ट्रॉनिक गिफ्टिंग प्रोडक्ट्सची संपूर्ण यादी, वैशिष्ट्ये आणि किमती मिळतील!
👉 *टेलिग्राम लिंक*:
https://t.me/spy_planet
> 🧼 स्वच्छतेत बदल:
काहींनी शौचालय बांधले, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर घेतले.
स्वच्छतेची सवय लागली.
> 👩🦰 स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य:
महिलांनी शिवणकाम, मसाले तयार करणं, शेळीपालन असे व्यवसाय सुरू केले.
आर्थिक निर्णय स्वतः घेऊ लागल्या.
> 💰 बचत आणि गुंतवणूक:
बरेच लोक बँकेत खाते उघडून पहिल्यांदाच बचत करू लागले.
काहींनी शेतीसाठी नवीन साधनं विकत घेतली.
> 🧠 निर्णयक्षमता वाढली:
UBI मुळे कुटुंबांनी धोका पत्करून नवे पर्याय निवडले. व्यसनांमध्ये घट झाली.
---
मग लोक आळशी झाले का? नाही. उलट, कामाचा उत्साह वाढला.
UBI मुळे लोकांना आत्मविश्वास मिळाला.
जे पूर्वी शक्य नव्हतं, ते करण्याची हिंमत मिळाली.
## असेच प्रयोग जगभरात इतरत्रही करण्यात आले ?
🇫🇮 फिनलंड
→ 2,000 बेरोजगार नागरिकांना UBI दिलं
→ कमी तणाव, अधिक आनंद, आणि नोकरी शोधण्याची प्रेरणा वाढली
🇨🇦 कॅनडा (ओंटारियो)
→ लोकांनी शिक्षण पूर्ण केलं, व्यसने टाळली, मानसिक आरोग्य सुधारलं
## पण UBI चा प्रश्न तितका सोपा नाहीये !
AI, डेटा, आणि ऑटोमेशन जेव्हा इतकं सामर्थ्यवान होईल, तेव्हा त्यातून निर्माण होणारी संपत्ती आणि नियंत्रण जर फक्त एका सरकार किंवा कंपन्यांकडे राहिलं, तर…
UBI असेल — पण ते चालविण्याचा हक्क कुणाकडे?” हा खरा प्रश्न राहील.
एका सरकारकडे ?
एका कंपनीकडे ?
एका देशाकडे ?
कुणाला UBI मध्ये समाविष्ट करायचे ?
किती पैसे द्यायचे ?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून शोधायची आहेत !
UBI ही फक्त आर्थिक योजना नसून, ती मानवी हक्क, पारदर्शकता आणि सहनिर्णयाची लढाई आहे.
आपण भविष्यात आपली स्वप्न पूर्ण करायला मोकळे असू, की कुणाच्यातरी सिस्टममध्ये एक ‘USER ID’ बनून राहू?
UBI ही सुरुवात आहे — एका नव्या अर्थव्यवस्थेची, जिथे माणूस काम न करताही मूल्य निर्माण करतो — आणि त्यात त्याचा वाटा मिळतो !
👇 याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये लिहा.
शेअर करा — कारण ही केवळ आर्थिक व्यवस्था नाही,
ही मानवतेच्या नव्या संकल्पनेची सुरुवात आहे.
शुक्रवार, २३ मे, २०२५
तुम्ही एका रोबोटचं भाषण ऐकायला जाल का ?
तुम्ही एका रोबोटचं भाषण ऐकायला जाल का ?
नुकताच NEO नावाचा एक रोबोट जगप्रसिद्ध TED TALKS च्या स्टेजवर चालत आला. तिथे माणसासारखा बोलला — शांत, आत्मविश्वासाने, शहाणपणाने.
अब्जो डेटा पॉइंट्सवरून मिळालेलं ज्ञान त्याच्यात ठासून भरलेलं.
पण तरी… काहीतरी कमी वाटलं.
