गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

65 बी सर्टिफिकेट म्हणजे काय ???

65 बी सर्टिफिकेट म्हणजे काय ???

 65 बी सर्टिफिकेट हे कोणताही डिजिटल  EVIDENCE कोर्टामध्ये देतो. त्यासाठी 65 बी लागतो यामध्ये जे काही डिजिटल पुरावा आहे त्यामध्ये छेडछाड, एडिट, DOCTERED, TEMPERED आहे नाही असं सर्टिफिकेट, आपणाला त्या सर्टिफिकेट द्वारे दाखवायचं असतं

आपण जे ऑडिओ किंवा रेकॉर्ड केलेला असतो ते आपणाला नेक्स्ट इन्वेस्टीगेशन करण्याकरता उपयोगी पडतं आणि त्याद्वारे त्याचा आपण कोर्टामध्ये वापर करू शकतो पुरावा म्हणून त्याला 65 बी सर्टिफिकेट दिलं तर त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो.

जे तुम्ही FORENSIC तज्ञांच्या रिपोर्ट बनवून घेता तो रिपोर्ट इंडियन EVIDENCE ACT  नुसार कोर्टामध्ये एक्सेप्ट केला जातो. INDIAN EVIDENCE ACT, SECTION 45(A) नुसार फॉरेन्सिक तज्ञांचे मत त्यामध्ये उपयोगी घेतलं जातं.


SPY camera, HIDDEN CAMERA , VOICE RECODER ,safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो G- guarding (protection) I- innovative products T- technology O- organisation committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

बदलाची लाट...नव्हे त्सुनामी !

 बदलाची लाट...नव्हे त्सुनामी !

(छोटा धडा, मोठी शिकवण)



कॅमेऱ्याच्या शोध लागल्यापासून गेल्या काही वर्षांपर्यंत जेवढे फोटो काढले गेले....तेवढेच फोटो आता जगभरात साधारण एका दिवसात काढले जातात.


इंजिनमुळे चालणाऱ्या मोटार 1990 पर्यंत हजारात एकाकडे असायची आता मोठ्या शहरात हजारात शंभर लोकांकडे कार आहेत. आता इलेक्ट्रिक कार दहा हजारात एकाकडे आहे ...येत्या काही वर्षांत फक्त इलेक्ट्रिक कार्सच रस्त्यावर दिसतील. सर्वोत्कृष्ट इंजिन बनवणाऱ्या मर्सिडीज कंपनीने नुकताच आपण यापुढे पेट्रोल डिझेल इंजिनवर काम करणार नसल्याचे घोषित केले आहे. कारण भविष्य इलेक्ट्रिक गाड्यांचेच आहे.


पाहिले 50 मिलियन वापरकर्ते मिळवायला फेसबुकला 2.5 वर्षे लागली, व्हाट्सअप्पला 15 महिने, angry birds या खेळाला 15 दिवस तर पॉकेमन गो ला केवळ 5 दिवस लागले.


काही वर्षांपूर्वी ज्यांना ATM वापरायला भीती वाटत होती ते आज मोबाईल वरून धडाधड पेमेंट्स करत आहेत. आपल्याकडे 10-15 वर्षांपूर्वी स्मार्टफोन नव्हता यावर विश्वास बसत नाही. आजच्या पिढीला आपले आईबाबा गुगल शिवाय शिकलो होतो यावर विश्वासही बसणार नाही.


मित्रांनो बदल (change) शतकानुशतके घडतो आहे...त्यात काही वाद नाही. पण खरा प्रश्न आहे बदल ज्या वेगाने घडत आहे त्याचा. सरसर वाढणाऱ्या वेली सारखा तंत्रज्ञानातील बदल आपल्या आयुष्यात वेटोळे घालत पुढे सरकत आहे. 


एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही बदलाची सुरुवात धिमी असते...आणि अचानक काही वर्षांतच हा बदल प्रचंड वेग घेतो. हे सर्व इतक्या वेगाने घडतं की कधी घडलं ते कळत देखील नाही.


ज्यांनी येणाऱ्या बदलांचा अंदाज घेतला आणि त्यावर कृती केली ते पुढे गेले. ज्यांनी बदल स्वीकारला नाही ते मागे पडले आणि ज्यांना बदल होतानाच दिसला नाही त्यांची फरफट झाली. हा इतिहास आहे. 


