बदलाची लाट...नव्हे त्सुनामी !
(छोटा धडा, मोठी शिकवण)
कॅमेऱ्याच्या शोध लागल्यापासून गेल्या काही वर्षांपर्यंत जेवढे फोटो काढले गेले....तेवढेच फोटो आता जगभरात साधारण एका दिवसात काढले जातात.
इंजिनमुळे चालणाऱ्या मोटार 1990 पर्यंत हजारात एकाकडे असायची आता मोठ्या शहरात हजारात शंभर लोकांकडे कार आहेत. आता इलेक्ट्रिक कार दहा हजारात एकाकडे आहे ...येत्या काही वर्षांत फक्त इलेक्ट्रिक कार्सच रस्त्यावर दिसतील. सर्वोत्कृष्ट इंजिन बनवणाऱ्या मर्सिडीज कंपनीने नुकताच आपण यापुढे पेट्रोल डिझेल इंजिनवर काम करणार नसल्याचे घोषित केले आहे. कारण भविष्य इलेक्ट्रिक गाड्यांचेच आहे.
पाहिले 50 मिलियन वापरकर्ते मिळवायला फेसबुकला 2.5 वर्षे लागली, व्हाट्सअप्पला 15 महिने, angry birds या खेळाला 15 दिवस तर पॉकेमन गो ला केवळ 5 दिवस लागले.
काही वर्षांपूर्वी ज्यांना ATM वापरायला भीती वाटत होती ते आज मोबाईल वरून धडाधड पेमेंट्स करत आहेत. आपल्याकडे 10-15 वर्षांपूर्वी स्मार्टफोन नव्हता यावर विश्वास बसत नाही. आजच्या पिढीला आपले आईबाबा गुगल शिवाय शिकलो होतो यावर विश्वासही बसणार नाही.
मित्रांनो बदल (change) शतकानुशतके घडतो आहे...त्यात काही वाद नाही. पण खरा प्रश्न आहे बदल ज्या वेगाने घडत आहे त्याचा. सरसर वाढणाऱ्या वेली सारखा तंत्रज्ञानातील बदल आपल्या आयुष्यात वेटोळे घालत पुढे सरकत आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही बदलाची सुरुवात धिमी असते...आणि अचानक काही वर्षांतच हा बदल प्रचंड वेग घेतो. हे सर्व इतक्या वेगाने घडतं की कधी घडलं ते कळत देखील नाही.
ज्यांनी येणाऱ्या बदलांचा अंदाज घेतला आणि त्यावर कृती केली ते पुढे गेले. ज्यांनी बदल स्वीकारला नाही ते मागे पडले आणि ज्यांना बदल होतानाच दिसला नाही त्यांची फरफट झाली. हा इतिहास आहे.
हाताने काम करण्यात, कलाकुसरीत माहिर असलेले भारत नि चीन हे दोन देश एकेकाळी GDP नुसार जगात सगळ्यात पुढे होते. पण युरोपने हातांच्या जागी मशीन्स आणल्या आणि औद्योगिक क्रांतीत बाजी मारली.
पुढे युरोप/अमेरिकेने माहितीच्या क्रांतीत प्रगती केली आणि गेली 25-30 वर्ष आघाडी घेतली. आता web 3.0, industry 4.0 या नव्या तंत्रज्ञानाची लाट येऊ घातली आहे. भारत आणि चीनला पुन्हा पुढे जायची संधी आहे.
अनेक कंपन्या, सरकारी संस्था आतापासूनच cross-skilling करत आहेत. कारण आताचे स्किल्स काही वर्षानंतर निरुपयोगी ठरतील. जुन्या गोष्टी विसरून (unlearn) , नव्या गोष्टी शिकून (learn) त्याचा सराव करणे (execute) ही त्रिसूत्री आपल्याला अंगी बाणवावी लागेल.
SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets
GITO - जिटो
G- guarding (protection)
regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102
#GITO
खूप कमी लोकांना त्यांच्या जीवनकाळात जग बदलून टाकणारा बदल पाहण्याचे भाग्य लाभते.आपण खरंच भाग्यवान आहोत कारण येत्या 20 वर्षात हा बदल घडताना आपण साक्षी असणार आहोत. मात्र केवळ साक्षी न राहता आपण या लाटेवर आरूढ होणार की या लाटेच्या तडाख्यात सापडणार हे आपले आपणच ठरवायचे आहे.