हो, एआय आता आपल्या पैकी बर्याच जणांपेक्षा अधिक नीट बोलतो.
तो लिहू शकतो, विश्लेषण करू शकतो, निरीक्षण करू शकतो —
वेगानं, अचूकपणे, खोलवर.
### *नवीन गॅझेट्स आणि अपडेट्ससाठी कनेक्ट राहा!* 7057573102
*कॉम्प्युटर प्लॅनेट* तुम्हाला नवीनतम गॅझेट्स, कॅमेरे आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सबद्दल अपडेट्स देत आहे. आता *व्हाट्सअॅप ग्रुप* जॉईन करून सर्व माहिती मिळवा:
👉 *जॉईन लिंक*:
https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi
📢 *अजून रंजक प्रोडक्ट्स पाहण्यासाठी*:
*टेलिग्राम* अॅप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनेलवर जॉईन व्हा. येथे तुम्हाला CCTV, स्पाय, हिडन कॅमेरे आणि फॅन्सी इलेक्ट्रॉनिक गिफ्टिंग प्रोडक्ट्सची संपूर्ण यादी, वैशिष्ट्ये आणि किमती मिळतील!
👉 *टेलिग्राम लिंक*:
https://t.me/spy_planet
👉 *अधिक माहितीसाठी*:
https://linktr.ee/Satful
---
🕵️♂️ *गुप्तचर कॅमेऱ्यांनी तुमच्या सुरक्षिततेची काळजी घ्या, आणि कनेक्ट राहून नवीन तंत्रज्ञानाचा आनंद घ्या!* 🚀
तुम्हाला कोणत्या प्रकारच्या स्पाय कॅमेऱ्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे? सांगा, आणि मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन! 😎
पण जेव्हा खऱ्या अर्थानं सर्जनशील (Creative) होण्याची वेळ येते…
जेव्हा काहीतरी नविन, अस्सल निर्माण करायचं असतं? एखादी नवीन संकल्पना मांडायची असते....
तेव्हा त्याला अजूनही आपणच (माणूसच) लागतो.
कारण सर्जनशीलता म्हणजे केवळ पॅटर्न नव्हे,
ती भावना आहे, त्यात अनिश्चितता आहे, त्यात अंतर्ज्ञान आहे —
एक अशी ठिणगी जी कोणतंही अल्गोरिदम समजू शकत नाही.
एक दिवस येईल…
जेव्हा एखादा रोबोट स्टेजवर उभा राहून एक अशी कल्पना मांडेल
जी पूर्णपणे त्याच्या स्वतःच्या मनातून आली असेल, त्या संकल्पानेमागे एखादे उदात्त उददीष्ट असेल —
आणि ती कल्पना जग ब
दलवून टाकेल.
👀 भविष्य अगदी दाराशी आलं आहे. आपल्याशी बोलत आहे ...पण आपण ऐकतोय का ?
#AI #TEDTalk #RobotSpeech #FutureOfTech #HumanTouch
मंगळवार, १३ मे, २०२५
आठ दिवसांपूर्वी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड झाला.
आठ दिवसांपूर्वी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड झाला. व्हिडिओ तयार करणाऱ्याचे नाव ब्रॅडफोर्ड जी. स्मिथ. एक अशी व्यक्ती जिला बोलता येत नाही, हालचाल करता येत नाही, एवढेच काय व्हेंटिलेटर शिवाय श्वासही घेता येत नाही. हा व्हिडिओ मानवी तंत्रज्ञानाची आणि ईच्छाशक्तीची झेप दाखविणारा आहे. लिंक https://www.youtube.com/watch?v=CJn0WRKwg34
ब्रॅडफोर्डला ALS (Amyotrophic Lateral Sclerosis) हा आजार आहे. तो बोलू शकत नाही. आणि त्याने पूर्ण व्हिडिओ फक्त मेंदूच्या सिग्नल्सने टायप करून आणि एडिट करून बनवला. ना कळफलक, ना आवाज, ना हात.