हाताने काम करण्यात, कलाकुसरीत माहिर असलेले भारत नि चीन हे दोन देश एकेकाळी GDP नुसार जगात सगळ्यात पुढे होते. पण युरोपने हातांच्या जागी मशीन्स आणल्या आणि औद्योगिक क्रांतीत बाजी मारली. 

पुढे युरोप/अमेरिकेने माहितीच्या क्रांतीत प्रगती केली आणि गेली 25-30 वर्ष आघाडी घेतली. आता web 3.0, industry 4.0 या नव्या तंत्रज्ञानाची लाट येऊ घातली आहे. भारत आणि चीनला पुन्हा पुढे जायची संधी आहे. 


अनेक कंपन्या, सरकारी संस्था आतापासूनच cross-skilling करत आहेत. कारण आताचे स्किल्स काही वर्षानंतर निरुपयोगी ठरतील. जुन्या गोष्टी विसरून (unlearn) , नव्या गोष्टी शिकून (learn) त्याचा सराव करणे (execute) ही त्रिसूत्री आपल्याला अंगी बाणवावी लागेल.

SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets GITO - जिटो G- guarding (protection) regards Satful Sonawane Computer planet 7057573102 #GITO

खूप कमी लोकांना त्यांच्या जीवनकाळात जग बदलून टाकणारा बदल पाहण्याचे भाग्य लाभते.आपण खरंच भाग्यवान आहोत कारण येत्या 20 वर्षात हा बदल घडताना आपण साक्षी असणार आहोत. मात्र केवळ साक्षी न राहता आपण या लाटेवर आरूढ होणार की या लाटेच्या तडाख्यात सापडणार हे आपले आपणच ठरवायचे आहे.

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

Church चे Father बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते.

 एके दिवशी मुंबईतील एका मोठया Church चे Father बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते. 

बोलता बोलता बाबासाहेब त्या Father ला म्हणाले की, "तुम्ही Church मध्ये प्रामुख्याने (prayer) प्रार्थनेसाठी कोणत्या version

च्या 'बायबल'चा वापर करता?"

त्यावर ते Father गोंधळून गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले, "कोणत्या बायबलचा वापर करता म्हणजे? "बाबासाहेब म्हणाले, "बायबलचे एकूण 18 versions आहेत. त्यापैकी आपण प्रारथनेसाठी कोणते

version वापरता? " व लगेचंच बाबासाहेबांनी त्यांच्या 'राजगृहा'वरिल Librarian ला बायबलची अठराची अठरा versions त्यांच्या कपाटामधून काढून दाखवायला

सांगीतली. 

बाबासाहेबांकडे बायबलची अठराची अठरा versions पाहून, ते father म्हणाले, "या माणसाइतका बायबलचा अभ्यास, christian धर्माच्या धर्मगुरूचा सुद्धा नसेल.

" खरोखरच, जगातल्या एकाही धर्माच्या धर्मगुरूचा अभ्यास बाबासाहेबाएवढा नव्हता. म्हणूनच त्यांनी 1956 ला इतर धर्म सोडून देऊन, सतत विज्ञानाच्या कसोटीवर

टिकणा-या ( बौद्ध धर्माची "दिक्षा" ) 

दिली.

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

या मराठी माणसामुळे टाटांनी गाडीला "सुमो" हे नाव दिलं !

 या मराठी माणसामुळे टाटांनी गाडीला "सुमो" हे नाव दिलं !


(छोटा धडा, मोठी शिकवण)


टाटा सुमो हे नाव ऐकलं की कोणालाही चटकन वाटतं, की टाटांनी जॅपनीझ सुमो पहिलवानांशी साधर्म्य साधणारं आपल्या कारचं दणकट मॉडेल बनवलं म्हणूनच त्यांना टाटा सुमो हे नाव या गाडीला द्यावसं वाटलं असणार ... पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, टाटा सुमोंनी आपल्या या गाडीला हे नाव दिलं ते सुमंत मूळगावकर यांना त्यांच्या कंपनीप्रती असलेल्या निष्ठेच्या प्रित्यर्थ सन्मान म्हणून !


ही सत्यकथा खरोखरीच मोठी रंजक आहे. 


टाटा मोटर्सचे अधिकारी दररोज जेवणाच्या सुट्टीत एकत्र जमून जेवत असत, पण त्यांच्यात कधीच सुमंत मूळगावकर जेवायला येत नसत. ते दररोज जेवणाच्या ब्रेकमध्ये आपली कार काढून कुठेतरी बाहेर जात असत आणि ब्रेक संपण्यापूर्वी ऑफीसमध्ये परतत असत. हा त्यांचा शिरस्ता जवळपास रोजचाच झालेला होता. त्यामुळे काहीजणांना तर असं वाटू लागलं होतं, की त्यांना बहुधा रोज कुठेतरी पंचतारांकीत रेस्तराँमध्ये टाटा डीलर्सकडून जेवणाचं आमंत्रण मिळत असावं आणि ते अशाच ठिकाणी जात असले पाहिजेत. 


एके दिवशी कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी सुमंत यांच्या नकळत लंच ब्रेकमध्ये ते बाहेर पडताच त्यांचा 

पाठलाग केला आणि त्यांनी जे पाहिलं ते निव्वळ अविश्वसनीय होतं. 


सुमंत मूळगावकर कोणत्याही पंचतारांकीत रेस्तराँमध्ये जात नसून ते दररोज हायवे लगतच्या एका ढाब्यावर जेवायला जात असतं. यामागे कारण हे की ढाब्यावर येणाऱ्या ड्रायव्हर्सशी त्यांना काही वेळ बोलायला मिळत असे. त्यांच्याशी बोलताना सुमंत त्यांना टाटा मोटर्सच्या ट्रकमधले गुणदोष विचारत असत, त्यांना हे ट्रक चालवताना येणाऱ्या काही समस्या ज्या कंपनीने सुधारल्या पाहिजेत त्यांबद्दलही ते चर्चा करून ते मुद्दे आपल्या जवळच्या एका डायरीत नोंदवून ते परत वेळेत ऑफीसमध्ये येत. हा जो फीडबॅक त्यांना मिळत असे त्यानुसार ते आपल्या कंपनीतील कामात त्याचा वापर करून अधिक सुधारणा करत असत. 

सुमंत यांच्या कामाविषयी जेव्हा कंपनीला हे कळलं त्यानंतर टाटा कंपनीच्या प्रती असलेली ही निष्ठा, कामाप्रती असलेला हा सच्चेपणा, हा प्रचंड उत्साह पाहून कंपनीने आपल्या या सच्च्या अधिकाऱ्याला सलाम म्हणून त्यांच्या नावाची अक्षरे घेऊन आपल्या गाडीला नाव दिले, टाटा सुमो (सुमंत मूळगावकर). 


सुमंत यांनी आपल्या कामातून एक नवा आदर्श रुजवला तसंच टाटा कंपनीनेही आपल्या कंपनीतील एका अशा प्रेरणादायी अधिकाऱ्याला निराळ्या पद्धतीने गौरवून जनमानसात आपले स्थान श्रेष्ठतम केले. 


कोण होते सुमंत मूळगावकर ?

सुमंत मूळगावकर हे एक सुप्रसिद्ध भारतीय उद्योजक होते. टाटा मोटर्सची स्थापना व वृद्धी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते टाटा स्टीलचे वाईस चेअरमन आणि मारूती सुझुकीचे नॉन एक्सिक्युटीव्ह चेअरमन होते. 1 जुलै 1989 मध्ये ते हे जग सोडून गेले. भारत सरकारने त्यांना मरणोपरांत पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या स्मरणार्थ जमशेदपूरमधील टेल्को कॉलनीत सुमंत मूळगावकर स्टेडीयम उभारण्यात आले. मूळगावकर हे अतिशय नम्र, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. ते स्वतः निसर्गप्रेमी होते तसंच त्यांना विविध कलांचीही आवड होती. त्यांनी सामाजिक कार्यातही भरीव योगदान दिलं. 

SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets
GITO - जिटो
G- guarding (protection)
I- innovative products
T- technology
O- organisation
committed to give you more advanced service & products
regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102

cyber crime

Cyber Crime Helpline is associated with Gov of India which deals in online fraud, Extra Marrital Affairs, GF BF Affairs investigation,Theft management, social media fraud, Blackmailing, Business Frauds, Sextortions, Extortion, Mobile Location tracing, Missing Person, Information Gathering, Loan & Credit card recovery Harrasment,Cyber Security Audit, Legal Advice, Court Matter, Police Complaint assistance, Pen Testing and Vulnerability Assessment. Form 65.
For more help please contact below e-mail address and contact.
info@computerplanet.info
WhatsApp: 9822358631

शनिवार, २४ डिसेंबर, २०२२

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने जेव्हा "जिओ" लाँच केला होता तेव्हाची गोष्ट.