ब्रॅडफोर्ड हा Neuralink इम्प्लांट घेणारा पहिला ALS रुग्ण आहे. ALS हा एक असा आजार आहे ज्यात शरीरावरचा ताबा हळूहळू जातो – सुरुवातीला हालचाल, मग बोलणं, आणि शेवटी स्वतः श्वास घेण्याचीही शक्ती हरवते. ब्रॅडफोर्डसारख्या व्यक्तीसाठी, ज्यांनी संवादाची जवळजवळ सगळी साधनं गमावली होती, Neuralink ही केवळ टेक्नॉलॉजी नाही – ती जिवंत राहण्यासाठीची आशा आहे.
एलॉन मस्कच्या Neuralink ची ही चिप मेंदूच्या motor cortex भागात बसवली जाते. ती मेंदूतील सिग्नल्स वाचते आणि त्यांचं रूपांतर डिजिटल क्रियांमध्ये करते – जसं की कर्सर हलवणं, टायप करणं किंवा सॉफ्टवेअर वापरणं.
ब्रॅडफोर्ड आपल्या मेंदूने कर्सर हलवतो. आणि क्लिक करण्यासाठी जसे आपण बोटं वापरतो त्याऐवजी ब्रॅडफोर्ड त्याची जीभ वापरतो. आणि "क्लिक"साठी जबडा आवळतो. हे सिग्नल्स ब्लूटूथच्या माध्यमातून संगणकाशी जोडले जातात. प्रतिसेकंदाला असे हजारो सिग्नल्स संगणकातील AI प्रणाली वापरून analayse केले जातात.
हेच तंत्रज्ञान, म्हणजे Neuralink, ब्रॅडफोर्ड स्मिथसाठी जगाशी संवाद साधण्याचं प्रमुख साधन बनलं आहे. तो व्हिडिओ? त्याने स्वतः एडिट केला. आणि त्यातला आवाज? तो AIने तयार केलेला त्याचा आवाज आहे, त्याच्या बोलण्याच्या जुन्या रेकॉर्डिंगवरून ट्रेन केलेला.
ही घटना मेंदूशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणसाच्या जिद्दीचा अद्भुत संगम आहे.
हे मेंदूतील इम्प्लांट फक्त ALS ग्रस्तांनाच नाही, तर न्यूरोडीजेनेरेटिव्ह आजारांनी ग्रस्त असलेल्या अनेक लोकांचे जीवन बदलू शकते. भविष्यात हेच तंत्रज्ञान दृष्टी परत देऊ शकतं, हालचाल शक्य करू शकतं, बोलणं परत आणू शकतं… आणि कदाचित अशा क्षमताही उघडू शकतं ज्या आज आपण केवळ स्वप्नातच पाहतो.
आणि एकदा हे तंत्रज्ञान अधिक सुरक्षित, परवडणारे आणि सहज उपलब्ध झालं… तेव्हा ते फक्त अपंगांसाठी नसेल – ते प्रत्येकासाठी असेल.
जीवन परत मिळवण्यापासून ते जीवन उन्नत करण्यापर्यंत…
माणसासाठी सुपरपॉवर्स… लवकरच येत आहेत! 🚀🧠✨
सोमवार, ५ मे, २०२५
Fiverr कंपनीचे संस्थापक आणि सीईओ मीचा कॉफमॅ
न यांनी त्यांच्या कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांना उद्देशून नुकताच एक पत्र लिहिले. माझ्या मते नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे पत्र वाचले पाहिजे. येणाऱ्या बदलाबद्दल सजग राहण्यासाठी आणि कामाप्रती असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हे पत्र वाचणे आवश्यक आहे.