छोटा धडा, मोठी शिकवण

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने जेव्हा "जिओ" लाँच केला होता तेव्हाची गोष्ट.

न भूतो न भविष्यती अशा किंमतीमध्ये रिलायन्सने जिओ च्या सेवा उपलब्ध करुन दिल्या होत्या. फक्त डेटा साठी पैसे आकारण्यात येत होते आणि कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉल करण्यासाठी बिलकुल पैसे चार्ज केले जात नव्हते. त्यामुळे भारतीयांनी जिओ फोनवर उड्या घेतल्या. आणि कॉल्स फुकट असल्याने प्रत्येकजण भरपूर कॉल्स करायला लागला.

आता झालं असं की भारतामध्ये टेलिकॉम क्षेत्रात एक नियम आहे. ज्या नेटवर्क वरुन दुसर्‍या नेटवर्क वर कॉल केला जात असेल त्या नेटवर्कला "इंटरकनेक्ट चार्जेस" (IUC) देणे भाग असते. या नियमानुसार जिओ वरुन ज्या नेटवर्कला फोन जात होते त्या सर्व नेटवर्क्सना रिलायन्सकडून "इंटरकनेक्ट चार्जेस" द्यावे लागत होते. यामुळे जिओ ला "इंटरकनेक्ट चार्जेस"चा प्रचंड भुर्दंड पडत होता. आधीच ग्राहकांकडून रिलयन्स पैसे घेत नव्हते, आणि त्याचबरोबर हा अधिकचा खर्च रिलायन्सला द्यावा लागत होता. दर तीन महिन्यांत साधारण २५० करोड इतकी रक्कम "इंटरकनेक्ट चार्जेस" म्हणून दिली जात होती.

मित्रांनो, जिओने या अडचणीवर मात करण्यासाठी एक अफलातून कल्पना राबविली.

साधारणपणे कॉल लागल्यानंतर समोरची व्यक्ती कॉल उचलेपर्यंत ४५ सेकंदाचा वेळ दिला जातो. जर ४५ सेकंदात कॉल उचलला नाही तर फोन आपोआप बंद होउन "मिस्ड कॉल" जातो. रिलायन्सने जेव्हा जिओ मधून इतर नेटवर्क्स मध्ये कॉल जायचा तेव्हा ही वेळ ४५ सेकंदांपासून २० सेकंदांपर्यंत कमी केली. त्यामुळे झाले काय की कॉल लवकर कट व्हायचा आणी दुसर्‍या नेटवर्क वरील फोनला मिस्ड कॉल जायचा. आता मिस्ड कॉल आल्याने समोरील व्यक्ती कॉल करायला लागली. साहजिकच "इंटरकनेक्ट चार्जेस" आता इतर नेटवर्क्स कडून जिओ ला मिळायला सुरुवात झाली. जिओ ने आपल्यावर आलेली परिस्थीती इतर नेटवर्क्सवर उलटवली आणि एअरटेल, व्होडाफोन, आयडिया कडून इंटरकनेक्ट चार्जेस कमवायला सुरुवात केली. इतर कंपन्यांना हे लक्षात यायला साधारण दोन वर्षं लागली. तोपर्यंत जिओ ने नियमांतील चोरवाटा शोधून करोडो रुपये कमविले होते.

मित्रांनो, मुकेशभाई अंबांनींची कंपनी कसा विचार करते त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मुकेश भाई किती "बेरकी"विचार करतात ते आता तुम्हाला कळले असेलच. परिस्थीती कशीही असो त्यातून मार्ग काढता येतोच ही शिकवणही आपल्याला यातून मिळते.

SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera,  technology gadgets

GITO - जिटो
G- guarding (protection)
I- innovative products
T- technology
O- organisation

committed to give you more advanced service & products

regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102
#GITO

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

स्पर्शाची किमया

 स्पर्शाची किमया

(छोटा धडा,मोठी शिकवण)


बोरिस सायरोलीक नावाचे एक मानसशास्त्रज्ञ आहेत. माणसाच्या आयुष्यात प्रेमाचा काय परिणाम होतो या विषयावर त्यांनी सुमारे 50 वर्षे अभ्यास केला. ते स्वतः दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला नाझी छळ छावणी मध्ये बंदी होते.


बोरीस यांनी रोमानिया मध्ये एका अनाथालयामध्ये असलेल्या मुलांच्या काही चाचण्या घेतल्या. त्यांनी जन्मापासून सुरुवातीचे दहा महिने आई-वडिलांचे प्रेम न मिळालेल्या मुलांचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की जवळपास सर्वच मुलांच्या मेंदूमधील Prefrontal Cortex आणि Amygdala मध्ये काही कमतरता होती.


हीच मुले पाच वर्षांची झाल्यानंतर आढळले की त्यांच्यापैकी दहा टक्के मुले मानसिक आजाराने ग्रस्त होती . आणी 90% मुले आत्मकेंद्रित बनली होती.


बोरिस यांच्यामते लहानपणी मायेचा स्पर्श न मिळाल्याने या मुलांची मानसिक वाढ खुंटली होती. आई वडिलांच्या प्रेमळ स्पर्शातून जी उत्तेजना मेंदूला मिळते तीच या मुलांना मिळाली नव्हती.


नंतर या मुलांना काही वेगवेगळ्या कुटुंबाकडे पाठविण्यात आलं. तिथे त्यांना नवे पालक , कुटुंब मिळालं आणि मुख्य म्हणजे मायेचा स्पर्श मिळाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढील वर्षभरातच या सर्व मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये बरीच सुधारणा दिसून आली आणि अगदी इतर सामान्य मुलांप्रमाणे ही मुले वागायला लागली. एवढेच नव्हे तर त्यांचं प्रेंटल कॉर्टेक्स देखील विकसित झाल्याचे दिसून आले


मित्रांनो ही आहे स्पर्शाची किमया आपल्या इतर ज्ञानेंद्रियां पैकी सर्वात जास्त दुर्लक्ष गेलेला हे ज्ञानेन्द्रिय. मिठी मारल्यामुळे, हातात हात घेतल्यामुळे, आलिंगन दिल्यामुळे जी विश्वासाची प्रेमाची भावना तयार होते त्याचा मानवी मेंदूच्या विकासात महत्वाचा वाटा असतो.


ज्या संघातील खेळाडू जिंकल्यावर एकमेकांना मिठी मारतात त्यांची पुढील सामन्यांमध्ये जिंकण्याची शक्यता वाढते असे एका अभ्यासद्वारे कळले आहे.


स्पर्शाची ही जादू नक्की अनुभवा. जेव्हा एखाद्या झाडाला स्पर्श कराल तेव्हा हातानेच डोळ्याप्रमाणे झाडा कडे पहा.

जेव्हा बाहेर फिरायला जाल तेव्हा हवेचा , जमिनीचा स्पर्श अनुभवा. हवेचा गारवा, आर्द्रता आपल्या त्वचेला जाणवते त्या स्पर्शाची जाणीव करून घ्या.

पायात चप्पल न घालता गवतावर, मैदानावर चालून पहा. पायांना तो स्पर्श कसा वाटतोय याकडे जाणीवपूर्वक पहा.


आपल्या रोज वापराच्या गोष्टीना देखील प्रेमाने स्पर्श करण्याची सवय करा. उदाहरणार्थ एखादा कपडा घालताना त्याच्यावरून हात फिरवा, त्याच्या texture चा अनुभव घ्या.


स्पर्श ही एक अनमोल देणगी आहे. ही देणगी वेचण्याची आणि वाटण्याची एकही संधी चुकवू नका.


वरील उतारा


Ichigo Ichi या पुस्तकातील आहे !


मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

स्पर्धात्मक फायदा Competitive Advantage

                                          स्पर्धात्मक फायदा Competitive Advantage 


एका मुलाला जन्मापासूनच उजवा हात नव्हता. दहा वर्षाचा होता तेव्हा त्याने कराटे क्लब जॉईन करायचं ठरवलं. त्याला लवकरच आवड निर्माण झाले आणि तो नेहमी सरावासाठी जायला लागला. एकदा त्याने आपल्या गुरु जवळ स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा दाखवली पण एका हाताने मी कराटे स्पर्धेत भाग घेऊ शकतो का याची त्याला शंका होती.