(मराठी अनुवाद AI ने केला आहे)
नमस्कार टीम,
मी नेहमीच स्पष्टपणावर विश्वास ठेवतो. मी अशा लोकांचा तिरस्कार करतो जे कटू सत्य सांगण्याऐवजी गोड बोलून सत्य झाकण्याचा प्रयत्न करतात. खरी काळजी म्हणजे एखाद्याला इतकं प्रेमाने आणि जबाबदारीने सांगणं की त्याला सत्य समजावं, शिकता यावं, आणि यशस्वी होता यावं – हाच खरा स्पष्टपणाचा पाया आहे.
म्हणून मी तुम्हाला आज एक कटू सत्य सांगणार आहे – AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तुमचं काम हिरावून घेणार आहे. खरं तर माझंही! हा एक जागे होण्याचा क्षण आहे.
तुम्ही प्रोग्रामर असाल, डिझायनर, डेटा सायंटिस्ट, वकील, कस्टमर सपोर्ट प्रतिनिधी, सेल्सपर्सन, प्रॉडक्ट मॅनेजर, की वित्त सल्लागार — काहीही असाल, AI तुमचं काम हिरावून घेण्यासाठी येत आहे.
जी कामे एकेकाळी ‘सोपी’ समजली जायची ती आता अस्तित्वातच राहणार नाहीत. ‘कठीण’ कामे आता ‘सोपी’ होतील आणि ‘अशक्य’ वाटणारी कामे आता नवीन कठीण कामे ठरतील. जर तुम्ही तुमच्या कामात उत्तम किंवा मास्टर बनला नाहीत, तर पुढील काही महिन्यांत तुमचे करिअर ठप्प होऊ शकते किंवा करिअर बदलायला लागू शकतं. मी इथे Fiverr मधील तुमच्या नोकरीबद्दल बोलत नाही – मी तुमच्या संपूर्ण क्षेत्रात कुठेही टिकून राहण्याच्या क्षमतेबद्दल बोलतोय.
मग आपण काय करू शकतो?
सर्वप्रथम, थोडा वेळ घ्या, हे सत्य पचवा. एक ग्लास पाणी प्या. गरज असेल तर आरशासमोर जोरात ओरडा. आणि मग शांत व्हा. घाबरणं काही उपयोगाचं नाही. चला आता पाहूया, काय केल्याने तुम्ही तुमच्या क्षेत्रात "अपवादात्मक" प्रतिभा बनू शकाल:
तुमच्या क्षेत्रातील नवीनतम AI सोल्यूशन्स शिकून, वापरून मास्टर करा. विविध पर्याय वापरून बघा आणि काय तुम्हाला ‘सुपरपॉवर’ देते ते शोधा. म्हणजेच कमी वेळात जास्त दर्जेदार काम कसं करता येईल हे जाणून घ्या. (उदा. प्रोग्रामर – Cursor, कस्टमर सपोर्ट – Intercom Fin, SentiSum, वकील – Lexis+AI, Legora इ.)
AI मध्ये पारंगत असलेल्या आणि ज्ञान असलेल्या टीममधील लोकांशी संपर्क करा. त्यांच्याकडून नवीनतम गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
तुमचा वेळ हा सर्वात मौल्यवान संसाधन आहे. जर तुम्ही अजूनही 2024 सारखं काम करत असाल, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. आता अपेक्षा आहे अधिक, जलद, आणि प्रभावी कामाची.
प्रॉम्प्ट इंजिनिअर बना. Google आता पुरेसं नाही. LLM आणि जनरेटिव AI ही आता बेसिक्स आहेत. जर तुम्ही त्यांचा तज्ज्ञासारखा वापर करत नसाल, तर तुमचं महत्व लवकरच कमी होईल.
AI टूल्स वापरून संस्थेला अधिक कार्यक्षम बनवण्याच्या कामात सहभागी व्हा. आधी योग्य तंत्र वापरायला शिका, मगच माणसं वाढवण्याचा विचार करा.
कंपनीची स्ट्रॅटेजी समजून घ्या आणि तिचं उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करा. ‘कोणाच्या तरी बोलण्याची वाट न बघता स्वतःहून कल्पना मांडायला शिका.
शिका आणि वाढा यासाठी संधीची वाट बघण्याऐवजी ती स्वतः तयार करा. मी प्रत्येक अशा व्यक्तीला मदत करीन जो स्वतःच स्वतःला मदत करू इच्छितो.
जर तुम्हाला हे सगळं वाचून त्रास झाला, राग आला, किंवा वाटलं की मी फक्त घाबरवतो आहे – तर ते मान्य आहे. तुम्ही हे इग्नोर करू शकता. मी तुमच्यावर प्रेम करतो, आणि शुभेच्छा देतो. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की जर तुम्ही वास्तव नाकारलंत, तर तुमच्यासाठी या क्षेत्रात फारसा उज्ज्वल भविष्य नाही.
पण जर तुम्हाला आतून वाटत असेल की मी बरोबर आहे, आणि आपण सगळे एकत्र इतिहासाच्या योग्य बाजूला उभं राहू इच्छितो, तर मला भेटा. चला आपण चर्चा करूया – पुढे कुठे जायचं, कसं जायचं. आपली कंपनी आणि भवितव्य उज्ज्वल आहे. पण ते सोपं नसेल – कठीण असेल, पण खूपच मूल्यवान ठरेल.
मी शेलीला सांगितलं आहे की पुढच्या काही आठवड्यांत माझं वेळापत्रक मोकळं करावं, जेणेकरून तुम्हाला हवं असल्यास माझ्याशी चर्चा करता येईल.
तुमची वाट पाहतो.
- मिचा
आता कॉम्पुटर प्लॅनेट नवीन अपडेट्स गडजेट्स , कॅमेरा , प्रोडक्ट संदर्भात माहीती साठी whatsapp वर वर देखील उपलब्ध आहे.
computer planet 1.1चा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/KJgcoykoRCOLOA9vw4hDyi
🕵♂For more
exciting products, Download the Telegram app and join our Channel catalogue for product list of Cctv , spy , hidden cameras and fancy electronic, gifting products with specifications and prices. Link below 👇🏻👇🏻👇🏻
https://t.me/spy_planet
https://linktr.ee/Satful
मंगळवार, २१ जानेवारी, २०२५
अवघे बोलू कौतुके !
अवघे बोलू कौतुके !
उत्तम काम किंवा कार्य केल्याबद्दल प्रशंसेचे चार शब्द आपण बोलतो त्याला कौतुक असे म्हणतात. वरवर दिसायला सामान्य पण प्रत्यक्षात मात्र असामान्य असा प्रकार म्हणजे कौतुक ही गोष्ट होय ! सर्व साधारण पणे प्रत्येक माणसात काही न काही गुण आणि दोष असतात. कौतुक करण्यात कंजुषपणा दाखवणे हा माणसाचा सर्वात मोठा दोष होय. वास्तविक कौतुक करायला ना खर्च, ना कष्ट तरीसुद्धा कौतुक करण्याच्या बाबतीत माणूस कुचराई करत असतो.
येथे प्रश्न निर्माण होतो तो हा की, कौतुक करण्यात माणूस कंजूषी का दाखवतो? याचे उत्तर असे की, एकतर कौतुक करण्यासाठी मनाचा जो मोठेपणा लागतो तो सामान्यपणे माणसाजवळ नसतो. काही माणसे तर अशी असतात की ते स्वतः इतरांचे कौतुक करीत नाहीच पण दुसऱ्याने जर कोणाचे कौतुक केले तर तेसुद्धा त्यांना खपत नाही. अशी जरी वस्तुस्थिती असली तरी एक गोष्ट मात्र प्रकर्षाने आढळते ती की, प्रत्येक माणसाला त्याचे इतरांनी कौतुक करावे असे मनापासून वाटते.
इतरांनी तुमचे कौतुक करावे असे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर इतरांचे कौतुक करण्यास आपण शिकले पाहिजे.