त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं की तू नक्कीच स्पर्धेत भाग घेऊ शकतोस आणि जिंकूही शकतोस. पण त्यासाठी तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि मी जे सांगेन त्यानुसार तयारी करावी लागेल. मुलाने लगेच होकार दिला.


पुढचे काही दिवस त्याचे गुरु त्याला रोज एकच डाव शिकवत होते आणि त्याचा सराव करायला लावत होते. बरेच दिवस हेच चालू होतं. आपल्या क्लब मधील इतर मुलांना वेगवेगळे डाव शिकताना व वापरताना पाहून त्याला सारखं वाटत होतं की मला केवळ एकच डाव शिकवला जातोय. याच्याने मी कसा जिंकू शकेन?


न राहवून त्याने शेवटी गुरुजींना विचारलंच. गुरुजी म्हणाले, तू त्याची चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव आणि या एकाच डावाचा सराव कर. त्याने पुढे मनापासून सराव करायला सुरुवात केली.


काही दिवसानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आणि हा मुलगा प्रत्येक फेरीमध्ये जिंकत जिंकत पुढे अंतिम फेरीतही पोहोचला. आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्याने अंतिम फेरी देखील सहज जिंकली. हे पाहून त्याने,त्याच्या पालकांनी आणि इतर सगळ्यांनी गुरुजींना विचारलं की हे कसं शक्य झालं?


तेव्हा गुरुजींनी सांगितलं की मी त्याला जो डाव शिकवला होता त्यावर एकमेव बचाव म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या उजवा हात पकडणं हे होतं पण याला उजवा हातच नाही त्यामुळे कोणीही या डावापासून बचाव करू शकला नाही.


मित्रांनो ही झेन कथा आपल्याला थोडक्यात Competitive Advantage म्हणजे काय ते सांगते. अशी गोष्ट जी आपले स्पर्धक करू शकत नाहीत किंवा सहजासहजी कॉपी करू शकत नाहीत. 


चांगला Competitive Advantage तयार केला तर बिजनेस मध्ये स्पर्धकांवर मात करणे आणि जास्तीत जास्त ग्राहक मिळवणं सोपं होत जातं.

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

करिअर खाजगी गुप्तहेर बना !

 सीआयडी किंवा एक शून्य शून्य सारख्या मालिका देखील अगदी हौसेने बघतो, पण करिअर म्हणून यातील प्रमुख पात्रांचा अर्थात डिटेक्टिव्ह किंवा गुप्तहेराचा विचारच करत नाही. कारण इथे गुळगुळीत, साचेबद्ध, एक विशिष्ट चौकटीतला, पारंपरिक धो-धो मार्क पडतील, मेरिट लिस्ट लागेल असा काही भक्कम अभ्यासक्रम नाहीये. अतिशय तीक्ष्ण निरीक्षण शक्ती, एखाद्या गोष्टीचं, घटनेचं मुळासकट खोलवर जावून विश्लेषण करण्याची कुवत (अ‍ॅनॅलॅटिकल अ‍ॅबिलिटी), समयसूचकता, धाडस, जिद्द, चिकाटी, सेवाभाव, तल्लख बुद्धिमत्ता, नैतिक मूल्यांची जोपासना, प्रामाणिक प्रयत्न यांचा एकत्रित मिलाफ असणारी व्यक्ती खासगी गुप्तहेर म्हणून काम करू शकते. गुप्तहेर होण्यासाठी मुळात डिप्लोमा इन डिटेक्टिव्ह, बॅचलर ऑफ डिटेक्टिव्ह किंवा मास्टर्स अशा प्रकारचा कुठलाही कोर्स किंवा अभ्यासक्रम किंवा कॉलेज किंवा विद्यापीठ नाही. पण तरीही वरील गुणांच्या जोरावर आपला विद्यार्थी मित्र या अतिशय वेगळ्या वाटेवरच्या क्षेत्रात सहज मुशाफिरी करू शकतो.