दुसऱ्यांचे कौतुक केल्याने आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. पहिला म्हणजे ज्या माणसाचं आपण कौतुक करतो त्याच्याबरोबर आपले संबंध खूप सुधारतात. त्या माणसाला धन्यता वाटते. आणि मुख्य म्हणजे आपल्याबद्दल चांगले शब्द ऐकल्याने अधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहनही आपोआप मिळतं.
एवढेच नव्हे तर त्या माणसाचं कौतुक झाल्यामुळे इतरांना सुद्धा उत्तम काम करण्याची स्फूर्ती मिळते. आणि एकंदर सकारात्मक ऊर्जा वातावरणात दिसून येते.
मात्र कौतुक करण्यात कोणत्याही प्रकारचा दांभिक पणा असता कामा नये. अगदी शंभर टक्के प्रामाणिक पणे कौतुक केले पाहिजे.
क्या आपको ऐसा गुप्त कॅमेरा चाहिए ?
जो किसी को नजर नाही आएगा जीसका live विडिओ केवल आप ही काहीसे भी मोबाईल पे देख पाएँगे
Website :- www.securityplanet.co
Product वीडियों :- - https://www.youtube.com/user/MrSatful?sub_confirmation=1
Website social media & Product Photo , व्हिडिओ information :- https://linktr.ee/Satful
Follow thislink to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919822358631
हॅलो📞📱 आपको प्रॉडक्ट देखना है तो व्हिडिओ कॉल लगाके दिखा सकतेहै. 11am to 7pm
आप मुझे hi मेसेज भेजने के बाद उपर की लिंक ऍक्टिव्हेट ओपन होगी🙏
घरासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या पतीचे किंवा पत्नीचे कौतुक आपण किती वेळा करतो? आपल्या आई वडिलां चे, मुलांचे, मित्रांचे, शेजाऱ्यांची, सहकाऱ्यांचे..... किंवा अगदी नुकताच भेटलेल्या कोणत्याही व्यक्ती चे कौतुक करण्याची संधी आपला कितीतरी वेळा मिळते.... पण आपण बऱ्याच वेळेला ती संधी ओळखतच नाही.
कुठलीही गोष्ट सरावाने साध्य होते तशीच मित्रांनो कौतुक करणे हेदेखील आपल्याला सरावाने जमू शकते. दररोज किमान एका तरी व्यक्तीचे अत्यंत प्रामाणिक पणे कौतुक करेन असे मनाशी ठरवा. आणि मग बघा, आजूबाजूला अशा अनेक संधी आपल्याला दिसायला लागतील.
कोणाचा प्रामाणिकपणा, मनमिळावू पणा, शिस्त, कष्ट, रूप, नीटनेटकेपणा, टापटीप पणा, वक्तशीरपणा, स्मरणशक्ती, हास्य, दातृत्व, कर्तुत्व, विनोदबुद्धी, तर्कबुद्धी, अभ्यास..... अशा कितीतरी गोष्टींबद्दल आपण आसपासच्या लोकांचे पासून कौतुक करू शकतो. समोरासमोर शक्य असेल तेव्हा, आणि जेव्हा शक्य नसेल तेव्हा फोनवर, व्हाट्सअप वर किंवा सोशल मीडियामध्ये नक्कीच आपण हे करू शकतो. चला तर मग आजच सुरुवात करुया ! "अवघे बोलू कौतुके" !
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्यातून पैशांच्या गोणी बाहेर पडल्या. गोणी फुटून त्यातील नोटा इतस्ततः विखुरल्या. ड्रॉयव्हरला हे लगेच कळले नाही आणि गाडी तशीच भरधाव पुढे निघून गेली.
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडल...
-
स्पाय गुप्तचर कॅमेरा खरेदी चे 5 टिप नमस्कार! छुपा कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करताना, आपण अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. 1.. प्रथम, ...
-
नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत . आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे मिशन खरा ...
.jpg)

.jpg)