खासगी गुप्तहेराचे कामाचे स्वरुप कसे असते बरं? एखाद्या गुन्हेगाराला पकडणं, मग तो चोरी करणारा चोर असो, दरोडे टाकणारा, लुबाडणारा दरोडेखोर असो, सोनसाखळी चोरणारा किंवा शांत वसाहतींमध्ये घुसून नगदी रक्कम, सोने चोरणार असो किंवा कुठल्याही, संशयास्पद वाटणा-या घडामोंडीमध्ये सहभागी असणारी व्यक्ती असो, त्याला पकडण्याचे काम हे खासगी गुप्तहेर करू शकतात. हल्ली बहुतेक ठिकाणी कॉर्पोरेट जगतामध्ये सुद्धा एखाद्या गलेलठ्ठ पगाराच्या, उच्च पदावरील नेमणुकीसाठी किंवा तिजोरी सांभाळणे किंवा रोकड हिशेब तपासणा-या व्यक्तीचे, संशयास्पद चारित्र्य किंवा वर्तनाचा शोध घेण्यासाठी खास गुप्तहेर नियुक्त केले जातात आणि त्या गुप्तहेरांकडून आणलेल्या माहितीनुसार त्याचे विश्लेषण केले जाते. बरेचदा श्रीमंत किंवा उद्योगपती किंवा चित्रपट तारकांच्या घरी वेगवेगळ्या कामासांठी येणा-यांवर नजर ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेर नेमलेले असतात.
कित्येक वधू-पिता आपली मुलगी ज्या घरामध्ये सून म्हणून वावरणार आहे, त्या घराची पार्श्वभूमी, नवरा मुलगा, त्याच्या सवयी, व्यसने, त्याची नोकरी/व्यवसाय, मित्र कंपनी या गोष्टींची खात्रीलायक चौकशी करण्यासाठी सुद्घा खासगी गुप्तहेरांचा वापर करताना दिसतात. म्हणजेच या क्षेत्रामध्ये संधी अतिशय मुबलक प्रमाणात आहेत. फक्त इथे काही दहा ते सहाच काम नसतं त्यामुळे एखादी ‘केस’ सोडवण्यासाठी कदाचित पंधरा दिवस लागतात तर कधी-कधी सहा-सहा महिन्यांचा अवधी सुद्धा लागू शकतो. गुप्तहेराची फी ही त्या कामाच्या वेळखाऊपणावर किंवा गुंतागुंतीवर अवलंबून असते. जितकी आव्हानात्मक, गुंतागुंतीची केस तितकीच फी ज्यादा म्हणजे या क्षेत्रामध्ये पैसाही ब-यापैकी मिळू शकतो. ना कोर्स ना सिलॅबस अशा या क्षेत्रामध्ये जर कुणाला यायचं असेल तर त्याने किंवा तिने किमान पदवीपर्यंतचं तरी शिक्षण घ्यायलाच हवं. अगदीच शिक्षणाची अट नाही म्हणजे दहावीनंतरच या क्षेत्रात येण्याचा वेडेपणा करु नये. पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन, मानसशास्त्राचा अभ्यास करीत, स्वतःमधील क्षमतांचा वापर करुन मग निर्णय घेणं योग्य करु शकते, कारण हे क्षेत्र सर्वस्वी तुमच्या धाडसावर, बुद्धिचातुर्य, समयसूचकतेवर, निरीक्षणावर आधारलेले आहे. शिवाय चेह-यावरुन माणसं ओळखू शकणं किंवा हस्तरेषा, शारीरिक ठेवण, डोळ्यांच्या हालचालींवरुन स्वभाव अशा गोष्टींचा अभ्यास असणे इथे उपयोगाचं ठरु शकतं. बरेचदा पोलिस यंत्रणेची वेगवेगळी मदत घ्यावी लागते. एकदा जम बसल्यावर स्वसंरक्षणाचा परवानादेखील मिळू शकतो. समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, गुन्हेगारी प्रवृत्ती, गुंडगिरी, अत्याचार, बलात्कारांसारख्या गोष्टी ज्यांना मनापासून संपवायच्यात, त्यांच्यासाठी हे क्षेत्र उपयुक्त आहे. खासगी गुप्तहेरांबरोबर किंवा त्यांच्या यंत्रणेत काम करण्याच्या अनुभवाचा खूप फायदा होतो. Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv,Spy / Hidden Camera, Stun gun,Spy Pen. M-9822358631,9503852341, Gito Spy
+91 70575 73102

गुप्त पद्धतीने इनव्हेस्टिगशन व पुरावे काढुन मिळतील तसेच वाॅच करणे,

 प्रि - पोस्ट मॅट्रिमोनिअल इनव्हेस्टिगशन , पोटगी , मुलांची कस्टडी ,अफेअर, डिव्होर्स या सर्व प्रकरणांवर गुप्त पद्धतीने इनव्हेस्टिगशन व पुरावे काढुन मिळतील  तसेच वाॅच करणे, पैशाचा फ्राॅड, मिसिंग व्यक्तीचा शोध घेणे, एम्प्लॉय, कंम्पणी व्हेरीफिकेशन करणे,स्टिंग आॅपरेशन ,सायबर क्राईम व मोबाईल डाटा मिळवणे इ सर्व प्रकारची गुप्त पद्धतीने माहीती काढुण मीळेल.. 

आपल्या कडे असलेले क्लाईन्ट  त्याचा समस्या,त्याना हवे असलेले पुरावे आम्ही आपल्याला मिळवुन देऊ
एजन्सी ही एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी आहे.
       आपण आमच्याशी संलग्न होऊन तुमच्या जवळच्या ज्या व्यक्तींना आमच्या सर्व्हिसेस ची गरज असेल त्यांना आमच्या सर्विसेस साठी जोडुण दिल्यास माहीती गुप्त राहील.
 या विषयावर सविस्तर माहिती साठी आपण फोन काॅल वर डिटेल मध्ये बोलू शकतो किंवा आपण अपाॅयमेंट देत असताल तर आम्ही आपल्या शाॅप ला विझिट देऊ. आपण आपली प्रतिक्रिया कळवावी.
हेरगिरी म्हणजे गुप्त किंवा गोपनीय माहिती उघड न केलेल्या स्त्रोतांकडून मिळवणे किंवा मूर्त फायद्यासाठी माहिती धारकाच्या परवानगीशिवाय ती उघड करणे. सरकार, कंपनी, गुन्हेगारी संस्था किंवा स्वतंत्र ऑपरेशन यांच्या सेवेत असणारी कोणतीही व्यक्ती किंवा हेरगिरी करणारी टोळी (हेरांचा एक सहयोगी गट) हेरगिरी करू शकते

.Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv,Spy / Hidden Camera, Stun gun,Spy Pen. M-9822358631,9503852341, Gito Spy
+91 70575 73102

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

What is your Strategy ?


(छोटा धडा,मोठी शिकवण)

What is your Strategy ?

गरुड सापाला जमिनीवर मारत नाही, तो सापाला घेऊन उंच आकाशात जातो. कारण साप हवेत असताना काहीच हालचाल करू शकत नाही. सारपटण्या साठी जमीन नसल्यामुळे साप निशस्त्र होतो.

कोळी आपल्या शिकारी साठी जाळं विणतो आणि त्यात शिकार येण्यासाठी कित्येक तास वाट पाहतो. शिकार सापडल्यानंतर सुद्धा कोळी लगेच शिकार खाऊ शकत नाही... तर अन्नाविना शिकार गतप्राण होईपर्यंत वाट पाहतो.


जंगली कुत्रे शिकार हेरून तो दमेपर्यंत त्या प्राण्याचा पाठलाग करतात. ते स्वतः मात्र कळपाने धावत असल्याने आळीपाळीने पुढे जातात त्यामुळे थकत नाहीत.

वाघ लपूनछपून शिकारीच्या जवळ जातो आणि शिकार बेसावध असताना मागून झडप घालतो.

मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक प्राण्याने आपापली स्ट्रॅटेजी तयार केली आहे. आणि ही स्ट्रॅटेजी वापरत असताना प्रत्येक प्रजाती स्वतःच्या शरीररचनेत बदल करत गेली आहे.

संकटांना सामोरे जाण्याची, आयुष्यातील युद्ध जिंकण्याची तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? विना धोरण सर्व अवहनांना सामोरे जाणे हे बहुतेकांच्या अपयशाचे खरे कारण असते.

धोरण (strategy) ठरवणे आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करणे (अनुकूलन) हे यशाचे सूत्र लक्षात ठेवा. बिझनेस असो वा खाजगी आयुष्य सगळीकडे योग्य धोरण आखून मार्गक्रमण केले तर जिंकता येते !!

वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यासाठी अशा स्ट्रॅटेजी तयार करायच्या असतील तर तुम्हाला दरोज  नवीन गोष्टी सतात शकले पाहिजे